Diet

आरोग्यासाठी स्वादानुसारच करा वेलचीचा वापर, अन्यथा होतील गंभीर परिणाम

Harshada Shirsekar  |  Jan 20, 2020
आरोग्यासाठी स्वादानुसारच करा वेलचीचा वापर, अन्यथा होतील गंभीर परिणाम

कोणत्या-न्-कोणत्या अन्नपदार्थांमध्ये आपण वेलचीचा (Cardamom) वापर आवर्जून करतो. या छोट्या वेलची असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. वेलचीमध्ये कित्येक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे कित्येक गंभीर आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत होते. काळी वेलची आणि हिरवी वेलची असे दोन प्रकार आहेत. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात मिळणारी वेलची केवळ आस्वाद आणि सुगंधासाठी वापरली जात नाही तर आरोग्यासाठीही वेलची अतिशय फायदेशीर असते. उच्च रक्तदाबाची आहारात वेलचीचा समावेश करावा, असा सल्ला आहार तज्ज्ञांकडून दिला जातो.

(वाचा : उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी या पाच अन्नपदार्थांचं करा सेवन)

instagram

हिरवी वेलची खाण्याचे आरोग्यदायी फायदे

1. वजन घटण्यास होते मदत  

वेलचीमध्ये असलेल्या पोषकतत्त्वांमुळे वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्याचे प्रयत्न करत आहात तर आपल्या स्वयंपाकात वेलचीचा वापर करावा. हळूहळू तुमचे वजन कमी होईल. 

2. मधुमेहासाठी फायदेशीर   

वेलचीमध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट्स गुणधर्म रक्तातील साखर नियंत्रणात आणण्याचे कार्य करतात. मधुमेहाचा त्रास असणाऱ्या वेलचीचे सेवन करावे. 

(वाचा : पपईच्या पानांचा रस प्या, नितळ त्वचेसह मिळतील असंख्य आरोग्यवर्धक फायदे)

3.तोंडाचा कॅन्सर  

वेलचीमध्ये अँटीइन्फेलेमेटरीचे घटक आहेत, ही पोषकतत्त्वे तोंडाचा कॅन्सर, त्वचेचा कॅन्सरच्या पेशींविरोधात लढतात.  

4. उच्च रक्तदाबाचा त्रास येतो नियंत्रणात   

हिरव्या वेलचीमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास नियंत्रणात येण्यास मदत होते. यातील औषधी गुणधर्मामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.  

(वाचा : पाठ दुखीतून सुटका मिळवण्यासाठी करा ही दहा योगासने)

5. खोकल्यापासून सुटका 

हिरवी वेलची गरम असते, यामुळे सर्दी-खोकल्यातून आपल्याला आराम मिळतो. रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत वेलची चावून खावी, तुम्हाला लवकरच आराम मिळेल. 

6. मुखशुद्धी
वेलची हे उत्तम आणि नैसर्गिक माउथ फ्रेशनर आहे. वेलचीमुळे मुखशुद्धी होते. तोंडातील दुर्गंधी दूर होते.

7. पित्ताचा त्रास कमी होतो
वेलचीच्या सेवनामुळे शरीरातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर फेकली जातात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात. नियमित वेलचीचे सेवन केल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

8. सेक्स लाईफसाठी फायदेशीर
वेलचीचे सेवन केल्यास सेक्स लाईफसाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीराचे आरोग्य सुधारतं तसंच शीघ्रपतन, नपुंसकत्व यांसारख्या समस्या दूर होतात. लैंगिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी वेलचीचे सेवन करावे. 

instagram

वेलचीच्या सेवनाचे दुष्परिणाम

वेलचीचा गरजेपेक्षा अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीराला अपाय होऊ शकतो.  वेलचीच्या अतिसेवनामुळे पित्ताची समस्या निर्माण होईल. पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. तसंच पचनप्रक्रिया संबंधीत समस्या निर्माण होऊ शकतात. 

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Diet