लाईफस्टाईल

घरी झाडं लावायला आवडतात, मग ही 5 झाडे आवर्जून लावा

Leenal Gawade  |  Apr 25, 2019
घरी झाडं लावायला आवडतात, मग ही 5 झाडे आवर्जून लावा

अनेकांना खिडकीमध्ये, बाल्कनीमध्ये झाडं लावायला खूप आवडतात. पण नेमकी कोणती झाडं लावायची असा नेहमी प्रश्न पडतो. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात तुळशीचे झाड तर असतेच. आज आम्ही तुम्हाला अशी 5 झाडं सांगणार जी तुम्ही तुमच्या घरी सहज लावू शकता, घरात कोणती झाडे लावावी आणि त्याचे फायदेच फायदे जाणून घ्या. शिवाय तुमची गार्डनिंगची हौस देखील ही झाडं पूर्ण करु शकतात.

 कढीपत्ता (Curry leaves plant)

फोडणीची चव जर कोण वाढवत असेल तर तो आहे कढीपत्ता. फोडणीत कढीपत्त्याची पाने तडतडली की, त्याचा घमघमाट घरभर होतो. हा कढीपत्ता बाजारातून आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी उगवलाच तर किती बरे होईल नाही का?

बाजारात कढीपत्त्याची रोपे सहज मिळतात.त्यांची अधिक काळजीही घ्यावी लागत नाही. बाजारा 15 ते  30 रुपयांमध्ये कढीपत्त्याचे झाड मिळते.

प्रवासाला सोबत न्या हे घरगुती पदार्थ

कढीपत्त्याचे विशेष फायदे सांगायचे झाले तर कढीपत्ता हा बारमाही आहे. त्यामुळे तुम्हाला झाडं थोडे वाढले तरी त्याची पाने खुडता येतात. तुमच्या किचनच्या खिडकीत जागा असेल तर हे झाड आवर्जून लावा.

हिरवी मिरची (Green chilly plant)

तुमच्या जेवणाला मस्त तिखट चव देणारी मिरची जेवणात किती आवश्यक आहे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे ओली मिरची घालून तुम्ही भाजी तयार करायची ठरवली घरात मिरची नसेल तर कशी अवस्था होते ना तुमची म्हणूनच तुम्ही तुमच्या घरी मिरचीचे झाड लावले तर अगदीच छान. मिरचीच्या रोपट्यालाही फार काळजी घ्यावी लागत नाही. उलट ते छान पटपट वाढते. त्याची छाटणी योग्यवेळी करुन जर त्याला योग्यवेळी खत दिले तर त्याला मिरच्याही लवकर धरतात. त्यामुळे मिरचीचे झाड नक्की लावा.

हेही वाचा: त्वचेसाठी हिबिस्कस

पुदिना (Mint plant)

पुदिना घालून केलेली चटणी म्हणजे क्या बात है. अनेकदा जेवण पचावे म्हणून त्यात पुदिना घालायला लावतात. उन्हाळ्यात तर पुदीना -कैरीची चटणी घालून भेळ केली तर तोंडाला चांगली चव येते. तुम्ही जर बाजारातून पुदिना आणला असेल तर तुम्ही तो पाण्याच्या ग्लासात ठेवून द्या. त्याला मूळ फुटल्यानंतर तुम्ही एखाद्या बसक्या भांड्यात पुदिना लावा. पुदिना नेहमी पसरत जातो. त्याची योग्यवेळी छाटणी करत राहा.

घरावर लक्ष्मीकृपा हवी असेल तर फॉलो करा या वास्तू टीप्स

 कोरफड (Aloe vera plant)

कोरफडीचे अनेक फायदे आहेत.त्यामुळे तुमच्या घरात, कोरफडीच झाड नक्कीच हवे. त्यामुळे तुम्ही आवर्जून कोरफड लावा. कोरफड एकदा जगली की, वाढत राहते. वाळवंटातील इतर झाडांप्रमाणे कोरफडीचे गुणधर्म असल्यामुळे त्याला फार पाणी लागत नाही. या झाडाला छान फुल देखील येतात. जी लीलीसारखी दिसतात. कोरफडीचा उपयोग तुम्हाला त्वचेसाठी, आरोग्याच्या इतर तक्रारीसाठी नक्की होऊ शकतो.

जास्वंद (Hibiscus flower plant)

आता तुमच्याकडे सगळी फायद्याची झाडे झाली तुमच्या खिडकीत एखादे तरी फुलझाड नको का? या फुलझाडापैकीच बाप्पाला वाहिल्या जाणाऱ्या जास्वंदाच्या झाडाला आम्ही अधिक पसंती देऊ कारण जास्वंदाचे झाड हे बहुगुणी आहे. लाल, गुलाबी, केशरी, पांढरा, पिवळ्या अशा विविध रंगात जास्वंदाची फुले येतात. या फुलांना सुवास नसला तरी ही फुले दिसायला छान दिसतात. जास्वंदाची पाने गरम तेलात बुडवून ते तेल केसांना लावले जाते. ज्यामुळे केसही छान होतात. या झाडाला बारमाही फुले येतच असतात.

खत देताना? (Fertilizers for plants)

आता बाहेरुन मिळणारे युरीया हे खत देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या झाडांनी केमिकल्स फ्री खतं सुद्धा देऊ शकता. शेणखत हे सगळ्या झाडांसाठी बेस्ट आहे. या शिवाय तुम्ही तांदुळ, डाळ, कडधान्य  धुतल्यानंतर ते पाणी तुम्ही फेकून देऊ नका. ते पाणी तुम्ही झाडासाठी वापरु शकता. या शिवाय तुम्ही कांद्याच्या साली पाण्यात भिजवून ते पाणी झाडांना घालू शकता. तुमच्या झाडांची वाढ चांगली होईल.

(सौजन्य-Shutterstock)

देखील वाचा-

उन्हाळ्यात अंड खाताय? मग तुम्हाला हे माहीत हवं

जाणून घ्या सेंद्रिय शेतीचे फायदे (Benefits of Organic Farming In Marathi)

Plants To Grow From Cuttings – घरातच झाडे वाढवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

घरातील झाडांची काळजी कशी घ्यावी, सोप्या टिप्ससह घ्या काळजी

Read More From लाईफस्टाईल