आरोग्य

सावधान! एसी लावल्यामुळे वाढू शकतो कोरोना संक्रमणाचा धोका

Trupti Paradkar  |  Mar 25, 2020
सावधान! एसी लावल्यामुळे वाढू शकतो कोरोना संक्रमणाचा धोका

जगावर सध्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या संकटाचे सावट पसरलेले आहे. कोरोना व्हायसर संसर्गजन्य असल्यामुळे तो झपाट्याने वाढत आहे. या व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सध्या जगभरातून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातही कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. सर्वांना सुरक्षेच्या उपाययोजना घेण्यासाठी वारंवार सूचना केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे वृत्तवाहिन्यांवरून या सूचना वारंवार देत आहेत. घराबाहेर पडू नका, हात वारंवार स्वच्छ करा, चेहऱ्यावर हाताने स्पर्श करू नका, मास्क वापरा यासोबतच एक सूचना वारंवार केली जात आहे ती म्हणजे एसीचा वापर कमी  करा अथवा वापर पूर्णपणे बंद करा. 

Shutterstock

कोरोनाला नष्ट करायचं असेल तर एसी बंदच ठेवा

जगावर आलेलं हे संकट अगदी महाभयंकर आहे. मात्र त्यासोबतच वातावरणातही नैसर्गिक बदल होत आहे. लवकरच मार्च संपून आता एप्रिल महिन्याला सुरूवात होईल. मार्च आणि एप्रिल म्हणजे ‘उन्हाळा’ ऋतू सुरू होण्याचे दिवस. सहाजिकच वातावरणातील उष्णता आता वाढू लागली आहे. प्रखर सुर्यप्रकाश पडण्यास सुरूवात झाली आहे. सुर्याच्या प्रखर उष्णतेमुळे कोरोना व्हायरस नष्ट होण्यास नक्कीच मदत होणार आहे. मात्र कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. ज्यामुळे सर्वांना घरात राहणं बंधनकारक आहे. सर्वांसाठी या काळात घराबाहेर न पडणं हाच सुरक्षेचा एकमेव पर्याय उरला आहे. खंरतर मार्च आणि एप्रिलच्या महिन्यात घरात राहायचं म्हणजे एसीचा वापर करणं हे आलंच. कारण या काळात वातावरणातील उष्णता वाढलेली असल्यामुळे घरात देखील फारच उकडत असतं. शिवाय मुंबईत जागेअभावी घरे छोटी आणि दाटीवाटीची असतात. ज्यातून हवा खेळती राहील अशी रचनाच नसते. सहाजिकच अशा ठिकाणी उकाडा कमी करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी एअर कंडिश्वर हाच एक उपाय असतो. मात्र आता कोरोनाला पिटाळून लावायचं असेल तर घरातील एअर कंडिश्नरदेखील बंदच ठेवण्याच्या सूचना वारंवार देण्यात येत आहेत. ज्यामुळे लोकांची खूप मोठी पंचाईत होण्याची शक्यता आहे. घरात अडकून पडलेल्या लोकांना आता हा उकाडा सहन करत दिवस काढावे लागणार आहेत. 

Shutterstock

एसी बंद ठेवा आणि कोरोनाला नष्ट करा

कोरोना व्हायरसचा संसर्ग नेमका कसा होतो यावर अजूनही संशोधने सुरूच आहेत. मात्र तो झपाट्याने पसरत आहे हे रूग्णाच्या वाढत्या आकड्यावरून नक्कीच समजत आहे. तेव्हा कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वच पातळीवर उपाय होणं गरजेचं आहे. संशोधनानुसार कोरोना हा व्हायरस थंड वातावरणात जास्त काळ टिकतो मात्र उष्णता असलेल्या वातावरणात तो लवकर नष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या जगभरात सर्वत्रच  कोरोनाला नष्ट करण्याचे अनेक उपाय केले जात आहेत. त्यामुळे स्वतःची आणि कुटुंबाच्या आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी घरातील एसीचा वापर कमी करण्याचा उपाय करण्यास प्रत्येकाला काहीच हरकत नाही. कारण जर या काळात घरातील एसीचा वापर कमी केला तर कोरोनाला नष्ट करण्यात हातभारच लागणार आहे. त्यामुळे जीव गमवायचा नसेल तर उकाडा सहन करण्याशिवाय पर्याय नाही. शिवाय उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी एसीचा वापर करण्याऐवजी घराची दारे आणि खिडक्या उघड्या ठेवणं फायदेशीर ठरेल. म्हणूनच एसीचा वापर कमी करू या आणि कोरोनाला या जगातूनच नष्ट करू या असा संकल्प सर्वांनी करणं गरजेचं आहे. 

Shutterstock

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा – 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

हात धुण्याची योग्य आणि अचूक पद्धत तुम्हाला माहीत आहे का

बॉलीवूडनेही केलं लॉकडाऊनचं समर्थन

सेलिब्रिटीजवर आली आहे भांडी घासायची वेळ, लॉकडाऊनचा परिणाम

Read More From आरोग्य