लाईफस्टाईल

लव्ह बाईट्स (Love Bites) बद्दल 5 अफलातून गोष्टी

Dipali Naphade  |  Jul 10, 2020
लव्ह बाईट्स (Love Bites) बद्दल 5 अफलातून गोष्टी

लव्ह बाईट (Love Bite) अथवा हिक्की (Hickey) तुमच्या पॅशनेट प्रेमाची खरी ओळख आहे असं म्हणतात. तुम्ही आणि तुमच्या  जोडीदारातील लक्षात राहणारे हे क्षण पूर्ण होतात ते लव्ह बाईट्सने. तुम्ही कसे लव्ह बाईट्स देता यावर तुमची तुमच्या जोडीदारासह केमिस्ट्री ठरत असते. वास्तविक असे अनेक लोक आहेत ज्यांना आपले लव्ह लाईफ अतिशय खासगी ठेवायला आवडते. त्यामुळे असे लोक लव्ह बाईट नेहमीच लपवण्याचा प्रयत्न करतात. पण लव्ह बाईट शरीरावर असणं यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही. शरीरावरील लव्ह बाईट हे आपल्या जोडीदाराने दिलेल्या प्रेमाची निशाणी असते आणि त्यातूनच त्याचे आक्रमक प्रेम दिसून येते. पण लव्ह बाईट्सबद्दल काही अफलातून गोष्टी आहेत ज्या  तुम्हाला माहीतही नसतील. त्याच आज आम्ही तुम्हीला सांगणार आहोत.  त्याआधी परफेक्ट लव्ह बाईट म्हणजे नक्की काय ते जाणून घेऊया. 

लव्ह बाईट अथवा हिक्की म्हणजे नेमकं काय?

Shutterstock

आपल्या माने,  छाती, खांदा आणि मांडीचा आतील भाग हा अतिशय संवेदनशील असतो. या ठिकाणी जर गरजेपेक्षा जास्त दाब आला तर त्यावर निशाण तयार होते. कारण या ठिकाणीवरील पेशींवर त्याचा पटकन परिणाम होत असतो. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही जोडीदाराचा चावा घेतलात तर त्या  ठिकाणी तुमच्या दाताचे निशाण तयार होतातच पण त्याहीपेक्षा अधिक हे असे भाग आहेत जिथे स्पर्श झाल्यानंतर सेक्सची जाणीव पटकन होते. पण लव्ह बाईट देताना आपण किती जोरात चावत आहोत याचे भान राखणेही तितकेच महत्त्वाचे असते. कारण हा भाग अत्यंत नाजूक असतो. त्यामुळे आपल्या जोडीदाराला त्रास होणार नाही अशाच तऱ्हेने लव्ह बाईट द्यायला हवे. 

कसा द्यावा परफेक्ट लव्ह बाईट?

परफेक्ट लव्ह बाईट देण्यासाठी तुम्हाला थोडा जास्त वेगळा प्रयत्न करावा लागतो. सर्वात पहिल्यांदा फोरप्लेने जोडीदाराला उत्तेजित करावे लागेल. त्यानंतर नक्की लव्ह बाईट कोणत्या ठिकाणी द्यायचा आहे याचा विचार करा. तुम्हाला जर कोणालाही लव्ह बाईट दिसायला नको असेल तर तुम्ही छाती, खांदा अथवा मांडीवर लव्ह बाईट घेऊ शकता. पण तुम्हाला लव्ह बाईट दिसण्यास हरकत नसेल तर तुम्ही मानेवर बिनधास्त लव्ह बाईट देऊ शकता. तुमच्या जोडीदाराचा मूड अधिक चांगला असेल तर तुम्ही जोडीदाराच्या ओठांवरही लव्ह बाईट देऊ शकता. ओठ दातांमध्ये घेऊन हळूहळू तुम्ही चावल्यास ओठांवरही परफेक्ट लव्ह बाईट तयार होतो. 30 सेकंदापेक्षा अधिक वेळ लव्ह बाईट घेऊ नका जर तुम्ही अगदी आक्रमक असाल. पण जर हळूवार चावत असाल तर ही प्रक्रिया तुम्ही दोन मिनिट्सपर्यंतही करू शकता.  

लव्ह बाईट्सबद्दल 5 अफलातून गोष्टी

1. दोन आठवड्यांपर्यंत राहते लव्ह बाईट

Giphy

तुम्हाला कदाचित हे वाचून आश्चर्य वाटेल की लव्ह बाईट हे शरीरावर दोन आठवड्यांपर्यंत राहाते. तुमच्या जोडीदाराला दोन आठवडे सतत शरीरावरील हे निशाण पाहून तुमचा स्पर्श जाणवत राहील. लव्ह बाईटवर केलेल्या रिसर्चमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की, लव्ह बाईट किती इंटेन्सिटीने दिला आहे आणि जोडीदार किती हेल्दी आहे हे लव्ह बाईट किती काळ दिसेल त्यावर अवलंबून असते. 

तुमच्या नात्यात आणा स्पाईसी सेक्स रिझॉल्युशन्स

2. आयरन कमी असणाऱ्यांना लव्ह बाईट लगेच दिसून येतो

Shutterstock

आपल्या शरीरावर हलकासा दबाव आल्यानंतर आपली त्वचा निळी काळी पडते. असं शरीरा ज्यांचं असतं त्यांच्या शरीरात लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स कमी असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात आयरनची कमतरता असते. इतर लोकांच्या तुलतेने अशा व्यक्तींना लव्ह बाईट्स पटकन शरीरावर उमटतो. त्यामुळे त्यांच्या जोडीदारांना लव्ह बाईट्स देताना काळजी घ्यावी लागते.

हे ‘लव्ह फूड्स’ बनवतील तुमचे सेक्स लाईफ अधिक स्पाईसी

3. कामसूत्रात विशेष वर्णन

तुम्हाला जर वाटत असेल की लव्ह बाईट्स हे आताच्या काळातील सेक्समधील बदल आहे तर असे अजिबातच नाही.  याचा उल्लेख वात्स्यायनच्या कामसूत्रातही करण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्यांनी आठ प्रकारचे लव्ह बाईट्स अगदी विस्तारीत करून सांगितले आहेत. 

‘या’ नुकसानांपासून वाचायचं असेल तर करा प्राचीन नियमानुसार सेक्स

4. लव्ह बाईट्स घालवण्यासाठी उपचार नाही

लव्ह बाईट्स प्रेमाच्या भरात घेतला जातो पण काही जणांना तो  लपवायचा असतो. त्यासाठी पटकन लव्ह बाईट्सवर बर्फाचा वापर करण्यात येतो. पण याचा परिणाम होण्यास वेळ लागतो. याचा त्वरीत लव्ह बाईट्स घालवण्यासाठी कोणताही उपचार नाही. कारण  हे वरील त्वचेपेक्षा आतल्या त्वचेमध्ये अधिक दिसून येतो. त्यामुळे लव्ह बाईट्स शरीरावर दिसेनासा होण्यासाठी एखादी जखम भरण्यास जितका वेळ लागतो तितकाच साधारण वेळ लागतो. 

सेक्स करण्याचे नक्की फायदे काय

5. लव्ह बाईट्सचे स्वप्न पडणे हे बिघडलेल्या नात्याचे उदाहरण आहे

Shutterstock

तुम्हाला जर लव्ह बाईट्सचे स्वप्न पडत असेल अथवा तुम्ही लव्ह बाईट्सबद्दल सतत विचार करत असाल तर यात रोमँटिक असं काही नाही.  तर तुमची मानसिक स्थिती नक्की काय आहे हे यातून  दिसून येतं. तुमचे नाते सध्या बिघडलेले आहे हे यातून दिसून येतं. तुम्हाला असे स्वप्न पडत असेल तर तुम्ही तुमच्या नात्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. 

Read More From लाईफस्टाईल