आपल्या रोजच्या लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याचा परिणााम हा सर्वात जास्त होतो तो आपल्या त्वचेवर. तुम्ही जर नियमित आपल्या शरीरयष्टीनुसार योग्य डाएट फूड खात असाल तर तुमची त्वचा ताजी आणि चमकदार दिसते. तर सतत अनियमित खाणेपिणे, तणाव, मसालेदार जेवण आणि व्यस्त लाईफस्टाईल असेल तर त्वचा अधिक निस्तेज आणि कोरडी दिसून येते. त्यामुळेच बऱ्याच जणांना चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तेलकट त्वचा, हार्मोन्समध्ये बदल, खाण्यापिण्याची वेळ नसणे यामुळे त्वचेवर मुरूमं होतात. सध्या अनेक महिलांना ब्लाईंड पिंपल्सचा (Blind Pimple) त्रास होताना दिसून येत आहे. अगदी सुरूवातीपासूनच ब्लाईंड पिंपल्सकडे लक्ष देण्यात आलं नाही तर त्याचे परिणाम अधिक वाईट होतात. त्वचा अतिशय खराब होते. त्यामुळे ब्लाईंड पिंपल्स यायला सुरू झाल्यावर लगेचच त्यावर घरगुती उपाय करणे सुरू करा. पण त्याआधी आपण ब्लाईंड पिंपल्स म्हणजे काय ते जाणून घेऊया.
ब्लाईंड पिंपल्स म्हणजे काय आणि का होतात
Freepik.com
ब्लाईंड पिंपल्स हे त्वचेवर दिसून येत नाही. हे त्वचेच्या आतच होत असल्याने तुम्हाला त्याचा जास्त त्रास होतो आणि यामुळे त्वचा अधिक खराब होते. ब्लाईंड पिंपल्स हे अतिशय त्रासदायक असतात. पण तुम्ही हाताने ते दाबल्यास, तुम्हाला त्रास होत नाही. नोडुल्स अर्थात ब्लाईंड पिंपल्समधून पस अर्थात पू देखील होत नाही. पण याची सुरूवात झाल्यानंतर याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्वचेमध्ये बॅक्टेरिया आणि सिबम जमा होण्यामुळे ही ब्लाईंड पिंपल्सची समस्या निर्माण होते. तेलकट त्वचा असेल तर ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. चेहऱ्यावर जर तुम्ही क्लिंन्झिंग करत नसाल तर पोर्स बॅक्टेरिया जमा होऊन ब्लाईंड पिंपल्स तयार होतात. हे पिंपल्स जाण्यासाठी उपचार करायला लागून साधारण एक महिना लागतो. कारण हे त्वचेच्या आतमध्ये असल्याने यावर उपचार लगेच सुरू केले तरीही यातून सुटका मिळविण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागतोच.
ब्लाईंड पिंपल्सवर घरगुती उपचार
मुरूमं कोणत्याही प्रकारचे असतील तरीही सतत त्यांना हात लावणे हे चुकीचे आहे. कारण यामुळे मुरूमांमध्ये अधिक वाढ होते. ब्लाईंड पिंपल्सवर तुम्हाला घरगुती उपचार करता येतात. नक्की कोणते घरगुती उपचार आहेत आणि त्याचा कसा उपयोग करायचा ते जाणून घेऊया.
टी ट्री ऑईल
Shutterstock
ब्लाईंड पिंपल ठीक करण्यासाठी टी ट्री ऑईल अत्यंत परिणामकारक मानण्यात येते. याचा वापर केल्याने त्वचेवर कमी जळजळ होते. तसंच हिवाळ्यात याचा वापर केल्यास, त्वचेची चमक अधिक वाढते. टी ट्री ऑईल लावताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की त्वचेवर याचा डायरेक्ट वापर करू नये. त्यासाठी तुम्ही सर्वात पहिले दोन चमचे टी ट्री ऑईल घ्या आणि त्यात एक चमचा बदाम तेल मिक्स करा. दोन्ही व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर कापसाच्या मदतीने हे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा. काही वेळ तसंच ठेवा आणि मग चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
मध
Shutterstock
मध हे केवळ शरीरासाठीच परिणामकारक नसते तर मधामधील अँटिमायक्रोबायल तुमच्या चेहऱ्यावर आलेले मुरूम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसंच मधाने चेहऱ्यावर जळजळ होत नाही. चेहऱ्यावर मध लावण्यासाठी तुम्ही कापसाचा वापर करा. त्यानंतर काही वेळाने सुकल्यावर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
कोरफड
Shutterstock
कोरफडचा वापर केल्याने चेहऱ्यावर जळजळ पटकन कमी होते. तसंच मुरूमं कमी करण्यासाठी कोरफड हा उत्तम नैसर्गिक उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्याला ब्लाईंड पिंपल्स असतील त्याठिकाणी कोरफड जेल लावा आणि रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठल्यावर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
ग्रीन टी
Shutterstock
ग्रीन टी चा वापर केल्याने वजन कमी होते हे सर्वांनाच माहीत आहे. पण चेहऱ्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. ब्लाईंड पिंपल्स दूर करण्यासाठी ग्रीन टी चा वापर करावा. एक ग्रीन टी बॅग तुम्ही फ्रिजमध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर नंतर बाहेर काढून ब्लाईंड पिंपल्सवर लावा. यामुळे पिंपल्स जाण्यास मदत मिळते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक