चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम (Best Cream For Pigmentation In Marathi)

वांग जाण्यासाठी क्रीम

आजकाल बदललेली जीवनशैली, प्रदूषण, धुळ, माती, अती मेकअप यामुळे महिलांना त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरं  जावं लागतं. यापैकीच एक त्वचेची समस्या म्हणजे चेहऱ्यावर वांग येणे ही आहे. बऱ्याच महिलांना पंचविस ते साठ या वयोगटात चेहऱ्यावर वांगचे डाग दिसू लागतात. यामागे त्यांच्या शरीरात होणारे हॉर्मोनल बदलही बऱ्याचदा कारणीभूत असतात. वांगचे डांग चेहऱ्यावरून समूळ जाऊ शकत नाहीत मात्र ते कमी नक्कीच होऊ शकतात.  आमच्याकडे वांग जाण्यासाठी क्रीम सांगा अशी मागणी नेहमी होत असते. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी क्रीमचे  काही प्रकार शेअर करत आहोत. ज्या क्रीमचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.

Table of Contents

  Kama Ayurveda Rejuvenating And Brightening Ayurvedic Night Cream

  कामा ब्रॅंडचं हे असं एक आयुर्वेदिक क्रीम आहे ज्यामध्ये खास केशराचा वापर करण्यात आलेला आहे. केशरामध्ये त्वचा उजळ करणारे आणि त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे काळे आणि जुनाट डाग विरह होऊ शकतात. ज्यामुळे या क्रीमचा वापर केल्यावर हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे डाग दिसेनासे होतात.  शिवाय या क्रीममध्ये केशरासोबतच कोरफड आणि त्वचेची निगा राखण्यारे इतर नैसर्गिक घटकही आहेत. या क्रिमच्या नियमित वापरामुळे तुमच्या त्वचेचा स्किन टोन सुधारतो, त्वचेवरील फाईन लाईन्स कमी होतात, सुरकुत्या येणं कमी होतं. हे एक नाईट क्रीम असल्यामुळे तुम्ही या क्रीमचा वापर दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर करू शकता.

  फायदे -

  • नैसर्गिक घटक आहेत
  • पॅराबेन फ्री आहे
  • मिनरल ऑईलचा वापर नाही
  • क्रुअल्टी फ्री आहे

  तोटे -

  • कोणतेही दुष्परिणाम अथवा तोटे नाहीत

  Skin Care

  Kama Ayurveda Rejuvenating and Brightening Ayurvedic Night Cream

  INR 1,292 AT Kama

  Oriflame Women's Optimals Even Out Replenishing Night Cream

  ओरिफ्लेम कंपनीची ही नाईट क्रीमदेखील तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर वांग घालवण्यासाठी क्रिम म्हणून वापरू शकता. कारण ओरिफ्लेमचे प्रॉडक्ट नैसर्गिक घटकांपासून बनलेले असतात. या क्रीममध्ये तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि व्रण घालवणारे गुणधर्म आहेत. सहाजिकच त्यामुळे तुमच्या त्वचेवरील वांगचे डाग देखील कमी होतात. त्वचेवरील काळे डाग, व्रण, पिगमेंटेशन कमी करून त्वचेला उजळ करण्यासाठी तुम्ही ओरिफ्लेमची ही नाईट क्रिम दररोज रात्री झोपण्यापूर्वी वापरू शकता. कारण नाईट क्रीम वापरण्याचे इतरही अनेक फायदे असतात.

  फायदे -

  • डर्मेटॉलिजिकली टेस्टेड आहे
  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर
  • हायड्रेटिंग फॉर्म्युला वापरण्यात आला आहे

  तोटे -

  • विशेष तोटे नाहीत

  Skin Care

  Oriflame Optimals Even Out Replenishing Night Cream

  INR 499 AT Oriflame

  St Botanica Vitamin C, E And Hyaluronic Acid DePigmentation Cream

  हे एक व्हिटॅमिन सी, ई आणि हायल्युनिक अॅसिड असलेलं डी पिगमेंटेशन क्रीम आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि वांगचे डाग कमी  होऊ शकतात. यातील व्हिटॅमिन्स आणि इतर नैसर्गिक घटक तुमच्या त्वचेला एजिंग मार्क्स पासून दूर ठेवतं. यातील सनस्क्रीनचे घटक तुमच्या त्वचेचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतं. या डीपिगमेटेंशन क्रीममुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने उजळ होते. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील वांगचे डाग, टॅनिंग आणि इतर काळे डाग कमी होतात. यामुळे तुमच्या त्वचेचा स्किन टोन बदलतो आणि उजळ होतो. यासाठी या क्रीममध्ये इसेंशिअल ऑईल आणि बोटॅनिकल अर्कांचा वापर करण्यात आलेला आहे.

  फायदे -

  • त्वचा उजळ होते
  • टॅन कमी होते
  • वांगचे डाग विरळ होतात
  • सनबर्न होत नाही
  • पॅराबेन फ्री आहे
  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे

  तोटे -

  • त्वचा तेलकट होण्याची शक्यता 

  Skin Care

  StBotanica Vitamin C, E & Hyaluronic Acid Depigmentation Cream

  INR 569 AT StBotanica

  Vaadi Herbals Lemongrass Anti Pigmentation Massage Cream

  वादी हर्बल्सचं हे क्रिम अॅंटि पिगमेटेंशन क्रीम आहे. ज्यामध्ये अॅस्ट्रिंजट आणि अॅंटि बॅक्टेरिअल घटकांचा भरपूर वापर करण्यात आलेला आहे. हे घटक तुमच्या त्वचेच्या मुळाशी जाऊन त्वचापेशींवर परिणाम करतात. या क्रिममुळे तुमच्या त्वचेवरील वांगचे डाग, काळे व्रण तर कमी होतातच शिवाय यामुळे तुमची त्वचा उजळ होते, स्किन टोन सुधारतो आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो दिसू लागतो. या क्रीमसोबतच चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय देखील तुम्ही करू शकता.

  फायदे -

  • नैसर्गिक घटक आहेत
  • जीएमपी सर्टिफाईड
  • प्राण्यांवर टेस्ट केलेलं नाही
  • शंभर टक्के केमिकल फ्री
  • पॅराबेन फ्री आहे
  • सेंद्रिय असल्याचे प्रमाणित आहे

  तोटे -

  • तोटे नाहीत

  Skin Care

  Vaadi Herbals Lemongrass Anti Pigmentation Massage Cream

  INR 165 AT Vaadi Herbals

  Kaya Clinic Pigmentation Reducing Complex

  काया कंपनीचं हे एक नाईट क्रीम आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे काळे डाग कमी होतात. या क्रीममुळे चेहऱ्यावरील काळे व्रण, सनटॅन, एजिंगच्या खुणा आणि वांगचे डाग अशा सर्व समस्या कमी होऊ शकतात. यासाठीच हे क्रीम रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून चेहऱ्यावर लावायला हवं. कायाचं हे नाईट क्रीम त्वचेत पटकन मुरतं आणि त्वचेवर परिणाम करतं. कंपनी या क्रीमचा परिणाम दोन आठवड्यात दिसेल असा दावा करते. त्यामुळे वांग घालवण्यासाठी क्रीमच्या शोधात असाल तर हे क्रीम अवश्य ट्राय करा. 

  फायदे -

  • वांगचे डाग कमी होतात
  • त्वचेवर पटकन मुरते
  • त्वचा हायड्रेट राहते
  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर

  तोटे -

  • परिणामांसाठी नियमित वापरावं लागते

  Skin Care

  Kaya Clinic Pigmentation Reducing Complex

  INR 580 AT Kaya Clinic

  Lotus Herbals Papayablem Papaya And Saffron Anti-Blemish Cream

  लोटस हर्बल्सची अनेक उत्पादने ही नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आलेली आहेत. या क्रीममध्ये लिंबाच्या सालींचा अर्क, अक्रोड तेल, व्हिटॅमिन ई आणि लवंग तेल वापरण्यात आलं  आहे. अक्रोड तेलामुळे तुमच्या त्वचेला मऊपणा मिळतो. व्हिटॅमिन ईमुळे तुमची त्वचा कंडिशनर होते, लवंग तेलामुळे त्वचेवरील डाग कमी होतात. विशेष म्हणजे यामध्ये पपईचा अर्क वापरण्यात आला आहे ज्यामुळे त्वचेवरील काळे आणि वांगचे डाग कमी होण्यास मदत होते. 

  फायदे -

  • वांगचे डाग कमी होतात
  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर
  • त्वचेवर लवकर परिणाम दिसतो
  • काळे डाग टॅन कमी होते

  तोटे - 

  • लवंग तेलाची अॅलर्जी असल्यास त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतो

  Skin Care

  Lotus Herbals Papayablem Papaya-n-Saffron Anti-Blemish Cream

  INR 312 AT Lotus Herbals

  RE' EQUIL Skin Radiance Cream

  या क्रीममध्ये वापरण्यात आलेल्या घटकांचा त्वचेत निर्माण होणाऱ्या मॅलेनिनवर परिणाम होतो. यातील सक्रिय घटकांमुळे मॅलेनिनची अती निर्मिती रोखली जाते. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे डाग कमी होतात. यासोबत या क्रीममुळे चेहऱ्यावरील काळे डाग, एजिंगच्या खुणा कमी होतात आणि त्वचा उजळ दिसते. या क्रीममध्ये असलेले अॅंटि एजिंग घटक तुम्हाला कायम तरूण आणि फ्रेश ठेवतात. यासाठीच स्किन केअर रूटिनमध्ये या क्रीमचा वापर जरूर करा. यासोबतच जाणून घ्या चेहऱ्यावर असतील वांग तर कसा करावा मेकअप

  फायदे -

  • सल्फेट फ्री
  • पॅराबेन फ्री
  • मिनरल ऑईलचा वापर नाही
  • चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात
  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर

  तोटे -

  • तोटे नाहीत

  Skin Care

  RE' EQUIL Skin Radiance Cream

  INR 441 AT RE' EQUIL

  Jovees Anti Blemish Pigmentation Cream

  जोविस कंपनीचं हे अॅंटि ब्लेमिश क्रीम तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे डाग कमी करण्यासाठीव वापरू शकता. कारण यामध्ये काही औषधी अर्क आहेत ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा स्किन टोन बदलतो. या क्रीमचा नियमित वापर केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे डाग कमी होत जातात. ज्याचा परिणाम तुमच्या स्किन टोनवर होतो. हे क्रीम पाण्यासारखं आणि वेलवेट टेक्चरचं आहे. ज्यामुळे ते तुमच्या त्वचेत लगेच मुरतं. 

  फायदे -

  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर
  • लाईटवेट
  • स्वस्त आणि खिशाला परवडणारे
  • पॅराबेन फ्री

  तोटे -

  • परिणाम दिसण्यास वेळ लागतो

  Skin Care

  Jovees Anti Blemish Pigmentation Cream

  INR 195 AT jovees

  VLCC De-Pigmentation Day Cream

  चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम हवं असेल तर व्हि एल सी सीचं हे डी पिगमेटेंशन डे क्रीम तुमच्या नक्कीच फायद्याचं आहे. यातील सक्रिय घटक तुमच्या त्वचेचं वातावरणातील प्रदूषणाचे घटक आणि सुर्य प्रकाशामुळे होणारे नुकसान टाळतात. यामध्ये असे नैसर्गिक घटक आहेत ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील वांगचे काळे डागही हळू हळू कमी होत जातात. 

  फायदे -

  • नैसर्गिक घटक
  • पॅराबेन फ्री
  • हानिकारक केमिकल्स नाहीत
  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त

  तोटे -

  • तीव्र सुंगध आहे
  • परिणाम दिसण्यास वेळ लागतो

  Skin Care

  VLCC De-Pigmentation Day Cream SPF 25

  INR 420 AT VLCC

  Olay Total Effect 7 In 1 Anti Ageing Skin Cream

  ओले कंपनीचं हे सेव्हन इन वन अॅंटि एजिंग क्रीम तुम्ही चेहऱ्यावरील वांग घालवण्याचे क्रीम म्हणून नक्कीच वापरू शकता. कारण हे एजिंगचे मार्क्स कमी करण्यासाठी वापरण्यास उपयुक्त असं डे क्रीम आहे. ज्यामुळे एजिंगच्या मुख्य सात त्वचेच्या समस्या कमी होतात. या क्रीममुळे तुमच्या चेहऱ्यावरील समस्या कमी होऊन त्वचा उजळ होते अशी कंपनी दावा करते. मेकअप केल्यावरही या  क्रीममुळे तुमची त्वचा फ्रेश आणि हायड्रेट राहते. शिवाय यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि वांगचे डाग कमी होतात. या क्रीममुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाईन लाईन्सची कमी होऊ शकतात. थोडक्यात एजिंग मार्क्स घालवण्यासाठी हे क्रीम वापरणं नक्कीच फायद्याचं आहे.

  फायदे -

  • SPF 15 देखील आहे
  • अॅंटि ऑक्सिडंट आहेत
  • चिकटपणा नाही

  तोटे -

  • पॅराबेनचे घटक आहेत
  • आर्टिफिशिअल सुंगधित घटक आहेत

  Beauty

  Olay Total Effect 7 In 1 Anti Ageing Night Firming Cream

  INR 346 AT Olay

  Beauty

  Manish Malhotra Cinnamon Ginger Night Gel

  INR 945 AT MyGlamm

  चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीमबाबत निवडक प्रश्न - FAQs

  1. चेहऱ्यावरील वांग घालवण्याचा जलद उपाय कोणता ?

  वांग घालवण्यासाठी क्रीम वापरणं हा चेहऱ्यावरील वांग कमी करण्याचा सोपा मार्ग आहे. त्याव्यतिरिक्त तुम्ही काही नैसर्गिक आणि घरगुती उपायही यासाठी करू शकता. अॅपल सायडर व्हिनेगर लावण्यामुळे वांगचे डाग कमी होऊ शकतात.

  2. चेहऱ्यावरील वांग पूर्णपणे निघून जाते का ?

  तुमच्या चेहऱ्यावर वांग कशामुळे आलं आहे आणि त्याचा प्रकार कोणता यावर वांग किती कमी होणार हे ठरू शकते. हायपरपिगमेटेंशन या प्रकारात त्वचेवर काळे डाग येतात. हे डाग पूर्ण नाहीशे झाले नाही तरी वांग घालवण्यासाठी क्रीम वापरून आणि घरगुती उपाय करून ते कमी होऊ शकतात.

  3. वांग आलेल्या त्वचेवर कोणते मॉईस्चराईझर वापरावे ?

  वांग आलेल्या त्वचेला नियमित मॉईस्चराईझर आणि सनस्क्रिन लावणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही बाजारात मिळणाऱ्या चांगल्या मॉईस्चराईझरचा वापर करू शकता. वादी, काया, जोविस या कंपन्या खास पिगमेंटेड त्वचेसाठी मॉईस्चराईझर तयार करतात.