DIY सौंदर्य

सुंदर त्वचा हवी असेल तर फॉलो करा या 101 टीप्स

Leenal Gawade  |  Sep 14, 2019
सुंदर त्वचा हवी असेल तर फॉलो करा या 101 टीप्स

सुंदर त्वचा ही प्रत्येकाची इच्छा असते. विशेषत: एखाद्याची सुंदर त्वचा पाहिली की, आपल्याला लगेचच तशी त्वचा हवी असते. पण तुम्हाला चांगली त्वचा हवी असेल तर तुम्ही काही नियमांचे पालन करायला हवे. आम्ही तुमच्या त्वचेसाठी 101 टीप्स काढल्या आहेत. या गोष्टी तुम्ही जर काटेकोरपणे पाळल्या तर तुम्हालाही मिळेल सुंदर त्वचा.

तुमचेही केस गळतायत? ‘या’ गोष्टी खाल तर थांबेल तुमची केसगळती

सुंदर त्वचेसाठी 101 टीप्स

shutterstock

  1. चेहऱ्याला काहीही लावण्याआधी तुमच्या चेहऱ्याचा प्रकार तुम्ही ओळखा.
  2. गरम पाण्याने चेहरा धूत असाल तर तुमचे पोअर्स उघडे राहण्याची शक्यता अधिक असते अशावेळी चेहऱ्याला बर्फ लावायला विसरु नका.
  3. आठवड्यातून दोन वेळा तरी तुमचा चेहरा स्क्रब करा.
  4. तुमची त्वचा नाजूक असेल तर तुम्ही चेहऱ्याला त्रास देणारे स्क्रब वापरु नका.
  5. उन्हात बाहेर जाणार असाल तर चेहऱ्याला नेहमी सनस्क्रिन लावूनच बाहेर पडा.
  6. सनस्क्रिनची निवडही तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार करायला हवी.
  7.  सनस्क्रिन निवडण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अगदी हमखास घ्या.
  8. चेहरा मऊ, मुलायम राहण्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेला मॉश्चरायझर लावणे गरजेचे असते.
  9. तुमच्या कामाच्या वेळा आणि तुमचे कामाचे स्वरुप यांचा विचार करुन तुम्ही मॉश्चरायझर निवडायला हवे.
  10. जर तुम्ही साधारण 25 या वयोगटाच्या पुढील असाल तर तुमच्या चेहऱ्याला मसाज हा आवश्यक आहे. तुम्ही महिन्यातून एकदा तरी फेसमसाज करुन घ्या.
  11. फेस मसाज पार्लरमध्ये करुन घ्यायची इच्छा नसेल तर योग्यपद्धतीने तो करायला शिका.
  12. फेसमसाज करताना कोणतेही तेल चेहऱ्याला लावू नका.
  13. अगदी काहीही न लावता तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मसाज करु शकता.
  14.   व्हिटॅमिन E, बदामाचे तेल चेहऱ्यासाठी चांगले असते तुम्ही त्याचा वापर चेहऱ्यासाठी करु शकता.
  15.  तुमच्या चेहऱ्यासाठी फेशिअल सुद्धा महत्वाचे असते. त्यामुळे महिन्यातून एक तरी साधे फेशिअल नक्की करुन पाहा.
  16.  प्रोफेशनल ठिकाणी मेकअप करुन घेणे उत्तम असते. कारण त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते.
  17. त्वचेवर सतत प्रयोग करणे टाळा.
  18. जर तुमच्या त्वचेवर मुरुम आले असतील तर ते सगळ्यात आधी डॉक्टरांना दाखवा.
  19. पिंपल्स कधीही फोडू नका. कारण त्यामुळे तुमचा चेहरा काळवंडू शकतो.
  20.  पिरेड्स येण्याआधी येणारे पिंपल्स अगदी सर्वसाधारण असतात. त्याला घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही.
  21. पिंपल्सवर कोणतेही जालीम उपाय करुन पाहू नका.
  22.  तुमच्या चेहऱ्यावर केस असतील तर ते काढण्यासाठी चेहऱ्यावर रेझर फिरवू नका.
  23.  वॅक्स करणे चेहऱ्यासाठी चांगले नाही.
  24. कोणताही मेकअप केल्यानंतर तो काढण्यासाठी योग्य क्लिनझरचा वापर करा.
  25. मेकअप काढताना चेहरा घासू नका.
  26. डोळ्यांचा मेकअप काढणे हे थोडे कठीण जात असेल तर तो तेलाने काढा
  27. जर तुमच्या त्वचेला खोबरेल तेलाचा किंवा इतर कोणत्याही तेलाचा त्रास असेल तर त्याचा वापर टाळा.
  28. जर तुमची त्वचा फारच नाजूक असेल तर तुम्ही बेबी वाईप्स वापरले तरी चालू शकतील.
  29. तुमची त्वचा ऑईली असेलत तर तुम्ही ऑईलबेस मेकअप प्रोडक्ट अजिबात वापरु नका.
  30. चेहऱ्याला थेट मेकअप लावण्याआधी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला पोअर्स बंद करणारे प्राईमर नक्की लावा. म्हणजे मेकअप थेट तुमच्या पोअर्समध्ये जाणार नाही.
  31. मेकअप काढल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ करायचा असेल तर तुम्ही गरम पाण्याने तुमचा चेहरा धुवू शकता.
  32.  तुम्ही गरम पाण्याने चेहऱ्याला वाफ घेतली तरी चालू शकेल.
  33.  त्यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ होईल.
  34.  मेकअप काढल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला मॉश्चरायझर लावायला अजिबात विसरु नका.
  35. रात्री झोपताना मेकअप काढून मगच झोपा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला कोणताही त्रास होणार नाही.
  36. सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
  37. साबणाचा वापर चेहऱ्यावर करणे टाळा.
  38. तुमच्या चेहऱ्याला शोभेल असा फेसवॉश तुमच्या चेहऱ्याला लावा.
  39. दिवसातून केवळ दोनच वेळ तुमचा चेहरा फेसवॉशने धुवा.
  40. जास्त वेळ फेसवॉशचा वापर करणे चांगले नसते.
  41. जर तुमच्या चेहऱ्याला उत्तम फेस ट्रिटमेंटची गरज असेल तर ती घ्या.
  42. तुमच्या त्वचेच्या डॉक्टरांना तुमचा चेहरा आवर्जून दाखवा.
  43. तुमच्या त्वचेला आवश्यक असलेल्या सप्लीमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्यास काहीच हरकत नसते.
  44. तुमच्या चेहऱ्याला कधीही दुसऱ्या व्यक्तीने वापरलेला टॉवेल लावू नका.
  45. दुसऱ्यांचा टॉवेल वापरल्यामुळे तुमच्या चेहऱ्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
  46. शक्य असल्यास त्वचेसाठी टर्किश टॉवेलचा वापर करा.
  47. चेहऱ्यासाठी टिश्यूपेपरचा वापर करत असाल तर पातळ टिश्यू वापरा.
  48. सुंदर त्वचेसाठी व्यायामही तितकाच महत्वाचा असतो.
  49. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील रक्तपुरवठा चांगला ठेवण्यासाठी तुम्ही काही व्यायाम हमखास करुन पाहायला हवे.
  50. कोणत्याही गोष्टी चेहऱ्यावर लावण्याआधी तुम्ही तुमचा त्वचेचा प्रकार ओळखून घ्या.
  51. तुमच्या त्वचेच्या नाक, हनुवटी, कपाळावर तेल साचत असेल तर तुमची त्वचा ऑईली आहे.
  52. जर तुमच्या त्वचेला चटकन काहीही त्रास होत असेल तर तुमची त्वचा नाजूक आहे.
  53.  तुमची त्वचा अगदी काहीही न करता कोरडी पडत असेल तर तुमची त्वचा कोरडी आहे.
  54. प्रत्येक त्वचेच्या प्रकारासाठी वेगवेगळे स्किन प्रोडक्ट असतात. ज्यांच्या त्वचेवर पिगमेंटेशन आहे त्यांनी वांग जाण्यासाठी क्रीम वापरावे.
  55. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही त्यांचा वापर करु शकता.
  56. सततच्या फोन वापरामुळेही तुमची त्वचा खराब होऊ शकते. फोन स्वच्छ केल्याशिवाय तो कानाला लावू नका.
  57. काहीही खाताना किंवा पिताना चेहऱ्याला हात लावू नका. तेलकट हात, मसाला तुमच्या त्वचेला त्रासदायक ठरु शकतो.
  58. त्वचा चांगली हवी असेल तर तुमच्या पोटात चांगले जाणेही आवश्यक असते.
  59. लिंबू वर्गातील सगळी फळे तुम्ही आवर्जून खायला हवी.
  60. जर तुम्हाला चेहऱ्याला काही नैसर्गिक लावायचे असेल तर तुम्ही फळांचे रस देखील लावू शकता.
  61.  जर तुम्हाला कोंडा झाला असेल तर तुम्ही सगळ्यात आधी त्याचा इलाज करुन घ्या.
  62. कोंड्यामुळे तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात.
  63.  कोंड्यामुळे तुम्हाला अन्य त्रास ही होऊ शकतो.
  64. त्वचेसाठी पोटाचे आरोग्यही महत्वाचे आहे.
  65. तुमचे पाट साफ होत नसेल तर तुम्ही त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
  66. पोट साफ होण्यासाठी तुम्ही काढा अथवा साफी सारख्या गोष्टी हमखास घेऊ शकता.
  67. त्वचा उजळण्यासाठी जर तुम्ही काही लावत असाल तर तुम्ही ते लावणे टाळा.
  68. प्रत्येकाच्या त्वचेचा रंग हा वेगळा असतो. तुम्ही तुमची त्वचा चांगली करु शकता.
  69.  गोऱ्या रंगाच्या हव्यासापेक्षा तुम्ही तुमची त्वचा चांगली ठेवणे आवश्यक असते.
  70. जर तुम्ही 12 ते 15 तास काम करत असाल तर या दरम्यानही तुम्ही तुमचा चेहरा एकदा तरी स्वच्छ धुवा.
  71. जर तुम्हाला पिंपल्स आले असतील तर तुम्ही काही दिवस तुमच्या त्वचेची काळजी घ्या.
  72. चेहऱ्याला कोणत्याही प्रकारे अस्वच्छ हात लावू नका.
  73. चेहऱ्याला तेलाने मसाज करावा असे तुम्हाला वाटत असेल तर व्हिटॅमिन E किंवा बदामाच्या तेलाचा वापर करा.
  74.  जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांचा मेकअप घालवण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही डोळ्यांचा मेकअप टाळा.
  75. लिपस्टिक ओठांवरुन गेली असे वाटत असली तरी देखील ती ओठांवरुन काढणे आवश्यक असते.
  76.  जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ब्लीच करत असाल तर आधी योग्य सल्ला घ्या.
  77. कोणतेही स्वस्तातले ब्लीच अजिबात निवडू नका. त्याचा तुम्हाला कदाचित जास्त त्रास होऊ शकतो.
  78. ब्लीच चेहऱ्यावर साधारण 7 ते 10 मिनिटांसाठी ठेवायचे असते.
  79. ब्लीचचे कॉस्मेटिक्स तुमच्या केसांना हायलाईट करायला थेट वापरु नका.
  80. ब्लीच करताना ते तुम्ही तुमच्या मानेला देखील लावा.
  81. ब्लीचचा उपयोग अनेकदा अंडरआर्म्समध्येही केला जातो. पण कोणाच्याही सल्ल्याशिवाय त्याचा वापर थेट करु नका.
  82. काही जणांना नाकावर सतत  घाम येते. त्यामुळे त्या ठिकाणी पुळ्या येऊ शकतात. अशा पुळ्यांवर योग्य इलाज करा.
  83. तुमच्या त्वचेवर जर वांग आले असतील तर तुम्ही त्यावर योग्यवेळी इलाज करा.
  84. अशांवर घरगुती इलाज नेहमीच काम करु शकत नाही.
  85. क्लिनिंग, टोनिंग, मॉश्चरायझिंग तुमच्या चेहऱ्यासाठी आवश्यक आहे.
  86.  गुलाबपाण्याचा उपयोग तुम्ही नॅचरल टोनर म्हणून वापरु शकता.
  87.  रोज रात्री तुम्ही तुमच्या चेहऱ्याला बर्फ देखील लावू शकता त्यामुळे तुमचे पोअर्स बंद होतील.
  88. घरात असणाऱ्या अॅपल सायडर व्हिनेगरचेही भरपूर फायदे आहेत त्याचा तुम्ही उपयोग करु शकता.
  89. सनटॅन कमी करण्यासाठी तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करु शकता.
  90. सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही कोमट पाण्यात  अॅपल सायडर व्हिनेगर घालून प्या. त्यामुळे तुमचे पिंपल्स कमी होतील.
  91. तुमची पचनसंस्था सुधारल्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकेल.
  92. तुम्हाला फार मेकअप करुन घराबाहेर जायचे नसेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला बेबी पावडर लावू शकता.
  93. बेबी पावडरचे कोणतेही साईड इफेक्टस नसून तुम्ही त्यांचा वापर करु शकता.
  94. अॅलोवेरा जेल तुमच्या चेहऱ्याला तजेला आणू शकते.
  95. अॅलोवेरा जेलमुळे तुमच्या त्वचेला आवश्यक असलेल्या गोष्टी तुम्हाला यातून मिळू शकता.
  96. जर तुम्हाला इन्स्टंट फ्रेश वाटायचे असेल तर तुम्ही काकडीचा रस चेहऱ्याला लावू शकता.
  97. पिंपल्सचे डाग तुम्हाला घालवायचे असतील तर तुम्ही तुळशीच्या पानांचा रस चेहऱ्याला लावू शकता.
  98.  कोथिंबीर आणि ओट्स यांचा पॅकही तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावू शकता. तुम्हाला इन्स्टंट उजळपणा  जाणवेल.
  99. कोणतेही ब्युटी प्रोडक्ट एका दिवसात कोणताही चमत्कार दाखवू शकत नाही.
  100. पिंपल्स एका दिवसात जाऊ शकत नाही. त्यामुळे थोडी वाट नक्की पाहा.
  101. चांगल्या त्वचेसाठी भरपूर पाणी प्या आणि हेल्दी त्वचा मिळवा.

सौंदर्य प्रसाधनं खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जरूर जाणून घ्या

shutterstock

या टीप्स फॉलो करुन तुम्ही तुमची त्वचा चांगली करु शकता.

गुलाबपाणी… त्वचा आणि केसांचं सौदर्य खुलवणारा नैसर्गिक उपाय!

Read More From DIY सौंदर्य