वजन वाढणं हे सहज शक्य आहे. पण वाढलेले वजन कमी करणे (Weight Loss) हे सोपे काम नाही. त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, नियमित सकाळचे रूटीन हे तुमचे वजन झटपट कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. तुमच्या 3 अशा सवयी ज्या तुम्हाला तुमचे वजन घटविण्यासाठी मदत करू शकतात. अशा या कोणत्या सवयी आहेत, ज्यामुळे तुम्ही पटकन वजन कमी करू शकता याबाबत काही महत्त्वाची माहिती. तुम्हीही तुमच्या आयुष्यात या रूटीनचा समावेश करून घेतलात तर वजन कमी करणे तुम्हालाही होईल सोपे. जाणून घ्या.
खूप पाणी प्या आणि थोडा वेळा उन्हात जा
रोज सकाळी तुम्ही उठल्यानंतर दात घासल्यावर त्वरीत 1-2 ग्लास पाणी प्या. पाण्यामध्ये तुमच्या शरीरात निर्माण होणाऱ्या कॅलरी कमी करण्याची क्षमता असते. जास्त पाणी प्यायल्याने मेटाबॉलिजमचे प्रमाण वाढते. पाणी हे सर्व हानिकारक गोष्टी दूर करून शरीर योग्य पद्धतीने डिटॉक्स करण्याचे काम करते. याशिवाय पाणी अधिक प्यायल्याने अन्न कमी प्रमाणात पोटात जाते आणि वजन कमी होण्यास याची मदत मिळते. आपल्या शरीराला हायड्रेट राखण्याचे काम पाणी योग्य प्रमाणात करते आणि त्यामुळेच अनेक आजार आणि शरीरावर होणाऱ्या दुष्परिणांपासून पाणी दूर ठेवते.
सकाळी सकाळी उठल्यानंतर पडदे उघडणे आणि काही वेळ सकाळच्या उन्हामध्ये आपले शरीर शेकवणे हे अत्यंत फायदेशीर ठरते. सूर्याच्या किरणांमधील विटामिन डी हा सर्वात चांगला स्रोत मानला जातो. विटामिन डी हे आपल्या शरीरातील काही हार्मोनल बदल करण्यासाठी चांगले ठरते. संपूर्ण दिवस यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि तुम्हाला ताजेतवाने राहण्यासाठीही याची मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही सकाळी जिमला जावे, तसंच वजन कमी करण्यसाठी तुम्ही आपल्या डाएटवर टिकून राहणे आवश्यक आहे. तुम्ही सकाळीच उन्हात काही वेळ काढल्यास, दिवसभर थकवा जाणवणार नाही आणि संपूर्ण दिवस ऊर्जा टिकून राहील.
नाश्त्यात अधिक प्रोटीन आणि धान्याचे पदार्थ तुम्ही समाविष्ट करून घ्या
सकाळचा नाश्ता (Morning Breakfast) हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सकाळचा नाश्ता योग्य असेल तर तुम्हाला दिवसभर योग्य आणि चांगली ऊर्जा मिळते आणि सारखी भूक लागत नाही. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. नाश्त्यामध्ये तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास, तुम्हाला दिवसभर पोट भरलेले वाटेल आणि जास्त भूक लागणार नाही. तसंच वजन कमी करण्यास याचा फायदा होतो. अंडे, पनीर, ग्रीक योगर्ट, चिया सीड्स आणि नट्स असे पदार्थ तुम्ही समाविष्ट करून घ्या.
असे पदार्थ खाण्यासाठी तुम्हाला अधिक वेळ लागते. कारण हे पदार्थ अन्य पदार्थांपेक्षा चावण्यास अधिक वेळ घेतात आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरी कमी करण्यास मदत मिळते. तसंच तुम्हाला तुमच्या नाश्त्यामध्ये फायबरयुक्त पदार्थांचाही समावेश (Fibre Food) करून घ्यायला हवा. फायबरयुक्त पदार्थ पोट अधिक वेळ भरून ठेवण्यास मदत करते. याशिवाय दिवसभर तुम्हाला चांगली ऊर्जा देते. गाजर, सफरचंद, ब्राऊन राईस असे पदार्थ फायबरयुक्त असतात. त्यामुळे याचा समावेश करून घेतल्यास, वजन कमी होण्यास मदत होते.
व्यायाम करा
व्यायाम नेहमी तुमच्या शरीरातील कॅलरी कमी करण्यासाठी आणि वजन घटविण्यासाठी उपयुक्त ठरतो. पण दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेच्या तुलनेत सकाळी व्यायाम करण्याचे फायदे अधिक आहेत. आरोग्यदायी टिप्समुळे तुम्हीही वजन कमी करण्यासाठी प्रभावित होऊ शकता. सकाळी व्यायाम केल्याने तुमच्या शरीरातील साखरेची पातळी संपूर्ण दिवस व्यवस्थित राहाते. व्यायामामुळे तुमचा मेटाबॉलिजम रेट व्यवस्थित राखला जातो आणि वजन कमी करण्यासाठी याची मदत मिळते. तसंच घरी तुम्ही स्ट्रेचिंग एक्सरसाईज (Stretching Exercise) करून स्वतःला फिट ठेऊ शकता.
सकाळी नाश्ता करण्यापूर्वी तुम्ही चालायला जा अथवा जॉगिंगसाठी जा. अनेक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, सकाळी नाश्ता करण्यापूर्वी तुम्ही व्यायाम केल्यास, अधिक कॅलरी कमी होतात आणि तुमच्या शरीरातील वजन कमी करण्यासाठी याचा फायदा मिळतो.
याशिवाय रोज ध्यानधारणा करणेही आवश्यक आहे. तुम्हाला केवळ काही मिनिट्स आपले डोळे बंद करून बसायचे आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य अधिक चांगले होते. तसंच तुम्ही यासह योगा केल्यासही वजन कमी होण्यासाठी मदत मिळते. याशिवाय तुमचे वय वाढेल त्याचा प्रभावही तुमच्या चेहऱ्यावर दिसू न देण्यासाठी याचा फायदा नक्कीच होतो.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक