आरोग्य

गरोदरपणाच्या 9 व्या महिन्यात कशी घ्याल काळजी, तुमच्यासाठी टिप्स

Dipali Naphade  |  Jun 9, 2021
गरोदरपणाच्या 9 व्या महिन्यात कशी घ्याल काळजी, तुमच्यासाठी टिप्स

 

 

गर्भधारणा लक्षणे यातील गरोदरपणाचा 9 वा महिना म्हणजे सर्वाधिक काळजी घेण्याचा महिना. बाळाची पूर्ण वाढ झालेली असते. संपूर्ण 9 महिने घेतलेली काळजी आणि आता बाळाच्या येण्याची ओढ या दोन्ही स्टेजच्यामध्ये आपण असतो. पण नववा महिना चालू झाल्यानंतर बाळाच्या हालचालीकडे अधिक लक्ष द्यावे लागते. नववा महिना अर्थात 35 व्या आठवड्यापासून ते 40 आठवड्याचा कालावधी. गर्भावस्थेचे हे शेवटचे दिवस असतात. त्यानंतर तुमच्याकडे लहानसा जीव तुमच्या हातात येणार असतो. हा संपूर्ण महिना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. काही महिला आपल्या बाळाच्या तयारीमध्ये व्यग्र होतात. तर काही महिलांना नवव्या महिन्यात भीती वाटते. पण या महिन्यात नक्की काय काळजी घ्यायची याची माहिती तुम्हाला असायला हवा. नवव्या महिन्यात नक्की काय लक्षणे असतात यापासून आपण सुरूवात करू.

 

 

9 व्या महिन्यातील लक्षणे (Symptoms Of 9th Month Pregnancy In Marathi)

Symptoms Of 9th Month Pregnancy In Marathi

प्रत्येक महिन्यात वेगवेगळी गरोदरपणाच लक्षणे दिसतात. सर्वात पहिले नवव्या महिन्यात गर्भावस्थेदरम्यान नक्की कोणती लक्षणे जाणवू शकतात हे आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे. 

स्तनांमधून पिवळ्या रक्ताचा स्राव – गर्भावस्थेचे शेवटचे दिवस जसजसे जवळ येतात. तसतसे गर्भवती महिलेच्या स्तनांमधून पिवळ्या रंगाच्या स्रावाला सुरूवात होते. याला कोलोस्ट्रोम असे म्हटले जाते. काही महिलांमध्ये हे लक्षण जास्त वाढते. 
सतत लघवीला होणे – गर्भावस्थेच्या नवव्या महिन्यात जेव्हा बाळाचा संपूर्ण विकास झालेला असतो तेव्हा योनीभागावर अधिक दबाव येतो. त्यामुळेच सतत लघ्वीला जाण्याचे लक्षण हे अत्यंत सामान्य आहे. 
ब्रेक्सटन हिक्सचे आकुंचन – गर्भावस्थेच्या अंतिम टप्प्यात ब्रेक्सटन हिक्स आकुंचन पावण्याची प्रक्रिया अधिक होते. पण हे प्रसव कळांइतके अधिक नसतात. अशावेळी तुम्ही तुमच्या बसण्याचे अथवा झोपण्याचे पॉश्चर बदला. तसंच तुम्ही हळूहळू चाललात तर तुमचं दुखणं कमी होतं. हे जर एका तासात चार ते पाच वेळा होत असेल तर हे नक्की लेबर पेन आहे. त्यामुळे अशावेळी त्वरीत डॉक्टरांना संपर्क साधा. 
बाळाचे खालच्या भागाकडे डोके येणे – डिलिव्हरीच्या काही आठवड्यापूर्वी तुमच्या छातीत जळजळ होणे अथवा श्वास घ्यायला त्रास होणे अशा समस्यांपासून तुमची सुटका होते. कारण या दरम्यान बाळ तुमच्या योनिमार्गातून बाहेर येण्यासाठी खालच्या बाजूला आलेले असते. त्यामुळे तुमच्या छातीवर ताण पडत नाही. तर तुमच्या योनिमार्गावर यावेळी ताण येतो. 
बाळाच्या हालचालींमध्ये बदल – या महिन्यात बाळाच्या हालचालींमध्ये खूपच बदल येतो. त्यामुळेच डॉक्टर नेहमी शेवटच्या महिन्यात बाळाच्या हालचालींकडे लक्ष द्या असं सतत सांगतात. सतत हलणारे बाळ कमी प्रमाणात हलू लागते. शेवटच्या दिवसात पूर्ण विकास झाल्यानंतर बाळाला पोटात हलायला जागा राहात नाही. त्यामुळे पोटात लाथ मारणं किंवा पटकन वळणं या गोष्टी बाळ करू शकत नाही. 
योनी स्रावासह रक्त दिसणे – गर्भावस्थेच्या नवव्या महिन्यात योनी स्रावासह हलकेसे रक्त येते. प्रसव कळा येण्याच्या काही दिवस आधी असे होते. वास्तविक हे सामान्य लक्षण आहे. पण जर हा स्राव पिवळ्या रंगाचा असेल आणि त्यातून दुर्गंध येत असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. 

शरीरातील बदल (Changes In Body In Marathi)

गर्भावस्थेच्या 9 व्या महिन्यात शरीरात अनेक बदल होतात. नक्की हे बदल काय आहेत जाणून घेऊया. 

बाळाचा विकास नवव्या महिन्यात किती होतो ? (Child’s Growth In Marathi)

9th Month Pregnancy Care Tips In Marathi

9 व्या महिन्यात बाळाचा पूर्ण विकास झालेला असतो आणि बाळ खाली सरकून योनीमार्गाजवळ येते. याचा नक्की विकास होतो म्हणजे काय होते ते जाणून घेऊया

9 व्या महिन्यात कशी घ्यावी काळजी ? (9th Month Pregnancy Care Tips In Marathi)

9th Month Pregnancy Care Tips In Marathi

हा जरी गर्भावस्थेचा शेवटचा महिना असला तरीही या महिन्यात महिलांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. बाळाला हानी पोहचेल असं काहीही वर्तन महिलांनी करू नये. गर्भावस्थे दरम्यान महिला काय खात आहेत, काय पित आहेत आणि त्यांची जीवनशैली कशी आहे याचा सर्व परिणाम बाळावर होत असतो. त्यामुळे शेवटच्या महिन्यातही बाळाकडे विशेष लक्ष पुरवावे लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाणे. नवव्या महिन्यातही आईने काय खायला हवे आणि काय खायला नको याची माहिती तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. 

काय खावे ? (Diet For 9th Month Pregnant In Marathi)

Diet For 9th Month Pregnant In Marathi

गर्भावस्थेदरम्यान खाण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यावेळी नक्की काय काय खायला हवे आणि काळजी घ्यायला हवी जाणून घ्या. 

फायबरयुक्त खाणे – यामध्ये तुम्ही हिरव्या भाज्या, फळं, कडधान्ये, डाळी, गहू, तांदूळ या सगळ्या पदार्थांचा समावेश करून घेऊ शकता, ज्यामध्ये जास्त प्रमाणात फायबरयुक्त पदार्थ आहेत. 
लोहयुक्त जेवण – नवव्या महिन्यातही शरीराला आणि बाळाला लोहयुक्त जेवणाची आवश्यकता भासते. यामध्ये तुम्ही पालक, सफरचंद, खजूर, ब्रोकोली यासारख्या पदार्थांचा समावेश करा. यामध्ये तुम्ही मांसाहारी चिकन खाऊ शकता.
कॅल्शियमयुक्त जेवण – गर्भावस्थेदरम्यान कॅल्शियम कमी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अगदी पहिल्या महिन्यापासून कॅल्शियमच्या गोळ्या, दूध याचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात येतो. शेवटच्या महिन्यातही तुम्ही डेअर उत्पादने आणि दही इत्यादी पदार्थांचे सेवन करण्याची गरज आहे. 
विटामिन सी युक्त जेवण – शरीरामध्ये विटामिन सी गर्भावस्थेदरम्यान जाणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही लिंबू, संत्रे, स्ट्रॉबेरी आणि टॉमेटो यासारख्या पदार्थांचे सेवन करावे. 
फॉलेटयुक्त पदार्थ – नवव्या महिन्यापर्यंत तुम्ही फॉलेटयुक्त पदार्थ खायला हवेत. फॉलेटच्या कमतरतेमुळे बाळाला हाडांचे आणि मतिष्कसंबंधी विकार होण्याचा धोका असतो.त्यामुळे तुम्ही या महिन्या हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्यांचा समावेश जेवणात करून घ्यायला हवा. 

काय खाऊ नये? (What Not To Eat)

9th Month Pregnancy Care Tips In Marathi

अशा अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश आहे जे नवव्या महिन्यात गर्भवती महिलांनी खाऊ नयेत. बाळाची काळजी घेण्यासाठी या पदार्थाचा तुम्ही काही काळ त्यागच केलेला बरा. 

कॅफीन – गर्भावस्थेमध्ये कॉफी, चहा, चॉकलेट या गोष्टी न खाण्याचा सल्ला देण्यात येतो. कारण यामध्ये असणारे कॅफीन हे बाळासाठी सुरक्षित नाही. तुम्हाला चहा आणि कॉफीची सवय असेल तर तुम्ही दोन कप चहा अथवा कॉफी दिवसातून पिऊ शकता. पण त्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
दारू आणि तंबाखू सेवन – गर्भावस्थेदरम्यान तुम्ही दारू अथवा तंबाखूचे सेवन अजिबातच करू नये. यामुळे बाळाला जन्माआधीच कोणताही दोष निर्माण होऊ शकतो
सॅकरिन (कृत्रिम गोड पदार्थ) – सॅकरिन एक प्रकारचा गोड पदार्थ असतो जो नैसर्गिक नसतो. गर्भावस्थेदरम्यान याचे सेवन करणे वर्जित आहे. तुम्हाला गोड खावेसे वाटत असेल तर तुम्ही फळांचा रस अथवा घरच्या घरी तयार करण्यात आलेले नैसर्गिक पदार्थ खा. 
सॉफ्ट चीज – सॉफ्ट चीजमध्ये वापरण्यात आलेले दूध हे वेगळ्या पद्धतीने पाश्चराईज्ड करण्यात आलेले असते. त्यामुळे गर्भावस्थेदरम्यान चीज खाऊ नये. यामुळे संक्रमणाचा धोका उद्भवतो 
जंक फूड – जंक फूडमध्ये वापरण्यात येणारे सॉस, अति तेल याचा बाळावर परिणाम होऊ शकतो. तसंच हे पचायला अत्यंत जड असते. यामध्ये कोणतेही पोषक तत्व नसल्यामुळे नवव्या महिन्यात जंक फूड खाऊ नये. 
कच्चे मांस, अंडी आणि मासे – गर्भावस्थेदरम्यान कोणतेही कच्चे मांस, कच्चे अंडी अथवा मासे खाऊ नयेत. यामुळे भ्रूणाला धोका पोहचतो. 

कोणता व्यायााम करावा ? (Exercise)

गर्भवती महिला असो अथवा कोणतीही सामान्य व्यक्ती, व्यायाम हा सर्वांसाठी फायदेशीर असतो. गर्भावती महिलांनी व्यायाम करताना मात्र सावधानीपूर्वक करावा. आपल्या प्रशिक्षकाच्या परिक्षणान्वये व्यायाम करावा. गरोदर असताना योगादेखील करण्यात येतो. सकाळी आणि संध्याकाळी चालणे आणि श्वासासंंबंधी व्यायाम, अनुलोम – विलोम, कपालभाती हे व्यायाम तर नक्कीच करावेत. 

टीप – या दरम्यान आपल्या मनाने कोणताही व्यायाम करू नये. तसंच पोटावर दबाव येईल असा कोणताही व्यायाम करू नये. प्रत्येक व्यायाम करताना प्रशिक्षक आजूबाजूला असेल तेव्हाच व्यायाम करावा.

9 व्या महिन्यातील स्कॅनिंग (9th Month Scanning In Marathi)

9th Month Scanning In Marathi

गर्भावस्थेच्या नवव्या महिन्यात डॉक्टर प्रत्येक महिन्यात तपासणीसाठी गर्भवती महिलेला बोलावतात. या दरम्यान कोणती तपासणी केली जाते जाणून घ्या. 

नवव्या महिन्यात काय करावे (What To Do In 9th Month Of Pregnancy)

नववा महिना खूपच नाजूक असतो. या दरम्यान गर्भवती महिलांना खूपच काळजी घ्यावी लागते. यादरम्यान काय करायला हवे जाणून घ्या – 

काय करू नये (What Not To Do In 9th Month Of Pregnancy)

वडिलांनी घ्यायची काळजी (Care Tips For Fathers In 9th Month Of Pregnancy)

आता गर्भवती महिलांसह तिचा पतीही बाबा म्हणून जबाबदारी स्वीकारणार असतो. त्यामुळे त्यांनीही आपल्या पत्नीला योग्य साथ देत काळजी घ्यायला हवी. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. 9 व्या महिन्यात गर्भवती महिलांनी प्रवास करणे कितपत योग्य आहे ?

सहसा नवव्या महिन्यात प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात येतो. या महिन्यात कधीही प्रसव वेदना सुरू होऊ शकतात. त्यामुळे अशी जोखीम न उचलण्याचा सल्ला देण्यात येतो.

2. नॉर्मल डिलिव्हरी होईल हे कसे समजावे ?

तुमच्या नऊ महिन्यात जास्त चढउतार आले नसतील आणि तुम्हाला कोणतीही शारीरिक समस्या नसेल तर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. याशिवाय जर बाळाची आतील अवस्था ठीक असेल आणि डोकं व्यवस्थित खालच्या बाजूने सरकल्याचे दिसत असेल तर नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते.

3. नवव्या महिन्यात जास्त आराम करावा का ?

इतर महिन्यांच्या तुलनेने नवव्या महिन्यात जास्त आराम करावा. तुम्हाला थकवा येईल अथवा ताण येईल असे कोणतेही काम तुम्ही नवव्या महिन्यात करू नये. प्रसव दरम्यान तुम्हाला खूपच एनर्जी लागते. त्यामुळे जास्तीत जास्त आराम करण्याची गरज आहे. आईने आराम केल्यास बाळाचे वजनही व्यवस्थित वाढते.

तुमचाही नववा महिना चालू असेल तर तुम्ही या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

Read More From आरोग्य