Advertisement

Recipes

सकाळच्या घाईत नाश्त्याला बनवा चविष्ट रव्याचे धिरडे, रवा चिला रेसिपी

Dipali NaphadeDipali Naphade  |  May 26, 2021
सकाळच्या घाईत नाश्त्याला बनवा चविष्ट रव्याचे धिरडे, रवा चिला रेसिपी

Advertisement

दिवसाची सुरूवात होते तीच कोणता नाश्ता बनवायचा यावरून. नाश्ता हा नेहमीच पोटभर आणि हेल्दी असायला हवा. पण सकाळच्या वेळात बऱ्याचदा खूपच घाई असते. मग काहीही थातुरमातुर बनविले जाते. पण असं करून चालणार नाही. नाश्त्यासाठी अनेक पर्याय आपल्याकडे विशेषतः महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये उपलब्ध आहेत. पण त्यातही तुम्हाला अगदी त्वरीत आणि चविष्ट नाश्ता हवा असेल तर तुम्ही रव्याच्या धिरड्याचाही पर्याय नक्की करून पाहू शकता. रव्याचे धिरडे (Rava Dhirde) अर्थात रवा चिला (Rava Chilla) हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर तर असतेच त्याशिवाय पटकन तयार होते आणि चविष्टही असते. रवा, भाजी आणि दही यांचे मिश्रण असलेले हे धिरडे अर्थात पॅनकेक तव्यावर पटकन होते. तसंच तुम्हाला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. आम्ही तुम्हाला या लेखातून याची खास रेसिपी देत आहोत. जाणून घ्या चविष्ट रव्याच्या धिरड्याची रेसिपी. 

लागणारे साहित्य

लागणारे साहित्य

Shutterstock

 • 1 कप रवा 
 • 1 कप पाणी 
 • 1 बारीक चिरलेला कांदा 
 • अर्धा कप दही
 • अर्धा लहान चमचा आलं – लसूण पेस्ट 
 • अर्धा चमचा मीठ (चवीनुसार)
 • 1 बारीक चिरलेला टॉमेटो 
 • 1 बारीक चिरलेली मिरची
 • 1 चमचे कापलेली कोथिंबीर 
 • तेल 

रव्याचे पदार्थ पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी (Rava Recipes In Marathi)

बनविण्याची पद्धत

 • सर्वात पहिले एका मोठ्या बाऊलमध्ये रवा ओतून घ्या त्यामध्ये दही घाला आणि मिक्स करा 
 • मिक्स करून झाल्यावर त्यात मीठ, पाणी घाला आणि व्यवस्थित फेटून घ्या आणि यामध्ये कोणतीही गुठळी राहणार नाही याची खात्री करून घ्या
 • हे भिजवल्यावर किमान अर्धा तास तसंच राहू द्या
 • रवा फुगल्यावर त्यात चिरलेला कांदा, टॉमेटो, मिरची, आलं – लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घालून मिक्स करा 
 • नंतर पाणी घालून पुन्हा व्यवस्थित त्याचे धिरडे घालता येईल इतकं मध्यम मिश्रण ठेवा 
 • गॅसवर तवा तापवत ठेवा. त्यावर तेल लावा आणि मग चिकटणार नाही अशा पद्धतीने हे धिरडे घाला 
 • एका बाजूने शेकल्यावर परता आणि बटर लावा. दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित शिजू द्या. क्रिस्पी झाले आणि रंगात बदल झाल्यावर गरमागरम धिरडे चटणी, बटर अथवा सॉससह खायला द्या

कुरकुरीत रवा डोसा बनवा 10 मिनिट्समध्ये, सकाळचा स्वादिष्ट नाश्ता

लक्षात ठेवायच्या गोष्टी

 • तुम्हाला हे धिरडे अधिक हेल्दी अर्थात आरोग्यदायी बनवयाचे असेल तर तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या उदाहरणार्थ किसलेला कोबी, गाजर तुकडे हेदेखील त्यामध्ये घालू शकता 
 • धिरडे बनवायच्या आधी किमान अर्धा तास तर रवा भिजवा. म्हणजे धिरडे योग्य बनेल आणि तव्याला चिकटणार नाही आणि पटकन उकटेल
 • धिरड्याचा स्वाद अधिक चविष्ट करायचा असेल तर त्यामध्ये चाट मसाला आणि लाल मिरची पावडरही घालू शकता 
 • यामध्ये 907 कॅलरी असून 31 ग्रॅम चरबीयुक्त वसा, 21 ग्रॅम प्रोटीन, 134 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 10 ग्रॅम फायबर आहे
 • सॉस अथवा चटणीसह हे धिरडे खायला अप्रतिम आणि चविष्ट लागते. तसंच तुम्ही मंद अथवा मध्यम आचेवर हे धिरडे केले तर त्याचा कुरकुरीतपणा येऊन चवीला अधिक चांगले लागते. रव्याचे असल्यामुळे धिरडे मंद गॅसवर अधिक कुरकुरीत भाजले जाते

चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे प्रमाण असावे योग्य
चमचमीत पास्ता रेसिपी मराठीत (Pasta Recipe in Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक