वैभव तत्त्ववादीची मुख्य भूमिका असलेला ग्रे(Gray) नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. रेड बल्ब मूव्हीज आणि का का किंडल एंटरटेनमेंट निर्मित, अभिषेक जावकर दिग्दर्शित ‘ग्रे’ 1 ऑक्टोबर रोजी झी5 प्रीमियरवर प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे खूप मोठ्या गॅपनंतर प्रेक्षकांना रहस्यमयी आणि थरारक कथा पाहायला मिळाली. वेगळ्या धाटणीचा विषय आणि कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे या चाहत्यांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. वैभवचा ग्रे सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला पडलेला दिसत आहे.
‘इंडियन आयडल- मराठी’ या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून दिसणार ‘अजय अतुल’
काय आहे ग्रेचं कथानक
‘ग्रे’ चित्रपटात अल्पावधीतच आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता वैभव तत्ववादी असून तो ‘सिद्धांत’ या एका धर्माधिकारी नामक प्रामाणिक पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा अमेरिकेतून परत आलेल्या मुलाची भूमिका साकारत आहे. पण ही कथा साधी आणि सरळ नक्कीच नाही. ग्रेही सिद्धांतच्या कुटुंबाच्या दुर्दैवी बदल्याची कथा आहे. प्रेम, कुटुंब आणि बदला असं रंजक वळण या चित्रपटातून पाहायला मिळत आहे. वैभवने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असल्या तरीही या चित्रपटातील ‘सिद्धांत’ ने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. या चित्रपटात वैभव तत्त्ववादी समवेत पल्लवी पाटील, मयुरी देशमुख, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, पुष्कराज चिरपूटकर असे एकापेक्षा एक अव्वल कलाकार आपणांस ह्या चित्रपटात पाहायला मिळतात. अभिषेक जावकर आणि स्पृहा जोशी यांनी या चित्रपटाचे लेखन केलेले असून विजय भाटे आणि केवल वाळुंज यांच्या संगीताची जोड या चित्रपटास लाभली आहे.
Bigg Boss 15 : जंगलात टिकू शकतील का हे नवे स्पर्धक, असा रंगला ग्रँड प्रिमिअर
वैभवचे आगामी चित्रपट
वैभव तत्त्ववादीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली पाळेमुळे चांगलीच रूजवली आहेत. त्याचा ‘भेटली तू पुन्हा’ हा चित्रपट सीक्वल स्वरूपात परत येत आहे. या चित्रपटाला चार वर्ष पूर्ण झाली असून निर्मात्यांनी आता या चित्रपटाच्या सीक्वलची अधिकृत घोषणा नुकतीच केली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत ही हिट जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. यासोबतच तो लवकरच सोनी लिव्हच्या आगामी ‘प्रोजेक्ट 9191’ मध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. यात त्याच्यासोबत सत्यजीत शर्मा, तृष्णा मुखर्जी, अभिषेक खान, मानिनी डे, जगत रावत, शरद कुमार यांच्या भूमिका असणार आहेत. याआधी वैभवने हंटर, बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका अशा हिंदी चित्रपट आणि त्रिभंग सारख्या वेबपटामध्ये हिंदीतून काम केलं आहे. त्यामुळे त्याचे हे आगामी चित्रपट पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सूक आहेत.
बॉलीवूड आणि ड्रग्ज कनेक्शन, आजवर या सेलिब्रेटींची नावे आली आहेत पुढे
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade