Diet

हिवाळ्यात या 10 पदार्थांचा करा समावेश आणि राहा फिट

Leenal Gawade  |  Dec 16, 2020
हिवाळ्यात या 10 पदार्थांचा करा समावेश आणि राहा फिट

बदलत्या वातावरणानुसार आहारात वेगवेगळे पदार्थ समाविष्ट केले जातात. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी पाणीदार फळ, पावसाळ्यात सर्दी, पडसं यापासून दूर राहण्यासाठी गरम जेवण, खिचडी आणि घरगुती जेवणाचे सेवन केले जाते. तर हिवाळ्यात शरीरात हिट निर्माण करणारे पदार्थ खाल्ले जातात. सध्याची परिस्थिती पाहता फिट राहणे हे फारच गरजेचे आहे. त्यामुळेच हिवाळ्यात तुम्ही काही खास अशा पदार्थांचे सेवन करणे फारच गरजेचे आहे. आम्ही असे 10 पदार्थ निवडले आहेत. जे तुम्ही हिवाळ्यात खाल्ले तर तुम्ही नक्कीच फिट राहाल.

थंडी चालू झाल्यावर फुटतात लगेच टाचा, तर वापरा तिळाचे तेल आणि मेण

तूप

Instagram

तूपाचे आरोग्यदायी फायदे अनेकांना माहीत आहे. कांती उजळवण्यापासून ते पचनक्रिया सुधारण्यापर्यंत तूपाचे अनेक फायदे आहे. अन्नपदार्थांची चव वाढवणे, त्यांना एक चांगले टेक्श्चर देण्याचे काम तूप करते. थंडीत तूपाच्या सेवनामुळे पोटाचे विकार दूर राहतात. अनेकांना थंडीच्या दिवसात बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अशावेळी तूपाचे सेवन केल्यामुळे मल: निस्सारण होण्यास अडथळा निर्माण होत नाही. त्यामुळे पोट स्वच्छ राहते.

तीळ

Instagram

थंडीच्या दिवसात अगदी आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ तीळ. थंडीच्या दिवसात येणारी संक्रात या दिवशीही तिळाचे लाडू खाल्ले जातात. तिळाच्या लाडूचे सेवन या दिवसात करण्यामागेही काही कारण आहे. तीळ हे उष्ण असतात. तिळाचे सेवन केल्यामुळे शरीराला आवश्यक असलेली उष्णता मिळते. त्यामुळे या दिवसात तुम्ही तिळाच्या पदार्थांचे सेवन करा.

हिरव्या पालेभाज्या

Instagram

हिरव्या पालेभाज्या या वर्षभर खायला हव्यात. पण हिवाळ्यात पालेभाज्या या खायलाच हव्यात. या दिवसांमधील वातावरण बदलामुळे अनेकांची प्रकृती ही नरम गरम असते. या दिवसात काही करावेसे वाटत नाही. सतत आळशीपणा आल्यासारखा वाटतो.  काही खायचे म्हटले की, त्याने देखील शरीराला जडत्व प्राप्त होते. तुमच्या शरीरात दिवसभर उर्जा राहावी असे वाटत असेल तर तुम्ही पालेभाज्यांचे सेवन करायलाच हवे

शेंगदाणे

Instagram

शेंगदाणे हे देखील थंडीच्या दिवसात खायला हवे. शेंगदाण्यांमुळे शरीराला उर्जा मिळते. ड्रायफ्रुट्स खाल्यामुळे ज्यापद्धतीने उर्जा मिळते. अगदी तशीच उर्जा तुम्हाला एक मुठ शेंगदाणे खाल्यामुळे मिळेल. त्यामुळे तुम्ही उर्जा मिळवण्यासाठी दररोज संध्याकाळी शेंगदाण्याचे सेवन करा. 

बाजरी

Instagram

अनेकांकडे खास हिवाळ्यात बाजरीच्या भाकऱ्या खाल्ल्या जातात .बाजरी ही आरोग्यास फारच लाभदायक असते. बाजरीच्या सेवनामुळे शरीराला उष्णता मिळते. कारण बाजरी ही उष्ण असते. इतर कोणत्याही वातावरणात बाजरीचे सेवन केले जात नाही. पण हिवाळ्यात आवर्जून केले जाते.

रोज खरबूज खा आणि आठवड्याभरात मिळवा सुंदर त्वचा

कंदमुळे

Instagram

कंदमुळांचे सेवन शरीरात फायबरचे प्रमाण वाढवते. त्यामुळे कंदमुळ ही देखील याकाळात खाणे गरजेचे आहे. या काळात मिळणारे नवलकोल किंवा अन्य कंद यांची भाजी करुन किंवा उकडून त्याचा समावेश आहारात करावा त्यामुळे पोट साफ राहण्यास मदत मिळते

रताळी

Instagram

कंदमुळांचाच एक प्रकार म्हणजे रताळी. पण रताळी याला वेगळे स्थान देण्यामागचे कारण असे की, रताळी ही बाजारात वेगवेगळ्या प्रकारात मिळतात. या रताळींच्या सेवनामुळे शरीराला उष्णता मिळते. त्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत चालते. पोट भरलेले राहते. त्यामुळे इतर काही खाण्याची फारशी इच्छा होत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

आवळा

Instagram

व्हिटॅमिन C नी युक्त असा आवळा या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात दिसू लागतो. आवळा हा कांती, केस आणि आरोग्यासाठी चांगला आहे. आवळयाच्या सेवनामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.बाजारातून ताजे आवळे आणून तुम्ही त्याचे सेवन कच्चे किंवा अगदी रस करुनही घेऊ शकता. आवळ्याचा मुरावळा करुनही तुम्हाला ठेवता येतो. तो वर्षभर टिकतो त्यामुळे आवळ्याचे सेवन वर्षभर करता येते.

घाम आल्यामुळे त्वचा होते अधिक सुंदर, जाणून घ्या कसे

खजूर

Instagram

 साखरेऐवजी खजूर खाण्याचा सल्ला अनेकांना दिला जातो. नैसर्गिक गोड असलेले खजूर आरोग्यासाठी ही फारच लाभदायक असतात. खजूर उष्ण असता. त्यामुळे शरीराला हिट मिळते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये खजूरचे सेवन करण्यास काहीच हरकत नाही. दिवसातून दोन खजूरांचे सेवन तुमच्यासाठी पुरेसे आहे. 

संत्री

Instagram

थंडीच्या दिवसात दिसणारे आणखी एक फळ म्हणजे संत्री व्हिटॅमिन C ने युक्त अशा संत्र्याचे फायदे अनेकांना माहीत आहेत. आंबट-गोड संत्री त्वचा, केस या दोघांसाठी चांगली ठरतात. थंडीच्या दिवसात त्वचा काळवंडते अशा काळामध्ये जर तुम्ही या पदार्थांचे सेवन केले तर त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते.

 

आता आवर्जून या पदार्थांचा समावेश आहारात करा आणि मस्त फिट राहा.

Read More From Diet