DIY फॅशन

5 दुपट्टे जे तुम्हाला मिळवून देतील वेगळा लुक, करा ट्राय

Dipali Naphade  |  Jul 1, 2021
5 दुपट्टे जे तुम्हाला मिळवून देतील वेगळा लुक, करा ट्राय

अनेक मुलींकडे ओढणी अर्थात दुपट्ट्यांचे सुंदर कलेक्शन वॉर्डरोबमध्ये असते. कोणत्याही सूटसह वेगवेगळे दुपट्टे वापरण्याची हल्ली फॅशन आली आहे. असे सुंदर आणि वेगळे दुपट्टा तुमचा लुक अधिक सुंदर आणि अप्रतिम करतात. एथनिक दुपट्ट्यांना खास महत्त्व आहे. जितका सुंदर तुमचा दुपट्टा तितका सुंदर तुमचा लुक अधिक खास होतो. तसंच भारतातीतल अनेक भागांच्या विशेष संस्कृतीचा भाग काही दुपट्टे असतात. तुम्हालाही वेगवेगळे दुपट्टे आवडत असतील तर असे 5 दुपट्टे आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत ज्याने तुम्हाला वेगळा लुक मिळू शकतो. तुमच्याही वॉर्डरोबमध्ये हे दुपट्टे असणे गरजेचे आहे. एखाद्या छोटेखानी समारंभामध्ये तुम्ही हे दुपट्टे घालून तुमचा लुक अधिक सुंदर आणि अप्रतिम करू शकता. 

चिकनकारी दुपट्टा (Chikankari Dupatta)

चिकनकारी सलवार सूटच नाही तर याची ओढणी अर्थात दुपट्टाही तितकाच प्रसिद्ध आहे. अतिशय हलका असणारा हा दुपट्टा तुम्ही अगदी सहजपणे कॅरी करू शकता. काही लोकांना वाटतं की, चिकनकारी दुपट्टा हा केवळ चिकनकारी कपड्यांवर वापरता येतो. पण असं अजिबात नाही. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही जर एखादा कॉटन सूट घालणार असाल तर तुम्ही त्यावर चिकनकारी दुपट्टा घालू शकता. वास्तविक चिकनकारी दुपट्ट्याचे वेगवेगळे फॅब्रिक असते, ज्याचा दर्जाही वेगळा असते. यामध्ये जॉर्जेट आणि कॉटनचा समावेश होतो. यामध्ये जड आणि हलके अशा दोन्ही स्वरूपाचे काम दिसून येते. लाईट रंगाच्या कुरतीसह असे दुपट्टा नेहमी कॅरी करता येतात. 

चिकनकारी अथवा लखनवी ड्रेस वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात

फुलकारी दुपट्टा (Phulkari Dupatta)

फुलकारी दुपट्टा हा जास्त प्रमाणात राजस्थान आणि पंजाब या राज्यांमध्ये वापरण्यात येतो. इथे फुलकारी दुपट्ट्यांवर खूपच कलाकुसर करून हे दुपट्टा बनविण्यात येतात. पटियाला सूटसह फुलकारी दुपट्टा खूपच छान दिसतो. याचा ट्रेंड जुना असला तरीही हा दुपट्टा प्लेन कुर्ती – लेगिन्स, पलाझो पँटसह आरामात कॅरी करण्यात येतो. मल्टिकलर असण्यासह हा दुपट्टा प्रत्येक रंगाच्या सूटवर शोभून दिसतो. त्यामुळे तुमच्या वॉर्डरोबमध्ये हा दुपट्टा असायलाच हवा.

फॅशन – लग्न आणि रितीरिवाजांसाठी बेस्ट 41 वेडिंग ड्रेसेस (Best Wedding Dresses In Marathi)

बनारसी सिल्क दुपट्टा (Banarasi Silk Dupatta)

मागच्या काही वर्षांपासून बनारसी सिल्क दुपट्टा हा ट्रेंडमध्ये आहे. अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनाही बनारसी दुपट्ट्याची भुरळ पडली आहे. त्यामुळे आता हा दुपट्टा वेगवेगळ्या समारंभामध्ये अगदी आवडीने वापरला जातो. तसंच लग्न, साखरपुडा अशा समारंभाना साडी नेसणार नसाल तर हा दुपट्टा वापरल्याने एक वेगळा आणि रॉयल लुकही मिळतो. खरं तर जेव्हा रॉयल लुक हवा असेल तेव्हा बनारसी सिल्क दुपट्ट्याइतका चांगला पर्याय कोणताच नाही. तुम्ही अनारकली, गाऊन अथवा नॉर्मल सलवार सूटवर मॅचिंग अथवा मिस मॅच करून हा दुपट्टा वापरू शकता. 

लग्नातील साड्यांचा पुनर्वापर करून बनवा नवे डिझाईन्स

नेट दुपट्टा (Net Dupatta)

हेव्ही नेट दुपट्टा दिसायलाच चांगला दिसतो असं नाही तर तुम्ही कोणत्याही ड्रेसवर हा कॅरी करू शकता. तसंच तुम्ही लग्नसमारंभात लेहंगा, अनारकली, गाऊन, नॉर्मल सलवार सूट इत्यादीसह कोणत्याही ड्रेसवर हा दुपट्टा घेऊ शकता. नेटच्या या दुपट्ट्यामध्ये तुम्हाला अनेक व्हरायटी मिळतात. तुम्हाला वजनाला हवा असेल तर तुम्ही रंगाची काळजी घ्या. कारण नेट दुपट्ट्याचे वैशिष्ट्य म्ङणजे त्यावरील कलाकुसर. पण त्यावर वर्क नसेल तर तुम्ही गडद रंगाचे दुपट्टे घ्या. जेणेकरून तुमचा लुक अधिक खुलून येईल. तसंच तुम्हाला हेव्ही नेट दुपट्टा हवा असेल तर तुम्हाला यामध्ये वेगवेगळी व्हरायटी दिसून येते. 

 

पॉम पॉम दुपट्टा

पॉम पॉम दुपट्टा तुमच्या साध्या लुकलादेखील अधिक सुंदर करतो. या दुपट्ट्याच्या चारही बाजूला रंगबेरंगी पॉमपॉम असतात. असे गोंडे खूपच सुंदर दिसतात. तसंच अगदी हलक्या वजनाचे असतात. कॉटन आणि जॉर्जेट या दोन्ही फॅब्रिकमध्ये या ओढणी तुम्हाला मिळतात. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला हा दुपट्टा अतिशय उत्तम ठरतो. कोणत्याही एथनिक कपड्यांसह तुम्ही हा दुपट्टा कॅरी करू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन