परदेशातील अनेक फळ हल्ली भारतात सहज उपलब्ध होतात. अगदी द्राक्षाप्रमाणे दिसणारे गडद निळ्या रंगाचे आणि चिरडल्यानंतर जांभळ्या रंगाचा गर असलेले हे फळ हल्ली वर्षभर उपलब्ध असते. ब्लुबेरीजपासून आतापर्यंत तुम्ही अनेक रेसिपी बनवलेल्या पाहिल्या असतील. पण कधी त्वचेसाठी याचा कसा उपयोग होतो हे जाणून घेतले आहे का? ब्लुबेरी हे असे फळ आहे. ज्याच्या वापरामुळे तुमच्या त्वचेवरील पिंपल्सपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. ब्लुबेरीजमध्ये नेमके कोणते महत्वाचे घटक असतात आणि त्यांचा वापर कसा करायचा ते आपण आता जाणून घेऊया.
बीचवर टॅन व्हायचं नसेल तर अशी घ्या त्वचेची काळजी
ब्लुबेरीज असे फारच फायद्याचे
ब्लुबेरीज हे व्हिटॅमिन C ने युक्त असे फळ आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात जे त्वचेचे कोलॅजन वाढवून त्वचेला तजेला देण्याचे काम करतात. कोलॅजनची योग्य मात्रा त्वचेत असेल तर त्वचेच्या इतर समस्या कधीही होत नाही. पिंपल्ससाठी ब्लुबेरीज हे फारच फायद्याचे आहे. ब्लुबेरीजमध्ये असलेल्या घटकामुळे तुम्हाला जर पिंपल्सचा त्रास असेल तर तो दूर होते. त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा कमी होतो. त्यामुळे पिंपल्स येत नाही. याशिवाय त्वचेवरील सुरकुत्या कमी करत त्वचा चिरतरुण ठेवण्याचे काम करते.
आयब्रोजचा असा मेकअप केला तर चेहरा दिसेल आकर्षक
असा करा ब्लु बेरीजचा वापर
ब्लुबेरीजचे फायदे लक्षात घेत त्याचा वापर करण्याचा विचार करत असाल तर ब्लुबेरीजचा असा वापर तुम्ही करु नका.
- मुठभर ब्लु बेरीज घेऊन त्या एका भांड्यात काट्याच्या चमच्यामदतीने क्रश करुन घ्या.याची फार पेस्ट करु नका. त्यामध्ये एक चमचा दही घालून त्याचा मास्क तयार करा. हा मास्क ब्रशच्या मदतीने चेहऱ्याला लावा. हा मास्क चेहऱ्याला किमान 30 मिनिटं तरी ठेवून द्या. हा मास्क सुकल्यानंतर कोमट पाण्याने हा मास्क धुवून टाका. तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये नक्कीच फरक झालेला जाणवेल.
- जर तुमची त्वचा कोरडी असेल तर एका भांड्यात ब्लु बेरीज, एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि मध एकत्र करा. त्याची एक स्मुथ पेस्ट तयार करा. हा तयार झालेला मास्क तुम्ही चेहऱ्याला लावा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर हा मास्क टाळा.
- जर तुम्हाला स्किनलाईटनिंग असा मास्क हवा असेल तर तुम्ही ब्लुबेरीज आणि लिंबाचा वापर करु शकता. एका भांड्यात ब्लुबेरीज आणि लिंबाचा रस घेऊन त्याचा जाडसर क्रश करा. हा मास्क तुम्ही चेहऱ्याला लावून किमान 5 मिनिटं ठेवा. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल आणि लिंबाची जळजळ तुम्हाला जणवत असेल तर तुम्ही तो लगेचच काढून टाका. त्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होणार नाही.
- ब्लुबेरी आणि अॅलोवेराचा उपयोग करुनही तुम्हाला असा मास्क करुनही लावता येईल. अॅलोवेरा जेल घेऊन त्यामध्ये ब्लुबेरीजचा क्रश मिसळा आणि तो चेहऱ्याला लावा.हा मास्क चेहऱ्यावर तुम्ही 10 मिनिटांसाठी ठेवा. हा मास्क काढून तुम्ही चेहऱ्याला मॉश्चरायझर लावा.
- ब्लुबेरी नुसती चेहऱ्याला लावूनही तुम्ही त्याचे फायदे मिळवू शकता. ब्लुबेरी क्रश करुन तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. त्यामुळेही तुम्हाला ब्लुबेरीजचे पूर्ण फायदे मिळू शकतील.
आताच बाजारात जाऊन ब्लुबेरीज घेऊन या आणि असे मास्क ट्राय करा.