मनोरंजन

अर्जुन कपूरचं ट्रोलरला सणसणीत उत्तर, मलायकाबरोबरच्या नात्यावर केलं भाष्य

Dipali Naphade  |  May 29, 2019
अर्जुन कपूरचं ट्रोलरला सणसणीत उत्तर, मलायकाबरोबरच्या नात्यावर केलं भाष्य

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांना बऱ्याच कालावधीपासून डेट करत आहेत आणि दोघांनीही आपलं नातं स्वीकारलं असून ठिकठिकाणी दोघंही एकत्र दिसतात. इतकंच नाही तर दोघंही एकमेकांबरोबर व्हेकेशनवर देखील जातात. नुकतंच अर्जुनला मलायकाबरोबर असलेल्या नात्यावर अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात आले. अर्जुनने यावर बऱ्याच प्रश्नांना उत्तरं दिली तर काही प्रश्नांना उत्तर देणं टाळलं. पण या सगळ्यामधून एका युजरला उत्तर देणं अर्जुनला गरजेचं वाटलं. अर्जुनला मलायकाबरोबरच्या नात्यात नेहमीच ट्रोल करण्यात आलं आहे. पण त्याकडे अर्जुनने कधी लक्ष दिलं नाही. पण आता अर्जुनने एका युजरला सणसणीत उत्तर देत त्याची बाजू स्पष्ट केली आहे.

श्रीदेवीचा द्वेष आणि मलायकावर प्रेम कसं? – युजरचा प्रश्न

I don’t hate anyone Kusum. We kept a dignified distance, If I did I wouldn’t have been there for my dad Janhvi & Khushi at a sensitive time… it’s easy to type & judge, think a little. Your @Varun_dvn s fan so I feel I should tell u don’t spread negativity with his face on ur DP https://twitter.com/kusumbhutani/status/1133420720887746565 …

कुसुम नावाच्या एका युजरने अर्जुन कपूरला टॅग करत प्रश्न विचारला की, ‘तुझ्या वडिलाची दुसरी पत्नी श्रीदेवीचा तू नेहमीच द्वेष केलास. कारण त्यांनी श्रीदेवीसाठी तुझ्या आईला सोडलं. पण तू तर अशा स्त्री ला डेट करत आहेस, जी तुझ्यापेक्षा 11 वर्षांनी मोठी असून तिला एक मुलगाही आहे. अर्जुन तू अशी दुटप्पी भूमिका का घेतली?’ यावर अर्जुनने या युजरला उत्तर देणं गरजेचं समजलं. अर्जुन म्हणाला, ‘कुसूम मी कोणाचाही द्वेष करत नाही. आम्ही दोघांनीही एकमेकांचा सन्मान ठेवत एकमेकांपासून अंतर ठेवलं होतं. जर मी द्वेष करत असतो तर त्या दिवसांमध्ये मी माझे वडील, जान्हवी आणि खुशीसोबत नक्कीच नसतो. एखादी गोष्ट टाईप करून लिहिणं आणि दुसऱ्यांबद्दल मत बनवणं हे खूपच सोपं आहे. पण लिहिण्याआधी थोडा विचार करत जा. तू वरूणची चाहती आहेस हे दिसत आहे. पण त्याचा फोटो डीपीवर लाऊन कृपया कोणत्याही प्रकारची नकारात्मकता पसरवू नकोस’.

युजरने मागितली माफी

अर्जुनने प्रतिक्रिया दिल्यानंतर कुसूमने लगेच माफी मागून आपली बाजू स्पष्ट केली. तिने ट्विट करत म्हटलं, ‘मी कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा. तसंच मी अर्जुनच्या चाहत्यांचीही माफी मागते. हे फकत् माझं मत आहे. यापैकी कोणतीही बाब अर्जुन सर आणि मलायका मॅमच्या विरोधात नव्हती. मला माफ करा अर्जुन कपूर सर’. त्यावर अर्जुननेदेखील मोठ्या मनाने माफ करत तिला म्हटलं, ‘कुसूम काहीच हरकत नाही. भरभरून प्रेम कर. तुझा स्ट्रीट डान्सर तुला पाहात आहे.’

वरूणनेही दिली प्रतिक्रिया

या सगळ्यात ट्विट करणारी युजर ही वरूणची चाहती असल्यामुळे वरूणनेदेखील ट्विट करत यावर तिला प्रतिक्रिया दिली. वरूण म्हणाला, ‘कुसूम तू माफी मागितली आहेस हे वाचून मला खूपच आनंद झाला आहे. सर्वांना आपापलं जीवन आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे. अर्जुन खूपच मोठ्या मनाचा आहे. माझ्या चाहत्यांकडून कोणाचंही मन दुखावलं जाईल हे मला कधीच आवडणार नाही.’ अर्जुनचा नुकताच ‘इंडियाज मोस्ट वाँटेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद आहे. तर मलायकाबरोबर अर्जुन कधी लग्न करणार याच्या चर्चा रोज रंगतात. मात्र यावर अर्जुनने आपण इतक्यात लग्न करणार नसल्याचं सांगितलं असून मलायकाबरोबर आपण अतिशय कम्फर्टेबर आहोत असं म्हटलं आहे.

फोटो सौजन्य – Instagram, Twitter

हेदेखील वाचा – 

अर्जुन कपूरशी ख्रिश्नन लग्नाबद्दल मलायका अरोराचा खुलासा

अर्जुन कपूर मलायकाबरोबर करणार नाही लग्न कारण…

Wedding Bells: ‘लग्नघटिका आली समीप’, मलायका – अर्जुन चढणार बोहल्यावर

Read More From मनोरंजन