Care

केस पातळ होण्याची नक्की काय आहेत कारणं, जाणून घ्या

Dipali Naphade  |  Nov 19, 2019
केस पातळ होण्याची नक्की काय आहेत कारणं,  जाणून घ्या

सुंदर केस असणं हे प्रत्येकाचंं स्वप्नं असतं. पण प्रत्येकाला काही ना काहीतरी केसांची समस्या एका विशिष्ट वयानंतर असतेच. आपल्या धावपळीच्या जीवनात केसांची काळजी नीट घेतली जात नाही. त्यामुळे सर्वात मोठी केसांच्या बाबतीतील समस्या येते ती म्हणजे केस पातळ होणे. केसगळतीमुळे हळूहळू केस पातळ होत जातात. पण याची नक्की कारणं काय आहेत हे मात्र आपल्याला समजत नाही. आपण वेगवेगळे अंदाज बांधत राहातो. पण आता याची नक्की कारणं काय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. केस घनदाट आणि लांबसडक करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण त्याचा काहीही परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे जेव्हा तुमचे केस पातळ होत असतील आणि त्यावर उपचार करायचे असतील त्याआधी केस पातळ होण्यामागची कारणं समजून घेणं आवश्यक आहे.तरच त्यावर योग्य उपचार करता येऊ शकतात. बघूया अशी कोणती कारणं आहेत जी केसांवर पातळ होण्याइतका जास्त वाईट परिणाम करत आहेत – 

1. तेलाचा अति वापर

Shutterstock

बऱ्याचदा केसांना चांगलं राखण्यासाठी आपण विविध तेलांचा वापर करतो. पण तेल वापरताना ते योग्य प्रमाणात वापरणं गरजेचं असतं. तुम्ही तुमच्या केसांना चांगलं राहण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी जर सतत तेल लावत असाल तर ते चुकीचं आहे. असं तेल चोपडणं तुम्हाला नक्कीच महागात पडून त्याचा उलटा परिणाम होतो. यामुळे तुमच्या स्काल्पचे पोअर्स बंद होतात आणि केस वाढण्याऐवजी केसांची वाढ थांबते. तसंच तुमच्या बंद पोअर्समध्ये तेल साठून राहते आणि त्यावर प्रदूषणामुळे धूळही साचून राहाते. यामुळे केस तुटण्याची आणि पातळ होण्याची समस्या वाढीला लागते. त्यामुळे सहसा तेल लावताना काळजी घ्या. सतत तेल लावून केसांची अवस्था अधिक वाईट करू नका.  

केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स

2. केस ओले असताना विंचरणे

Shutterstock

आपल्याला रोजच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टीची घाई असते. बऱ्याचदा ऑफिसला निघताना घरातून निघायच्या आधी आंघोळ केली जाते. अशावेळी जेव्हा तुम्हाला केस धुवायचे असतात त्यावर वाईट परिणाम होतो. घाईघाईत आपण ओले केस विंचरतो. केस पातळ होण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. ओले केस विंचरण्याने अधिक तुटतात. त्यासाठी तुम्ही केस ओले असताना ते हाताच्या बोटांनी मोकळे करा त्यानंतर टॉवेलने व्यवस्थित पुसून घ्या आणि त्यानंतर थोडे सुकू द्या. सुकल्यावरच केसांना फणी लावा. ओल्या केसात कंगवा फिरवू नका. त्यामुळे केसगळती आणि केस पातळ होतात. 

3. केस रगडून धुणं

Shutterstock

केस धुण्याची एक पद्धत असते. अन्यथा केस हा शरीराचा नाजूक भाग आहे. पण काही जणं केस धुताना रगडून धुतात. त्यामुळे केस तुटतात आणि त्याचा परिणाम केस पातळ होण्यात होतो. केसांना आठवड्यातून  तीन वेळा शँपू आणि कंडिशनर हे करायलाच हवं. पण हे करत असातना शँपू लावल्यानंतर तुम्ही जर तुमचे केस रगडून धुत असाल तर तुम्ही चूक करत आहात हे लक्षात घ्या. त्यामुळे केस अधिक कमजोर होतात आणि तुटतात. शँपू लावल्यानंतर तुम्ही केसांना हलक्या हातांनी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केलात तर केसांना योग्य पोषण मिळतं. अशावेळी केस पातळ होण्याची शक्यता राहातन नाही. 

कढीपत्त्याचा हेअर मास्क तयार करून मिळवा सुंदर केस

4. केसांमध्ये जास्त हिटचा वापर करणं

Shutterstock

बऱ्याजदा कुठेही जायचं झालं किंवा अनेक कार्यक्रमांना जाताना आपण स्ट्रेटनर अथवा ड्रायर्स या सगळ्या गोष्टींंचा केसांवर वापर करतो. पण केसांना अशा तऱ्हेने सतत हिट देणंही चुकीचं ठरतं. तुमचे केस चांगले राहण्यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. सतत केसांना अशा तऱ्हेने हिट देणं तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. तसंच तुम्ही सतत ड्रायरचा वापर केलात तर तुमचे केस नक्कीच त्याच्या हिटने पातळ होतात. पण तुम्ही या गोष्टींचा वापर करणं टाळलंत तर तुमचे केस नक्कीच घनदाट होण्यास मदत होईल. 

5. सतत ताणात राहणं

सतत काम आणि ऑफिस या सगळ्यामध्ये आपण तणावात असतो. पण हाच तणाव आपले केस पातळ करण्यासाठी कारणीभूत ठरतो. यावर एकच उपाय आहे. तुम्ही सतत तणाव घेणं सोडून द्या. एखादी गोष्ट तणावामुळे बिघडणारच असते. त्यामुळे शक्यतो तणाव न घेणंच योग्य. त्याचा सर्वात जास्त परिणाम हा केसांवर होत असतो. त्यामुळे तुम्ही शक्यतो आनंदी राहण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. 

घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

6. क्रॅश डाएट करणं

Shutterstock

आजकाल वेगवेगळ्या प्रकारची डाएट सुरू झाली आहेत. तुमचं शरीर चांगलं राखणं योग्य आहे. पण त्याचबरोबर योग्य काळजी घेणंही गरजेचं आहे. बारीक होण्याच्या नादात तुम्ही तुमच्या शरीराच्या इतर भागांंवर दुष्परिणाम होऊ देऊ नका. केस मजबूत राहण्यासाठी हेल्दी आणि संतुलित डाएटची गरज असते. त्यासाठी तुम्ही क्रॅश डाएट करणं अजिबातच योग्य नाही. आपल्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही प्रोटीन आणि लोहाचा जास्तीत जास्त समावेश करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचे केस पातळ राहणार नाहीत.  

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Care