खाणंपिण आणि नाइटलाईफ

शास्त्र सांगतं की, रात्री खाऊ नका हे पदार्थ

Aaditi Datar  |  Oct 14, 2019
शास्त्र सांगतं की, रात्री खाऊ नका हे पदार्थ

अशी जुनी म्हण आहे की, खा मनाप्रमाणे आणि कपडे घाला जगाप्रमाणे. काळानुसार आपल्या दैनंदिन जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत. हीच गोष्ट जेवणाच्याबाबतीतही लागू होते. आयुर्वेद आणि शास्त्रग्रंथानुसार सांगितलेल्या काही गोष्टी मात्र आजही तंतोतंत लागू होतात. कारण ते फक्त आरोग्यदायी जीवनाचा उपदेश देतात असं नाहीतर सुखी जीवनाचा मार्ग सांगतात. 

प्राचीन ग्रंथांमध्ये सांगण्यात आलं आहे की, कोणत्या पदार्थांना सामील करू नये. खासकरून पचनाला जड असणाऱ्या पदार्थांना रात्रीच्या जेवणात वर्ज्य करण्यात आलं आहे. कारण यामुळे दीर्घकाळासाठी तुम्हाला त्रास होऊ शकतो. जाणून घेऊया कोणते आहेत हे पदार्थ.

जास्त तिखट आणि मसालेदार –

असे पदार्थ खाताना चवीला चांगले लागतात पण हे पचनतंत्राला नुकसानकारक असतात. याामुळे रात्री पित्ताची मात्रा वाढू शकते आणि परिणामी अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकतं.

मिठाई आणि चॉकलेट –

खरंतर मिठाई आणि चॉकलेट खाण्याची काही ठराविक अशी वेळ नाही. कारण जेव्हा चॉकलेट आणि मिठाई समोर येते तेव्हा एखादा तुकडा तरी हमखास खाल्ला जातो. आयुर्वेदानुसार, रात्री मिठाई किंवा चॉकलेट खाणं हे दातांच्या रोगांना निमंत्रण ठरू शकतं.  अगदी डार्क चॉकलेटचं सेवन केल्यासही ते नुकसानकारकच ठरतं. कारण यामध्ये कॅफीन तत्त्व आढळतं जे झोपेसाठी अपायकारक आहे. त्यामुळे रात्री याचं सेवन नक्कीच टाळा. अगदीच जर तुम्ही चॉकलेट किंवा मिठाई खाल्लीच तर दात ब्रश करून झोपायला विसरू नका. 

पिझ्झा आणि पास्ता –

रात्री झोपण्याआधी पिझ्झा खाणं हे अनेकांच्या लाईफस्टाईलचा आजकाल भाग झालं आहे. पण हे पचनासाठी अत्यंत हानीकारक आहे. पिझ्झा तुमच्या पचन यंत्रणेसाठी भारी ठरू शकतो. रात्री याचं पचन होणं अधिक कठीण असतं. तसंच पास्त्यातील कार्बाहायड्रेटमुळे तुम्हाला बद्धकोष्ठाचा त्रासही होऊ शकतो.

नॉनव्हेज –

वीकेंड पार्टीज किंवा रविवारी रात्री हमखास अनेक जण रात्रीच्या जेवणात नॉनव्हेज खातात. पण आयुर्वेदानुसार हे जड पदार्थांमध्ये गणलं जातं. जे पचवण्यासाठी शरीराला अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे रात्री याचं पचन न झाल्यास अनेक रोगांना आमत्रंण ठरू शकतं. 

न्यूडल्स –

न्यूडल्समध्ये सर्वात जास्त कॅलरीज असतात. जर हे दिवस खाल्ले तर योग्य ठरतं. पण रात्री खाल्ल्यास तुमच्या पचनसंस्थेवर ताण येतो. कारण यात चरबीचं प्रमाणही जास्त असतं. ज्यामुळे याचं योग्यप्रकारे रात्री पचन होत नाही. 

चिप्स किंवा स्नॅक्स –

या पदार्थांचं सेवन तर आपण सर्रास रात्री करतो. पण हे सर्वात जास्त वाईट आहे. कारण यामध्ये मोनोसोडिअम ग्लूटामेटची मात्रा अधिक असते. हे पचन संस्थेसाठी योग्य नसतं. तसंच यामुळे झोपेतही बाधा येते. 

त्यामुळे पुढच्यावेळी आवर्जून रात्री झोपायच्या आधी या पदार्थांचं सेवन टाळा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा –

संध्याकाळी कधीही खाऊ नका हे पदार्थ नाहीतर वाढेल वजन

उपाशीपोटी ‘हे’ पदार्थ खाल्ले तर होऊ शकतो आरोग्यावर उलट परिणाम

कोकणातील या पदार्थांमुळे येईल तुम्हाला ‘गावची आठवण’

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ