पालकत्व

6 महिन्याच्या बाळाचा आहार | 6 Months Baby Food In Marathi

Leenal Gawade  |  Jul 20, 2021
6 Months Baby Food In Marathi

घरात तान्हुले बाळ आले की, घराचे वातावरण एकदम बदलून जाते. बाळासाठी वेगवेगळ्या गोष्टी तयार करण्याची लगबग सुरु होते. नवमातांना तयारी करावी लागते. आपल्या बाळाला एकदम परफेक्ट आहार मिळावा यासाठी खिमटी किंवा बाळाचे वेगवेगळे पदार्थ घरी केले जातात. वेगवेगळ्या डाळी भाजूनही ठेवली जाते.जी शिजवून बाळाला प्रोटीन मिळवून देण्याचे काम करते. फळांचा गर, रस अशा या सगळ्या गोष्टी भरवण्याची एक वेळ असते. म्हणजे जन्मलेल्या बाळाला लगेचच सगळ्या गोष्टी खाता येत नाही. तो त्यांचा आहार देखील नसतो. साधारण 4 महिन्यांपासून दात येऊ लागले की, बाळाच्या आहारात थोडे बदल करणे गरजेचे असते. या एवढ्या वयात तान्ह्या बाळांच्या आहारात बदल करायला हवा. तसंच बाळ 7 महिन्यांचे झाल्यानंतर आहार नेमका कसा द्यायचा ते देखील जाणून घ्या.

6 व्या महिन्यातील बाळांची वाढ

6 महिन्याच्या बाळाचा आहार

बाळाच्या वाढीचे टप्पे हे घरातील प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे. विशेषत: बाळाच्या आईबाबांना त्याच्या सगळ्या गोष्टी माहीत असायला हव्यात. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या वाढीचे टप्पे हे सर्वसाधारणपणे असे अवलंबून असतात. 6 महिन्याच्या बाळाचा आहार हा त्यावर अवलंबून असतो

महिनाबाळाची वाढआहार 
1 महिनामान सावरणे,आईची ओळख, वजनात वाढ होणेस्तनपान
2 महिना

बाळाची नजर स्थिर होणे, बाळ हसणे

स्तनपान
3 महिनाहालचाली वाढणे, आवाजाकडे प्रतिसाद देेणेस्तनपान
4 महिनामांडीवर बसणे, हातात वस्तू पकडण्याचा प्रयत्न करणेस्तनपान
5 महिनावजन वाढणे, एखादी वस्तू दिसल्यास शोधणेस्तनपान
6 महिनाआधार देऊन बसणेस्तनपान
7 महिनाहाताने खाण्याचा प्रयत्न करणे, नावाला प्रतिसाद देणेडाळीचे पाणी,सूप, भाज्यांचे सूप,पेज
8 महिनासोपे शब्द उच्चारणे (मामा, काका,बाबा)शिजलेला मऊ भात, वरण, पोळी
9 महिनाउभे राहण्याचा प्रयत्न करणेमऊ खिचडी, दुधात कुस्करलेली पोळी
10 महिनाटाळ्या वाजवणे, प्रतिसाद देणेखिचडी, फळ, पोळी, मऊ भाकरी, दूध
11 महिनाखेळण्याचा प्रयत्न करणेवरीलप्रमाणे
12 महिनावजन तिप्पट वाढणे, चालणे, योग्य खाणे, अॅक्टिव्ह असणेघरातील रोजचा आहार पण कमी तिखट 
6 महिन्याच्या बाळाचा आहार

सहा महिन्यापर्यंत बाळ स्तनपानावर असते. पण त्यानंतर बाळाला जेव्हा आहार सुरु होतो तेव्हा बाळ साधारण 6 ते 9 महिने 2 वेळा खायला देऊ शकतात. त्यानंतर बाळाला दिवसातून 3 ते 4 वेळा भरवले तरी चालू शकेल. नव मातांनी प्रेग्नंसीमध्ये आरोग्याची काळजी घ्यायला हवी.

वाचा5 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता

6 महिन्यांच्या बाळाचा आहार

6 महिन्याच्या बाळाचा आहार

6 महिन्यांच्या बाळाचा आहार हा त्यांच्या वाढीसोबत वाढू लागतो. त्यांना दात आल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी खाता येतात. साधाऱण या महिन्यांपर्यंत बाळांना आहारात वेगवेगळ्या चवी असाव्यात असे वाटू लागते. त्यामुळे तुम्ही आहारात काही गोष्टी अगदी बिनधास्त समाविष्ट करु शकता. 

भाताची पेज

भाताची पेज ही कधीही आणि कोणत्याही वयासाठी चांगली असते. लहान बाळांना मऊ भाताची पेज तर फारच आवडते. यामध्ये मीठ असल्यामुळे आणि तांदुळाची चव असल्यामुळे ही भाताची पेज पोटभरीची आणि अधिक चविष्ट लागते. भाताची पेज करण्यासाठी खास उकडे तांदूळ मिळतात. ते स्वच्छ धुवून पाणी आणि मीठ घालून चांगल्या मऊ होईपर्यंत त्याच्या शिट्ट्या काढा. भात छान मऊ झाल्यानंतर तुम्ही ती भाताची पेज त्यांना बाळांना द्या. त्यामध्ये पाणी जास्त असेल तर ते मीठाचे पाणी बाळांना फार आवडते. त्यासोबत भातही खाल्ला जातो.

खिमटी

मिश्र डाळींची खिमटी हा प्रकार खूप जण लहान बाळांसाठी घरीच करतात. वेगवेगळ्या डाळी भाजून त्याची पावडर केली जाते. ही खिमटी शिजवून त्यावर तूप घालावे. खिमटी ही बाळाला आवडेल त्यानुसार पातळ किंवा थोडीशी घट्टसर करावी. त्यामुळे त्यांना खाणे बरे पडते. लहान बाळांना खिमटी हा पुरक असा आहार आहे. तो त्यांना चांगलाच आवडतो. यामध्ये मूग डाळ,मसूर डाळ, तूरडाळ, ड्रायफ्रुट्स यांचा समावेश असतो. त्यामुळे हे खाणे अधिकच पौष्टिक असते. 6 महिन्याच्या बाळाचा आहार हा असा असावा.

पातळ खिचडी

खिचडी ही भात आणि डाळीपासून बनवलेली अत्यंत पौष्टिक अशी डिश आहे. यामुळे बाळाचे पोट छान भरते. बाळासाठी खिचडी करताना त्यामध्ये फार काही घालता येत नाही.तांदूळ आणि डाळ भिजत घाला.तांदूळाच्या तुलनेत डाळ जास्त असलेली बरी. त्यामुळे बाळाला जास्तीत जास्त डाळ जाते. रोजच्या प्रमाणे कुकरला खिचडी लावून ती जास्तीत जास्त शिजवा. या खिचडीत तुम्ही बटाटा किंवा काही भाज्या घातल्या तरी चालू शकेल.

किसलेले किंवा बारीक केलेली फळ

किसलेली आणि बारीक केलेली फळ ही देखील सहा महिने पूर्ण झालेल्या बाळांना चालू शकतात. पण ही फळ नरम असायला हवी. या वयात मुलांना दात असले तरी देखील त्यांना खात येत नाही. त्यामुळे केळी, आंबा किंवा कलिंगड, सफरचंद, पेर अशी फळे थोडी किसून दिली तरी चालू शकतात.

मासे

जर तुम्ही मासांहार खाणारे असाल तर बाळांना मासे फ्राय देण्यासही हरकत नाही. पापलेट किंवा काटे नसलेले मासे फक्त मीठ,हळद आणि तिखट घालून तुम्ही मासे फ्राय करा. हा मासा अगदी थोडासा त्यांच्या खिचडीमध्ये घालून त्यांना द्या. लहान बाळ फ्राय मासा पूर्ण खाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना आधी एखादा तुकडा देण्यापासूनच सुरुवात करा.

उकडलेले अंड

माशांव्यतिरिक्त तुम्ही उकडलेले अंड देखील बाळांना देऊ शकता. अंड चांगले उकडून त्याला मोडून अंड्याचा पिवळा बलक आणि पांढरा बलक असे दोन्ही द्या. त्यांच्या खिचडीमध्ये उकडलेले अंडे त्यांना दिले तर चालू शकेल. जर बाळाला याची चव आवडली नसेल तर त्यांना जबरदस्ती खायला देऊ नका. कारण त्यांना जर नावडती गोष्ट दिली तर ते पुन्हा ते खाणार नाही. तसंच बाळ्याला देण्याचे अंड्याचं प्रमाणही डॉक्टरांना विचारून मगच द्या. 

उकडलेली रताळी

पोटभरीसाठी आणि चवीसाठी मस्त असा आहार म्हणजे रताळी. बाळांना पिष्टमय पदार्थ अधिक आवडतात. जर त्यांना तुम्ही रताळी थोडीशी उकडून दिली तरी देखील चालू शकते. रताळी उकडल्यानंतर ती तुम्ही खाऊन बघा. जर ती घशात लागत नसतील तरच ती बाळांना द्या. कारण अनेकदा रताळीमुळे घास लागण्याची शक्यता असते. त्यामुळे रताळी आधी तुम्ही चाखून बघा.

शिजलेल्या भाज्या

भाज्या या कधीही बाळांना देणे चांगलेच. पण बाळांना भाज्या देताना त्यांना फ्लॉवर, ब्रोकोली अशा स्मॅश होतील अशाच भाज्या देता येतात. त्यांना भाज्या देण्यास काहीच हरकत नाही. पण या भाज्या त्यांच्या पातळ खिचडीमध्ये घाला  म्हणजे त्यांना ते खाता येतील.

वाचा 9 महिन्याच्या बाळाचा आहार

आईने या गोष्टीही ठेवा लक्षात

6 Months Baby Food In Marathi

बाळाच्या बाबतीत त्यांच्या आई या फार आग्रही असतात आपल्या बाळाला काहीही कमी पडू नये म्हणून त्यांना सतत त्या काही ना काही चांगलं भऱवण्यामध्ये व्यग्र असतात. पण असे करताना काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. नेमकी मातांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

1 वर्षाच्या बाळाचा आहार तक्ता

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. 6 महिन्याचे बाळ किती खाते ?

साधारण 6 महिन्याचे बाळ दिवसातून दोनवेळाच खाते. त्याला दोनच मील देणे गरजेचे असते. उरलेल्या वेळी आईच्या दूधावर असल्यामुळे त्यांना तितका आहार पुरतो. लहान बाळ खाते म्हणून त्याला सतत भरवू नका. त्यामुळे अशी बाळ सुस्त आणि जाड होऊ लागतात.

2. 6 महिन्याचे बाळाला पिण्यासाठी काय द्यावे ?

दूधाव्यतिरिक्त या बाळांना आता इतर काही प्यायला दिले तर चालू शकते. फळांचे रस, मटणाचे सूप असे दिले तरी चालू शकते. पण हे त्यांना 3 ते ४ चमच्यांशिवाय जास्त देऊ नका. आधी त्यांना याचा त्रास होतो की नाही ते पाहा मगच त्यांना आहार वाढवा

3. 6 महिन्याचे बाळ मोठ्यांचा आहार घेऊ शकते का ?

6 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळांच्या आहारात तुम्हाला थोडासा बदल करता येतो. त्यामध्ये उकडलेला बटाटा, बीट असे कुस्करुन दिल्यास काहीच हरकत नसते. पण मोठ्यांचा सगळा आहार त्यांना चालू शकत नाही. त्यांना आहारात मोठ्यांच्या तुलनेत कमीत तिखट ठेवावा लागतो.

Read More From पालकत्व