कटप्पाने बाहुबली को क्यू मारा ? या प्रश्नावरुन पडदा उठला असला तरी आजही बाहुबली या चित्रपटाचा चाहता वर्ग आहे. अमरेंद्र बाहुबलीनंतर सत्तेवर आलेला उत्तराधिकारी महेंद्र बाहुबली काय करेल ? पुढे काय होईल ? याची उत्सुकता चित्रपटाचा दुसरा आणि शेवटचा भाग रिलीज होऊन दोन वर्षे तरी झाले असतील पण आजही या चित्रपटाची क्रेझ आहे आणि या चित्रपटाचा तिसरा भाग येण्याची उत्सुकता लोकांमध्ये आहे. ही क्रेझ हॉलीवूडमध्येही पाहायला मिळत आहे. अॅनिमेशनच्या बाबतीत भारतीय चित्रपट काकणभर मागे असतानाही बाहुबली सारखा चित्रपट सगळ्याच दृष्टिने सरस होता. त्यामुळेत हॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांना बाहुबलीने वेड लावले आहे. एस.एस. राजमौलीने बाहुबली ३ काढला तर त्यामध्ये Avengersमधील एका अभिनेत्याला काम करण्याची इच्छा आहे.त्याने त्याची ही इच्छा एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलून दाखवली आहे.
आलिया-रणबीरच्या लग्नाची घाई ऋषी कपूर यांना
कोण आहे हा Avenger अभिनेता ?
हा अभिनेता आणखी कोणी नसून सॅम्युअल जॅक्सन आहे. त्याला ज्यावेळी भारतात यायला आवडेल का असे विचारण्यात आले त्यावेळी तो भारतभेटीसाठी फारसा इच्छुक नसला असे जाणवले. पण त्याने लगेचच एक वेगळा ट्विस्ट देत आपली बॉलीवूडमधील इच्छा बोलून दाखवली. त्याने लगेचच मला काम दिले तर मी नक्कीच भारतात येईन. त्यातल्या त्यात त्याला कोणत्या सिनेमात काम करायला आवडेल? असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने बाहुबलीचे नाव घेतले. जर बाहुबली ३ येणार असेल तर एस.एस. राजमौलीने मला त्या चित्रपटात घ्यावे असे त्याने सांगितले.
कोणत्या रुपात चांगला दिसेल सॅम्युअल ?
जर तुम्ही Marvel Avengers पाहिला असेल निक फरी हे पात्र यात सॅम्युअल साकारत आहे. त्याला पाहिल्यानंतर तो या चित्रपटात कोणते पात्र साकारु शकतो ? असा प्रश्न नक्कीच येतो. मार्वेलने तयार केलेल्या कॉमिक बुकमध्ये त्याचे पात्र महत्वाचे आहे. त्यामुळे त्याला बाहुबलीमध्ये महत्वाचे पात्र मिळायला हवे. आता हे पात्र बाहुबली सध्या तरी असू शकत नाही. त्यामुळे आता राजमौली सॅम्युअलसाठी कोणते तरी नवे पात्र तयार करावे लागणार हे नक्की!
अक्षय म्हणूनच खऱ्या आयुष्यातला खिलाडी
येईल का बाहुबली ३?
पण हे सगळे करत असताना बाहुबली ३ येणार का? हा प्रश्न आहे . कारण राजामौलीकडून सध्या या चित्रपटाचा सिक्वल बनवण्याचा कोणताही प्लॅन आहे असे वाटत नाही. कारण ही कलाकृती त्यांना रटाळ करायची नाही. या चित्रपटाने त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. या शिवाय आता बाहुबलीच्या सिक्रेटवरुन पडदा उठल्यानंतर आता राजमौली नवे काय दाखवतील हा प्रश्नही आहेच.
प्रभास शुटींगमध्ये व्यग्र
सध्या प्रभास हा ‘साहो’ च्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात प्रभाससोबत श्रद्धा कपूर दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रभासच्या वाढदिवसादिवशी शेअर करण्यात आला होता. त्यामुळे प्रभास सध्या तरी बाहुबली ३ करेल असे वाटत नाही. या शिवाय प्रभासच्या हातात आणखी काही प्रोजेक्टस असल्याचे देखील कळत आहे. त्यामुळे बाहुबली फॅन्सना साहोच्या रिलीजची वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर कदाचित बाहुबली ३ येणार की नाही यासंदर्भात काही कळू शकेल.
(सौजन्य- Instagram)
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade