ADVERTISEMENT
home / Diet
भाजी करताना नका टाकू कारळ्याच्या बिया, मधुमेहींसाठी ठरतात वरदान

भाजी करताना नका टाकू कारळ्याच्या बिया, मधुमेहींसाठी ठरतात वरदान

कारळ्याची भाजी जरी कडू लागत असली तरी ती आरोग्यासाठी खूपच चांगली असते. त्यामुळे जरी आवडत नसली तरी आपण आहारात कारळ्याच्या भाजी समावेश जरूर करतो. कारळ्याच्या भाजीत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, झिंक आणि फोलेट असतं. हे गुणधर्म भाजीप्रमाणेच त्यातील बियांमध्येही असतात. मात्र भाजी करताना आपण या बिया फेकून देतो. असं न करता त्याचा योग्य उपयोग केल्यास त्या मधुमेहींसाठी वरदान ठरू शकतात.

कारळ्याच्या बियांचे फायदे

कारळ्याच्या भाजीतील बिया न टाकता या बियांसकट कारळ्याची भाजी बनवा. याचप्रमाणे तुम्ही चटणी करण्यासाठी अथवा बिया सुककून त्याची पावडर करून या बिया वापरू शकता. कारण या बियांचे फायदे अनेक आहेत.

मधुमेहींना बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो

कारळ्याच्या बियांच्या माध्यमातून शरीराला पुरेसं फायबर मिळतं. शरीराचं मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी आणि खाल्लेल्या अन्नाचं योग्य पचन होण्यासाठी फायबर शरीराला उपयुक्त ठरतं. मधुमेहींना बऱ्याचदा बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. मात्र जर त्यांनी आहारात कारळ्याच्या बियांचा समावेश केला तर त्यांचा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.

ADVERTISEMENT

instagram

इन्सुलीन नियंत्रित राहते

जेव्हा शरीरात इन्शुलीनची कमतरता असते तेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. मात्र कारळं अथवा कारळ्याच्या बिया खाण्यामुळे ही प्रक्रिया नियंत्रित होते. कारण कारळ्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत नाही. कारळ्याच्या भाजीत इन्शुलीनप्रमाणे कार्य करणारे गुणधर्म असतात. यासाठी मधुमेहींना कारळ्याची भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारळ्याच्या बियांमुळे तुमची पचनक्रिया देखील सुरळीत होते. थोडक्यात जर मधुमहींनी नियमित कारळ्याच्या बियांसह भाजी खाल्ली तर त्यांचे यकृत, रक्तपेशी व रक्ताभिसरळ या क्रिया चांगल्या पद्धतीने होतात आणि त्यांचे आरोग्य सुधारते. 

कोलेस्ट्रोल कमी होते

शरीरात कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढणे मधुमेहींसाठी धोक्याचे असू शकते. कारण त्यामुळे मधुमेहींना ह्रदयविकार होण्याची शक्यता वाढते. कोलेस्ट्रोलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि ह्रदयाला रक्त पंप करण्यात अडचणी येतात. मात्र कारळ्याच्या बियायुक्त भाजीमुळे शरीरातील कोलेस्ट्रोल नियंत्रणात येते. ज्याचा चांगला परिणाम ह्रदयाच्या आरोग्यावर होतो.

 

ADVERTISEMENT

वजन कमी होते

मधुमेंहींना वजन नियंत्रणात ठेवण्याची अतिशय गरज असते. कारण अती वजनामुळे इतर शारीरिक समस्या वाढू शकतात. यासाठीच जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल. तर आहारात कारळ्याच्या बियांचा समावेश करा. आधीच सांगितल्यामुळे यात फायबरचे गुणधर्म असल्यामुळे खाल्लेले अन्न योग्य प्रकारे पचते आणि वजन नियंत्रणात राहते.

रोग प्रतिकारशक्ती वाढते

जर तुमची रोग प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर कोणत्याही आरोग्य समस्येला तोंड देणे सोपे जाते. यासाठी मधुमेहींची प्रतिकार शक्ती वाढणं गरजेचं आहे. कारळ्यात लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

तुम्ही यासाठी नियमित सकाळी उठल्यावर कोमट पाण्यातून कारळ्याच्या बियांची सुकवून केलेली पावडर घेऊ शकता. याचप्रमाणे नियमित आहारात कारळ्याची बियांसह भाजी, चटणी यांचा समावेश करा. ज्यामुळे तुमची रक्तातीस साखर नियंत्रित राहील. याचप्रमाणे मधुमेहींनी त्याच्या आहारात योग्य ते बदल अवश्य करावे. ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर वाढणार नाही. कारण कोणते पदार्थ त्यांच्यासाठी योग्य आणि कोणते अयोग्य हे मधुमेहींना माहीत असणं फार गरजेचं आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

बाजारातून आणलेली फळं आणि भाज्या धुताना अशी घ्या काळजी

बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास खा कच्च्या केळ्याची भाजी

Kitchen Tips : कांद्याशिवाय बनवा दाट रस्सा भाजी

ADVERTISEMENT
01 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT