लाईफस्टाईल

अनुप्रिया लकडा बनली पहिली आदिवासी महिला पायलट, जिद्दीने केलं स्वप्नं पूर्ण

Dipali Naphade  |  Sep 10, 2019
अनुप्रिया लकडा बनली पहिली आदिवासी महिला पायलट, जिद्दीने केलं स्वप्नं पूर्ण

परिस्थिती कशीही असो हिंमत आणि इच्छा असेल तर काहीच कठीण नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे पाहायला मिळाली आहे. मुख्यत्वे महिलांच्या बाबतीतही. आपल्याकडे काही करून दाखवण्याची हिंमत असेल तर नक्कीच कोणत्याही परिस्थितीवर मात करत आपण आपल्याला हवी ती गोष्ट मिळवू शकतो. यामध्ये कितीही अडचणी आल्या तरीही त्या पार करत आपलं लक्ष्य आपण गाठू शकतो. पुन्हा एकदा हेच सिद्ध करून दाखवलं आहे ते भुवनेश्वरमधील नक्षलवादी प्रभावित क्षेत्रात राहणाऱ्या मलकानगरीमधील अनुप्रिया लकडाने. 23 वर्षीय अनुप्रियाची गोष्ट ही नक्कीच प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायक आहे. आकाशात उडण्याचं स्वप्नं पाहणाऱ्या अनुप्रियाने आपलं हे स्वप्नं पूर्ण करून दाखवलं आहे. 

Forbes List: दीपिका पदूकोण भारतातील सर्वात ‘श्रीमंत’ महिला सेलिब्रेटी

इंजिनिअरिंग सोडून निवडलंं पायलट बनण्याचं स्वप्न

Odhisha TV

अनुप्रियाचं पायलट बनण्याचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. इतकंच नाही तर आदिवासी समाजातील पहिली महिला पायलट म्हणून तिने नाव कमावलं आहे. आपला इंजिनिअरिंगचा अभ्यास सोडून अनुप्रियाने आपल्या पायलट होण्याच्या स्वप्नाला महत्त्व दिलं आणि ते स्वप्नं पूर्णही करून दाखवलं आहे. 2012 मध्ये भुवनेश्वरमध्ये असणाऱ्या एव्हिएशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूमध्ये अनुप्रियाने प्रवेश घेतला आणि आपल्या मेहनतीने तिने हे स्वप्नं पूर्ण केलं आहे. लवकरच ती एका विमान कंपनीमध्ये को-पायलट म्हणून रूजू होत आहे. इतकंच नाही तर तिला हे यश मिळाल्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही तिचं कौतुक केलं असून तिचं अभिनंदन केलं आहे आणि अनुप्रिया लकडा हे दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे. 

अनुप्रिया अतिशय दुर्गम भागातून

अनुप्रियाचे वडील मारिनियास लकडा हे ओडिशा पोलीसमध्ये हवालदार म्हणून कार्यरत असून तिची आई जामज यास्मिन लकडा ही घराचा सांभाळ करते. अनुप्रियाने 10 पर्यंतचं शिक्षण हे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये केलं असून 12 चं शिक्षण हे सेमीलिदुगामधील एका शाळेतून घेतलं आहे. अनुप्रियाच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, तिला पायलट व्हायचं होतं म्हणून तिने इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडून पायलटची प्रवेश परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्ण झाल्यावर तिने भुवनेश्वरमधील एव्हिएशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवला. पायलट होण्याचं तिचं स्वप्नं साकार झाल्याने ते दोघेही आनंदी असल्याचं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. लवकरच अनुप्रिया इंडिगो एअरलाईन्ससाठीही विमान उड्डाण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंं. तसंच तिच्या शिक्षणाचा खर्च करणं कठीण होतं. पण तिने पायलट बनायचंच आहे हे निश्चित केल्यानंतर त्यांना जमेल त्या सर्वपरीने त्यांनी तिचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी हातभार लावल्याचंही सांगितलं. त्यांच्या या मेहनतीला तिने आपल्या यशाने आनंद मिळवून दिला आहे. त्यामुळे सध्या तिच्या घरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 

मेरा देश बदल रहा है…. महिला डब्यावर दिसणार आधुनिक महिला

मलकानगरीसाठी अभिमानास्पद

मलकानगरीसारख्या अगदी दुर्गम भागामधून आलेल्या व्यक्तीसाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे असं अनुप्रियाच्या वडिलांनी अभिमानाने सांगितलं आहे. तसंच तिच्या आईने आपल्याला अत्यंत आनंद झाला असून मलकानगरीसाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले आहेत. तिचं हे यश नक्कीच इतर आदिवासी मुलींनाही प्रेरणा मिळवून देईल असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच त्या मुलींमध्येही काहीतरी करून दाखवण्याची इच्छा नक्कीच निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

#StrengthOfAWoman – दाढीमिशा असूनही मुलींसाठी ठरत आहे ‘ही’ मुलगी प्रेरणा

 

Read More From लाईफस्टाईल