ADVERTISEMENT
home / Recipes
Maharashtrian Recipes In Marathi

महाराष्ट्रीयन पदार्थ जे पुरवतात तुमच्या जिभेचे चोचले (Maharashtrian Recipes In Marathi)

आपल्याकडे अनेक पदार्थ आहेत. पण महाराष्ट्रीयन पदार्थ म्हटलं की आपोआपच तोंडाला पाणी सुटते. महाराष्ट्रीयन पदार्थांची आपल्याकडे अक्षरशः रेचलेल आहे. नाश्त्यासाठीही अनेक महाराष्ट्रीयन पदार्थ आपण बनवतो हे पदार्थ आपण घरीही बनवतो. काही खास पदार्थ आहेत जे तुमच्या जिभेचे चोचले पुरवतात. अशाच काही महाराष्ट्रीयन पदार्थांची रेसिपी मराठीत (Maharashtrian Recipes in Marathi) आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्हीही अगदी नाश्त्यापासून ते मेन कोर्सपर्यंत या रेसिपी नक्कीच घरी करू शकता. महाराष्ट्रीयन असे काही पदार्थ आहेत जे तुम्हाला अगदी कोणत्याही वेळी खाता येतात. महाराष्ट्रीयन रेसिपी मराठीत अगदी सोप्या पद्धतीने आम्ही खास तुमच्यासाठी दिली आहे. असेच काही खास महाराष्ट्रीयन पदार्थ आपण पाहूया. 

बटाटा वडा (Batata Vada)

Batata Vada

Batata Vada

 

झणझणीत आणि स्वादिष्ट बटाटावडा म्हटलं की आपोआपच तोंडाला पाणी सुटतं. असा हा बटाटावडा आपल्याला महाराष्ट्रात ठिकठिकाणी गरमागरम खायला मिळतो. खरं तर महाराष्ट्राचं उत्कृष्ट खाद्यच म्हणता येईल. असा हा महाराष्ट्रीयन पद्धतीचा बटाटावडा कसा करायचा जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • 4-5 उकडलेले बटाटे 
  • आलं – लसूण – हिरवी मिरची पेस्ट
  • चिरलेला कांदा 
  • हळद 
  • कोथिंबीर 
  • चवीनुसार मीठ 
  • तळण्यासाठी तेल
  • बेसन 
  • खाण्याचा सोडा

बनविण्याची पद्धत 

  • कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या. उकडलेले बटाटे साल काढून सोला आणि व्यवस्थित मॅश करा
  • एका कढईत तेल घ्या. त्यात चिरलेला कांदा परतून घ्या. त्यात हळद मिक्स करून कांदा थंड होऊ द्या. आले चिरून घ्या आणि लसणीच्या पाकळ्या काढा. मिरचीचे देढ काढून घ्या. हे तिन्ही एकत्र मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करून घ्या
  • दुसऱ्या भांड्यात बेसन (चण्याच्या डाळीचे पीठ) पाण्याने भिजवा. त्यात मीठ आणि खाण्याचा सोडा चवीपुरता घाला आणि मध्यम स्वरूपात भिजवा. मॅश केलेल्या बटाट्यांवर परतलेला कांदा, आलं – लसूण – मिरची पेस्ट, मीठ घाला आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून
  • घ्या. त्याचे गोळे करा 
  • हे गोळे पिठात भिजवा आणि तेल मध्यम आचेवर ठेऊन तळा. गरमागरम खुसखुशीत आणि खमंग वडे गोड आणि तिखट चटणीसह खायला द्या

वाचा – Misal Pav Recipe In Marathi

भाजणी थालीपीठ (Bhajani Thaleepith)

Bhajani Thaleepith

ADVERTISEMENT

Bhajani Thaleepith

नाश्त्याला मराठी घरामध्ये भाजणी थालीपीठ (Bhajaniche thaleepith) नाही असं कधीच दिसणार नाही. अगदी संध्याकाळच्या वेळीही सहज बनणारा असा हा महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे भाजणीचं थालिपीठ. खास अनेक मराठमोळ्या हॉटेलमध्येही याला अधिक मागणी असते. जाणून घेऊया याची रेसिपी. 

साहित्य 

  • 1 कप थालिपीठाची भाजणी
  • 1 कप पाणी
  • चवीपुरते मिठ
  • 1 चमचा लाल तिखट
  • ½ चमचा जिरे
  • 2 चिमटी हिंग
  • पाव चमचा हळद
  • 1 चमचा तेल
  • पाव कप चिरलेली कोथिंबीर
  • अर्धा कप बारीक चिरलेला कांदा
  • पाव कप तेल थालिपीठ भाजताना तव्यावर सोडण्यासाठी

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • प्रथम भाजणीची उकड काढून घ्यावी. उकड काढल्याने भाजणीचे थालिपीठ थापताना चिकटत नाही. त्यासाठी 1 कप पाणी नॉनस्टिक भांड्यात उकळवण्यास ठेवावे. त्यात तिखट, मिठ, हिंग, हळद, जिरे, 1 चमचा तेल घालून मिक्स करावे. पाणी उकळले कि गॅस मंद करून पाण्यात भाजणी घालावी आणि लगेच चमच्याने ढवळावे. थोडे मिक्स करून वरती झाकण ठेवून 5 मिनिटे मंद आचेवर वाफ काढावी. गॅस बंद करून वाफ अजून ५ मिनिटे मुरू द्यावे.
  • उकड थोडी कोमट झाली कि पाण्याचा हात लावून मळून घ्यावे. मळतानाच चिरलेला कांदा आणि कोथिंबीर त्यात घालून एकत्र करावे. थोडावेळ झाकून ठेवावे. नंतर ४ ते ५ मध्यम आकाराचे सारखे गोळे करून घ्यावे.
  • जाडसर प्लास्टिकचा तुकडा घ्यावाय लांबड्या बाजूकडून बरोबर अर्धा असा दुमडून घ्यावा. त्याला अगदी थोडा पाण्याचा हात लावावा. मधे भाजणीचा गोळा ठेवून वरती अर्धा प्लास्टिकच्या भागाने कव्हर करून लाटावे. कडेला जर भेगा पडत असतील तर बोटांनी जरा आत ढकलून सारख्या करून घ्याव्यात. मध्यम लाटावे.
  • तवा गरम करून तेल घालून त्यावर थालिपीठ घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्यावे. प्रत्येक बाजू साधारण 2 – 3 मिनिट्स भाजायला हवी. त्यामुळे भाजणी शिजते आणि थालिपीठही खरपूस होते. 
  • फक्त दह्याबरोबर किंवा दही-मिरची लोणच्याबरोबर आणि कैरी लोणच्याबरोबर थालिपीठ अप्रतिम लागते

झुणका भाकरी (Zunka Bhakri Recipe In Marathi)

Zunka Bhakri Recipe In Marathi

Zunka Bhakri Recipe In Marathi

महाराष्ट्रीयन पदार्थ म्हटलं आणि झुणका भाकरीचे नाव घेतलं नाही असं होणं शक्यच नाही. झुणका आणि भाकरी ही तर महाराष्ट्राची शान आहे. सर्वात महत्वाचा महाराष्ट्रीय पदार्थ ज्याशिवाय महाराष्ट्राचा मेन्यू पूर्णच होत नाही. अशाचा झुणका भाकरीची रेसिपी

साहित्य झुणक्यासाठी 

ADVERTISEMENT
  • 5 चमचे चण्याचे पीठ अर्थात बेसन 
  • तेल 
  • चिरलेला कांदा 
  • हवी असल्यास, भोपळी मिरची 
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • 4-5 कढिपत्ता पाने 
  • 6-7 लसूण पाकळ्या 
  • जिरे
  • मोहरी
  • हिंग
  • हळद 
  • चवीनुसार मीठ
  • कोथिंबीर 
  • पाणी
  • 1-2 चमचे लाल तिखट 

झुणका बनविण्याची पद्धत 

  • एका कढईत तेल घ्या. त्यात लसणीच्या पाकळ्या ठेचून घाला. जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून त्यात कांदा परतून घ्या. त्यात कढिपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून परता 
  • कांदा ब्राऊन होत आला की, लाल तिखट आणि बेसन घालून व्यवस्थित भाजा 
  • बेसन चांगले परता. परतून झाल्यावर आपल्याला किती प्रमाणात घट्ट हवे त्यानुसार पाणी घाला आणि ढवळा. त्यात मीठ घाला. वरून चवीनुसार कोथिंबीर चिरून घाला. गरमागरम झुणका आणि भाकर खायला द्या

भाकरीसाठी साहित्य

  • एक मोठी वाटी तांदळाचे पीठ 
  • चवीनुसार मीठ
  • भाकरीला लावण्यासाठी तांदळाचे पीठ 
  • पाणी 

भाकरी बनविण्याची पद्धत 

  • तांदळाच्या पिठात मीठ घालून घ्या. व्यवस्थित मिक्स करा
  • पाणी एका भांड्यात गरम करा. पाणी व्यवस्थित गरम करा. जेणेकरून पीठ व्यवस्थित मळले जाईल. पीठ व्यवस्थित मळल्यास भाकरीला तडे जात नाहीत
  • पाणी गरम झाल्यावर गरजेनुसार पिठात घालून भाकरीसाठी पीठ व्यवस्थित मळून घ्या. गरम पाणी घातल्याने तांदळाचे पीठ अगदी मऊ होते आणि भाकरी लुसलुशीत होण्यास मदत होते. त्यामुळेच पाणी थंड न वापरता गरम पाण्याचा उपयोग करा. यामुळे तुम्हाला वेगळी उकड काढून घ्यायची गरज भासणार नाही 
  • पिठाचा गोळा झाल्यावर जरासा घट्टसर ठेवा. गरज पडल्यास, भाकरी करताना हाताला पाणी लावा 
  • गोळा जास्त मोठा असेल तर त्याचे दोन भाग करून घ्या आणि हाताला पाणी लावा आणि व्यवस्थित मळून घ्या. जितके पीठ जास्त मळाल तितकी भाकरी अधिक लुसलुशीत होईल
  • भाकरीसाठी गोळा मळल्यानंतर अगदी प्लेन आणि मऊ दिसतो. असा गोळा दिसला की त्याचे लहान लहान गोळे करून घ्या. भाकरी किती मोठी करायची आहे त्यानुसार तुम्ही गोळा बनवून घ्या
  • पोळपाट लाटणं घेऊन त्यावर तांदळाचे पीठ पसरा आणि त्यावर गोळा ठेऊन लाटा. वरून गरज भासेल तसं लाटताना तांदळाचे पीठ तुम्ही लावा आणि भाकरी लाटा 
  • एका बाजूला तवा तापत ठेवा. त्यावर लाटलेली भाकरी टाका आणि वरून हाताने पाणी लावा. वरती लावलेले पाणी सुकल्यावर भाकरीची बाजू पलटा आणि मग पुन्हा भाजून घ्या. पुन्हा पहिल्या बाजूला परता. भाकरी मस्त टम्म फुगू लागते. तुम्हाला हवं तर न पलटता ती काढून गॅसच्या आचेवर चिमट्यात धरून भाजा. तुमची लुसलुशीत भाकरी तयार आहे. लोणी, भाजी, पिठलं आणि कांद्यासह ही गरमागरम भाकरी खायला द्या 

वाचा – राजमा चावल (Rajma Chawal Recipe in Marathi)

ADVERTISEMENT

कुळीथ पिठले (Kulith Pithle)

कुळीथ पिठले (Kulith pithle)

Instagram

भाकरीसह ज्याप्रमाणे झुणका छान लागतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये कुळीथ पिठले अर्थात कुळथाचं पिठलंह तितकंच प्रसिद्ध आहे. आजही अनेक गावात आणि शहरांमध्ये घराघरात पटकन जेवायला होणारा पदार्थ म्हणजे कुळीथ पिठले. 

साहित्य झुणक्यासाठी 

ADVERTISEMENT
  • 5 चमचे कुळीथ पीठ 
  • तेल 
  • चिरलेला कांदा 
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • 4-5 कढिपत्ता पाने 
  • 6-7 लसूण पाकळ्या 
  • जिरे
  • मोहरी
  • हिंग
  • हळद 
  • चवीनुसार मीठ
  • कोथिंबीर 
  • पाणी
  • 1-2 चमचे लाल तिखट 

झुणका बनविण्याची पद्धत 

  • एका कढईत तेल घ्या. त्यात लसणीच्या पाकळ्या ठेचून घाला. जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून त्यात कांदा परतून घ्या. त्यात कढिपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून परता 
  • कांदा ब्राऊन होत आला की, लाल तिखट आणि कुळीथ पीठ घालून व्यवस्थित भाजा 
  • कुळीथ पीठ चांगले परता. परतून झाल्यावर आपल्याला किती प्रमाणात घट्ट हवे त्यानुसार पाणी घाला आणि ढवळा. त्यात मीठ घाला. वरून चवीनुसार कोथिंबीर चिरून घाला. गरमागरम कुळीथ पिठलं आणि भाकरी खायला द्या

खरवस (Kharwas)

Kharwas

Kharwas

खरवस म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. ज्यांना दुधाचे पदार्थ आवडतात त्यांना खरवस म्हणजे पर्वणीच वाटते. खरवस घरी करायचा म्हटलं की, खूप त्रास असतो असं लोकांना वाटतं. पण असं अजिबात नाही. खरवस करणेही सोपे आहे. खरवस रेसिपी मराठीत 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • एक ग्लास गाय किंवा म्हशीचा दुधाचा चीक 
  • एक ग्लास किसलेला गूळ (गूळ नको असल्यास साखर)
  • वेलची पावडर
  • जायफळ पावडर 
  • एक ग्लास दूध 
  • केशर 

बनविण्याची पद्धत 

  • चिकामध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करून घेणे
  • कुकरमध्ये शिजवणे (मोदकपात्र अथवा कुकरच्या भांड्यात) 
  • साधारण 15 मिनिट्समध्ये शिजवणे आणि गरमागरम खायला देणे 

भरली वांगी (Bharli Vangi)

Bharli Vangi

Bharli Vangi

ADVERTISEMENT

भरली वांगी म्हटलं की आठवतो तो फक्कड वांगी आणि भाकरीचा बेत. महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये भरली वांगी ही सगळ्यांचीच आवडती असतात. अशाच फक्कड भरली वांग्याची रेसिपी 

साहित्य 

  • 5-6 लहान वांगी 
  • सुकं खोबरं 
  • ओलं खोबरं 
  • शेंगदाणे कूट 
  • सफेद तीळ (काळे तीळ)
  • गोडा मसाला
  • चवीनुसार मीठ 
  • तेल
  • हळद
  • लाल तिखट 
  • जिरे 
  • चिंच 
  • गूळ
  • मोहरी
  • हिंग 

बनविण्याची पद्धत 

  • सुकं खोबरं, ओलं खोबरं, तीळ हे सर्व एकत्र भाजून घेणे 
  • मिक्सरमधून वरील मिश्रण शेंगदाणे कूट घालून वाटून घेणे 
  • मसाला तयार झाला की, या मिश्रणात गोडा मसाला, मीठ, लाल तिखट, हळद, चिंच आणि गूळ एकत्र घालणे आणि मिक्स करणे 
  • वांगी उभ्या चिरा पाडून घेणे त्यात मसाला भरणे 
  • कढईत जास्त तेल घालून त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद घालणे आणि भरलेले वांगी मंद गॅसवर परतवणे. शिजल्यावर गॅस बंद करणे. वरून हवी असल्यास, कोथिंबीर घालणे 

कोंथिबीर वडी (Kothimbir Vadi)

कोंथिबीर वडी (Kothimbir vadi)

ADVERTISEMENT

Kothimbir Vadi

कोणत्याही सीझनमध्ये खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी खायला सगळ्यांनाच आवडते. कोथिंबीरवडीचा सुगंध नाकात दरवळला की ताव मारायलाच हवा. कोथिंबीर वडीची रेसिपी मराठीत 

साहित्य

  • कोथिंबीरची एक जुडी 
  • 200 ग्रॅम बेसन 
  • 100 ग्रॅम तांदूळ पीठ
  • 25 ग्रॅम पांढरे तीळ 
  • 2 चमचे लाल तिखट 
  • 1 चमचा हळद पावडर 
  • जिरे 
  • 10-15 लसूण पाकळ्या 
  • तेल
  • स्वादानुसार मीठ 

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • पहिले कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी आणि व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवा 
  • चिरलेल्या कोथिंबीरमध्ये बेसन, तांदूळ पीठ, पांढरे तीळ, लाल तिखट, हळद, लसूण पाकळ्या ठेचून, मीठ आणि एक चमचा तेल घालून सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घ्या
  • नंतर कुकरच्या भांड्यात खाली तेल लावा आणि हे एकजीव झालेले मिश्रण त्यात ओता आणि कुकरच्या 8-10 शिट्ट्या झाल्या की मग बंद करा 
  • कुकर थंड झाल्यावर हे बाहेर काढा आणि त्याच्या सुरीने वड्या पाडा 
    तुम्हाला हवं तर तुम्ही शॅलोफ्राय करा अथवा तेलात मध्यम आचेवर तळा आणि खोबऱ्याच्या चटणीसह गरमागरम खायला द्या

अळूची वडी (Alu Vadi)

Alu Vadi

Alu Vadi

कोथिंबीरवडीप्रमाणेच महाराष्ट्रीयन पदार्थांचा खास अविभाज्य भाग म्हणजे अळूवडी. विशेषतः श्रावण महिन्यात ताज्या अळूंच्या पानांच्या वड्या करून खाण्यात काही वेगळीच मजा आहे.

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 5 – 6 पाने वडीचे अळू
  • तेल
  • सफेद तीळ 
  • गूळ 
  • बेसन
  • तांदळाचे पीठ
  • गोडा मसाला 
  • किंचित गरम मसाला 
  • लाल तिखट
  • हळद 
  • चवीनुसार मीठ 
  • चिंचेचे पाणी 

बनविण्याची पद्धत

  • अळूची पाने व्यवस्थित धुवा
  • एका भांड्यामध्ये बेसन, तांदूळ पीठ आणि वरील सर्व मसाला एकत्र भिजवून घेणे 
  • हे मिश्रण पानाला लावणे आणि त्याच्यावर दुसरं पानं ठेवा आणि त्याची गुंडाळी करा 
  • दोन ते तीन पानांचा रोल तयार करा 
  • मोदकपात्रात वाफवा साधारण 10 मिनिट्स 
  • नंतर थंड झाल्यावर त्याचे तुकडे करून शॅलो फ्राय करा अथवा मध्यम आचेवर तळा 

पुरी आणि बटाटा भाजी (Puri Ani Batata Bhaji Recipe In Marathi)

Puri Ani Batata Bhaji Recipe In Marathi

Puri Ani Batata Bhaji Recipe In Marathi

कोणताही सण आला की पुरी आणि बटाट्याची भाजी हे नेवैद्याला ठरलेलेच असते. पुरी आणि बटाट्याच्या भाजीशिवाय कोणत्याही महाराष्ट्रीयन घरात नेवैद्य पूर्ण होत नाही. खरं तर हा बेत पटकन बनणारा असतो. पाहूया पुरी भाजीची रेसिपी नक्की काय आहे. 

ADVERTISEMENT

पुरीसाठी साहित्य 

  • गव्हाचं पीठ
  • मीठ
  • तेल
  • पाणी

बनविण्याची पद्धत 

  • गव्हाचं पीठ त्यात तेल, मीठ घालून पाण्याने भिजवा. थोडं घट्ट भिजवा. 
  • पुरीचं पीठ हे पोळीच्या पिठाप्रमाणे सैलसर नसावे. सैलसर भिजवल्यास पुरी फुगत नाही. 
  • त्यानंतर तुम्हाला जर पटापट पुरी करायची असेल आणि गोलाकार आकाराचीच हवी असेल. तर पोळपाटभर एक थोडी
  • जाडी पोळी लाटून घ्या आणि मग स्टीलच्या काठ असलेल्या वाटीने त्यावर छाप मारा. म्हणजे एका आकारात पुऱ्या दिसतात.

बटाट्याच्या भाजीसाठी साहित्य 

  • उकडलेले बटाटे
  • जिरे
  • मोहरी
  • हिंग 
  • हळद
  • आल्याचे तुकडे
  • कडिपत्ता
  • चवीनुसार मीठ
  • लिंबू
  • कोथिंबीर
  • ओलं खोबरं 
  • हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • तेल

बनविण्याची पद्धत

ADVERTISEMENT
  • बटाटे शिजवून मध्यम आकाराचे तुकडे करावेत. 
  • तुकड्यांवरच थोडी साखर, हिंग, हळद आणि चवीपुरतं मीठ घालावं. (कढईत हे असं टाकल्यास, सर्व बटाट्याला त्याची व्यवस्थित चव लागते) 
  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग, कडीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि हवं असल्यास, आल्याचे तुकडे घालावेत. 
  • थोडं परतून त्यावर बटाट्याच्या फोडी परताव्यात. एक वाफ काढावी. गरमागरम भाजी तयार. 
  • त्यावर कोथिंबीर चिरून घालावी. तुम्हाला आवडत असल्यास, खरवडलेलं खोबरं घातलं तरीही चालेल.  (नेवैद्यासाठी कांदा घालत नसल्यामुळे कांदा घालणं सहसा टाळलं जातं)

वालाची उसळ (Valachi Usal Recipe In Marathi)

Valachi Usal Recipe In Marathi

Valachi Usal Recipe In Marathi

वालाची उसळ अर्थात डाळिंबी उसळ किंवा याला वालाचे बिरडं असं म्हटलं जातं. अतिशय उत्तम अशी चवीला असणारी ही उसळ म्हणजे महाराष्ट्रीयन पदार्थांची शान आहे. कसं बनवायचं वालाचे बिरडं अथवा वालाची उसळ जाणून घेऊया

साहित्य

ADVERTISEMENT
  • पाऊण कप वाल अर्थात डाळिंबी
  • 1 चमचा तेल, 
  • पाव चमचा मोहरी
  • अर्धा चमचा जिरे
  • हिंग 
  • पाव चमचा हळद
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • 4 कढीपत्ता पाने
  • 2 चमचा सुका नारळ
  • 1 चमचा गूळ
  • 2 आमसुलं
  • पाव कप कोथिंबीर
  • 2 चमचा ओला नारळ
  • चवीनुसार मीठ

बनविण्याची पद्धत

  • वाल कोमट पाण्यात 10 ते 12 तास भिजत ठेवावे. नंतर पाणी काढून टाकून भिजलेले वाल मोड आणण्यासाठी पंच्यात 8 ते 10 तास गच्च बांधून ठेवावे. डाळींब्यांना मोड आले की कोमट पाण्यात 10 मिनीटे टाकून ठेवावे. डाळिंबी सोलून घ्याव्यात. मोड आलेल्या डाळिंबी हाताळताना त्या अख्ख्या राहतील याची काळजी घ्यावी. साधारण सव्वा ते दिड कप डाळिंबी होतील.
  • कढईत किसलेला सुका नारळ मध्यम आचेवर भाजून घ्यावे. नंतर जिरे खरपूस भाजून घ्यावे. नंतर भाजलेला नारळ आणि भाजलेले जिरे निट कुटून घ्यावे.
  • कढईत तेल गरम करावे. त्यात पाव चमचा मोहरी घालून तडतडू द्यावी. नंतर जिरे, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. कढीपत्ता आणि कोथिंबीर घालावी. थोडावेळ परतून डाळिंबी घालाव्यात. हलक्या हाताने परतावे. थोडा पाणी घालावे. 1 – 2 चमचे कुटलेले जिरे-खोबरे, आमसुलं आणि मीठ घालून वाफ काढावी.
  • डाळिंबी अर्धी शिजली की गूळ घालून वाफ काढावी. डाळिंबी अर्थात वाल खूप नाजूक असतात पटकन मोडल्या जातात म्हणून हलक्या हाताने परतावे.
  • उसळ तयार झाली कि ओला नारळ घालावा. गरमागरम पोळ्यांबरोबर खायला द्यावे

काळ्या चण्याची उसळ आणि घावणे (Kala Chana Usal And Ghavne)

Kala Chana Usal And Ghavne

Kala Chana Usal And Ghavne

घरात कोणता कार्यक्रम असल्यानंतर बरेच पाहुणे जमले की, काळ्या चण्याची उसळ आणि घावणे हा बेत हमखास महाराष्ट्रीय घरांमध्ये करण्यात येतो. विशेषतः कोकणमधील माणसांसाठी हा बेत खास आखला जातो. 

ADVERTISEMENT

साहित्य काळ्या चण्याच्या उसळीसाठी

  • काळे चणे
  • कांदा 
  • ओलं खोबरं 
  • आलं
  • लसूण 
  • मालवणी मसाला
  • तिखट 
  • मीठ
  • हळद
  • कडिपत्ता 
  • हिंग 
  • तेल
  • कोथिंबीर  

बनविण्याची पद्धत 

  • काळे चणे रात्रभर पाण्यात भिजत घालणे. सकाळी कुकरमध्ये शिजवून घेणे
  • कढईत तेल गरम करणे त्यात उभा चिरलेला कांदा, ओलं खोबरं, आलं आणि लसूण भाजून घेणे 
    मिक्सरमधून हे वाटून घेणे 
  • त्यानंतर पुन्हा कढईत तेल घेणे, त्यात हिंग, कडिपत्ता हळद आणि वरील वाटलेला मसाला, तिखट, मालवणी मसाला घालून परतणे 
  • शिजलेले काळे वाटणे, मीठ घालून त्याला एक कढ काढणे. भाजी तयार, घावण्यांसह खायला देणे 

साहित्य घावणे बनविण्यासाठी 

  • जुने तांदूळ
  • 1 वाटी शिजलेला भात 
  • चवीपुरते मीठ
  • तेल

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • तांदूळ धुवा आणि कमीत कमी 4 तास भिजत ठेवा 
  • मिक्सरच्या मोठ्या भांड्यातून तांदूळ भरडा आणि त्यात शिजलेला भात घालून थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा
    त्यात पाणी आणि मीठ मिक्स करा. पातळसर पीठ करून घ्या
  • तव्यावर तेल सोडून घावन घाला आणि गरमागरम खायला द्या

सोलकढी (Solkadhi)

Solkadhi

Solkadhi

महाराष्ट्रीयन पदार्थात सोलकढीला कोणतीही तोड नाही. सोलकढीशिवाय महाराष्ट्रीय पदार्थाचे ताट पूर्ण होऊच शकत नाही. हा आंबटगोड असा कढीचा पदार्थ अत्यंत चविष्ट असतो. पाहा ही सोलकढी रेसिपी

साहित्य

ADVERTISEMENT
  • ओलं खोबरं
  • हिरवी मिरची 
  • कोथिंबीर
  • कोकम आगळ
  • लसणीच्या पाकळ्या ठेचून 
  • चवीनुसार मीठ 

बनविण्याची पद्धत 

  • खोबरं खरवडून घेणे 
  • त्यात मिरची, लसूण, कोथिंबीर हे एकत्र करून मिक्सरमधून वाटणे 
  • त्याचा रस काढणे 
  • या काढलेल्या रसात मीठ, साखर आणि कोकम आगळ मिक्स करणे आणि वरून जिऱ्याची फोडणी देणे 

मिसळ पाव रेसिपी (Misal)

Misal

Misal

महाराष्ट्रात ठिकठिकाणी मिळणारा चविष्ट आणि चटकदार पदार्थ म्हणजे मिसळ. तुम्ही मिसळ घरातही तयार करू शकता. मिसळ पाव खाण्याची मजाच काही वेगळी आहे. 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • 3 वाट्या मोड आलेली मटकी (मिक्स कडधान्य मटकी, चवळी, पांढरा वाटाणा हे तुमच्या आवडीनुसार घ्यावे)
  • 4 मोठे कांदे
  • 2 वाट्या ओले खोबरे
  • 1 वाटी सुके खोबरे
  • आल्याचा तुकडा
  • 2 लसणाचे गड्डे (सोलून वाटीभर व्हावा)
  • 1 जुडी कोथिंबीर
  • 2 मोठे चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी
  • 1 मोठा चमचा गरम मसाला पावडर किंवा अख्खा मसाला (5-6 लवंगा, १ दालचिनीचा २ इंचाचा तुकडा, 5-6 काळे मिरे, धणे – जीरे 1-1 चमचा)
  • 2 बटाटे चिरून.
  • मीठ, तेल, हिंग, हळद, तिखट, पाणी.
  • फरसाण किन्वा hot mix , ब्रेड अथवा पाव, बारीक चिरलेला कच्चा कांदा, कोथिंबीर, लिंबू

बनविण्याची पद्धत 

  • पातेल्यात तेल तापवून त्यात हिंग, हळद घालावी. मटकी, बटाटे टाकून परतावे, बुडेल इतके पाणी,तिखट, मीठ घालून शिजवून घ्यावी. फार मऊ नको. यात थोडे पाणी राहिले तरी चालेल.
  • कटाची तयारी – कांदे उभे पातळ चिरून घ्यावेत. यातला वाटीभर कांदा बाजूला ठेवून उरलेला कांदा, खोबरे(दोन्ही), गरम मसाला तेलावर भाजून बारीक वाटावे. आले, लसूण, कोथिंबीर बारीक वाटावी. वाटताना जास्त पाणी घालू नये.
  • जाड बुडाच्या पातेल्यात एक वाटी तेल तापवून हिंग, हळद आणि उभा चिरलेला वाटीभर कांदा, कोल्हापुरी चटणी टाकावी. परतून घेऊन मग दोन्ही वाटणे घालून पुन्हा चांगले परतावे. त्यात मीठ आणि ४ कप पाणी घालून उकळी आणावी.
  • घेताना एका खोलगट प्लेट मधे दोन मोठे चमचे फरसाण घ्यावे. त्यावर मटकी, थोडा कच्चा कांदा, कोथिंबीर घालून मग एक पळी कट घालावा. कट घेताना ढवळून घ्यावा. आवडतो त्यांनी वरचा तेलाचा तवंग घ्यावा. लिंबू पिळावे आणि पाव अथवा ब्रेड बरोबर खावे

मोदक (Modak)

Modak

Modak

ADVERTISEMENT

मोदक ….आहाहा नुसतं नाव घेतलं तरीही डोळ्यासमोर मोदक तरळू लागतात. प्रत्येक संकष्टी असो अथवा गणपतीबाप्पाचं आगमन. मोदकाशिवाय पर्यायच नाही. 

उकड काढण्यासाठी लागणारे साहित्य 

  • अर्धा किलो आंबेमोहर तांदूळ
  • 2 ग्लास पाणी 
  • चवीपुरते मीठ 
  • तूप 
  • तेल (उकड मळण्यासाठी तेल जास्त प्रमाणात लागते. तसंच मोदक बनवताना पाकळ्या करतानाही हाताला तेल लावावे  लागते)

सारणासाठी लागणारे साहित्य

  • एक नारळ
  • पाव किलो गूळ
  • खवा (आवडीनुसार)
  • वेलची पावडर 
  • सुका मेवा

सारण बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • नारळ खवणून घ्यावा 
  • खोबऱ्याचे तुकडे पडणार नाहीत याची काळजी घेऊन हलक्या हाताने नारळ खवणावा
  • गूळ बारीक चिरून घ्यावा 
  • खोबरं आणि गूळ एकत्र मंद गॅसवर भाजावे आणि सारण तयार करावे
  • तुम्हाला खवा आवडत असल्यास यात खवा घालावा
  • सारण तयार होत आल्यावर वेलची पावडर घालावी 
  • आवडत असल्यास सुका मेवा अर्थात काजू, बदाम, बेदाणा घालावे 

उकड बनविण्याची पद्धत 

  • आंबेमोहर तांदूळ धुऊन सुकत घालावा 
  • सुकल्यावर त्याचे पीठ करून घ्यावे 
  • 2 ग्लास पाणी उकळत ठेवावे
  • तितकेच तांदळाचे पीठ घ्यावे
  • पाण्याला अर्धवट उकळी आली की तांदळाचे पीठ  त्यात घालावे आणि ढवळावे. त्यात थोडं तूप घालावं झाकण ठेऊन त्याला वाफ काढावी
  • व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर परात घ्यावी त्यात ही गरम तांदळाची पिठी काढून तेल लाऊन मळावी
  • उकड गरम असतानाच मळावी तरच मोदक चांगले होतात
  • हाताला तेल लावा आणि मोदकची पारी करायला घ्या 
  • त्याची पारी करून त्यात सारण भरावे 
  • मोदकाच्या सुबक पाळ्या करून हे मोदक मोदकपात्रात साधारण 20 मिनिट्स वाफवावेत 
  • गरम मोदक तूप घालून खायला द्यावे.

तसंच महाराष्ट्रातली अजून एक खासियत असलेली बालुशाही रेसिपी मराठीत खास तुमच्यासाठी आम्ही शेअर केली आह. 

साबुदाणा वडा (Sabudana Vada)

Sabudana Vada

Sabudana Vada

ADVERTISEMENT

उपवास म्हटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर कोणता पदार्थ येत असेल तो म्हणजे साबुदाणा वडा. महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून हा साबुदाणा वडा प्रसिद्ध आहे. साबुदाणा वड्याची रेसिपी  क्रिस्पी आणि खुसखुशीत साबुदाणे वडे बनविण्याची रेसिपी

साहित्य 

  • साबुदाणे – अर्धा किलो (पाण्यात नीट स्वच्छ धुऊन घ्या आणि पाणी घालून रात्रभर व्यवस्थित भिजू द्या)
  • 3-4 उकडलेले बटाटे 
  • शेंगदाणे भाजून त्याचे केलेले कूट (5-6 चमचे)
  • हिरव्या मिरच्या (कापून अथवा वाटलेल्या)
  • साखर – 1 लहान चमचा 
  • चवीनुसार मीठ 
  • लिंबाचा रस 
  • जिरे 
  • तळण्यासाठी तेल अथवा तूप (तुमच्या आवडीनुसार)

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात आधी रात्रभर साबुदाणे स्वच्छ धुऊन पाण्यात भिजवून घ्या. साबुदाणा नरम झाला आहे की नाही याची सकाळी उठल्यावर खात्री करून घ्या
  • सकाळी उठल्यावर बटाटे उकडून घ्या आणि नंतर ते नीट स्मॅश करा 
  • एका भांड्यात साबुदाणा, स्मॅश बटाटे, साखर,  मिरचीचे वाटण अथवा कापलेल्या मिरच्या, मीठ, शेंगदाण्याचे कूट, जिरे सर्व एकत्र करून मिश्रण करून घ्या 
  • नंतर हे सारण एकत्र झाले की, थोड्या वेळाने याचे वड्याच्या आकाराचे गोळे करा 
  • गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवा.  दुसऱ्या बाजूला तळहाताला तेल अथवा तूप लावा आणि साबुदाण्याचे बनवलेले गोळे घेऊन थोडेसे चपटे करून तेलात सोडा आणि मग मंद आचेवर डीप फ्राय करा
  • क्रिस्पी अर्थात कुरकुरीत आणि खुसखुशीत वडे हवे असतील तर वडे तळताना गॅस हा नेहमी मंद ठेवावा.  थोडे सोनेरी रंगाचे वडे झाले की टिश्यू पेपरवर वडे काढा आणि त्यातील अतिरिक्त तेल जाऊ द्या.
  • खोबऱ्याची हिरवी चटणी अथवा शेंगदाण्याच्या चटणीसह खास उपवासाचे रेसिपी असलेले गरमागरम वडे खायला द्या
07 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT