DIY सौंदर्य

5 सोप्या घरगुती उपायांनी मिळवा तेलकट त्वचेपासून त्वरीत सुटका

Dipali Naphade  |  Sep 23, 2020
5 सोप्या घरगुती उपायांनी मिळवा तेलकट त्वचेपासून त्वरीत सुटका

तेलकट त्वचा (Oily Skin) असणाऱ्यांना आपल्या त्वचेची खूपच काळजी घ्यावी लागते. त्यातही त्यांना मुरूमं, ब्लॅकहेड्स, सततचा चेहऱ्यावरील चिकटपणा आणि त्यामुळे चेहऱ्यावर चिकटून बसणारी धूळ या सगळ्या समस्यांना जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. त्यामुळे बऱ्याचदा अशा व्यक्तींचा आत्मविश्वासही कमी होतो. तेलकट त्वचा असणाऱ्यांना सतत आपला चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. पण तुम्हाला तेलकट त्वचेपासून त्वरीत सुटका हवी असेल तर आम्ही तुमच्यासाठी 5 सोपे उपाय घेऊन आलो आहोत. या घरगुती उपायांनी (Home Remedies for Oily Skin) तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल आणि तेलकट त्वचेपासून सुटकाही मिळेल. तसंच हे उपाय करणेही अतिशय सोपे आहे आणि त्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करायची अथवा बाहेर जाऊन काही अधिक गोष्टी खरेदी करण्याची आवश्यकताही भासणार नाही. त्यामुळे वाट बघत बसू नका हा लेख वाचा आणि त्वरीत तुम्ही तुम्हाला त्रासदायक ठरणाऱ्या तेलकट त्वचेवर उपाय करून पाहा.

1. लिंबू, चंंदन पावडर आणि दही

Shutterstock

लिंबामध्ये विटामिन सी चे प्रमाण भरपूर असते आणि दह्यामध्ये असणाऱ्या बॅक्टेरियाने त्वचा स्वच्छ आणि  अधिक मुलायम होण्यास मदत मिळते. चंदन पावडर ही तर त्वचेमध्ये चमक आणण्यासाठी नैसर्गिक सौंदर्य प्रसाधन ठरते. त्यामुळे या तिघांच्या मिश्रणाने तेलकट त्वचेला फायदा मिळतो. तसंच लिंबू, दही आणि चंदन पावडरचे मिश्रण हे त्वचेतील तेल पटकन शोषून घेते आणि त्वचा अधिक चमकदार बनविण्यास फायदेशीर ठरते. 

त्वचेनुसार निवडा तुमचा साबण, घ्या त्वचेची काळजी

2. अंडे आणि कापूर

Shutterstock

हे वाचून तुम्हाला थोडेसे आश्चर्य वाटले असेल की हे असं कसं मिश्रण.  पण अंड्यांच्या सफेद भागामुळे चेहऱ्यावर तेल शोषून घेण्यास मदत मिळते आणि चेहऱ्यावरील साचलेली घाण ही कापूरामुळे कमी होते आणि चेहरा स्वच्छ करण्यास कापूर मदत करतो. 

तुमच्या तेलकट त्वचेसाठी घरगुती उपाय (Home Remedies For Oily Skin In Marathi)

3. बेसन, हळद आणि ऑलिव्ह ऑईल

Shutterstock

बेसनामुळे चेहऱ्यावरील मुलायमपणा अधिक राहातो आणि हळद ही नैसर्गिक अँटिसेप्टिक मानली जाते. तसंच याच्या मिश्रणाने चेहऱ्यावर मळ आणि अतिरिक्त तेल निघण्यास मदत मिळते. हळदीने चेहऱ्यावरील डागही कमी होतात. तसंच चेहऱ्यावर आलेले पुरळही कमी करण्यास बेसन आणि हळद कॉम्बिनेशन उत्तम समजण्यात येतं. म्हणून या सोप्या घरगुती उपायाने तुम्ही तेलकट त्वचेपासून सुटका मिळवू शकता.

 

4. काकडी, व्हिनेगर आणि तुरटी पावडर

Shutterstock

काकडी चेहऱ्यावरील तेल शोषून घेऊन चेहऱ्याला अधिक ताजेपणा देण्यास फायदेशीर ठरते. तर तुरटी चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेते. घरामध्ये या वस्तू सहज सापडतात. त्यामुळे तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. यामुळे तुमचे रोमछिद्र स्वच्छ होतील आणि तुम्हाला खूपच ताजेतवाने वाटेल. 

तेलकट त्वचेसाठी बेस्ट फाऊंडेशन (Best Foundation For Oily Skin In Marathi)

5. ओटमील पावडर, सफरचंद आणि दूध

Shutterstock

ओटमील पावडरने चेहऱ्यावरील तेल त्वरीत निघून जाण्यास मदत होते तर दूध हे चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यास आणि अधिक मऊ मुलायम चेहरा राखण्यास मदत करते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य