DIY सौंदर्य

घरच्या घरी बनवा अँटिएजिंग फेसपॅक आणि मिळवा सुंदर त्वचा (Anti Aging Face Packs In Marathi)

Dipali Naphade  |  Dec 6, 2020
Anti Aging Face packs In Marathi

एका वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स दिसू लागतात. यापासून सुटका व्हावी म्हणून बरेच जण चेहऱ्यावर वेगवेगळ्या अँटिएजिंंग उत्पादनांचा प्रयोगही करतात. बाजारामध्ये मिळणारे अनेक अँटिएजिंग हे केमिकलयुक्त असतात. ज्यामुळे त्वचेला हानी पोहचू शकते. पण तुम्ही घरच्या अँटिएजिंग फेसपॅक तयार करू शकता. हे फेसपॅक नैसर्गिक साहित्यांनी बनल्यामुळे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. पण असे फेसपॅक नक्की कसे बनवायचे आणि त्याचा कसा वापर करायचा हे प्रत्येकाला माहीत असतेच असं नाही. या लेखातून आम्ही ही सर्व माहिती तुम्हाला देणार आहोत. तसंच अँटिएजिंग फेसपॅकबाबत काही महत्त्वाच्या टिप्सही तुम्हाला या लेखातून जाणून घेता येतील. 

अँटिएजिंगसाठी फेसपॅक (Anti Aging Face Packs In Marathi)

अँटिएजिंग समस्या बऱ्याच जणांना असते. हल्लीची लाईफस्टाईल बघता वयाच्या आधीच त्वचा खराब होते. प्रदूषण, माती या सगळ्यामुळे हा त्रास बऱ्याच जणांना उद्भवतो. पण तुम्ही यावर घरच्या घरी उपाय नक्कीच करू शकता. घरीच तुम्ही तयार करा अँटिएजिंंगसाठी फेसपॅक आणि करा वापर. याच्या खास टिप्स तुमच्यासाठी. 

नारळाच्या तेलाचा फेसपॅक (Coconut Oil Face Pask)

Shutterstock

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

युव्ही रेडिएशनमुळे त्वचेमध्ये रिअॅक्टिव्ह ऑक्सिजन स्पेशीज वाढतात. हे एक प्रकारचे फ्री रॅडिकल्स असतात, ज्यामुळे नसांचे नुकसान होते. तसंच यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचीही शक्यता असते आणि त्वचेवर इन्फ्लेमेशनसह वाढत्या वयाची लक्षणंही दिसून येतात. या फ्री रॅडिकल्सच्या सुरक्षेसाठी नारळाच्या तेलाचा उपयोग होतो. नारळाचे तेल त्वचेला रेडिएशनच्या प्रभावापासून वाचवते तसंच यामध्ये असणारे अँटिइन्फ्लेमेटरी गुण हे त्वचेला इन्फ्लेमेशन पासून रोखतात. याशिवाय डाळिंबाचे तेल हे युव्ही किरणांचा प्रभाव कमी करून फोटोएजिंग कमी करण्यासाठी मदत करते. 

बेंटोनाईट क्ले फेसमास्क (Bentonite Clay Face Mask)

Freepik.com

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

त्वचेवर सूर्याच्या किरणांमुळे खूपच फरक पडत असतो. त्यामुळे वयाच्या आधीच इलास्टिसिटी कमी होणे, सुरकुत्या येणे अथवा फोटोएजिंग अशा समस्या उद्धवतात. अशावेळी अँटिएजिंग फेसपॅक बनविण्यासाठी बेंटोनाईट क्ले चा उपयोग आपण करू शकतो. बेंटोनाईट क्ले चा उपयोग करून सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रिनमध्येही केला जातो. इराणियन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये केलेल्या शोधात आढळले की, त्वचेवर युव्ही लाईटचा प्रभाव कमी करण्यासाठी बेंटोनाईट क्ले सर्वात जास्त प्रभावशाली आहे. तसंच सनस्क्रिनमध्येही याचा समावेश असल्याने त्वचा अधिक चांगली राहाते. 

अवाकाडो फेसमास्क (Avocado Face Mask)

Freepik.com

साहित्य 

वापरण्याची  पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

अवाकाडोमध्ये एक लिनोलिक नावाचे अॅसिड आढळते. लिनोलिक अॅसिड हे त्वचेमध्ये मऊपणा आणि त्वचा सैलसर होणाऱ्या एजिंगच्या लक्षणांना कमी करण्याचे काम करण्यास मदत करते. तर अवाकाडो तेलाचा प्रभावही त्वचेवरील एजिंगचा प्रभाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. वास्तविक एनसीबीआयच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या एका शोधानुसार अवाकाडोचे तेल हे कोलेजन मेटाबॉलिजम वाढविण्यासाठी मदत करते. यामुळे त्वचेमध्ये कसदारपणा राहतो. तसंच अन्य एका शोधानुसार, अवाकाडो आणि अवाकाडोचे तेल या दोन्हीचे त्वचेसाठी चांगले फायदे मिळतात. अँटिएजिंग फेसपॅक स्वरूपात याचा चांगला फायदा मिळतो. 

केळ्याचा फेसपॅक (Banana Face Mask)

Shutterstock

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

केळ्यामध्ये विटामिन सी आणि विटामिन ए चे प्रमाण असते. त्वचेवर अँटिएजिंगचा प्रभाव कमी करण्यासाठी या दोन्ही विटामिन्सची गरज भासते. विटामिन सी त्वचेमध्ये कोलेजन वाढविण्यास मदत करते आणि सुरकुत्या कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. तर विटामिन ए हे अँटिऑक्सिडंट स्वरूपात काम करते ज्यामुळे त्वचेवर युव्ही किरणांचा प्रभाव जास्त काळ टिकू शकत नाही. वयाच्या आधी चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, इलास्टिसिटी अथवा पिगमेंटेशनसारख्या समस्येपासून सुटका हवी असेल तर तुम्ही हा अँटिएजिंग फेसपॅक नक्कीच वापरू शकता.

तांदळाच्या पाण्याचा फेसपॅक (Rice Water Face Pack)

Shutterstock

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

ब्राऊन राईस खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण याचे पाणी त्वचेसाठी अँटिएजिंग एजंटचे काम करते. वास्तविक ब्राऊन राईसमध्ये नियासिन नावाचे एक विटामिन असते जे आपल्या अँटिएजिंग गुणांसाठी ओळखले जाते. नियासिन सुरकुत्या, पिगमेंटेशन आणि सैलसर त्वचेसह पिंपल्स आणि युव्ही किरणांचा होणारा त्रास या सर्वांसाठी फायदेशीर ठरते. 

कॉफी फेसमास्क (Coffee Face Mask)

Shutterstock

साहित्य

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

जसे आम्ही सांगितले की, युव्ही रेडिएशन त्वचेवर वाढणाऱ्या वयाचे लक्षण दाखवणारे एक मोठे कारण आहे. अशावेळी कॉफीपासून अँटिएजिंग फेसपॅक तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फोर्मेशन) च्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या एका शोधानुसार या कॅफेनमध्ये  एक प्रभावी अँटिऑक्सिडंट असून त्वचेवर युव्ही रेडिएशनचा परिणाम होण्यापासून वाचवते आणि फोटोएजिंग कमी करण्यास मदत करते. 

यासह कोकोचा उपयोग केल्याने या फेसपॅकचे दुप्पट फायदे होतात. कोकोमध्ये असणारे पॉलिफिनॉलदेखील त्वचेवर युव्ही किरणांचा प्रभाव कमी करून फोटोएजिंगची प्रक्रिया कमी करण्यास फायदेशीर ठरते. कोको त्वचेवर प्रभावी अँटिऑक्सिडं, अँटिइन्फ्लेमेटरी आणि फोटोप्रोटेक्टिव्ह एजंटप्रमाणे काम करते. ज्याच्या मदतीने वाढत्या वयाच्या लक्षणांवर मात करण्यास मदत मिळते.

हळदीचा फेसपॅक (Turmeric Face Pack)

Shutterstock

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

हळद त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे त्वचेला रिअॅक्टिव्ह ऑक्सिजन स्पिशीज (फ्रि रॅडिकल्स) च्या कारणामुळे होणाऱ्या परिणामांपासून वाचवतात. तसंच हे एक अत्यंत प्रभावशाली अँटिऑक्सिडंट असल्याने वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यास फायदेशीर ठरते. 

काकडीचा फेसपॅक (Cucumber Face Pack)

Shutterstock

साहित्य

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

युव्ही किरणांचा त्रास होऊ नये  यासाठी काकडीचा उपयोग होतो. यामध्ये प्रभावी अँटिऑक्सिडंट्स असतात, जे फ्री रॅडिकल्सचा परिणाम कमी करतात. त्याशिवाय काकडी त्वचेतून विषारी पदार्थ काढून टाकून त्वचा स्वच्छ करते आणि शरीरातील उष्णता कमी करून तुमची त्वचा अधिक उजळ करण्याचे काम करते. तसंच त्वचेवर होणारी जळजळ आणि सूजही कमी करते. त्यामुळे त्वचा अधिक तजेलदार आणि तरूण दिसते. 

बटाटा – गाजराचा फेसपॅक (Potato – Carrot Face Pack)

Shutterstock

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

बटाटा आणि गाजरापासून तयार केलेला अँटिएजिंग घरगुती फेसपॅक हा वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. वास्तविक बटाटा आणि गाजरामध्ये विटामिन सी असते. तसंच गाजरामध्ये विटामिन ए देखील असते. विटामिन ए आणि विटामिन सी मध्ये प्रभावी अँटिऑक्सिडंट्स असतात. हे दोन्ही विटामिन्स त्वचेला युव्ही रेडिएशनच्या प्रभाव आणि फोटोएजिंगपासून वाचविण्याचे काम करतात. विटामिन ए त्वचेमधील कोलेजन वाढवून त्वचेचे इलास्टिसिटी वाढवते. 

कोरडफ फेसपॅक (Aloe Vera Face Pack)

Shutterstock

साहित्य 

वापरण्याची पद्धत 

कसे ठरते फायदेशीर 

चमकणार्‍या त्वचेसाठी कोरफड करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये मेटालोथायोनिन नावाचे प्रोटीन आढळते, जे युव्ही रेडिएशनपासून संरक्षण करते. त्याशिवाय कोरफडमध्ये कोलेजन वाढविण्याचे गुण असतात. ज्यामुळे त्वचेची इलास्टिसिटी वाढते आणि सुरकुत्या कमी होतात. तसंच कोरफडमध्ये आढळणारे अमिनो अॅसिड हे कडक सेल्स मऊ करण्यासाठी उपयुक्त ठरते. 

कोणती काळजी घ्यावी (Care Tips)

आम्ही सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला या अँटिएजिंग फेसपॅकचा फायदा होईल. नक्की कोणती काळजी घ्यायची ते जाणून घेऊया 

प्रश्नोत्तरे (FAQs)

1. घरगुती अँटिएजिंग फेसपॅकने चेहऱ्याला त्रास होत नाही ना?

तुम्हाला आधीपासूनच चेहऱ्याला त्रास असेल अथवा चेहऱ्याची त्वचा अत्यंत संवेदनशील असेल तर तुम्ही घरगुती फेसपॅक वापरायच्या आधी पॅच टेस्ट नक्की करून पाहा. सहसा घरगुती फेसपॅकने चेहऱ्याला कोणताही त्रास होत नाही.

2. अँटिएजिंग फेसपॅकसाठी ग्लिसरीनचा उपयोग होतो का?

हो अँटिएजिंगचा फेसपॅक घरी बनवताना तुम्ही ग्लिसरीनचा वापर करू शकता. ग्लिसरीनमध्ये दोन ई – कॅप्सूल मिक्स करून ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण अर्ध्या तासाने चेहरा स्वच्छ करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा प्रयोग करू शकता.

3. चेहरा तुकतुकीत आणि तरूण राहण्यासाठी पपईचा वापर केला जातो, मग याच फेसपॅक अँटिएजिंग म्हणून करता येईल का?

हो. पपई ही चेहऱ्याच्या त्वचेसाठी उत्तम ठरते. अँटिएजिंग फेसपॅकसाठीही त्याचा उपयोग होतो. उकडलेली पपई मॅश करून त्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि हे चेहऱ्याला लावा. साधारण अर्ध्या तासाने चेहरा स्वच्छ करा. तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य