Care

हिवाळ्यात होत असतील केस तेलकट तर वापरा 5 सोप्या टिप्स

Dipali Naphade  |  Dec 24, 2020
हिवाळ्यात होत असतील केस तेलकट तर वापरा 5 सोप्या टिप्स

हिवाळ्याच्या दिवसात केसांचा कोरडेपणा होणं ही एक सामाईक समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे नारळाचे तेल. नारळाचे तेल अत्यंत सहज लावता येते. पण जेव्हा तेल डोक्यावरून काढायची वेळ येते तेव्हा मात्र हे काम कठीण होतं आणि हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त त्रास होतो तो केस धुण्याचा. कारण केस कोरडे पडू नये म्हणून तेल लावण्यात येतं. पण ते काढताना मात्र त्रास होतो. वास्तविक हिवाळ्यात नारळाचं तेल केसांमध्ये चिकटून राहतं. त्यामुळे साधारण शँपूने केस धुतल्यास, हे केसातून निघत नाही. त्यामुळे केसांमध्ये समस्या होऊ शकते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात केसांमधील तेल कसे काढायचे याच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्हीही या टिप्स वापरून तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता. 

केसांमधून कसे काढाल नारळाचे तेल

Shutterstock

केसातून तेल निघाले नाही तर होतात या समस्या

नारळाचे तेल केसांवरून काढण्यासाठी घरगुती उपाय

तुम्ही केसातून तेल काढण्यासाठी घरगुती उपायांचा उपयोग करून घेऊ शकता. यामुळे तुमच्या केसात जमलेल्या तेलाला स्वच्छ करता येते. 

घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

टॉमेटो रस

Shutterstock

केसांना लावलेले नारळाचे तेल साधारण शँपूने जात नाही. त्यामुळे तुम्ही टॉमेटोचा घरगुती हेअरपॅक लाऊन केसातील नारळाचे तेल काढू शकता. 

मुलतानी माती

Shutterstock

मुलतानी माती केसांना अधिक कोरडी करते. तुम्ही जर केसाना तेल लावले तर मग केस अधिक चिकट होत असतील तर केसांना शँपू लावल्यानंतरही केस नीट धुतले गेले नाहीत असं वाटत असेल तर तुम्ही मुलतानी मातीचा वापर करा. 

केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स

हिना पावडर

Shutterstock

हिना अर्थात मेंदी केसांना कोरडे करते. वास्तविक केसांना मेंदी लावण्याचे अनेक फायदे आहेत. पण मेंदी वापरल्याने केसांचे तेल स्वच्छ करण्यास मदत मिळते. यामध्ये आवळा, रिठा आणि शिकेकाईचे मिश्रण यामध्ये मिक्स करा 

मऊ आणि मुलायम केस मिळविण्यासाठी अशी भिजवावी मेंदी

बिअर

Shutterstock

केस बिअरने धुतल्यामुळे चमकदारही होतात आणि केसांमधील तेल आणि चिकटपणा निघून जाण्यास मदत मिळते. तसंच हे वापरणं सोपं आहे. 

 

अंड्याचा सफेद भाग

Shutterstock

अंड्याचा सफेद भाग 
अंड्याचा सफेद भाग केसांना लावल्याने तेल पटकन निघून जाते. पण तुम्हाला त्रास होत असेल तर मात्र तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Care