ADVERTISEMENT
home / Recipes
Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi

अशी बनवा चमचमीत घेवड्याची भाजी रेसिपी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)

 

गृहिणीला घरात दररोज पडणारा महाभयंकर प्रश्न म्हणजे… आज भाजी कोणती करायची? कारण घरात प्रत्येकाची आवडनिवड निरनिराळी असते. त्यामुळे प्रत्येकाला आवडेल अशी एखादी डिश बनवण्याची तिची इच्छा असते. मात्र प्रत्येकासाठी अशी निरनिराळी भाजी बनवण्यासाठी वेळ आणि खर्च दोन्ही होत असतो. पावसाळा आणि हिवाळ्यात हिरव्यागार फळभाज्या आणि शेंगभाज्या मुबलक मिळतात. घेवडा ही तशी कोणालाच न आवडणारी भाजी आहे. पण असं म्हणतात की, दत्तगुरूनां घेवड्याची भाजी खूप आवडते. यासाठी श्रावणात पारायण करताना अथवा गुरूवारी तुम्ही घेवड्याची भाजी नक्कीच करू शकता. शिवाय जर ही भाजी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने केली तर सर्वात जास्त चविष्ट लागू शकते. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत घेवड्याची भाजी रेसिपी (Ghevdyachi Bhaji Recipe) शेअर करत आहोत. ज्यामुळे नेहमीची साधी घेवड्याची भाजीदेखील घरातील सर्वजण अगदी आवडीने खातील. 

घेवड्याची सुकी भाजी (Dry Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)

घेवड्याची सुकी भाजी

घेवड्याची सुकी भाजी

ओले खोबरे पेरून केलेली घेवड्याची सुकी भाजी (ghevdyachi bhaji) तुम्ही गरमागरम पोळी अथवा  वरणभातासोबत नक्कीच ट्राय करू शकता.  

ADVERTISEMENT

साहित्य –  

  • पाव किलो घेवड्याच्या शेंगा
  • एक छोटा कांदा
  • दोन ते तीन लसूण पाकळ्या
  • दोन ते तीन चमचे ओला खोवलेला नारळ
  • दोन चमचे कांदालसणाचे वाटण
  • चवीपुरते मीठ
  • तेल
  • हिंग
  • मोहरी
  • हळद
  • लाल तिखट
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर

भाजी करण्याची पद्धत –

  • घेवड्याच्या शेंगा सोलून चिरून घ्याव्या.
  • कांदा बारीक कापावा.
  • लसूण ठेचून घ्यावा.
  • तेलात फोडणी करून कांदा परतून घ्या.
  • त्यावर ठेचलेला लसूण टाका.
  • चिमुटभर हळद टाका.
  • कांदा लसूण परतल्यावर त्यावर घेवड्याच्या चिरलेला शेंगा टाका.
  • खोबरे आणि कांद्याचे वाटण टाकून त्यावर लाल तिखट परतून घ्या.
  • वरून मीठ आणि पाव वाटी पाणी टाकून वाफेवर शिजू द्या
  • भाजी शिजल्यावर त्यावर ओले खोबरे, कोथिंबीर टाकून गरमागरम भाजी वाढा.

जाणून घ्या का खायला हवी अळकुडीची भाजी

सोपी खमंग घेवडा भाजी (Khamang Ghevdyachi Bhaji)

सोपी खमंग घेवडा भाजी

ADVERTISEMENT

सोपी खमंग घेवडा भाजी

आज काहीतरी चमचमीत आणि खमंग खाण्याचा बेत असेल तर या पद्धतीने बनवा घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji).

साहित्य –

  • पाव किलो घेवडा
  • दोन कांदे
  • एक बटाटा
  • एक टोमॅटो
  • पाव वाटी ओले खोबरे
  • चार ते पाच लसूण पाकळ्या
  • एक चमचा लाल तिखट
  • एक चमचा गरम मसाला
  • एक चमचा पावभाजी मसाला
  • अर्धा चमचा धणेपूड
  • पाव चमचा हळद
  • चिमूटभर हिंग
  • तेल
  • फोडणीसाठी मोहरी आणि जिरे
  • कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • पाणी

भाजी करण्याची पद्धत –

ADVERTISEMENT
  • घेवडा सोलून, धुवून बारीक चिरून घ्या
  • कांदा, टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर चिरून घ्या
  • एका भांड्यात चिरलेला घेवडा आणि बटाटा पाण्यात टाकून ठेवा.
  • ओले खोबरे, कांदा आणि लसूण तव्यावर गरम करून वाटून घ्या
  • कढईत तेल गरम करून थोडाकांदा, मोहरी, जिरे, हिंग परतून घ्या.
  • त्यावर बटाटा टाकून चांगले परता
  • बटाटा  शिजू लागतात फोडणीत टोमॅटो आणि वाटलेला मसाला टाका
  • हळद,लाल तिखट आणि  इतर मसाले टाकून चांगले एकजीव करा
  • वरून पाणी टाका आणि कोथिंबीर पेरा
  • पाणी आटून भाजी शिजेपर्यंत मध्यम आचेवर भाजी शिजवा.
  • पोळी, भाकरीसोबत मस्त गरमगरम सर्व्ह करा. 

का खावी कारल्याची भाजी

घेवड्याची सातारा स्टाईल भाजी (Satara Style Ghevda Bhaji)

Satara Style Ghevda Bhaji

Satara Style Ghevda Bhaji

साताऱ्याची स्वयंपाकाची पद्धत थोडी वेगळी आहे. जर तुम्हाला सातारा स्टाईल घेवडा भाजी (ghevda bhaji) बनवण्याची इच्छा असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे.

ADVERTISEMENT

साहित्य –

  • एक वाटी बारीक चिरलेला घेवडा
  • एक वाटी मटार
  • एक वाटी वांग्याचे चिरलेल्या फोडी
  • एक वाटी गाजर
  • एक वाटी वालाचे दाणे
  • अर्धी वाटी शेंगदाणे
  • एक वाटी हिरवा ताजा  हरभरा
  • चिमूटभर हळद
  • चवीपुरतं मीठ
  • पाणी
  • एक ते दोन चमचे घाटी मसाला
  • एक ते दोन चमचे लाल तिखट
  • तीन चमचे काळे जवसाची पूड
  • तेल
  • मोहरी
  • हिंग

भाजी करण्याची पद्धत –

  • सर्व भाज्या एकत्र करून त्यात हळद, मीठ आणि पाणी टाकून शिजवून घ्या.
  • एका कढईत तेल गरम करा आणि  त्यात मोहरी आणि हिंगाची फोडणी द्या.
  • फोडणीत घाटी मसाला, लाल तिखट टाका आणि परतून घ्या.
  • फोडणीत शिजलेल्या भाज्या टाका.
  • पाच ते दहा मिनीटे वाफवून झाल्यावर त्यात जवसाची पूड टाकून दोन मिनीटे शिजू द्या.

शेपू भाजी खाण्याचे अनेक फायदे

श्रावण घेवडा भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)

श्रावण घेवडा भाजी

ADVERTISEMENT

श्रावण घेवडा भाजी

 

श्रावण घेवड्याला फरसबी असंही म्हणतात. जर तुम्हाला फरसबीची भाजी आवडत असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता.

साहित्य –

  • पाव किलो फरसबी अथवा श्रावण घेवडा
  • एक बटाटा
  • एक कांदा
  • एक टोमॅटो
  • तेल
  • मोहरी 
  • जिरे
  • हळद
  • हिंग
  • एक चमचा लाल तिखट
  • एक चमचा गरम मसाला
  • चवीपुरते मीठ
  • गुळ
  • ओले खोबरे
  • कोथिंबीर

भाजी करण्याची पद्धत –

ADVERTISEMENT
  • श्रावण घेवडे सोलून आणि धुवून बारीक चिरून घ्या.
  • कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बटाटा धुवून चिरून घ्या.
  • कढईत तेल गरम करा आणि त्यात मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी तयार करा.
  • फोडणीत कांदा, बटाटा आणि टोमॅटो टप्पाटप्प्याने टाका.
  • सर्व मिश्रण चांगले परतून घ्या.
  • त्यात हळद आणि सर्व मसाले टाका.
  • वरून श्रावण घेवड्याच्या चिरलेल्या शेंगा टाका.
  • गरम पाणी टाकून पाच मिनीटे वाफेवर शिजू द्या
  • भाजी शिजल्यावर त्यात मीठ, कोथिंबीर आणि ओले खोबरे टाका आणि गरमगरम सर्व्ह करा.

वाचा – भरलेली तोंडली (Bharli Tondli Chi Bhaji)

काळा घेवड्याची भाजी (Kala Ghevda Bhaji Recipe In Marathi)

Kala Ghevda Bhaji Recipe in Marathi

Kala Ghevda Bhaji Recipe in Marathi

काळा घेवडा ही सिझनल भाजी आहे. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसा ही भाजी मुबलक प्रमाणात असते. काळा घेवडा  हिरव्या घेवड्यापेक्षा जास्त चविष्ट लागतो.

ADVERTISEMENT

साहित्य –

  • पाव किलो काळा घेवड्याच्या शेंगा
  • एक कांदा
  • एक बटाटा
  • चार, पाच लसूण पाकळ्या
  • एक चमचा किचन किंग मसाला
  • एक चमचा गोडा मसाला
  • चिमूटभर हळद
  • हिंग
  • मोहरी
  • जिरे
  • तेल
  • चवीपुरते मीठ
  • कोथिंबीर 

भाजी करण्याची पद्धत –

  • लाल अथवा काळसर रंगाच्या घेवड्याच्या शेंगा निवडून, धुवून आणि चिरून घ्या.
  • कढईत तेल गरम करा आणि त्यामध्ये चिरलेला कांदा  आणि ठेचलेला लसूण टाका.
  • हळद, हिंग, मोहरी आणि जिरे टाकून परतून घ्या.
  • सर्व प्रकारचे कोरडे मसाले मिसळा आणि मिश्रण एकजीव करा
  • काळ्या घेवड्याची भाजी, बटाटा, गोडा मसाला टाका आणि भाजी वाफेवर शिजू द्या.
  • भाजी करपू नये यासाठी थोडे गरम पाणी त्यात मिसळा.
  • भाजीत वरून कोथिंबीर पेरा.

घेवड्याची राजमा स्टाईल भाजी (Rajma Style Ghevdyachi Bhaji)

Rajma Style Ghevdyachi Bhaji

Rajma Style Ghevdyachi Bhaji

ADVERTISEMENT

घेवड्याची भाजी (ghevda bhaji) तुम्ही पंजाबी स्टाईल अथवा राजमा स्टाईल देखील करू शकता. ज्यामुळे रोटी, नान अथवा भातासोबत ती छान लागेल. शिवाय घरच्यांना एक छान भाजीचा प्रकार ट्राय करता येईल.

साहित्य –

  • पाव किलो सोललेला घेवड्याच्या शेंगा
  • एक बटाटा
  • एक कांदा
  • एक टोमॅटो
  • चार ते पाच लसूण
  • एक चमचा खोबरे
  • चार ते पाच कडिपत्ता
  • एक चमचा लाल तिखट
  • एक चमचा राजमा मसाला
  • चवीपुरते मीठ 
  • तेल 
  • पाणी
  • तेल
  • जिरे
  • मोहरी
  • हिंग
  • कोथिंबीर

भाजी करण्याची पद्धत –

  • घेवड्याचे दाणे कुकरमध्ये वाफवून घ्या
  • कांदा, खोबरे, लसूण तव्यावर भाजून त्याचे वाटण तयार करा
  • कढईत तेल गरम करा आणि मध्यम आचेवर जिरे, हिंग, मोहरीची फोडणी द्या
  • फोडणीवर कांदा खोबऱ्याचे वाटण परतून घ्या
  • त्यात चिरलेला बटाटा आणि टोमॅटोची प्युरी परतून घ्या.
  • हळद आणि सर्व मसाले परतून घ्या
  • फोडणीत वाफवलेले घेवड्याचे  दाणे टाका आणि गरम पाणी टाकून भाजी शिजू द्या
  • भाजीची ग्रेव्ही राजमाप्रमाणे तयार झाल्यावर कोथिंबीर टाका आणि गरमगरम सर्व्ह करा.

वाल पापडी घेवडा भाजी (Val Papdi Ghevdyachi Bhaji)

वाल पापडी घेवडा भाजी

ADVERTISEMENT

वाल पापडी घेवडा भाजी

वालपापडी हा देखील घेवड्याचाच एक प्रकार आहे. फक्त वालपापडीच्या शेंगा थोड्या छोट्या आणि चवीला उत्कृष्ट असतात.

साहित्य –

  • एक वाटी सोललेली वाल पापडी
  • अर्धी वाटी खोवलेला नारळ
  • पाव वाटी शेंगदाण्याचा कूट
  • चार ते पाच कडीपत्ता
  • एक चमचा गोडा मसाला
  • एक ते दोन कोकम
  • एक चमचा गुळ
  • चवीपुरतं मीठ
  • तेल
  • हिंग
  • जिरे 
  • मोहरी

भाजी करण्याची पद्धत –

ADVERTISEMENT
  • वालपापडी निवडून, धुवून आणि चिरून घ्या
  • कढईत तेल गरम करा त्यात हिंग, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्या.
  • फोडणीत वालपापडी पाच मिनिटे परतून घ्या.
  • मीठ, कोकम आणि पाणी टाकून वाफेवर शिजू द्या.
  • भाजीतील पाणी सुकल्यावर त्यात खोवलेला नारळ, गोडा मसाला, गुळ, शेंगदाण्याचा कूट टाका  आणि गॅस बंद करा.
  • कढईवर झाकण ठेवा ज्यामुळे भाजी वाफेवर शिजत राहिल. 

घेवड्याची फ्राय केलेली भाजी (Fry Ghevda Bhaji)

Fry Ghevda Bhaji

Fry Ghevda Bhaji

घेवड्याची नेहमीची भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर घेवडा फ्राय करून अशी तवा फ्राय भाजी (Ghevdyachi Bhaji) तयार करा.

साहित्य –

ADVERTISEMENT
  • पाव किलो घेवडा
  • एक वाटी शिजवलेली चणाडाळ
  • एक आल्याचा तुकडा
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता
  • चार हिरव्या मिरच्या
  • एक चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा हळद
  • एक लिंबू
  • चवीपुरते मीठ
  • एक चमचा साखर
  • दोन चमचे तांदळाचे पीठ
  • अर्धी वाटी ओले खोबरे
  • तेल

भाजी करण्याची पद्धत –

  • घेवडा सोलून सारण भरण्यासाठी त्याचा अर्धा भाग उघडावा
  • चणाडाळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे,  ओले खोबरे जाडसर वाटून घ्यावे.
  • या वाटणार हळद, मीठ, लाल तिखट, तांदळाचे पीठ, लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करा.
  • वाटण घेवड्याच्या शेंगामध्ये भरा आणि शेंगा मोदकपात्रात उकडून घ्या
  • उकडलेला घेवडा तव्यावर शॅलो फ्राय करा.

तिळकूट घालून घेवडा भाजी (Tilkut Ghevda Bhaji)

Tilkut Ghevda Bhaji

Tilkut Ghevda Bhaji

घेवड्याची भाजी तिळकूट घालून केल्यास जास्त छान लागते. यासाठी ट्राय करा ही तिळकूट घालून घेवडा भाजी (Ghevdyachi Bhaji).

ADVERTISEMENT

साहित्य –

  • पाव किलो घेवडा
  • दोन कांदे
  • एक बटाटा
  • एक टोमॅटो
  • पाव वाटी ओले खोबरे
  • चार ते पाच लसूण पाकळ्या
  • एक चमचा लाल तिखट
  • एक चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा धणेपूड
  • पाव चमचा हळद
  • चिमूटभर हिंग
  • तेल
  • फोडणीसाठी मोहरी आणि जिरे
  • कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • पाणी
  • तिळकूट

भाजी करण्याची पद्धत –

  • घेवडा सोलून, धुवून बारीक चिरून घ्या
  • कांदा, टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर चिरून घ्या
  • एका भांड्यात चिरलेला घेवडा आणि बटाटा पाण्यात टाकून ठेवा.
  • ओले खोबरे, कांदा आणि लसूण तव्यावर गरम करून वाटून घ्या
  • कढईत तेल गरम करून थोडाकांदा, मोहरी, जिरे, हिंग परतून घ्या.
  • त्यावर बटाटा टाकून चांगले परता
  • बटाटा  शिजू लागतात फोडणीत टोमॅटो आणि वाटलेला मसाला टाका
  • हळद,लाल तिखट, गरम मसाला टाकून चांगले एकजीव करा
  • वरून पाणी टाका आणि कोथिंबीर पेरा
  • भाजी शिजल्यावर त्यामध्ये तिळकूट टाका.
  • पाणी आटून भाजी शिजेपर्यंत मध्यम आचेवर भाजी शिजवा.
  • पोळी, भाकरीसोबत मस्त गरमगरम सर्व्ह करा. 

घेवडा घालून केलेला उंधियो (Ghevda Undhiyu Recipe In Marathi)

Ghevda Undhiyu Recipe In Marathi

Ghevda Undhiyu Recipe In Marathi

ADVERTISEMENT

उंधियो ही एक पारंपरिक रेसिपी (Undhiyu Recipe In Marathi) असून ही भाजी घेवडा अथवा वालपापडीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. यासाठी जाणून घ्या उंधियो कसा बनवावा. 

साहित्य –

  • एक वाटी सुरती वालपापडी
  • एक वाटी वांग्याचे काप
  • एक वाटी जांबळा कंद सोलून चिरून घेतलेला
  • चार ते  पाच बेबी पॉटॅटो
  • दोन कच्ची केळी चिरून घेतलेली
  • एक रताळे धुवून चिरून घेतलेले
  • एक वाटी मटार
  • एक वाटी तुरीचे ताजे दाणे
  • एक वाटी हरभरा  सोललेला
  • एक वाटी मेथीच्या मुठीया
  • अर्धी वाटी चिंचेचा कोळ
  • एक वाटी गुळ
  • एक वाटी चिरलेली कोथिंबीर
  • अर्धी वाटी शेंगदाणे
  • तेल
  • मीठ 
  • हिंग
  • जिरे
  • ओवा
  • हळद
  • अर्धी वाटी ओला नारळ
  • पाच हिरव्या मिरच्या
  • एक वाटी पांढरे तीळ

उंधियो बनवण्याची कृती – 

  • कोथिंबीर, हिरवी मिरची, नारळाचा किस, शेंगदाणे, तीळ, ओवा, मीठ जाडसर वाटून घ्या
  • कुकरमध्ये फोडणी करून त्यात वरून वालपापडी पेरावी
  • त्यावर वाटलेला मसाला पेरावा
  • पुन्हा कच्ची केळी, पापडी, मटार, तूर, रताळे, बटाटे याचा एक थर द्यावा.
  • पुन्हा थोडा वाटलेला मसाला पेरावा 
  • असे करत भाज्यांचे सर्व थर लावून घ्यावे
  • पंधरा ते वीस मिनीटे आधी मध्यम आणि  मग मंद आचेवर उंधिओ शिजू द्यावा 
  • एका मोठ्या भांड्यात तेल गरम करून त्यात जिरे टाकावे
  • वरून शिजवलेल्या भाज्या, मीठ, चिंचेचा कोळ, पाणी टाकावे.
  • उंधियो शिजला की वरून तळलेल्या मुठिया, कोथिबीरने सजवावे आणि सर्व्ह करावे.
08 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT