घर आणि बगीचा

घरातील या वास्तूदोषांमुळे होतात कुटुंबियांमध्ये वाद

Aaditi Datar  |  Mar 24, 2020
घरातील या वास्तूदोषांमुळे होतात कुटुंबियांमध्ये वाद

घरही एक अशी जागा आहे, जिथे आलं की, कसं एकमद रिलॅक्स वाटतं. दिवसभरातला थकवा घरी आल्यावर नक्कीच कमी होतो. पण बरेचदा घरी असताना छोट्या छोट्या गोष्टींवरून कुटुंबियांमध्ये वाद होताना दिसतात किंवा घरातील कोणी ना कोणी व्यक्ती आजारी असते. तुम्ही कधी यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे का, की घरात सगळी सुबत्ता असतानाही घरात अशी परिस्थिती का. यामागील कारण असू शकतात घरातील वास्तूदोष. वास्तूशास्त्रानुसार सांगण्यात आलेले घरात आढळणारे काही वास्तूदोष जाणून घेऊया

Instagram

वास्तूशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी घरातील इतर दरवाज्यांपेक्षा मोठा असायला हवा. जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा मोठा नसल्यास घरात नेहमी पैशांशी निगडीत समस्या जाणवत असल्याचं आढळतं. जसं वारंवार पैशांची चणचण जाणवणं, उत्पन्न नियमित असूनही घरावर सतत आर्थिक संकट येणं. साहजिकच याचा परिणाम घरातल्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो आणि वाद होतात. 

आजकाल बऱ्याच घरांमध्ये बेडरूम अटॅच्ड बाथरूम असतं आणि बाथरूममध्ये बेसिनही असल्याचं दिसतं. पण वास्तूशास्त्रानुसार घरातील कोणत्याही बेडरूमध्ये वॉश बेसिन नसावं. 

पाणी हा आपल्या जीवनातील अत्यावश्यक घटक आहे. पण बरेचदा आपण पाण्याबाबतही निष्काळजीपणा दाखवतो. उदा. बाथरूम किंवा वॉश बेसिनचा नळातून गळणारं पाणी. हो..घरातील कोणत्याही नळातून पाण्याची गळती होत असल्यास तोही वास्तूदोष मानला जातो. तुमच्याकडे असा एखादा गळणारा नळ असल्यास तो त्वरित दुरूस्त करून घ्या. 

आपलं घर आपण नेहमीच स्वच्छ आणि टापटीप ठेवतो. पण तुम्हाला माहीत आहे का, घराच्या आसपास असणाऱ्या गोष्टींचाही आपल्या घरावर परिणाम होत असतो. तुमच्या घराच्या आसपास एखादं सुकलेलं झाड किंवा वीजेचा खांब असेल तर तो त्वरित दूर करण्यासाठी पाऊल उचला. कारण यामुळे घरात वास्तूदोष निर्माण होऊन घरामध्ये आर्थिक समस्या उद्भवू शकतात. खरंतर यामागील कारण हेही असू शकतं की, वीजेच्या खांबामुळे घरावर आपत्तीही ओढवू शकते किंवा घरातून दिसणाऱ्या सुकलेल्या झाडामुळे उदासही वाटू शकते. त्यामुळे घरासोबतच घराच्या आसपासचा परिसरही स्वच्छ आणि सुंदर ठेवा. 

बरेचदा घरांमध्ये गरज नसलेल्या किंवा तुटलेल्या वस्तू आणि सामान विनाकारण ठेवलेलं असतं. पण तुम्हाला माहीत आहे का, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे घरातील सदस्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शक्य असेल तेवढं घरात कमीत कमी सामान ठेवा. जुनं तुटकं-फुटकं सामान किंवा गरज नसलेलं सामान लगेच घराबाहेर करा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

Vaastu Tips : घरात बासरी ठेवण्याचे फायदे

महत्त्वाची आणि सोपी टीप – घरात आठवड्यातून एकदा मीठाच्या पाण्याने लादी पुसा. यामुळे घरातील नकारात्मक उर्जाही कमी होईल आणि घर स्वच्छंही होईल.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

Read More From घर आणि बगीचा