ADVERTISEMENT
home / Recipes
रोजची भाजी बनवायची असेल अधिक चविष्ट तर घरीच तयार करा असा सुका मसाला

रोजची भाजी बनवायची असेल अधिक चविष्ट तर घरीच तयार करा असा सुका मसाला

बऱ्याचदा जेवण बनवताना पोळी, आमटी, भात हे सगळं पटकन तयार करता येतं. पण भाजीमध्ये वेगळेपणा हवा असतो आणि त्यासाठी रोज प्रश्न पडतो भाजी काय करायची? त्याची वेगळी चव कशी आणायची? एकसारख्या चवीचं जेवण खाणे शक्य नाही. पण तुम्ही बाजारातील काही मसाले वापरता आणि मग भाजीमध्ये त्याचा वापर करून भाजीची वेगळी चव आणता. आम्ही तुम्हाला असाच एक सुका मसाला रेसिपी (spicy sabji masala recipe) या लेखातून देणार आहोत. तुम्ही भाजीसाठी याचा वापर केल्यास, तुम्हाला भाजीची वेगळी चव मिळते आणि तोचतोचपणा येणार नाही. हा घरगुती मसाला तयार करणे अत्यंत सोपे आहे. तसंच अत्यंत कमी वेळा तुम्ही भाजी बनवू शकता. तुमच्या घाईच्या वेळी हा मसाला नक्कीच तुमच्या कामाला येईल.

क्रिस्पी जिरा आलू बनविण्याची सोपी पद्धत, रेसिपी घ्या जाणून

रोजची भाजी बनविण्यासाठी सुका मसाला

रोजची भाजी बनविण्यासाठी सुका मसाला

sukha masala

ADVERTISEMENT

रोज भाजी बनविण्यासाठी तुम्ही हा सुका मसाला बनवून ठेवला तर नक्कीच तुमचे अति कष्ट वाचतील. तसं तर आपण रोजच्या भाजीमध्ये गोडा मसाला, तिखट, बाजारातील सब्जी मसाला याचा वापर करतच असतो. पण तुमच्याजवळ हा सुका मसाला (sukha masala) तयार असेल तर तुमचे काम अधिक सोपे होईल. हा मसाला 5 मिनिट्समध्ये बनतो आणि त्यासाठी जास्त मेहनतही लागत नाही. 

साहित्य 

  • 50 ग्रॅम काजू 
  • 4 चमचे कलिंगडाचे सुकवलेले बी (पर्यायी)
  • 4 चमचे भाजलेले चणे 
  • 2-3 तमालपत्र
  • 4-5 हिरवी वेलची
  • 1 मोठी वेलची
  • 1 इंच दालचिनीचा तुकडा
  • 15-20 काळी मिरी
  • 1 दगडफूल
  • 5-6 लवंगा
  • 2 मोठे चमचे मिल्क पावडर 
  • 1 मोठा चमचा जिरे 
  • 4 मोठे चमचे कांद्याची पावडर
  • दीड चमचा सुंठ पावडर 
  • 1 लहान चमचा लसूण पावडर
  • 4 चमचे टॉमेटो पावडर
  • 2 चमचे गरम मसाला पावडर
  • 1 मोठा चमचा हिरवी मिरची पावडर अथवा कापलेल्या हिरव्या मिरच्या
  • 4 चमचे धने पावडर
  • अर्धा चमचा हळद पावडर
  • अर्धा चमचा लाल मिरची पावडर
  • 2 मोठे चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
  • अर्धा चमचा काळे मीठ 
  • 1 मोठा चमचा साधे मीठ
  • 1 चमचा पिठी साखर

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिले तुम्ही काजू, कलिंगडाचे बी, भाजलेले चणे एकत्र वाटून घ्या
  • त्यानंतर पुन्हा सर्व खडे मसाले एकत्र वाटून घ्या
  • यामध्ये आता बाकीच्या सर्व पावडर मिक्स करा 
  • सर्व एकत्र करून ब्लेंडिंगमधून पुन्हा एकदा वाटून घ्या जेणेकरून सर्व व्यवस्थित मिक्स होईल
  • हा तयार मसाला आता भाजून घ्या. इतर मसाले तयार करण्यापूर्वी पदार्थ भाजून घेतले जातात. पण हा मसाला वाटून घेतल्यावर मग भाजा. साधारण 2-3 मिनिट्स भाजा. असं केल्याने हा मसाला अधिक टिकतो. यामध्ये कोणत्याही प्रिझर्व्हेटिव्हची गरज भासत नाही. साधारण 1 महिना हा सुका भाजी मसाला तुम्ही वापरू शकता
  • तुम्ही हा सुका मसाला वापरून भाजी तयार करू शकता. तसंच फ्रिजमध्ये हा मसाला स्टोअर करू शकता. 

स्वयंपाकघरात करायच्या असतील स्वादिष्ट रेसिपीज तर वापरा सोप्या टिप्स

ADVERTISEMENT

भाजीच्या ग्रेव्हीसाठी लागणारा घरगुती मसाला (Homemade masala for gravy)

भाजीच्या ग्रेव्हीसाठी लागणारा घरगुती मसाला (Homemade masala for gravy)

gravy masala for sabji

हा मसाला तयार करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. पण तुम्ही एकदा हा मसाला तयार करून घेतला की याचा स्वाद तुमच्या जिभेचे चोचले नक्कीच पुरवतो. 

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 4 मोठे कांदे, 
  • 4 टॉमेटो
  • 25 ग्रॅम आल्याचे तुकडे
  • 25 ग्रॅम सोललेल्या लसणीच्या पाकळ्या
  • 3-4 सुक्या मिरच्या
  • 1 मोठा चमचा हळद पावडर 
  • 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर 
  • 1 मोठा चमचा जिरे पावडर
  • दीड चमचा धने पावडर 
  • 1 मोठा चमचा गरम मसाला
  • आवश्यकतेनुसार तेल

बनविण्याची पद्धत 

  • तुम्ही सर्वात पहिले या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कापून घ्यायच्या आहेत 
  • त्यानंतर तुम्ही लाल मिरची, आले, लसूण साधारण एक मिनिट भाजून घ्या. त्यात आता कांदा, टॉमेटो घाला आणि पुन्हा एक मिनिट नीट भाजा 
  • हे थंड झाल्यावर याची पेस्ट बनवा
  • ग्रेव्हीमध्ये तुम्हाला ही पेस्ट वापरायची असेल तर तुम्ही जास्त तेलात शिजवून ठेवा. एका गोष्टीची काळजी घ्या की, मसाल्यामध्ये मीठाचा अजिबात वापर करू नका. भाजी बनवताना मीठ वापरा 
  • एका पॅनमध्ये तेल घ्या. त्यात ही पेस्ट ओता आणि साधारण 20 मिनिट्स शिजवा. ही पेस्ट फ्रिजमध्ये जास्त दिवस टिकते 
  • थंड झाल्यावर एका डब्यात काढून फ्रिजमध्ये ठेवा आणि भाजी करताना त्यात वापरा. ही पेस्ट तुम्ही चिकन, फ्लॉवर, पनीर अशा कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता. 

घरच्या घरी करा दाबेली मसाला आणि बनवा चविष्ट दाबेली

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT