लाईफस्टाईलमध्ये थोडासा फरक झाला की, त्याचा फरक लगेेचच आपल्या आरोग्यावर होऊ लागतो. तुम्हालाही कामाचा वाढता ताण, आहारात झालेला बदल, झोपेची कमतरता या सगळ्यामुळे अस्वस्थ वाटू लागले असेल तुमची चेहऱ्यावरील चमक निघून गेली असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे हे फारच गरजेचे आहे. अगदी आठवड्याभरात योग्य आहार घेऊन तुम्ही तुमच्या प्रकृतीमध्ये बदल घडवून आणू शकता. त्यासाठी तुम्हाला आहारात काही बदल करावे लागतील जे बदल फारच सोपे आणि सहज करता येण्यासारखे आहेत. आहारात काही चांगल्या गोष्टींचा समाविष्ट केल्यामुळे शरीर सुदृढ होण्यास मदत मिळेल.
गरजेपेक्षा कमी झोप घेतल्यास शरीरावर होतात हे गंभीर परिणाम
सुकामेवा
रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही भिजवलेले बदाम, अक्रोड किंवा मुठभर काठे मनुके खा. भिजवलेल्या या सुक्या मेव्यामध्ये प्रोटीन्स असतात. जे शरीराला जीवनसत्वे पुरवण्याचे काम करतात. इतकेच नाही तर शरीराला उर्जा पुरवण्याचे कामही सुकामेवा करत असते. त्यामुळे तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही काही सुकामेवा खा. तुम्हाला नक्कीच त्यामुळे बरे वाटेल. त्यामुळे घरी काजू, बदाम, पिस्ता असे सगळे काही आणून ठेवा. ते योग्य प्रमाणात खा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
आवळा किंवा व्हिटॅमिन C चे रस
चांगली त्वचा आणि केस हवे असेल तर तुम्हाला व्हिटॅमिन C चे सेवन करण्यास सांगितले जाते. खूप वेळा धावपळ आणि दगदग यामुळे तुमची त्वचा आणि केस निस्तेज दिसू लागतात. अशावेळी जर तुम्ही यांचे सेवन केले तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच दिसून येईल. त्यामुळे तुम्ही लिंबू वर्गातील फळं, फळांचे रस यांचे सेवन सुरु करा. तुमच्या त्वचेमध्ये आणि तुमच्या केसांमध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवू लागेल. तुम्हाला तुमच्या त्वचेमध्येही तजेला आलेला जाणवेल.
आठवड्याभरात नितंब आणि मांड्या कमी करण्याचे उपाय (How To Reduce Butt Fat)
भाकरी
फायबरचा पुरेपूर साठा असलेली भाकरी ही तुम्ही आहारात नक्की असू द्या. भाकरीमुळे पोट भरलेले राहते. बाहेरचे अरबट चरबट खाण्याची मुळीच इच्छा होत नाही. त्यामुळे रोज तुम्ही वेगवेगळ्या धान्यांच्या भाकरींचा समावेश करा. त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. खूप जण रोज आहारात भाकरी घेतात. पण भाकरी घेताना तुम्ही जर ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदुळ अशा वेगवेगळ्या भाकऱ्यांचे सेवन केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल.
पालेभाज्या
पालेभाज्या या आहारात असायलाच हव्यात. भाज्या असल्या की, पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पालेभाज्यांमध्ये क्षार आणि अन्य जीवनसत्वे असतात जे शरीराला सुदृढ करण्यास मदत करतात. तुम्ही रोज एक पालेभाजी आहारात घेतली तर तुम्हाला तुमच्यामध्ये झालेला बदल जाणवेल. त्यातही तुम्ही सीझनल पालेभाज्या खाल्ल्या तर त्याचा अधिक फायदा तुम्हाला होईल. मेथी, मुळा, चाकवत, चवळी, शेपू, तांदुळजा, लालमाठ, चंदन बटवा अशा काही भाज्या अगदी दररोज बाजारात असतात ज्या तुम्ही अगदी रोज खायला काहीच हरकत नाही. या भाज्या भाकरी किंवा डाळ – भात कशासोबतही चांगल्या लागतात.
आता तुमच्या आहारात याचा समावेश करा आणि तुमच्या शरीरात होणारे बदल टिपा
वजन कमी करण्यासाठी, करून पाहा ‘हे’ योगासने (Yoga For Weight Loss In Marathi)