DIY सौंदर्य

या ‘5’ चुका पोहचवतात तुमच्या त्वचेला नुकसान, वेळीच व्हा सावध

Dipali Naphade  |  Sep 16, 2019
या ‘5’ चुका पोहचवतात तुमच्या त्वचेला नुकसान, वेळीच व्हा सावध

आपली त्वचा अधिक सुंदर दिसावी आणि तजेलदार दिसावी यासाठी बऱ्याच जणी पार्लरमध्ये सतत जातात. शिवाय प्रत्येक महिन्यात पार्लरमध्ये जाऊन आपल्या त्वचेला चमक द्यावी हे प्रत्येकाच्या खिशाला परवडेलच असं नाही. त्यामुळे आपण सहसा घरच्या घरीच त्वचेची काळजी कशी घ्यायची याचा प्रयत्न करत असतो. पण हे प्रयत्न करत असताना आपल्याकडून अशा  काही चुका होतात ज्यामुळे त्वचेला नुकसान होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा केमिकलयुक्त उत्पादनांचा उपयोगही केला जातो. त्यामुळे वेळीच सावध होणं गरजेचं आहे. पण या नक्की अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो असा प्रश्न तुम्हाला नक्कीच जाणवत असेल. तर त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. वेळीच या चुका करण्यापासून दूर राहा म्हणजे तुमची त्वचा अधिक तजेलदार तर राहीलच शिवाय तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारच्या त्रासालाही सामोरं जावं लागणार नाही. 

गरम पाण्याने केलेली आंघोळ

Shutterstock

आपल्याला प्रत्येकालाच गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते. दिवसभर थकल्यानंतर अंग शेकून निघतं. तसंच सकाळीही अशी आंघोळ एकदम तजेलदारपणा आणते. काही जणांना तर खूपच गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. पण ही सवय चांगली नाही. जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या त्वचेचं नुकसान होतं. गरम पाण्यामुळे त्वचा अधिक कोरडी होते. तसंच त्वचेमधील नैसर्गिकरित्या असणारा ओलावादेखील नष्ट होतो. त्यामुळे आंघोळ करताना नेहमी तुम्ही गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरणं योग्य आहे. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात सहसा गरम पाणी न वापरता थंड पाण्याने आंघोळ करणंच उत्तम. तुमची त्वचा अधिक चांगली ठेवण्यासाठी तुम्ही नियमित जास्त गरम पाण्याने आंघोळ करण्याची चूक करत असाल तर ती टाळण्याचा प्रयत्न करा. 

नेहमी कुशीवर झोपणं

Shutterstock

तुम्हाला जर नेहमी कुशीवर झोपायची सवय असेल तर तुमच्या त्वचेसाठी ही सवय चूक ठरते. सतत डाव्या अथवा उजव्या बाजूला झोपल्याने तुमचा चेहरा हा उशीवर दबला जातो आणि त्याशिवाय झोपेत उशीवर चेहरा घासलाही जातो आणि योग्य रक्तपुरवठा न झाल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येतात. तसंच तुम्ही डोक्याला तेल लावून झोपत असाल तर तुमचा चेहरा त्या तेलकट झालेल्या उशीवर घासला गेल्याने त्वचेवर पिंपल्सदेखील येतात आणि तुमच्या त्वचेला जास्त नुकसान पोहचतं. त्यामुळे शक्यतो कुशीवर झोपणं टाळा. 

प्रत्येक आजारावर खात असाल ‘पेनकिलर’ तर वेळीच सावध व्हा

मीठ अथवा साखरेचं अतिप्रमाणात सेवन

Shutterstock

मीठ आणि साखर हे दोन्ही पदार्थ आपल्या रोजच्या पदार्थांमधील अविभाज्य भाग आहेत. मीठामधील सोडियम हे शरीरासाठी लागणारं आवश्यक पोषक तत्व आहे. पण जर पदार्थांमध्ये याचं प्रमाण अधिक झालं तर त्यामुळे त्वचेतील ओलावा नष्ट होतो आणि तुमची त्वचा अधिक खरखरीत आणि कोरडी होते. याचा परिणाम तुमची त्वचा अधिक निर्जिव दिसण्यावर होतो. तर साखरही मर्यादेपेक्षा अधिक खाल्ल्याने त्वचेचं नुकसान होतं. यामुळे तुमची त्वचा सैल होते. तसंच मधुमेहासारखे रोग होऊन त्वचेवरील तेज निघून जातं. 

स्विमिंगची सवय

Shutterstock

अनेकांना स्विमिंग करणं खूप आवडतं. कधी संधी मिळते आणि स्विमिंग करतो याची वाटच पाहत असतात. स्विमिंग हे तुमच्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी अत्यंत चांगलं आहे पण स्विमिंग करण्यासाठी तुम्ही ज्या स्विमिंग पूलमध्ये उतरता त्या पाण्यात असलेल्या क्लोरिनमुळे तुमच्या त्वचेला नुकसान पोहचतं. स्विमिंग केल्यानंतर तुम्ही शॉवर घेता पण तरीही ते क्लोरिन तुमच्या शरीरावरून जात नाही. त्यामुळे तुम्ही जर जास्त प्रमाणात स्विमिंग केलं तर तुमच्या त्वचेला अधिक प्रमाणात हानी पोहचवण्याचं काम हे क्लोरिनचं पाणी करतं.

लहान मुलांना हेल्दी खाण्याची सवय कशी लावाल
 

स्मोकिंग

Shutterstock

तुम्हाला स्मोकिंकची सवय नसली तरीही तुमच्या आजूबाजूला जर स्मोकिंग करणारे असतील तर तुम्ही नक्कीच पॅसिव्ह स्मोकिंग करत आहात. यामुळे तुमच्या आरोग्याचं तर नुकसान होतंच पण त्याचबरोबर तुमच्या त्वचेचंही जास्त प्रमाणात नुकसान होत असतं हे वेळीच लक्षात घ्या. यामुळे तुमची त्वचा वेळेआधीच वयस्कर दिसू लागते. सिगारेटमध्ये असलेल्या निकोटिन आणि टारमुळे हे नुकसान होतं. पण वेळीच काळजी घेणं हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे या सवयी लवकरच बंद करण्याकडे लक्ष द्या.

तुम्हाला पोटावर झोपायची सवय असल्यास, त्वरीत बदला ही सवय

Read More From DIY सौंदर्य