Sex Advice

लग्नाआधी तुमच्या डॉक्टरला नक्की विचारा हे ‘6’ प्रश्न

Aaditi Datar  |  May 29, 2019
लग्नाआधी तुमच्या डॉक्टरला नक्की विचारा हे  ‘6’ प्रश्न

Congratulations!! तुमचं लवकरच लग्न होणारआहे ना. तुमचं Excited होणं आणि काही गोष्टींबाबत सीरियसली विचार करणं साहाजिक आहे. लग्न ठरल्यावर प्रत्येक मुलीच्या मनात जेवढा आनंद असतो तेवढेच प्रश्नही असतात. यातील काही गोष्टी तुमच्या Sex Health शी निगडीतही असू शकतात. ज्या तुमच्या Healthy Married Life साठी खूप महत्त्वाच्या आहेत. मग जसं लग्नाच्या तयारीसाठी शॉपिंग आणि इतर विधी आवश्यक आहेत तसंच महत्त्वाचं आहे ते तुमच्या गायनॅकोलॉजिस्ट किंवा लेडी डॉक्टरला भेट देणं आणि या भेटीत पुढील 6 प्रश्न नक्की विचारा.

1. Contraception Queries

लग्नानंतर तुम्हाला ही गोष्ट नक्कीच खरेदी करावी लागणार आहे. तुमच्या Honeymoon Checklist मधला हा सर्वात महत्त्वाचा item आहे आणि याबाबत तुम्ही नक्की serious असालच. जर हनीमूनवरून परत येताना तुम्हाला 2+1 व्हायचं नसेल तर कॉन्ट्रासेप्शन हे फारच महत्त्वाचं आहे. मग तुमच्या डॉक्टरशी याबाबत मोकळेपणाने चर्चा करा.

2. या Tests आहेत महत्त्वाच्या

आजच्या लाईफस्टाईलमध्ये लग्नाआधी काही टेस्ट करून घेणं फार महत्त्वाचं आहे. ज्यापैकी लग्नाआधी होणाऱ्या नवरा-बायकोच्या Blood Related सर्व टेस्ट करून घेतल्या पाहिजेत. म्हणजे भविष्यात कोणत्याही nasty infection च्या शक्यात संपुष्टात येतील. आम्ही तुम्हाला सल्ला देत आहोत याचा अर्थ हा नाही की आम्हाला तुमच्या would Be बाबत काही सांगायचं आहे. तुमचा होणारा नवरा हा चांगलाच आहे. पण तरीही Realistic विचार करून Polycystic Ovarian Disease (PCOD) Test तुम्ही नक्की करा. यासाठी तुम्हाला ब्लड टेस्ट आणि अल्ट्रासाउंड्ससारख्या सोप्या process मधून जावं लागतं.

युरिन इन्फेक्शन घरगुती उपाय (Home Remedies For Urine Infection)

 3. हेल्दी Breast

Married Life सोबतच आपल्या पर्सनल health शी निगडीत काही चेकअप आवश्यक आहेत. जेव्हा तुम्ही gynae कडे जाल तेव्हा या टेस्ट करून घ्यायला विसरू नका. तसंही सगळ्याच महिलांनी वर्षातून एकदा या टेस्ट करून घेणमं आवश्यक आहे.

4. Periods चा प्रोब्लेम

खरंच Happy Periods आपल्याला physical सोबतच mental peace ही देतात. पण जर तुमची due date लग्नाच्या वेळी किंवा तुमच्या Honeymoon च्या दरम्यान येत असेल तर तुमच्या गायनॅकोलॉजिस्टशी याबाबत बोला. ज्यामध्ये तुमची डॉक्टर तुम्हाला पीरियड cycle प्लॅन करण्यात तुमची मदत करू शकेल. तसंच जर तुमचे पीरियड्स हे Painful, Irregular असतील तर तुमच्या गायनॅकला नक्की सांगा. कारण या सगळ्या प्रोब्लेम्स सॉल्यूशन तिच देऊ शकेल.

5. कधी, कुठे आणि केव्हा?

अनेक मुलींच्या मनात Sex बाबत अनेक संभ्रम असतात. लग्नानंतरचा तो पहिला अनुभव कसा असेल. आपल्याला जमेल का? आणि यासारखे अनेक प्रश्न प्रत्येकीच्या मनात असतात. पण सेक्सदरम्यान safety ची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यासंबंधी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्याची उत्तर देण्यासाठी डॉक्टरपेक्षा चांगल आणि विश्वासू कोणीच नाही. अगदी Internet सुद्धा नाही. मग संकोच सोडा आणि बिनधास्तपणे शंका निरसन करून घ्या. कॉन्डम पूल/शॉवरमध्ये सेक्स करतानाही तितकंच परिणामकारक आहे का… Pill घेतल्यावरही सेक्सदरम्यानही कॉन्डमची गरज असते का? असे प्रश्न तुमच्या मनात असू शकतात. आम्ही समजू शकतो की ही लिस्ट थोडी लांब असू शकते. पण तुमच्या मनातील सगळ्या शंकाचं निरसन करून घेणं आवश्यक आहे.

6. हे Normal आहे का?

गायनॅकशी बोलण्यासाठी घेतलेल्या Appointment चा पूर्ण वापर करा. कोणत्याही गोष्टीबाबत असा विचार करू नका कि हे मी विचारू की नको. ज्या गोष्टीबाबत तुम्हाला वाटेल की, हे नॉर्मल नाहीये तीच गोष्ट तुमचा प्रश्न असू शकतो. त्यामुळे मनात कोणतीही शंका ठेऊ नका.

लग्नानंतरच्या आनंदी जीवनासाठी अनुरूप जोडीदार आणि आरोग्य या दोन्हींचा सुंदर मेळ साधणं आवश्यक आहे.

हेही वाचा –

पहिल्यांदा *Condom वापरुन सेक्स केले तेव्हा…. वाटले

आपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन (Sex Position)

तुमच्या नात्यात आणा स्पाईसी सेक्स रिझॉल्युशन्स

सेक्स करताना त्याने ‘या’ 10 जागी तुम्हाला स्पर्श केला तर…

Read More From Sex Advice