ADVERTISEMENT
home / Recipes
Amla Recipes In Marathi

घरीच बनवा या चटपटीत आवळा रेसिपीज (Amla Recipes In Marathi)

हिवाळ्यात आवळ्याचा सीझन असतो. या काळात सर्वत्र दिसणाऱ्या हिरव्या पोपटी रंगाच्या आणि लिंबाच्या आकाराप्रमाणे असणाऱ्या आंबट गोड चवीच्या आवळ्याची चव सर्वांनी चाखली असेलच. मात्र आवळा फक्त हिवाळ्यातच नाही तर तुम्ही बाराही महिने टिकवून ठेवू शकता. उन्हाळ्यातही मनसोक्त आवळा खाण्यासाठी त्याचं सरबत, लोणचं, मोरावळा, सुपारी बनवून ठेवली जाते. आवळ्यापासून असे विविध पदार्थ बनवले तर तुम्ही नेहमीच आवळ्याचा आस्वाद घेऊ शकता. यासाठीच ट्राय करा या स्वादिष्ट आणि चमचमीत आवळा रेसिपीज (amla recipe in marathi).

आवळा कॅन्डी (Amla Candy Recipe In Marathi)

आवळा कॅंडी हा खाण्यासाठी स्वादिष्ट आणि वर्षभर टिकणारा पदार्थ आहे. 

साहित्य – 

ADVERTISEMENT
  • वीस ताजे आवळे
  • अर्धा किलो साखर
  • थोडी पिठीसाखर

आवळा कॅंडी करण्याची कृती  –

आवळे स्वच्छ धुवून पाण्यात उकळत ठेवावे. दहा मिनिटांनी आवळे एका चाळणीत काढून ठेवावे. उकळल्यामुळे आवळ्याच्या कळ्या पडू लागतात. आवळ्यामधील बी काढून या फोडींवर साखर पेरावी. भांडे एका बाजूला ठेवून  द्यावे. दोन ते तीन दिवसांनी साखर विरघळून ती आवळ्यांच्या फोंडीमध्ये चांगली मुरते. दोन दिवसांनी आवळे कडक उन्हात वाळवून घ्यावे. सुकलेल्या आवळ्यांवर पिठी साखर लावून ते हवाबंद डब्यात भरून ठेवावे. 

Amla Candy Recipe In Marathi

Amla Candy Recipe In Marathi

ADVERTISEMENT

मोरावळा (Morawala Recipe In Marathi)

आंब्याच्या मुरांंब्याप्रमाणेच आवळ्याचा मोरावळा (Amla Murabba Recipe In Marathi) ही वर्षभर टिकवता येतो. 

साहित्य –

  • वीस ताजे आवळे
  • अर्धा किलो साखर
  • आल्याचा कीस
  • अर्धा चमचा वेलची पावडर
  • चवीपुरतं मीठ

मोरावळ्याची कृती –

आवळे स्वच्छ धुवून उकडून घ्यावे. थंड झाल्यावर त्याच्या बिया काढून ते स्मॅश करून घ्यावे. एका भांड्यांत आवळ्याचा गर, साखर, मीठ आणि आल्याचा कीस एकत्र करावा आणि मिश्रण मंद गॅसवर अर्धा तास शिजू द्यावे. मिश्रण भांड्याला चिकटू नये यासाठी सतत ढवळत राहावे. साखरेचा पाक होऊन आवळा त्यात शिजला की गॅस बंद करावा. वेलची पावडर टाकून थंड झाल्यावर मोरावळा हवाबंद डब्ब्यात भरून ठेवावा. यात साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता. 

ADVERTISEMENT

Morawala Recipe In Marathi

Morawala Recipe In Marathi

आवळ्याचं लोणचं (Amla Pickle Recipe Maharashtrian Style)

लोणचं हा अनेकांचा आवडता पदार्थ असतो. त्यात महाराष्ट्रीयन पद्धतीने केलेलं आवळ्याचं लोणचं (Amla Lonche Recipe In Marathi) म्हणजे अप्रतिमच.

ADVERTISEMENT

साहित्य –

  • वीस ताजे आवळे
  • एक चमचा लाल मसाला
  • एक चमचा मोहरी पावडर
  • एक चमचा मेथी पावडर
  • थोडंसं हिंग
  • चवीपुरते मीठ
  • एक वाटी तेल

आवळ्याचं लोणचं बनवण्याची कृती –

आवळे स्वच्छ धुवून त्याच्या लहान फोडी तयार करा. गॅसवर भांडे गरम करा आणि त्यात तेल, हिंग, मोहरीची फोडणी तयार करा. मोहरी आणि मेथीची पावडर, लाल तिखट, मीठ एकत्र करून त्यात आवळ्याचे तुकडे मिक्स करा. सर्व साहित्य एकत्र वरून थंड झालेलं  फोडणीचं तेल टाका. लोणचं एका बरणीत भरून ठेवा. एक ते दोन दिवस हे लोणचं मुरू द्या. मुरलेलं आवळ्याचं लोणचं मस्त जेवणासोबत चाखा. यासाठी जाणून घ्या का खायला हवं होममेड लोणचं.

Amla Pickle Recipe Maharashtrian Style

ADVERTISEMENT

Amla Pickle Recipe Maharashtrian Style

आवळा सुपारी (Amla Supari Recipe In Marathi)

पित्त अथवा उलटी, मळमळ जाणवत असेल तर आवळ्याची सुपारी तोंडात ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

साहित्य –

ADVERTISEMENT
  • वीस आवळे
  • दोन चमचे लजीरा पावडर
  • दोन कप साखर 
  • सैंधव

आवळा सुपारी कृती –

आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्या. कोरडे झाल्यावर त्याच्या बारीक फोडी तयार करा. त्यांना साखर, सैंधव आणि जलजीरा पावडर लावा. कडक उन्हात या फोडी चांगल्या वाळवून घ्या. सुकल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा आणि वर्षभर वापरा. 

Amla Supari Recipe In Marathi

Amla Supari Recipe In Marathi

ADVERTISEMENT

हळद आणि आवळ्याचं पेय (Turmeric Amla Squash Recipe In Marathi)

आवळ्यापासून तयार केलेलं हे पेय तुम्हाला नक्कीच आवडेल. 

साहित्य – 

  • अर्धा लीटर आवळ्याचा रस
  • अर्धी वाटी ओल्या हळदीचे तुकडे
  • पाव वाटी आल्याचे तुकडे
  • चार ते पाच तुळशीची पाने
  • पाव वाटी गूळ
  • एक चमचा पुदिना पावडर
  • पाव वाटी लिंबाचा रस
  • सैंधव
  • गरजेनुसार पाणी

आवळा आणि हळदीचे पेय –

ADVERTISEMENT

हळद धुवून तिचे बारीक तुकडे तयार करा. हळद, आलं मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात तुळशीची पाने, पुदिना पावडर, गूळ, सैंधव, लिंबाचा रस आणि आवळ्याचा रस मिसळा. सर्व साहित्य भरपूर पाणी टाकून वाटून घ्या. गाळणीने गाळा आणि मस्त थंडगार सर्व्ह करा. तुम्ही हे पेय फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता. आवळ्याचा रसाचे आहेत फायदे पोटाची चरबी होते कमी. 

Turmeric Amla Squash Recipe In Marathi

Turmeric Amla Squash Recipe In Marathi

आवळा चटणी (Amla Chutney Recipe In Marathi)

आवळ्याची चटणी जेवणासोबत मस्त लागते. भाकरी, पोळी आणि थालिपीठासोबत तुम्ही ती नक्कीच खाऊ शकता. 

ADVERTISEMENT

साहित्य –

  • चार ते पाच मध्यम आकाराचे आवळे
  • एक चमचा लाल मसाला
  • पाव वाटी किसलेला गूळ
  • चमचा भर तेल 
  • चवीपुरतं मीठ
  • दोन चमचे लिंबू

आवळा चटणी करण्याची कृती –

आवळे स्वच्छ धुवून किसून घ्या. या कीसात मीठ टाका  ज्यामुळे आवळ्याला पाणी सुटेल. आवळ्याच्या किसातील पाणी घट्ट पिळून काढून टाका. आवळ्याच्या या पाण्याचा वापर तुम्ही वर दिलेल्या सरबतासाठी करू शकता. आवळ्याच्या किसात लाल मसाला, गूळ घाला. आवळ्याच्या किसाला वरून तेल आणि मीठ लावा. सर्व साहित्य एकत्र करा आणि त्यात लिंबाचा रस पिळून मिश्रण एकजीव करा. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर चटण्यांचे हे प्रकारही नक्की ट्राय करा.  

Amla Chutney

ADVERTISEMENT

instagram

आवळ्याचं सरबत (Amla Juice)

उन्हाळ्यात आवळ्याचं सरबत पिण्याने अंगाची काहिली कमी होते. यासाठी घरीच ट्राय करा ही आवळा रेसिपी

साहित्य –

  • वीस ताजे आवळे
  • एक इंच आले
  • एक वाटी साखर
  • चवीनुसार मीठ 
  • पाव वाटी लिंबू रस

आवळा सरबताची कृती –

ADVERTISEMENT

आवळे शिजवून त्याची बी काढून गर काढून घ्या. त्या गरात साखर, मीठ, आल्याचा रस आणि लिंबाचा रस मिसळावा. सर्व साहित्य एकत्र करा ज्यामुळे आवळ्याचं घट्ट सरबत तयार होईल. हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये साठवून गरजेच्या वेळी त्यात पाणी मिसळून सरबत तयार करू शकता. 

Amla Juice

instagram

ADVERTISEMENT

आवळा क्रश (Amla Crush)

आवळा आरोग्यासाठी उत्तम असल्याने तुम्ही घरीच हा आवळा क्रश तयार करून त्याचा आहारात वापर करू शकता.

साहित्य –

  • एक कप आवळ्याचा किस
  • एक चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा काळी मिरी पूड
  • एक चमचा ओव्याची पावडर
  • चवीनुसार सैंधव
  • एक चमचा बडीसोपची पावडर

आवळा क्रशची कृती –

आवळ्याचा किस आणि वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करा. आवळ्याच्या किसात  सर्व साहित्य मिक्स झाले की तो कीस उन्हात वाळवून घ्या. पाणी सुकून कीस सुटसुटीत झाला की हवाबंद डब्यात भरून ठेवा. वर्षभर तुम्ही हा क्रश खाण्यासाठी वापरू शकता.

ADVERTISEMENT

Amla Crush

instagram

आवळा भात (Amla Rice)

भारतीय संस्कृतीत विविध प्रकारचे भात, पुलाव करण्याची पद्धत आहे. मात्र आवळा भात चवीसोबत तुमच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे.

साहित्य –

ADVERTISEMENT
  • एक वाटी आवळ्याचा किस
  • दोन वाटी बासमती तांदूळ
  • चार ते पाच कडीपत्ता
  • पाव वाटी किसलेला नारळ
  • पाव वाटी कोथिंबीर
  • दोन चमचे तेल 
  • चमचाभर मोहरी
  • चमचाभर जीरे
  • चमचाभर उडीद डाळ
  • चमचाभर चण्याची डाळ
  • पावा वाटी शेंगदाणे
  • एक चमचा लाल तिखट
  • चिमूटभर हिंग
  • पाव चमचा हळद
  • चार ते पाच हिरवी मिरची
  • चार लसूण पाकळ्या
  • एक इंच आलं
  • पाणी
  • अर्धी वाटी लिंबाचा रस

आवळा भात करण्याची कृती –

तांदूळ धुवून अर्धा तास बाजूला ठेवा. पाणी उकळत ठेवून त्यात तांदूळ शिजवून मस्त भात तयार करा. भात फडफडीत शिजला की गॅस बंद करा. आवळ्याच्या किसामध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं वाटून मिक्स करा. कढईत तेल गरम  करा. त्यात कडीपत्ता, उडीद डाळ, चण्याची डाळ, शेंगदाणे परतून घ्या. त्यात शिजलेला भात टाकून चांगली वाफ येऊ द्या. वरून कोथिंबीर, खोबरं आणि लिंबाने सजवा. गरमागरम आवळ्याचा भात सर्व्ह करा.

Amla Rice

instagram

ADVERTISEMENT

आवळा मुखवास (Amla Mukhwas)

जेवणानंतर तोंडाला वास येऊ नये आणि खाल्लेल्या अन्नाचे चांगले पचन व्हावे यासाठी मुखवास खाण्याची पद्धत आहे. 

साहित्य –

  • वीस ताजे आवळे
  • एक चमचा पिठीसाखर
  • एक चमचा ओवा
  • पाव चमचा काळिमीरी पावडर
  • सैंधव
  • दोन चमचे लिंबाचा रस

आवळा मुखवास कृती –

ADVERTISEMENT

आवळे स्वच्छ धुवून पुसून किसून घ्या. त्यात सर्व साहित्य टाका आणि चांगलं एकजीव करा. आवळ्याच्या किसातील पाणी सुकेपर्यंत एक ते  दोन दिवस कीस उन्हात वाळू द्या. सुकल्यावर डब्ब्यात भरून ठेवा.

Amla Mukhwas

instagram

ADVERTISEMENT

आवळा बर्फी (Amla Barfi)

आंबट गोड चवीचे पदार्थ आवडत  असतील तर तुम्ही आवळ्यापासून अशी बर्फीदेखील तयार करू शकता.

साहित्य –

  • वीस ताजे आवळे
  • एक वाटी साखर
  • अर्धी वाटी तूप
  • मीठ
  • चमचाभर वेलची पूड

आवळ्याची बर्फी बनवण्याची कृती –

आवळे शिजवून घ्या आणि त्याच्या फोडी मोकळ्या करा. आवळ्यात सर्व साहित्य एकत्र करा आणि त्याची मिक्सरमध्ये जाडसर पेस्ट तयार करा. गॅसवर कढईत तूप गरम करून त्यात हे मिश्रण गरम करा. मिश्रण एकजीव करून ढवळत राहा. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पावडर टाका. थंड झाल्यावर एका थाळीला तूप लावून त्यात ते थापून घ्या आणि सुरीने हव्या तशा वड्या पाडा. 

ADVERTISEMENT

Amla Barfi

instagram

आवळा च्यवनप्राश (Amla Chyawanprash)

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचे च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो.

साहित्य –

ADVERTISEMENT
  • एक वाटी आवळ्याचा कीस
  • पाव वाटी आलं 
  • अर्धी वाटी गूळ
  • दोन वेलची
  • पाव चमचा वेलदोड्याची पूड
  • पाव चमचा दालचिनीची पूड
  • अर्धा चमचा लेंडी पिंपळाचे तुकडे
  • पाव चमचा प्रवाळभस्माची पूड
  • पाव चमचा गुळवेलाची पावडर
  • पाव चमचा अश्वगंधा
  • पाव चमचा शतावरी
  • पाव चमचा काळिमिरी
  • पाव चमचा नागकेशर
  • दोन लवंग
  • चिमूट भर  केशर
  • पाव चमचा जायफळ पावडर
  • पाव वाटी मध

आवळ्याचे च्यवनप्राश करण्याची कृती –

आवळे उकडून त्याच्या फोडी करा. मिक्सरमध्ये या फोडी वाटून घ्या. आलं किसून घ्या. इतर सर्व साहित्य एकत्र करून त्याची पूड तयार करा. एका भांड्यातत आवळ्याचा गर, आल्याचा कीस, गूळ गरम  करून आटवून घ्या. त्यात मध टाका. मिश्रण एकजीव करून सर्व मसाल्यांची पूड त्यात टाका. थंड झाल्यावर हवाबंद डब्ब्यात भरून ठेवा. तुम्ही हे च्यवनप्राश बराच काळ टिकवून ठेवू शकता. 

Amla Chyawanprash

instagram

ADVERTISEMENT

आवळा सॉस (Amla Sauce)

आवळ्याच्या चटणीप्रमाणेच तुम्ही आवळ्याच्या सॉसचाही वापर जेवणात करू शकता.

साहित्य –

  • वीस ताजे आवळे
  • अर्धी वाटी गूळ
  • चमचाभर तेल
  • एक चमचा लाल तिखट
  • एक चमचा धणे पूड
  • पाव चमचा  हळद
  • चवीपुरतं मीठ
  • एक चमचा साखर
  • एक चमचा जीरेपावडर
  • चिमूटभर हिंग
  • अर्धी वाटी कोथिंबीर
  • चार हिरवी मिरच्या

आवळ्याचे सॉस बनवण्याची कृती –

ADVERTISEMENT

आवळे उकडून त्याची बी बाजूला काढा आणि आधी वरील सर्व साहित्य टाकून मिक्समध्ये वाटून घ्या. त्यात आवळ्याचा गर टाका आणि पुन्हा वाटून घ्या. पॅनवर पाच मिनिटे गरम करा आणि तुमचा आवळ्याचा सॉस तयार होईल. 

08 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT