DIY सौंदर्य

लिप बामचे 10 फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Leenal Gawade  |  Oct 26, 2020
लिप बामचे 10 फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

ओठांचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी लिप बाम हा फारच फायदेशीर आहे. हे सगळ्यांनाच माहीत असेल. पण लिप बाम तुमच्या ओठांव्यतिरिक्तही कसा फायदेशीर आहे हे कधी तुम्ही जाणून घेतले आहे का? नाही.. तर आज आम्ही तुम्हाला लिप बामचे 10 फायदे सांगणार आहोत. हे उपयोग वाचल्यानंतर तुम्हाला हे कळेल की, लिप बाम हे फक्त कोरड्या ओठांना ओलावा द्यायचेच काम करत नाही तर त्या व्यतिरिक्तही तो फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया लिप बामचे हे 10 फायदे.

फक्त लिपस्टिक नाही तर ‘हे’ 5 Lip Balm करतील तुमच्या ओठांना अधिक आकर्षक

क्युटिकलचा त्रास करते कमी

Instagram

नखांवर वाढणाऱ्या मृत त्वचेला ‘क्युटिकल’ असे म्हणतात. हे क्युटिकल वाढले की, नखं खराब दिसू लागतात. नखांची चमक त्यामुळे झाकोळली जाते. क्युटिकल खूप वाढू द्यायचे नसतील तर तुम्ही नखांना लिप बाम लावा. रोज रात्री लिप बाम लावल्यामुळे क्युटिकल नरम होतात. आणि ते साचत नाही.तसेच नखांनाही चमक मिळते. त्यामुळे रोज रात्री नखांना लिप बाम लावा. त्याचा फायदा तुम्हाला दिसेल.

मेकअपसाठी फायदेशीर

मेकअपसाठीही लिप बामचा  उपयोग केला जातो. लिप बामचा वापर करुन तुम्ही चेहऱ्यावर  अतिरिक्त झालेला मेकअप अगदी हलक्या हाताने काढू शकता. मेकअप क्लिन्झरपेक्षा ही अत्यंत व्यवस्थित लिप बाम लावला जातो. तो टिश्यूवर घेऊन तुम्हाला मेकअप काढण्यास अडथळा येत नाही. 

गुलाबी रंगाचे ओठ हवे असतील तर करा घरीच Lip Balm तयार

आयमेकअपसाठीही चांगला

Instagram

लिपबामचा उपयोग आयमेकअपसाठीही केला जातो. आयमेकअप करताना तुम्हाला ड्युई मेकअप लुक हवा असेल तर तुम्ही आयशॅडोमध्ये थोडासा लिप बाम घ्या.ब्रशच्या मदतीने तो डोळ्यांना लावा. असा आयशॅडो डोळ्यांवर छान टिकतो. यासाठी तुम्ही चांगले लिप बाम घ्या. कारण त्यामुळे रंगामध्ये बदल होत. एकाहून अधिक रंगाचा उपयोग करताना ही पद्धत अधिक छान उठून दिसते.

त्वचा करते मॉश्चरायईज

लिप बाम आणि व्हॅसलीन जेलीचे फायदे सर्वसाधारणपणे सारखेच आहे. फाटलेले ओठ, सुरकुतलेली त्वचा किंवा हाताचे, पायाचे कोपरे यांना हातावर चोळून थोडासा लिप बाम लावा. तुम्हाला तुमची त्वचा लगेचच मऊ आणि मुलायम झालेली जाणवेल. त्यामुळे प्रवासात असताना मॉश्चयरायजर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने लिप बाम लावण्यास काहीच हरकत नाही. 

पायाच्या भेगा भरते

Instagram

पायांच्या भेगांवरही लिप बाम कमालीचे काम करते. तुमच्या पायांना भेगा पडल्या असतील तर तुम्ही पायांच्या भेगांना लिप बाम लावा. पायाच्या भेगा भरुन निघण्यास मदत मिळेल. त्यामुळे लिप बामचा उपयोग तुम्ही अशापद्धतीने करु शकता. झोपताना तुम्ही हा प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही.

काळे ओठ गुलाबी करण्यासाठी घरगुती उपाय, सोप्या पद्धती (Home Remedies For Dark Lips)

आयब्रोज करते जाड

आयब्रोज जाड दिसणे हा हल्लीचा ट्रेंड आहे. तुम्हालाही आयब्रोज जाड दाखवायच्या असतील तर तुम्ही एका स्पुली ब्रश (मस्कारा ब्रश) वर लिप बाम घेऊन तो आयब्रोजवर फिरवा. त्यामुळे तुमच्या आयब्रोजचे केसही जाड दिसतात.

स्किन करते ग्लो

Instagram

 काही जणांना फार मेकअप आवडत नाही. पण त्वचा ग्लो व्हावी असे अनेकांना वाटते. तुम्ही अचानक कुठे बाहेर जाणार असाल तर तुमच्या क्विक मेकअपसाठी तुम्ही याचा उपयोग करु शकता. हल्ली लिप बाममध्ये छान रंगाच्या शेड्स मिळतात. बोटावर घेऊन तुम्ही ते थेट तुमच्या गालांना लावू शकता. 

सुरकुत्या करते कमी

चेहऱ्यावर अनेक ठिकाणी सुरकुत्या असतात. या सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही लिपबाम थेट डोळ्यांच्या आजुबाजूला आणि ज्या ठिकाणी चेहऱ्याला सुरकुत्या असतील तिथे लावा म्हणजे त्या सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.

सर्दीत असे ठरते फायदेशीर

वाहते नाक सांभाळताना आपण अनेकदा नाक इतक्या जोरात आणि इतक्या वेळा पुसतो की, नाक आणि चेहऱ्याचा काही भाग खूप लाल होतो. चेहऱ्यावरील लालिमा कमी करण्यासाठीही लिप बाम फायदेशीर आहे. तुम्ही नाकाच्या कडांना हे लावा. तुम्हाला लगेच आराम मिळेल. 


अशा पद्धतीने करा लिप बामचा वापर.

Read More From DIY सौंदर्य