घरात बाळ आल्यानंतर मोठ्यांचे सल्ले सुरू होतात. साधारण 6 व्या महिन्यापासून बाळाचा आहार सुरू होतो. प्रत्येक महिन्यात बाळाला वेगवेगळा आहार आपण देऊ शकतो. 7 महिन्याच्या बाळाचा आहार (7 Mahinyachya Balacha Aahar) नक्की कसा असावा अथवा 7 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता (7 Month Baby Diet Chart Marathi) बाळाच्या आईला माहीत असायला हवा. गरोदरपणात तुम्ही याचा अभ्यास करून ठेऊ शकता. गरोदरपणात वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्येही याविषयी माहिती असते. 7 महिन्याच्या बाळाचा आहार (7 Month Baby Food Chart In Marathi) सुरू करताना त्यामध्ये नक्की कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असावा (7 Month Baby Food In Marathi) हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचीच योग्य आणि इत्यंभूत माहिती या लेखातून आम्ही घेऊन आलो आहोत. बाळाची काळजी प्रत्येक महिन्यात व्यवस्थितच घ्यावी लागते.
Table of Contents
- 7 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता – 7 Month Old Baby Diet Chart In Marathi
- 7 महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम पदार्थ – Best Food For 7 Month Old Baby In Marathi
- 7 महिन्यांच्या बाळाने किती खायला हवे – How Much A Baby Should Eat At This Age Marathi
- 7 व्या महिन्यात बाळासाठी मुख्य पोषक तत्वे कोणती आहेत – What Are The Most Important Nutrients In A Baby’s Diet?
- 7 महिन्यांच्या बाळासाठी होममेड बेबी फूड रेसिपी – Homemade Baby Food Recipes For 7 Month Old Baby
- 7 महिन्यांच्या बाळाला हे देऊ नये – Which Food To Avoid For Baby In Marathi
- प्रश्नोत्तरे (FAQ)
7 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता – 7 Month Old Baby Diet Chart In Marathi
प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास हा वेगळा असतो. साधारण सातव्या महिन्यात बाळ आधाराने बसायला शिकलेले असते आणि आपल्या हाताने खेळणी उचलण्याइतकी ताकद त्याच्यामध्ये आलेली असते. बाळाने मान सावरायला शिकलेले असते आणि हळूहळू पुढेदेखील सरकत असते. बाळ सातव्या महिन्यात अन्न चावायला शिकत असते. कारण काही बाळांना दातही येणे सुरू झालेले असते. तर काही बाळ एक एक अक्षरही उच्चारू लागतात. त्यामुळे बाळाचा अधिक विकास होण्यासाठी 7 महिन्याच्या बाळाचा आहार (7 Month Old Baby Diet Chart In Marathi) महत्त्वाचा आहे. त्यासाठी योग्य आहार तक्ता घ्या जाणून.
साधारणपणे सात महिन्याचे बाळ हे तीन वेळा घन पदार्थ आणि दोन वेळा स्नॅक्स खातात. तर सकाळी उठल्यावर आणि मध्ये मध्ये स्तनपान करतात. त्यानुसार हा तक्ता
दिवस | सकाळी उठल्यानंतर | बाळाचा नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
सोमवार | स्तनपान | नाचणीची लापशी | तूप भात (मऊ भात) | फळांचा रस | धान्याची लापशी |
मंगळवार | स्तनपान | फळांची प्युरी (सफरचंद, पेर) | दलिया | डाळीचे पाणी | मऊ भात (तूप वा डाळीचे पाणी घालून) |
बुधवार | स्तनपान | मऊ मुगाची खिचडी | उकडलेल्या भाज्यांचे सूप | स्तनपान | तांदळाची खीर |
गुरूवार | स्तनपान | गव्हाच्या पिठाची लापशी | माशाची प्युरी | गाजराची खीर | नाचणी लापशी |
शुक्रवार | स्तनपान | इडली | मऊ खिचडी | सफरचंद प्युरी | मऊ मुगाची खिचडी |
शनिवार | स्तनपान | भाज्यांचे सूप | दलिया | केळं | मऊ भात |
रविवार | स्तनपान | दही भात | लापशी | पेर प्युरी | तांदळाची लापशी |
7 महिन्याचे बाळ साधारणतः पाव वाटी लापशी खाते. बाळाच्या मागणीनुसार तुम्ही हे त्याला भरवू शकता. मात्र यासह आईचे दुधही गरजेचे आहे हे लक्षात ठेवा.
7 महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम पदार्थ – Best Food For 7 Month Old Baby In Marathi
बाळ जेव्हा 7 महिन्याचे होते तेव्हा त्याची शारीरिक प्रगती अगदी वेगाने होऊ लागते. तसंच त्याची शारीरिक हालचालही जास्त प्रमाणात होत असते. बाळाला दात येण्याचा हा काळ असतो. त्यामुळे बाळाचे योग्य पोषण होणे आवश्यक आहे. यासाठी 7 महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम पदार्थ कोणते (Best Food For 7 Month Old Baby In Marathi) हे जाणून घ्यायला हवेत.
उकडलेल्या भाज्या
6 व्या महिन्यात अन्नप्राशनाचा विधी झाल्यावर बाळाला अनेक पदार्थ (7 Month Baby Food In Marathi) तुम्ही खायला घालू शकता. त्यापैकी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे उकडलेल्या भाज्या मॅश करून बाळाला त्याचे सूप बनवून देणे. भाज्या वाफवून त्याची प्युरी बनवून बाळाला खायला द्यावी. हे त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते.
फळांचा रस
अगदी लहानपणापासूनच म्हणजे अगदी 7 व्या महिन्यापासूनच सफरचंद, पेर, केळी, चिकू, पपई यांच्या फळांच्या रसाची बाळाला चव चाखायला द्यावी. जेणेकरून त्याला योग्य पोषक तत्व मिळतात. बाळाला प्रतिकारशक्ती वाढविण्यासही यामुळे मदत मिळते.
लापशी
बाळाला उत्तम पोषण मिळावे म्हणून लापशी हा सर्वोत्तम पदार्थ (7 Month Baby Food In Marathi) आहे. गहू, तांदूळ, जव, बाजरी, नाचणी या सर्व पदार्थांची लापशी तुम्ही बाळाला भरवावी. या धान्याची तुम्ही पावडर करून घ्या आणि त्याची लापशी तुम्ही नियमित आपल्या 7 महिन्याच्या बाळाला भरवा. त्याला यामधून पोषक तत्व मिळतात.
खिचडी
तांदूळ, मूग अशा डाळीची मऊ खिचडीदेखील बाळांना द्यावी. खिचडी ही बाळासाठी पौष्टिक असून मोठ्यांच्या अन्नाची त्याला यामुळे ओळख होते.
मांस
चिकन आणि मटण यामधून बाळाला प्रथिने आणि कार्बोदके मिळतात. त्यामुळे याची प्युरी करून बाळाला अगदी प्रमाणात भरवावे. तसंच अंडे उकडून त्याचे लहान लहान तुकडेही बाळाला तुम्ही भरवू शकता.
7 महिन्यांच्या बाळाने किती खायला हवे – How Much A Baby Should Eat At This Age Marathi
बाळाने खाणे चालू करून एकच महिना लोटलेला असतो. साधारणपणे 7 महिन्याचे बाळ हे दिवसातून स्तनपान दोन ते तीन वेळा, 2 वेळा स्नॅक्स आणि 3 वेळा घन पदार्थ खाऊ शकते. बाळाला तुम्ही अति प्रमाणात खायला देऊ नका. बाळाला आपल्याला काय होत आहे हे या वयात व्यक्त करता येत नाही. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने प्रमाणात त्याला वर तक्त्यात दिलेले पदार्थ तुम्ही खायला देऊ शकता. तसंच सातव्या महिन्यात बाळाला फिल्टरचे पाणी अथवा घरात उकळून थंड केलेले पाणीही तुम्ही देऊ शकता. 7 महिन्यांच्या बाळाने किती खायला हवे (How Much A Baby Should Eat At This Age Marathi) असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुम्ही याचा संदर्भ घेऊ शकता. 7 महिन्याच्या बाळाचा आहार तुम्हाला व्यवस्थितच द्यायला हवा.
7 व्या महिन्यात बाळासाठी मुख्य पोषक तत्वे कोणती आहेत – What Are The Most Important Nutrients In A Baby’s Diet?
बाळाचे पोषण योग्य होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण वयाच्या सहा महिन्यानंतर बाळाला केवळ आईचे दूध पुरेसे ठरत नाही. त्यामुळे वरचे अन्न सुरू करावे लागते. उशिरा अन्न सुरू केल्यास कुपोषणाला कारणीभूत ठरू शकते. याच काळात बाळाला दातही येत असतात. त्यामुळे त्याच्या शरीराच्या वाढीसाठी मुख्य पोषक तत्वे द्यायला हवीत. यासाठी रोज नाचणीचे दूध, गूळ घातलेली खीर अर्थात लापशी द्यावी, ज्यामधून बाळाला कॅल्शियम मिळते. तुम्ही तांदळाची खीरही करून देऊ शकता. याशिवाय तुम्ही तांदूळ, हरभरा डाळ, शेंगदाणे हे सर्व भाजून भरडून ठेऊन त्याची लापशी देऊ शकता. जेणेकरून बाळाला योग्य पोषण मिळते.
7 व्या महिन्यात बाळाला गाजर, पपई, हिरव्या पालेभाज्या हे सर्व शिजवून आणि वाफवून त्याचे सूप बनवून द्यावे. यामुळे जीवनसत्वयुक्त आणि खनिजयुक्त पोषक तत्वे बाळाच्या पोटामध्ये जाण्यास मदत मिळते. तसंच बाळाला रोज थोडं थोडं तूपही द्यावं. याचा बाळाच्या पोषणासाठी चांगला फायदा होतो. वरणभात (मऊ शिजलेला) किंवा मुगातांदळाची मऊ शिजलेली खिचडी, उकडलेला मऊ बटाटा, पोळी दुधात कुस्करून, केळं, आंबा, पेरू असे कोणतेही फळ, उकडलेल्या अंड्याचा पिवळा भाग, मटणाचे सूप, कोणत्याही पालेभाजीचे सूप असे सर्व पदार्थ (7 Month Baby Food In Marathi) बाळाच्या पोषणासाठी उत्तम ठरतात.
7 महिन्यांच्या बाळासाठी होममेड बेबी फूड रेसिपी – Homemade Baby Food Recipes For 7 Month Old Baby
बाळासाठी आईने घरीच असे काही पदार्थ (7 Month Baby Food Recipes In Marathi) बनवावेत ज्यामुळे त्याचे योग्य पोषण मिळण्यास मदत होते. त्यासाठी अगदी सोप्या काही रेसिपी आम्ही तुम्हाला देत आहोत.
नाचणीची लापशी
साहित्य
- 1 कप नाचणीचे पिठ
- 1 चमचा तूप
- आवश्यकतेप्रमाणे पाणी
बनविण्याची पद्धत
- एका भांड्यात नाचणीचे पीठ आणि पाणी घालून पेस्ट तयार करा आणि मंद आचेवर उकळी येईपर्यंत ठेवा
- शिजल्यावर त्यात एक चमचा तूप सोडा आणि मग थंड करून आपल्या बाळाला खायला द्या
सफरचंदाचा रस
साहित्य
- 1 सफरचंद
बनविण्याची पद्धत
- सफरचंदाचे साल काढून टाका
- त्यानंतर एका भांड्यात सफरचंद उकडून घ्या
- मॅश करून त्याची बारीक पेस्ट करा आणि मग गाळून बाळाला भरवा
गव्हाच्या पिठाचा पॅनकेक
साहित्य
- 1 कप गव्हाचे पिठ
- पाव कप गुळाचा रस
- आवश्यकतेप्रमाणे पाणी
- 1 चमचा बडिशेप
बनविण्याची पद्धत
- गव्हाच्या पिठामध्ये गुळाचा रस मिक्स करा
- थोडे पाणी घाला आणि सरसरीत पेस्ट बनवून घ्या
- त्यात बडिशेप घाला, तुम्हाला हवं तर बडिशेप पावडरही मिक्स करू शकता
- हे मिश्रण रात्रभर तसंच ठेवा
- सकाळी तव्याला थोडं तूप लावा आणि याचे डोसे घाला
- दोन्ही बाजूंनी भाजून घ्या आणि पॅनकेक्स तयार. बाळाला लहान लहान तुकडे भरवा
मुगाच्या डाळीची खिचडी
साहित्य
- अर्धा कप हिरव्या मुगाची डाळ
- अर्धा कप तांदूळ
- अर्धा चमचा हळद
- अर्धा चमचा जिरे
- 1 चमचा तूप
- पाऊण कप पाणी
बनविण्याची पद्धत
- डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि अर्धा तास पाण्यात भिजत घाला
- त्यानंतर पाणी काढून टाका आणि त्यात हळद आणि जिरे घाला
- हे प्रेशर कुकरमध्ये पाणी घालून शिजवून घ्या
- शिजल्यावर मिक्सरमध्ये एकदा फिरवा आणि मग बाळाला भरवा
धान्यांची लापशी
साहित्य
- सर्व धान्य एकत्र करून तयार केलेली धान्यांची पूड
- अर्धा कप पाणी
- स्तनपानाचे दूध अथवा फॉर्म्युला दूध अर्धा कप
बनविण्याची पद्धत
- एका भांड्यामध्ये धान्याचे पीठ घ्या आणि त्यात पाणी घालून गुठळी राहणार नाही असे व्यवस्थित मिक्स करून घ्या
- त्यानंतर मंद गॅसवर हे शिजू द्या
- उकळल्यावर त्यात दूध घाला
- तुम्हाला हवं तर एखाद्या फळाची प्युरीही यात तुम्ही मिक्स करून घेऊ शकता
हे पदार्थ तुम्ही घरच्या घरी बनवून आपल्या 7 महिन्याच्या बाळाचा आहार करत असल्यास, समाविष्ट करून घेऊ शकता.
7 महिन्यांच्या बाळाला हे देऊ नये – Which Food To Avoid For Baby In Marathi
- बाळाला वरच्या आहाराची सुरूवात करताना एका वेळी एकच पदार्थ सुरू करावा. लगेच एकाच दिवशी दुसरा पदार्थ देणे टाळावे. उदा. भाताची पेज आज दिल्यास, पुढचे साधारण 3-4 दिवस भाताची पेजच द्यावी. त्यानंतर दुसऱ्या एखाद्या पदार्थाची चव बाळाला द्यावी
- बाळ साधारण एक वर्षाचे होईपर्यंत कोणत्याही पदार्थामध्ये मीठ वा साखर घालू नये. बाळाला तुम्ही जे पदार्थ देता त्याचीच चव माहीत असते. त्यामुळे मीठ आणि साखर हे पदार्थ नाही घातले तरीही बाळ इतर पदार्थ खाणारच हे लक्षात ठेवा
- एखादा पदार्थ खाताना बाळाला त्रास झाला तर थोडे दिवस तो पदार्थ देणे टाळावे
- बाळाला खूप थंड किंवा खूप गरम पदार्थ देऊ नयेत. कोमट करूनच द्यावेत
- पाणी अथवा दूध सहसा बाटलीतून देऊ नये
- वरचे दूध देणे सहसा टाळावे
- शेंगदाणे, काजू अथवा सुकामेवा देऊ नये. असे पदार्थ बाळाच्या घशात अडकण्याची भीती असते
- साधारण एक वर्षापर्यंत मध देणेही टाळा
- रेडीमेड फूड अथवा बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही पावडरींचा उपयोग बाळासाठी करून घेऊ नका
प्रश्नोत्तरे (FAQ)
प्रश्नः सात महिन्याच्या बाळाच्या विकासाचे काय टप्पे आहेत?
उत्तरः सात महिन्याचे बाळ साधारणतः बसू शकते. तसंच हातात खेळणी धरू शकते आणि फेकूही शकते. आपल्या नावाला प्रतिसादही बाळ देते. याशिवाय या काळात बाळाला दात येत असतात.
प्रश्नः सात महिन्याच्या बाळाची उंची आणि वजन साधारण किती असावे?
उत्तरः प्रत्येक बाळ हे वेगळे असते. पण साधारण बाळाचे वजन जर मुलगा असेल तर हे साडेसहा किलो ते दहा किलो इथपर्यंत असावे. यापेक्षा कमी अथवा यापेक्षा अधिक असू नये. तर बाळाची उंची ही 72 सेमी इतकी वाढते. तर मुलगी असल्यास तिचे वजन साधारणतः सहा ते नऊ किलो इतके असते आणि उंची ही 68 सेमी इतकी असते.
प्रश्नः सात महिन्याच्या बाळाची झोप किती तास असावी?
उत्तरः सात महिन्याचे बाळ हे साधारणतः 10 ते 14 तास झोपते. त्याला पुरेशी झोप मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे इतकी झोप तरी हवीच.
निष्कर्षः 7 महिन्याच्या बाळाचा आहार (7 mahinyachya balacha aahar) आपण या लेखातून जाणून घेतला आहे. तसंच आम्ही तुम्हाला 7 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता (7 month baby diet chart marathi) देखील दिला आहे. यामध्ये (7 month baby food chart in marathi) बाळाला 7 व्या महिन्यात काय खायला पदार्थ हवेत (7 month baby food in marathi) आणि त्या पदार्थांच्या रेसिपीचा (7 month baby food recipes in marathi) समावेशही आम्ही केला आहे.