ADVERTISEMENT
home / सौंदर्य
चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी उपाय

चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी उपाय |चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय

तुम्हाला जेव्हा तजेलदार आणि अप्रतिम त्वचा हवी असते त्यामध्ये सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे पिंपल्स अर्थात चेहऱ्यावर येणारी मुरूमं. तुम्हाला जेव्हा एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला जायचं असतं, तेव्हा तुमचा ड्रेस कितीही सुंदर असला तरीही जर तुमच्या चेहऱ्यावर लहानशी जरी पुळी असली तरीही त्या पुळीकडे सर्वात पहिले लक्ष जातं. खरं आहे ना? आणि कितीही काहीही केलं तरी अशा मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी एखादी तरी पुळी चेहऱ्यावर येतेच असंही बऱ्याच जणींच्या बाबतीत घडलं असेल? हो ना? त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी पिंपल्स अर्थात मुरूमं घालवण्यासाठी लागणारी सर्व माहिती घेऊन आलो आहोत. नेहमी तुमची त्वचा नितळ राहील यासाठी ही माहिती वाचून नक्की हा लेख बुकमार्क करून ठेवा. तुम्हाला नक्की कायमस्वरूपी हा लेख उपयोग पडेल याची हमी आम्ही तुम्हाला देतो. जाणून घेऊया चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी उपाय (pimples treatment at home in marathi).

मुरुमं म्हणजे नक्की काय ? (Pimple Meaning In Marathi)

कोणतीही अडचण सोडविण्यासाठी ती अडचण नक्की काय आहे हे समजून घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. पिंपल्स अर्थात मुरूमं साधारणतः आपल्या शरीरावरील चेहरा, पाठ, छाती आणि खांदे या भागामध्ये येत असतात. जेव्हा ऑईल ग्लॅन्ड्स (sebaceous glands) ला संसर्ग होतो तेव्हा मुरूमं यायला सुरुवात होते. Sebaceous glands त्वचेच्या आतमध्ये असून सिबम निर्माण करण्याचं काम करत असतात. जेव्हा त्वचेचं बाह्य आवरण हे तेलकट सिबमच्या सान्निध्यात येत असतं तेव्हा अॅक्ने अर्थात मुरूमं चेहऱ्यावर तयार होतात.

कोणत्याही वयात ही पुळी येत असून साधारण लाल रंगाची सूज येणारी अशी ही पुळी असते ज्याला पिंपल अथवा मुरूम असं म्हटलं जातं. खरं तर पुळ्या तारूण्यात जास्त प्रमाणात येतात त्यामुळे त्याला तारूण्यपिटीकादेखील म्हटलं जातं. जेव्हा तुमची त्वचा जास्त जाड असते तेव्हा पुळ्यांचं प्रमाण जास्त असतं. जास्तीत जास्त मुलींना वा महिलांना त्यांच्या पाळीच्या कालावधीमध्ये अशी मुरूमं चेहऱ्यावर येत असतात. त्यांच्यातील हार्मोन्सचे होणारे बदल वा असंतुलन, तसंच sebaceous glands जास्त प्रमाणात काम करत असल्यास, मुरुमं येतात.

मुरूमांचा प्रकार काय आहे ते ओळखणे (Types Of Acne In Marathi)

आता आपण वाचलं की मुरूमं म्हणजे नक्की काय असतं आणि कोणत्या कारणांमुळे चेहऱ्यावर मुरूमं अर्थात पिंपल्स येऊ शकतात. आता आपण पिंपल्सचे काय प्रकार असतात ते पाहूया – 

ADVERTISEMENT

पॅपल्स

मुरूमांमध्ये दिसत असलेल्या लाल रंगावरून हे पॅपल्स असल्याचे अोळखावं. बऱ्याचदा हा मुरूमांचा प्रकार चेहऱ्यावरच दिसून येतो आणि अतिशय संवेदनशील आणि दुखणारी अशी ही पुळी असते. जेव्हा तुमच्या छिद्रामध्ये तेल आणि किटाणू अडकून राहतात तेव्हा अशा स्वरूपाच्या पॅपल्सना तुम्हाला सामोरं जावं लागतं. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जळजळदेखील जाणवते. अशावेळी तुम्हाला अतिशय काळजी घ्यायला हवी कारण अशी पुळी फुटल्यास अथवा तुमचा हात लागल्यास, कायमस्वरूपी त्याचा डाग तुमच्या चेहऱ्यावर राहण्याची शक्यताही असते.

सायस्टस

तुम्हाला जर तुमच्या शरीरावर वा चेहऱ्यावर एखादा मोठं, लाल आणि दुखणारं असं मुरूम आढळलं तर त्याला सायस्टस असं म्हटलं जातं. तुमच्या चेहरा, छाती आणि पाठीवर जास्त प्रमाणात अशा प्रकारची मुरूमं येतात आणि त्याची त्वरीत काळजी घेतली जाणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा तुमच्या त्वचेवरील छिद्र बंद होतात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर पिंपल अथवा पॅपल यायला सुरुवात होते. त्यावर संसर्ग झाल्यावर त्यामध्ये पू जमा होतो. जर तुम्हाला असा जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांकडे जाणं गरजेचं आहे. तेही अगदी लवकराfत लवकर!

ब्लॅकहेड्स

ब्लॅकहेड्स हा देखील मुरूमांचा अगदी सौम्य प्रकार आहे. अगदी लहान स्वरुपात तुमच्या त्वचेवर ब्लॅकहेड्स तयार होतात. ब्लॅकहेड्सचा अनुभव तुम्हाला नेहमीच येत असेल मात्र तुमच्या हेदेखील लक्षात येत असेल की, ब्लॅकहेड्समुळे कोणतंही दुखणं उद्भवत नाही. पण जेव्हा तुम्हाला ते काढून टाकायचे असतात…तेव्हा मात्र नक्कीच दुखतं.

आमची ब्युटी प्रॉड्युसर, चेरी कशा प्रकारे ब्लॅकहेड्सपासून सुटका मिळवत आहे, ते या व्हिडिओमधून नक्की पाहा.

ADVERTISEMENT

व्हाईटहेड्स

व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्सची कारणं समानच आहेत. डेड सेल्स अथवा जेव्हा केसांचे फॉसिकल्स उघडत असताना तेलाशी संबंध येतो तेव्हा व्हाईडहेड्स आणि ब्लॅकहेड्स तयार होत असतात. जर हवेशी संबंध आला तर ते काळे होतात आणि जर संबंध नाही आला तर ते पांढरे होतात.

मुरूमं येण्याची काय कारणं आहेत ? (Causes Of Pimples In Marathi)

जेव्हा तुम्हाला एखाद्या अडचणीवर उपचार हवा असतो तेव्हा त्याची नक्की कारणं काय आहेत आणि तुम्ही कोणता उपचार निवडायला हवा हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. विशेषतः तुमचं उत्तर बऱ्याच प्रश्नांसाठी एकच असेल तेव्हा. तुम्ही नीट आहार घेत नसाल किंवा तुमचं शरीर हार्मोनल बदलामधून सध्या जात असेल वा तुम्ही तुमच्या त्वचेसाठी योग्य उत्पादन वापरत नसाल यापैकी काहीही कारण असू शकतं. आम्ही खाली तुम्ही ती सर्व कारणं देत आहोत, ज्यामुळे मुरूमं अर्थात पिंपल्स येतात –

तारूण्यावस्था

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय

आपण वर चर्चा केल्याप्रमाणेच, तारूण्यावस्थेत पिंपल्स येण्याचं प्रमाण जास्त असतं कारण शरीर हे हार्मोनल बदलांमधून जात असतं. साधारणतः 10 ते 14 वर्षांच्या मुली आणि 12 ते 16 वर्षांच्या मुलांमध्ये हे प्रमाण आढळतं. याच वयामध्ये sebaceous glands जास्त प्रमाणात कार्यरत असतात आणि त्यामुळे पिंपल्स येतात. वेबएमडी (WebMD) नुसार 80% तरूणांना ही मुरूमांची समस्या उद्भवतेच.

प्रदूषण

आपल्या त्वचेला हानी पोहचवण्यामध्ये सर्वात मोठं कारण प्रदूषणदेखील आहे. अर्थात मुरूमं येण्याच्या प्रमुख कारणांपैकी जरी प्रदूषण नसलं तरीही तुमच्या चेहऱ्यावर हवेतून येणारी धूळ आणि घाण ही त्वचेवरील छिद्रं बंद करते आणि त्यामुळे त्वचेला हानी पोहचते. इतकंच नाही तर आपल्या त्वचेची काळजी घेणारा नैसर्गिक तेलाचा थर आपल्या त्वचेवर असतो तोदेखील या हवेतील प्रदूषणामुळे असमतोल होतो आणि पुरळ अथवा मुरूमं येण्याला कारणीभूत ठरतं.

ADVERTISEMENT

वाचा – पुरळ घरगुती उपाय

खाण्याच्या सवयी

तुमच्या रोजच्या खाण्याच्या सवयीदेखील महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही रोज चिप्स अथवा तेलकट नाश्ता करता तेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेमधील होणारा बदल लक्षात घेता का? कधीच कळत नाही ना तुम्हाला? वास्तविक, महिनाभर जंक फूड न खाता तुमच्या नियमित आहाराकडे लक्ष द्या आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेमधील फरक जाणवायला लागेल. यामध्ये काही प्रत्येकवेळा कोणत्या मॅगझिनमध्ये सांगितलं आहे किंवा फॅशन आहे असं नाही, तर यामागेदेखील वैज्ञानिक कारणं असतात. काही पदार्थांमध्ये तुमच्या ग्रंथींमध्ये इन्शुलिन निर्माण करून तेलही निर्माण करण्याची क्षमता असते, ज्याचा परिणाम हा चेहऱ्यावर मुरूमं येण्यामध्ये परावर्तित होतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला मुरूमांपासून सुटका हवी असते तेव्हा भात, ब्रेड आणि साखर यांसारखे पदार्थ खाणे नक्की टाळा. त्याऐवजी फळ, भाजी आणि धान्यांचा जास्त वापर करा. कोणत्याही पिझ्झापेक्षा कधीही सलाड मागवणं फायदेशीर ठरू शकतं.

तणाव

तुम्हाला जाणवतं का महिनाभर वाट पाहात असलेल्या मोठ्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी किंवा अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीच तुमच्या चेहऱ्यावर पिंपल येतात. हे फक्त तुमच्याच बाबतीत आहे असं नाही. 2013 मध्ये करण्यात आलेल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या अभ्यासात निष्पन्न झालं आहे की, सिबममुळे तुमचे फॉलिकल्स बंद होतात आणि तणावामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरूमं येतात. त्यामुळे तुम्ही कोणत्या तरी तणावाखाली आहात हेदेखील कळून येतं.

हार्मोनल असमतोल

तारूण्यावस्थेत तुमचं शरीर हे हार्मोनल बदलांमधून जात असतं. तुमची विशी उलटल्यानंतरही अशी स्थिती बऱ्याचदा उद्भवत असते. तुमच्या शरीरातील अँन्ड्रोजेन पातळी वाढल्यानंतर तुमच्या शरीरावर हार्मोनल अॅक्ने दिसू लागतात. तसंच सिबमची निर्मिती जास्त होण्यामागेही हेच कारण आहे, जे पिंपल्ससाठीही कारणीभूत ठरतं. स्त्रियांकरिता साधारणतः हार्मोनल बदल हे त्यांच्या पाळीच्या दिवसांमध्येही होत असतात.

ADVERTISEMENT

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी उपाय (How To Remove Pimples In Marathi)

तर आता सर्वात महत्त्वाचा टप्पा – चांगलं दिसण्यासाठी या मुरुमांपासून सुटका नक्की कशी मिळवायची? नक्की कोणत्या प्रकाराचे अॅक्ने आहे हे कळल्यानंतर आणि त्याची कारणं काय आहेत हे समजल्यावर त्यांच्यापासून नक्की कशी सुटका मिळवायची याची तुम्हाला चांगली संधी आहे. यासाठीच करा पिंपल्स चे डाग घालवण्यासाठी उपाय.

नैसर्गिक उपाय

आपल्या शरीरावर इतर त्वचेपेक्षा आपल्या चेहऱ्यावरील त्वचा ही अधिक संवेदनशील असते. त्यामुळे, सावधगिरीने वागणं जास्त गरजेचं आहे. जर तुमच्या शरीरावर नुकतेच पिंपल्स येण्यास सुरुवात झाली असेल तर, तुम्ही सर्वात पहिल्यांदा नैसर्गिक उपचार शोधण्याचा प्रयत्न करा. तुमची त्वचा ही अतिशय संवदनशील असल्यामुळे, नैसर्गिक घटक तुमच्या त्वचेकरिता जास्त योग्य आहेत.

ही समस्या सोडविण्यासाठी, जोजोबा तेल चांगलं असतं. तुमच्या त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यासाठी याची ओळख आहेच आणि तुमच्या त्वचेला योग्य राखण्यासाठी लागणारे अँटी-इन्फ्लेमेटरी घटकही यात आहेत.

दुसरा चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी उपाय म्हणजे कोरफड जेल. यामध्ये किटाणू, व्हायरस आणि फंगस यांच्याशी दोन हात करणारे, अँटी-इन्फ्लेमेटरी फॅटी अॅसिड्स (कोलेस्ट्रॉल, कँम्पेस्ट्रॉल आणि बी-सायटोस्ट्रॉल याचा समावेश असतो. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावण्यासाठी घरच्याघरीदेखील हे तयार करू शकता. यासाठी तुम्हाला हळद, दही आणि मधाचं मिश्रण करावं लागेल. कच्च्या मधामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी घटकांचं प्रमाण असतं, तर दह्यामध्ये नैसर्गिक घटक असतात जे तुमच्या चेहऱ्यावर चांगलं स्क्रब करू शकतात आणि हळद तुमच्या त्वचेला अधिक उजळवते. या तिघांचं मिश्रण तुमच्या चेहऱ्याला लागल्यानंतर मुरूमं येण्याची संधीच नाही.

ADVERTISEMENT
चेहऱ्यावरचे फोड जाण्यासाठी घरगुती उपाय

हर्बल उत्पादने

तुम्हाला जर घरच्या घरी फेस मास्क बनविण्यात काही अडचण येत असेल तर बाजारामध्ये अशी बरीच उत्पादनं उपलब्ध आहेत. लोटस हर्बल्स, कामा आयुर्वेद, हिमालया, फॉरेस्ट इसेन्शियल्स यासारख्या सर्व ब्रँड्समध्ये हर्बल उत्पादनांचा समावेश असतो आणि त्यामुळे तुमच्या संवेदशील त्वचेकरिता ही उत्पादनं चांगली असतात.

औषधी उत्पादने

हर्बल उत्पादनांव्यतिरिक्त, पिंपल्स घालवण्यासाठी इतर बरीच उत्पादनही असतात जी आपण वापरू शकतो. पण अशी उत्पादनं वापरण्यापूर्वी आपल्या व्यावसायिक त्वचारोगतज्ज्ञाकडून त्याबद्दल व्यवस्थित माहिती करून घ्यायला हवी. डॉ. अपर्णा संस्थानम, प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, संसर्ग टाळण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी रोज कमी डोस असलेल्या गोळ्या तुम्ही घेऊ शकता. त्याने तुम्हाला नक्कीच मदत होईल. शिवाय गोळ्या चालू राहिल्यामुळे तुम्हाला मुळापासून तेल काढून टाकण्यासाठी आणि चेहऱ्यावरील मुरुमं कमी होण्यासाठीदेखील मदत होते. ट्रेटिनॉईन, अडापलेन आणि टाझारोटेन हे सर्वात जास्त वापरले जाणारे औषध आहे पण अर्थातच तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच या औषधांचा वापर करायला हवा. तुमच्या चेहऱ्यावरील तेल कमी करण्यासाठी नक्कीच याचा वापर चांगला आहे. मात्र तुमच्या त्वचेसाठी हे वाईट ठरू शकते. त्यामुळे तुम्ही मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे.

चेहऱ्यांवरील मुरुमांसाठी तुम्हाला डॉक्टरांची गरज असल्यास, आम्ही तुम्हाला काही त्वचारोगतज्ज्ञांची यादी देत आहोत, भारतातील नऊ प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञांची यादी जाणून घेण्यासाठी सेक्शन 9 पाहा.

कॉस्मेटिक उत्पादने

चेहऱ्यांवरची मुरुमं घालवण्यासाठी बाजारामध्ये अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. आम्ही तुमच्यासाठी काही खास उत्पादनांची यादी आणली आहे, त्यावर एक नजर –

ADVERTISEMENT

1. Sebamed Soap: सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमचा साबण बदलणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचा बॉडी वॉश हा क्लिनिंग बारबरोबर बदला. त्यामुळे तुमच्या त्वचेवरील छिद्र साफ होती आणि शिवाय तुमच्या त्वचेवर येणाऱ्या मुरुमांना रोखण्यासाठी याची मदत होईल. किंमत: रू. 199.
2. Mederma cream: चेहऱ्यावर राहिलेले मुरुमांचे डाग काढण्यासाठी हे मलम अतिशय उपयुक्त आहे. आपल्या चेहर्यावर मुरुमांसाठी क्रीम लावा. किंमत: रू. 380.
3. Neutrogena Oil-Free Acne Wash: एन्साक्लोपिडियानुसार, त्वचा आणि केसांच्या निरोगाी आणि सुदृढतेसाठी ग्राहकांना योग्य वैद्यकीय आणि व्यावसायिक उत्पादनं जगभर पुरविणे आणि पोचवणे हीचे न्यूट्रोजेनाचे उद्दिष्ट आहे. हेच लक्षात ठेऊन याचा फेस वॉश दिवसभातून वापरावा. त्यामुळे त्वचेवरील धूळ निघून जाण्यास आणि त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते. किंमत: रू. 399.
Bioderma White Objective Fluid: यादीमध्ये या उत्पादनाचं नाव हे असायलाच हवं. बायडर्मा व्हाईट ऑब्जेक्टिव्ह फ्लुईडमध्ये अझेलिक अॅसिड आणि अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड असल्यामुळे चेहऱ्यावरील मुरूमं घालवण्यास मदत होते. किंमत: रू. 2,160.

डाएटमधील बदल

तुमच्या खाण्याची सवय कशाप्रकारे बाधक ठरू शकते हे आपण बोललो आहोतच. त्यामुळे यातून बाहेर येण्यासाठी नक्की कशाप्रकारे डाएटमध्ये बदल असायला हवा हे महत्त्वाचं आहे. बाहेरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे अॅक्ने अर्थात मुरुमांमध्ये वाढ होण्याची बरीच शक्यता असते. ओमेगा – ३ असणारे खाद्यपदार्थ अर्थात मासे आणि सुका मेवा हे मुरूमं घालवण्यासाठी चांगले खाद्यपदार्थ असल्याचे सिद्ध झाले आहे. तुम्ही कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत याची ही यादी –

तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करण्याचे पदार्थ –

भाज्या
फळे
धान्य
मासे
सुका मेवा
सोया

ADVERTISEMENT

टाळण्याच्या गोष्टी:

पांढरा ब्रेड
सफेद भात
साखर
दूध उत्पादने

राहणीमानातील बदल

तुम्ही राहात असलेले वातावरण आणि तुमच्या हार्मोन्समधील बदलामुळे सर्वात जास्त मुरुमं चेहऱ्यावर येत असतात. तुमच्या चेहऱ्यावरील ही मुरुमं घालवण्यासाठी तुम्हाला तुमच्या राहणीमानात बदल करण्याची आवश्यकता असते. तुम्हाला रोज आठ तास झोप मिळेल याची नक्की काळजी घ्या. नियमित जेवण जेवा आणि नियमित त्वचेची काळजी घ्या.

कधीही पिंपल्स फोडू नका 

चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्स फोडणं हे नेहमीच आपल्याला करावं असं वाटत असतं. विशेषतः तेव्हा जेव्हा तुमच्या अगदी चेहऱ्याच्या मध्यभागी मुरुमं पिंपल्स आलेले असतात. असं करणं हे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतं. यामुळे केवळ कायमस्वरूपी डागच नाही तर तुमच्या त्वचेला हानीही पोहचू शकते. त्यामुळे तुम्हाला जर पिंपल्स आल्या असतील तर त्याला हात न लावता आणि न फोडता स्वस्थ राहा.

ADVERTISEMENT

चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी उपाय (How To Remove Pimple Marks In Marathi)

आता आपण यातून कसं वाचावं हे पाहिलं, पण मुरुमांचे राहिलेले डाग कसे काढावेत हे आपण आता पाहणार आहोत. हे डाग काढणं थोडं कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही. ते जाण्यासाठी थोडा वेळ लागेल. पण हे डाग जातील नक्की. मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या.

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय (How To Remove Pimples At Home In Marathi)

जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरचे डाग काढण्याचा प्रयत्न करत असता, तेव्हा तुम्ही सर्वात पहिल्यांदा घरगुती उपाय करायला हवेत. तुमची त्वचा जर अगदीच संवेदनशील असेल, तर त्यासाठी सर्वात चांगले चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय असतात. नैसर्गिक घटकांची एक यादीच आम्ही तुम्हाला सुचवत आहोत.

नारळाचे तेल : खराब केसांसाठी नारळाचं तेल हा चेहऱ्यावरचे फोड जाण्यासाठी सर्वोत्कृष्ट घरगुती उपाय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. पण तुमचा चेहरा चांगला राहण्यासाठी खोबरेल तेल हा चांगला उपाय आहे. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल घटक असल्यामुळे शरीरातील टॉक्झीन्स लांब ठेवण्यासाठी याची मदत होते. तुम्हाला रोज डाग असलेल्या ठिकाणी फक्त थोडसं तेल लावायचं आहे. त्यामुळे डाग जाण्यास मदत होते.

कोरफड : केवळ तुमची मुरमं घालवण्यासच कोरफडीचा उपयोग होत नाही तर, तुमच्या त्वचेवरील वेदना घालवण्यासाठीही याचा उपयोग होतो. मुरुमांमध्ये कोरफड फायदेशीर आहे.

ADVERTISEMENT
चेहऱ्यावर फुटकुळ्या का येतात

अन्य उत्पादनं

जेव्हा तुम्हाला घरगुती उपायांनाही बरं वाटत नाही, तेव्हा तुम्हाला इतर गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. आम्ही सध्या तुमच्या सौंदर्यासाठी वापरता येऊ शकतील अशा उत्पादनांबद्दल बोलत आहोत. तुम्हाला त्यापैकी नक्की कोणतं उत्पादन निवडावं हे सांगत आहोत. आमची आवडती दोन उत्पादनं खालीलप्रमाणे आहेत –

Biotique Bio Myristica Spot Correcting Anti-Acne Face Pack: या फेसपॅकमध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असल्यामुळे त्वचेवरील डाग जाण्यासाठी मदत होते. हे केवळ डाग घालवण्यासाठीच मदत करत नाही तर, आलेल्या पिंपल्सवरील बॅक्टेरिया नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करते.

Sebamed Clear Face Care Gel Ph5.5: बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या उत्पादनांपैकी हे एक उत्पादन आहे. यामध्ये असणारे अथनॉल हे पिंपल्स घालवण्यासाठी मदत करते.

पिंपल्स झाकण्यासाठी कसा करावा मेकअप? (How To Hide Pimples With Makeup)

तुम्ही पिंपल्स आणि त्वचेवरील पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी प्रयत्नामध्ये असाल, तर आमच्याकडे चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी उपाय आहे. होय, आम्ही जादुई मेकअपबद्दलच बोलत आहोत. तुमच्या पिंपल्स अर्थात मुरुमं दिसू नयेत यासाठी स्टेप – बाय – स्टेप प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

ADVERTISEMENT

काय पावलं उचलावीत:

Step 1: प्रायमर
तुम्ही तुम्हाला मेकअप सुरु करण्यापूर्वी तुमचा कॅनव्हास अर्थात चेहऱ्याची पहिली प्रक्रिया काय असायला हवी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. परिणामकारक प्रायमर कन्सील तुमच्या त्वचेची छिद्र उघडण्यास मदत करतात आणि तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या न दिसता तुमचा बेस अप्रतिम करतात. तुमचा मेकअप चांगला करण्यासाठी याचा उपयोग होतो.

Step 2: कन्सीलर
तुमच्या शेडचे कन्सीलर घ्या आणि तुमच्या त्वचेवर जिथे गरज आहे तिथे लावा. नीट लावण्याची एक पद्धत असते. तुमच्या स्कीन टोनची योग्य शेड वापरून तुम्ही याचा वापर करावा. तुमच्या त्वचेवर कन्सीलर घासू नका. तुमच्या त्वचेवर अगदी हलक्या हाताने याचा वापर करावा.

Step 3: फाऊंडेशन
तुमच्या चेहऱ्यावर खराब पॅच येतील अशा तऱ्हेने न लावता अगदी हलक्या हाताने फाऊंडेशनचा वापर करा. अति फाऊंडेशन घेऊ नका. तसंच तुमच्या मानेलाही फाऊंडेशन लावायला विसरू नका.

मुरुमं घालावण्याचे इतर परिणामकारक उपाय तुम्हाला इथे पाहता येतील. कशा प्रकारे याचा वापर करावा हे पाण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहू शकता.

ADVERTISEMENT

कोणते मेकअप उत्पादन वापरावे? (Makeup Products For Pimples In Marathi)

तुमची त्वचा अतिशय संवदेनशील असते, त्यामुळे तुम्ही वापरत असलेल्या उत्पादनांची अधिक काळजी घ्यावी. निरोगी आणि आनंदी त्वचेसाठी अशी मेकअपची उत्पादने निवडा जी तेलविरहित असतील आणि तुमच्या त्वचेला चांगली जपू शकतील. त्यासाठी आम्ही काही उत्पादनांची शिफारस करत आहोत.

1. प्रायमर: तुम्हाला जर प्रायमर हवं असेल तर, आम्ही तुम्हाला ला गर्लचे प्रो प्रेम एचडी फेस प्रायमर सुचवू इच्छितो याची किंमत केवळ रू. 592 आहे. हे तुमच्या त्वचेसाठी चांगलंच ठरतं असं नाही, तर तुमची त्वचा दिसायलादेखील सुंदर दिसते.

2. फाऊंडेशन: क्लिनिक तुमच्या पाकिटात असणे नेहमीच चांगले. अतिशय संवेदनशील असणाऱ्या त्वचेसाठी हा ब्रँड खूपच चांगला आहे.

POPxo recommends: Clinique Even Better Makeup Broad Spectrum (रू. 2990)

ADVERTISEMENT

3. कन्सीलर: तुम्हाला अशा उत्पादनाची गरज आहे, जे अतिशय क्रिमी असेल आणि त्याचा तुमच्या चेहऱ्यावर खूपच चांगला फरक पडू शकेल. त्यासाठी आमच्याकडे तुमच्यासाठी एक उत्पादन आहे. एल. ए. गर्ल्स प्रो कन्सिलर एचडी रू.. 595 नक्की वापरा. ही अतिशय लहान ट्यूब असते पण याचे उपयोग मोठे आहेत.
अक्ने – प्रोन स्किनसाठी अधिक चांगली उत्पादनं कोणती हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

पिंपल्सची काळजी कशी घ्याल (How To Prevent Pimples In Marathi)

एका रात्रीत उपचार

एखाद्या मित्र-मैत्रिणीच्या घरी राहण्याची योजना अथवा कुटुंबातील कोणाचं तरी लग्न वा कोणतातरी महत्त्वाचा कार्यक्रम काहीही असेल तरी आपली तयारी खूपच असते. असं असताना खूपच ताणही असतो आणि अशावेळीच आपल्याला चिंता सतावते ती अचानक आलेल्या पिंपल्सची. पण त्यासाठी कामी येतो तो मेकअप. अशावेळी तुमच्या सुजलेल्या, लाल झालेल्या त्या पुळीवर मेकअप करणे म्हणजे शिकस्त. पण तुम्ही नक्कीच घाबरून जाऊ नका. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळे पर्याय आणि परिणामकारक उपाय घेऊन आलो आहोत, जेणेकरून एका रात्रीत तुमच्या या पिंपल्स निघून जातील.

माऊथवॉश 

तोंडावर पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय

तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया आतून स्वच्छ करून त्यामध्ये ताजेपणा आणण्याचं कामच केवळ माऊथवॉश करतो असं नाही. तर तुमच्या चेहऱ्यावर आलेल्या पुळ्यांवरदेखील हे उत्तम काम करतं आणि पुळ्या पटकन सुकवण्याचंही कामा करतं. झोपण्यापूर्वी तुम्ही जर हे आपल्या चेहऱ्यावर लावलंत तर तुमची त्वचा सकाळी उठल्यानंतर नक्कीच चांगली झालेली तुम्हाला दिसेल.

टूथपेस्ट

पिंपल्स सुकवण्यासाठी टूथपेस्टचादेखील वापर करण्यात येतो आणि दिवसातून दोन वेळा टूथपेस्ट बाधित क्षेत्रावर लावल्यास, तुमच्या पुळ्या लगेच निघून जाण्यास मदत होते.

ADVERTISEMENT

भुसा केलेली अॅस्परिन गोळी

Aspirin for Pimples
महिलांनो ही गोळी फक्त डोकेदुखी थांबवण्यासाठी नाही. तर, यामध्ये असेल्या अँटीइन्फ्लेटरी घटकांमुळे पिंपल्स घालवण्यासाठीही याची मदत होते. अॅस्परिनची गोळी कुटून घ्या आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवा. तुमच्या पुळी आलेल्या जागेवर ही पेस्ट लावा आणि मग बघा काय जादू होते ती!

लसणाची कमाल 

लसणाच्या अँटीबॅक्टेरियल घटकांबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे. तुमच्या प्रतिकारशक्तीसाठी लसूण ही अतिशय फायदेशीर आणि उत्तम इलाज आहे. लसणाची एक पाकळी अर्धी अर्धी कापा आणि तुम्हाला आलेल्या पुळीच्या जागी लावा. तुमची त्वचा चांगली होण्यासाठी ही सर्वात जलद प्रक्रिया आहे.

पोहायला जा 

पोहणे हा यावरील सर्वात चांगला आणि फायदेशीर उपाय आणि व्यायाम आहे. पूलमधील पाण्यामध्ये पोहायला गेल्यामुळे पिंपल लवकर निघून जाण्यास मदत होते. स्विमिंग पूलमधील पाण्यामध्ये असलेल्या क्लोरिनचा चांगला परिणाम होतो. तुमच्या त्वचेवर आलेली पुळी लवकर सुकण्यासाठी त्याची मदत होते. हे नक्की ट्राय करून पाहा.

काही अल्कोहोलचीही मदत घेऊ शकता 

कॉकटेल पिण्याशिवाय काही अल्कोहोलमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल घटक असतात. तुम्हाला जर लगेच पुळी घालवायची असेल. तर काही प्रमाणात अल्कोहोल घेऊन पुळी आलेल्या ठिकाणी ते घासा आणि तुमची चिंता लगेच मिटेल. काही वेळातच त्वचेवरील पुळी नाहीशी होईल.

ADVERTISEMENT

सकाळी उठल्यावर आलेली लाळ

कदाचित हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल. पण सकाळी उठल्यानंतर तुमच्या तोंडात आलेली लाळ ही पिंपल्सवरील मोठा उपाय आहे. आप्लया तोंडात येणारी लाळ, सकाळी तोंड धुण्यापूर्वी लावल्यास, त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असतात आणि तुमच्या पिंपल्ससाठीदेखील हे फारच चांगलं असतं.

कायमस्वरूपी उपचार (Pimples Treatment In Marathi)

लेझर ट्रीटमेंट

भारतीय त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अप्रतिम गोएल यांच्या म्हणण्यानुसार, लेझर ट्रीटमेंट ही परिणामकारक आहे. तसंच आलेले डाग घालवण्यासाठी हे बरेच परिणामकारक आहे. जेव्हा तुम्हाला दिलेल्या गोळ्यांचा काही परिणाम होत नसतो तेव्हा हा खूपच चांगला पर्याय आहे. तुमचे इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी हे कायमस्वरूपी एनडी – याग लेझर खूपच चांगलं आहे.

सालिकयालिक अॅसिड आणि बेंझोयल पील्स

त्वचेवरील बाह्य छिद्रातील असेलेली घाण काढण्यासाठी सालिकयालिक अॅसिड चांगलं उपयोगी पडतं. तसंच बॅक्टेरिया कारणीभूत आणि तुमच्या चेहऱ्यावर आलेल्या पुळ्या घालवण्यासाठी चांगलं काम करू शकतं आणि बेंझोयल पेरॉक्साईड यावर उपचार करण्यासाठी मदत करते.

pimples on face removal tips in marathi

साधारण टीप्स

काही महत्त्वाचे उपचार सुरु करण्यापूर्वी आपले नेहमीचे उपचार करून पाहावेत. तुमची त्वचा आणि राहण्याची पद्धत नियमित आहे का? तुमची त्वचा चांगली आणि उत्तम राहण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. :

ADVERTISEMENT

1. दिवसातून दोन वेळा तुमचा चेहरा धुवावा.
2. रोज सनस्क्रिन वापरावं
3. फेसस्क्रब वापरणे टाळा
4. दिवसाच्या शेवटी नेहमी तुमचा मेकअप काढून टाका
5. तुम्ही वापरत असणारे मेकअप उत्पादन वापरताना काळजी घ्या
6. दिवसभर भरपूर पाणी प्या
7. जंक फूड खाणं टाळा

उत्तम त्वचेसाठी काही चांगले व्हिडिओज

08 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT