मनोरंजन

‘मिसेस मुख्यमंत्री’ ची जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल’

Dipali NaphadeDipali Naphade  |  Jan 11, 2022
dishbhul

‘मिसेस मुख्यमंत्री’ या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी  ‘सुमी’ म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे (Amruta Dhongde) आणि ‘सुमी’ चा लाडका  ‘पायलट’ अर्थात अभिनेता तेजस बर्वे (Tejas Barve) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या नव्या वर्षात अमृता धोंगडे आणि तेजस बर्वे यांची जोडी छोट्या नाही तर मोठ्या पडद्यावर पेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव ‘दिशाभूल’ (Dishabhul) आहे. तेजस बर्वे आणि अमृता धोंगडे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

अधिक वाचा – सर्जरीनंतर या अभिनेत्रीला झाला होता खूप त्रास

दिशाभूल करायला येत आहे सुमी आणि पायलट

सानवी प्रॉडक्शन हाऊस निर्मित आणि आशिष कैलास जैन दिग्दर्शित ‘दिशाभूल’ या चित्रपटाचा स्क्रिप्ट पूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पुण्यात पार पडला. यावेळी अभिनेता तेजस बर्वे, निर्मात्या आरती चव्हाण, नीलेश आर. विनोद नाईक, ऍड.  प्रज्ञावंत गायकवाड, गोपाळ  कडावत, संगीतकार प्रथमेश धोंगडे, गीतकार हरिभाऊ धोंगडे, नृत्य दिग्दर्शक नील राठोड, कला दिग्दर्शक वैभव शिरोळकर, वेशभूषाकार शीतल माहेश्वरी यांच्यासह चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक आशिष कैलास जैन म्हणाले की, ‘दिशाभूल’ हा आजच्या तरुणाईचा चित्रपट आहे. कॉलेजमधील मुलांची ही अनोखी कथा असून यामध्ये फ्रेंडशिप, रोमान्स आणि सस्पेन्स थ्रीलर यांचा त्रिवेणी संगम बघायला मिळणार आहे. ‘दिशाभूल’ मध्ये अमृता धोंगडे, तेजस बर्वेसह आणखी एक जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

निर्मात्या आरती चव्हाण म्हणाल्या, ‘दिशाभूल’ हा सानवी प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट आहे. नवीन वर्षांची सुरुवात एका मराठी चित्रपटसह करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही अमृता आणि तेजस यांच्यासह मराठीतील नामवंत कलाकारांना एकत्र घेऊन एक वेगळा प्रयोग करत आहोत, त्याला प्रेक्षक साथ देतील असा विश्वास वाटतो.

अधिक वाचा – या कारणामुळे निआ शर्मा होऊ लागलीय ट्रोल

मराठी चित्रपटात दिसत आहेत नव्या जोड्या

मराठी चित्रपटानेही आता कात टाकली आहे असं म्हणायला हरकत नाही. वेगवेगळे प्रयोग करताना नव्या जोड्याही आता मराठी चित्रपटामध्ये दिसून येत आहेत. त्यातही मराठी मालिकांमधील कलाकारांना प्रेक्षक अक्षरशः डोक्यावर उचलून धरतात. या कलाकारांना घेऊन चित्रपट केल्यानेही फायदा होतो हे नक्की. तसंच मालिकेतील कलाकारांनाही एक वेगळा प्रयोग करता येतो. तेजस बर्वे आणि अमृता धोंगडे या जोडीला प्रेक्षकांनी मालिकेतून भरभरून प्रतिसाद दिला होता. आता या नव्या चित्रपटातून ही जोडी काय कमाल दाखवणार हे पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षक उत्सुक असतील. तसंच तेजस आणि अमृताच्या सहजाभिनयासह अन्य कलाकारांचीही त्यांना साथ मिळणार आहे. दरम्यान चित्रपटाच्या नावावरून नक्कीच हा चित्रपट नव्या दमाचा आणि नव्या कथेवर असणार याची कल्पना येत आहे. सध्या याची कथा काय हे माहीत नसली तरीही तरूणाईला नक्कीच हा चित्रपट भुरळ घालेल असा विश्वास या चित्रपटाच्या टीमला आहे. त्यामुळे आता हा चित्रपट नक्की कधी प्रदर्शित होत आहे याकडे सर्व चाहत्यांचे नक्कीच लक्ष लागून राहिले आहे.  

अधिक वाचा – BB15: अभिजित बिचुकलेचा माज, सलमानच्या बोलण्यानेही पडला नाही फरक

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन