बॉलीवूड

लवकरच लग्न करणार बॉलीवूडमधील ‘हे’ 5 सेलिब्रिटी कपल्स

Dipali Naphade  |  Jun 16, 2019
लवकरच लग्न करणार बॉलीवूडमधील ‘हे’ 5 सेलिब्रिटी कपल्स

गेल्यावर्षीपासून बॉलीवूडमध्ये अनेक लग्न होत आहे. सोनम कपूर, नेहा धूपिया, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यांनी गेल्यावर्षी धुमधडाक्यात लग्न केलं. आता यावर्षी बॉलीवूडमध्ये कोण नंबर लावणार याची चर्चा जोर धरू लागली आहे. यापैकी बऱ्याच जोड्यांनी अचानक लग्न करून आपल्या चाहत्यांना धक्का दिला आहे. तर आता बाकीचे बॉलीवूडमधील कपल्सदेखील असंच करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या काही सेलिब्रिटी जोड्यांनी आपल्या लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळे लवकरच तुम्हाला या जोड्यांच्या लग्नाची बातमी मिळाली तर आश्चर्यचकीत होऊ नका. कारण आम्ही तुम्हाला आधीच या जोड्यांबद्दल माहिती देत आहोत.

1. वरूण धवन आणि नताशा दलाल

instagram

वरूण धवन गेली अनेक वर्ष आपली बालमैत्रीण आणि गर्लफ्रेंड नताशा दलालला डेट करत आहे. या दोघांना नेहमीच पार्टी, चित्रपटांचे प्रिमीयर, डिनर डेट आणि कुटुंबातील फंक्शन्सना एकत्र पाहिलं जातं. करण जोहरच्या शो मध्ये नताशाबरोबर आपलं नातं वरूणने मान्य केलं आहे. पण तरीही वरूणने आपलं खासगी आयुष्य नेहमीच मीडियापासून दूर ठेवलं. मात्र याचवर्षी वरूण आणि नताशा लग्न करणार असल्याचं त्याचे वडिल डेव्हिड धवन यांनीही सांगितलं आहे. स्वतः वरूणनेदेखील या गोष्टीची पुष्टी एका मुलाखतीदरम्यान दिली होती.

वरूण आणि नताशामध्ये खूपच चांगली बाँडिंग आहे. वरूण नेहमीच नताशाची काळजी घेताना दिसतो. काही दिवसांपूर्वी सोनम कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही वरूण नताशासोबतच दिसला होता. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा वरूण नताशासोबत डिनर डेटला जातो. आपलं पहिलं प्रेम चित्रपट असून उरलेला वेळ नताशाचा आहे असंही एका मुलाखतीमध्ये वरूणने सांगितलं आहे. नताशा आपल्याला खूपच चांगलं समजून घेते आणि तिच्याशिवाय मला जास्त चांगलं कोणीही ओळखत नाही असंही त्याने म्हटलं. याचवर्षी हे दोघं लग्नबंधनात बांधले जाणार आहेत, अशी चर्चा आहे.

2. अली फज़ल और रिचा चड्ढा

instagram

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल हे बरेच वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. या जोडीला याआधीदेखील बेस्ट ब्युटीफूल कपल म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. या दोघांनीही आपण लपून छपून नाही तर अगदी धुमधडाक्यात लग्न करणार असल्याचं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. लग्न कधी करणार हे माहीत नसलं तरी लपूनछपून नक्कीच करणार नाही असं एका मुलाखतीमध्ये अली फजलने सांगितलं आहे. रिचावरील प्रेमही नेहमीच त्याने बोलून दाखवलं आहे. तर रिचानेही अलीवरील आपलं प्रेम कधीच जाहीर केलं आहे. लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

3. राजकुमार राव आणि पत्रलेखा

instagram

बरेली की बरफी, स्त्री आणि अनेक चित्रपटांमधून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा राजकुमार राव गेल्या कित्येक वर्षापासून अभिनेत्री पत्रलेखाला डेट करत आहे. बऱ्याच पुरस्कार सोहळ्यात आणि इतर ठिकाणीही या दोघांना एकत्र पाहिलं जातं. या दोघांकडे बॉलीवूड आणि त्यांचे चाहते आदर्श कपल म्हणूनच पाहतात. हे दोघंही लग्न नक्की कधी करणार माहीत नसलं तरी या वर्षी लग्न करतील असा कयास बांधला जात आहे. पण हे दोघंही एकमेकांबरोबर अतिशय आनंदी असतात आणि राजकुमारने आपल्या मुलाखतीत बऱ्याच वेळा पत्रलेखा आपल्याला खूपच चांगलं समजून घेत असल्याचंही मान्य केलं आहे. पत्रलेखाला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच राजकुमार तिच्या प्रेमात पडला होता. ते दोघं एकमेकांचे खूपच चांगले मित्र असल्यामुळे कोणत्याही विषयावर मनापासून गप्पा मारतात असंही त्याने सांगितलं होतं. राजकुमार रावने आपण खूपच रोमँटिक असल्याचंही यावेळी सांगितलं होतं त्यामुळे ही जोडी कधी लग्न करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

4. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर

instagram

लवकरच लग्न करणार असल्याच्या यादीमध्ये फरहान आणि शिबानीचं नाव नक्कीच वरती आहे. बऱ्याच दिवसांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. व्हेकेशनवरील त्याचे फोटोज बरेच व्हायरलही झाले आहेत. तसंच फरहान आणि शिबानीने फोटो शेअर करून आपलं नातंही जाहीर केलं आहे. तर दीपिका आणि रणवीरच्या लग्नामध्ये दोघेही एकत्र आले होते. लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. सेटल होण्यासाठी सध्या हे दोघं घराच्या शोधात असल्याचंही म्हटलं जातं.

5. रणबीर कपूर आणि आलिया भट

instagram

बॉलीवूड स्टार रणबीर कपूर आणि अलिया भट बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. रणबीर कपूरचा वाढदिवस 28 सप्टेंबरला असतो. त्यानंतर रणबीर आणि आलिया एकमेकांशी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. रणबीर आणि आलियाचं कुटुंब एकमेकांना हल्ली वरचेवर भेटत असल्यामुळे ही शक्यता जास्तच वाढली आहे. आलियाची आई सोनी आणि रणबीरची आई नीतू या दोघी सतत एकत्र असतात. रणबीर आणि आलियाचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दोघेही व्यस्त होतील. त्यामुळे लग्न आधीच उरकून घेण्याचं ठरलं असल्याचंही म्हटलं जात आहे.

हेदेखील वाचा – 

या विचित्र फोटोंमुळे हे सेलिब्रिटी झाले होते चर्चेचा विषय

सिनेमांपेक्षा अफेअर्समुळे मिळाली फरहानला प्रसिद्धी

दीपिकाने रणवीरची का केली बॅटने ‘धुलाई’

अबब! आगामी चित्रपटासाठी दीपिकाला मिळाले इतके मानधन

 

Read More From बॉलीवूड