त्वचेची काळजी

उर्वशी ढोलकियाप्रमाणे घ्याल त्वचेची काळजी तर चाळीशीतही दिसाल सुंदर

Trupti Paradkar  |  Dec 20, 2020
उर्वशी ढोलकियाप्रमाणे घ्याल त्वचेची काळजी तर चाळीशीतही दिसाल सुंदर

कसौटी जिंदगी की या मालिकेतून ‘कोमोलिका’ साकारत ऊर्वशीने चाहत्यांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ऊर्वशीची या मालिकेतील भूमिका नकारात्मक असूनही तिच्या सौंदर्याची भुरळ भल्याभल्यांना पडली होती. ऊर्वशी आता बेचाळीस वर्षांची आहे. तरूण वयात झालेलं लग्न, कोवळ्या वयात स्वीकारलेलं मातृत्व, करिअर आणि जीवनातील अनेक चढ उतार सांभाळत तिने तिचं सौंदर्य आजही जपलं आहे. तिच्याकडे पाहून ती तिच्या तरूण मुलांची आई नाहीतर बहीणच जास्त वाटते. उर्वशी अनेकदा तिच्या मुलांसोबत फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. चाळीशी उलटूनही उर्वशी इतकी सुंदर कशी दिसते याबाबत अनेकांना जाणून घ्यायचं होतं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत ऊर्वशी ढोलकियाचं ब्युटी सिक्रेट

चेहऱ्याची नियमित स्वच्छता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उर्वशी तिचा चेहरा नियमित स्वच्छ करण्यासाठी जेल बेस्ड क्लिंझरचा वापर करते. अशा प्रकारचे फेस वॉश अथवा क्लिंझर वापरल्याममुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जातं. त्वचा मुळापासून स्वच्छ होते. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यासाठी चेहरा नियमित स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मात्र यासाठी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉश निवडा. बाजारात सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फेसवॉश मिळतात. सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना आणि दिवसभरात दोनदा चेहरा स्वच्छ करण्यास विसरू नका. 

टोनरचा वापर करा न चुकता

स्किन केअर रूटिनमध्ये क्लिझिंगनंतर महत्त्वाची स्टेप असते ती म्हणजे स्किन टोन करणे. क्लिझिंगनंतर यासाठी तुम्ही  तुमच्या त्वचेवर बर्फ फिरवू शकता. ज्यामुळे चाळीशीमध्ये होणाऱ्या त्वचेच्या समस्या कमीम होऊ शकतात. बर्फाने मसाज केल्यामुळे त्वचेचे ओपन पोअर्स बंद होतात. त्याचप्रमाणे सैल पडलेली त्वचा पुन्हा घट्ट होते. यासाठी एका सुती कापडात बर्फ घ्या त्वचेवरून फिरवा. त्याचप्रमाणे क्लिंझिंगनंतर तुम्ही त्वचेला गुलाबपाण्याने टोन करू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळेल आणि त्वचा टवटवीत दिसू लागेल. 

मॉईस्चराईझर आहे महत्त्वाचे

क्लिंझिंग आणि टोनिंग नंतर महत्त्वाचं आहे त्वचा मॉईस्चराईझ करणं. उर्वशीची त्वचा कॉम्बिनेशन प्रकारातील असल्यामुळे ती वॉटर बेस्ड मॉईस्चराईझर वापरते. पण जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही यासाठी क्रीम बेस्ड मॉईस्चराईझर वापरू शकता. मॉईस्चराईझरने त्वचेला मसाज केल्यामुळे वयोमानानुसार त्वचेमध्ये येणारा सैलपणा कमी होतो. 

Instagram

लिप केअर

चेहरा, मान आणि शरीरावरील इतर भागाच्या त्वचेची निगा राखण्यासोबत सर्वात महत्त्वाचं आहे ते ओठांची  काळजी घेणं. कारण ओठांची त्वचा शरीरावरच्या इतर भागावरील त्वचेपेक्षा नाजूक असते. त्यामुळे तिच्यावर हवामानाचा सर्वात जास्त परिणाम होतो. शिवाय बोलतना तुमचे ओठ सर्वात आधी दिसतात. त्यामुळे ओठांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही चांगलं लिप बाम सतत वापरू शकता. 

ऊर्वशी ढोलकियाचं हे ब्युटी सिक्रेट तुम्हाला कसं वाटलं आणि ते तुम्ही फॉलो केलं का, तुम्हाला त्यामुळे काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्स मध्ये जरूर कळवा. त्यासोबतच ट्राय करा मायग्लॅमचे हे स्किन केअर प्रॉडक्ट

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

प्रेगनन्सीमध्ये दिसायचं असेल स्टायलिश तर या बॉलीवूड अभिनेत्रींनी करा फॉलो

उर्वशी रौतेलाने मित्राच्या लग्नात नेसली लाखोंची साडी, किंमत ऐकून व्हाल थक्क

पवित्रा पुनियाचे हॉट बॅकलेस ब्लाऊज डिझाईन्स, तुम्हालाही पाडतील भुरळ

Read More From त्वचेची काळजी