ADVERTISEMENT
home / Recipes
घरीच बनवा गरमागरम पास्ता, हॉटेलचा पडेल विसर

घरीच बनवा गरमागरम पास्ता, हॉटेलचा पडेल विसर

गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये मुलांना घरी ठेवण्यासाठी सगळ्यात पालकांनी मुलांना चांगलं चांगलं काही काही करुन नक्कीच खाऊ घातलं असेल. पण आता या वर्षी पुन्हा एकदा सगळ्यांवरच या कोरोनाने घरी बसण्याची वेळ आणली आहे. बाहेर सगळ्या गोष्टी विकत घेता येत असल्या तरी मुलांना काही होऊ नये ही भीती अजूनही पालकांमध्ये आहे. संध्याकाळच्या वेळेत मुलं पास्ता खाण्याचा खूपच हट्ट करतात.अशावेळी त्यांना काय बनवून द्यायचं असा प्रश्न पडतो? मुलांना रोजच काहीतरी चटपटीत आणि चटकमटक खायचं असतं. अशावेळी तुम्ही घरीच असलेल्या साहित्यातून एकदम छान पास्ता बनवू शकता. आज आपण पास्ताचे दोन प्रकार बघूया एक व्हाईट सॉस पास्ता आणि दुसरा इंडियन स्टाईल पास्ता. चला जाणून घेऊया या सोप्या रेसिपीज

गाजर हलवा बनविण्याची सोपी रेसिपी, असा होतो फायदा

इंडियन स्टाईल पास्ता

Instagram

ADVERTISEMENT

इंडियन स्टाईल पास्ता हा बनवणे सगळ्यात सोपे असते. ही चव मुलांना थोडी फार माहीत असल्यामुळे खूप वेळा हा पास्ता खायला मुलांना आवडतं. याला थोडासा चायनीज टच दिला की, मुलं हा पास्ता अगदी पटपट संपवतात.

साहित्य:
एक वाटी कोणत्याही प्रकारातील पास्ता, एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो, एक मोठा चमचा बारीक चिरलेले आलं आणि लसूण, चवीनुसार लाल तिखट, मॅगी मसाला, टोमॅटो केचअप, चीझ स्लाईस, मीठ, पाणी, तेल 

कृती:

  • सगळ्यात आधी तुम्हाला पास्ता वाफवून घ्यायला आहे. त्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करुन त्यात थोडे मीठ आणि तेल घालून पास्ता छान उकडून घ्या. साधारणपणे पास्ता पाण्याच्या वर तरंगू लागला की, तो शिजला असे समजावे. त्यातील पाणी काढून पास्ता निथळत ठेवावा. 
  • दुसरीकडे एका कढईमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये आलं-लसूणचे बारीक तुकडे घालून परतून घ्यावे. त्यावर बारीक चिरलेला कांदा घलावा. कांदा छान परतायला हवा. तरच तो चांगला लागतो. कांदा परतण्यासाठी वेळ गेला तरी चालेल पण कांदा अगदी बारीक गॅसवर छान परता. त्याला हलका सोनेरी रंग आला की, त्यामध्ये टोमॅटो घाला. हळद( आवश्यक असल्यास) तिखट, मॅगी मसाला घालून एकदा छान परतून झाकण लावून टोमॅटो चांगला शिजू द्या.
  •  टोमॅटोने तेल सोडलं की, त्यामध्ये पाण्याचा हबका मारुन त्यामध्ये पास्ता घाला आणि एकजीव करा.  आता तुमच्याकडे असलेल्या चीझ स्लाईस किंवा कोणत्याही प्रकारचे प्रोसेस चीझ घेऊन त्यामध्ये घाला. झाकण लावून चीझ छान वितळू द्या. तुमचा इंडियन स्टाईल पास्ता तयार. त्यावर तुम्ही थोडा पातीचा कांदाही घालू शकता. 

बेकरीसारखा लुसलुशीत लादीपाव करा घरीच,परफेक्ट रेसिपी

ADVERTISEMENT

व्हाईट सॉस पास्ता

Instagram

लहान मुलांना व्हाईट सॉस पास्ताही खूप आवडतो. खूप जणांना हा पास्ता घरी कसा बनवायचा हे देखील कळत नाही. अशावेळी तुम्ही ही रेसिपी फॉलो करा तुम्हाला अगदी बाहेर मिळणारा तसाच पास्ता मिळेल.

साहित्य:  एक मोठा चमचा बटर, मैदा, 1 कप दूध, लसूण पेस्ट, प्रोसेस चीझ, काळीमिरी पूड, रेड चिली फ्लेक्स, एक चमचा क्रिम, मीठ, शिजवलेला पास्ता, तेल किंवा बटर 

ADVERTISEMENT

कृती: 

  • पास्ता उकडून घ्या.  या पास्तासाठी सॉस हा फारच महत्वाचा असतो. त्यामुळे हा पास्ता सॉस बनवला की, तुम्हाला पास्ता करायला फारसा वेळ लागत नाही. 
  • एका पॅनमध्ये तेल किंवा बटर घेऊन त्यामध्ये थोडासा ठेचलेला लसूण  परतून घ्या त्यामध्ये एक मोठा चमचा मैदा घालून थोडे भाजून घ्या. आता त्यात दूध घालून गुठळ्या मोडून घ्या. त्यामध्ये किसलेलं चीझ घाला. एकजीव करुन एक छान थीक सॉस बनवून घ्या.
  • आता तुम्हाला आवडतं असेल तर भाज्या घालून परतून घ्या. यामध्येच ओरिगॅने, चिली फ्लेक्स  घालून एकजीव करा. आणि त्यामध्ये पास्ता घालून एक छान वाफ काढून घ्या. तुमचा व्हाईट सॉस पास्ता तयार 

तोंडाची चव बदलतील या 5 चटकदार रेसिपी,नक्की करुन पाहा

आता घरीच ट्राय करा तुमच्या आवडीचा पास्ता

05 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT