आपलं जग

बाळाला अंगाई गीत गाऊन झोपवण्याचे फायदे

Trupti Paradkar  |  Apr 21, 2022
benefits of angai geet in marathi

“लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई” किंवा “गाई गाई गोठ्यात” अशी अंगाई गीतं ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. पण आता बाळासाठी अंगाई गाण्यासाठी वेळच नसतो. लहान बाळाला अशी अंगाई गीतं ऐकल्यामुळे पटकन झोप लागते. शिवाय झोपेसाठी रडून चिडचिड करणाऱ्या मुलांना झोपवण्याचा हा एक सोपा मार्ग असतो. एवढंच नाही नकळत या अंगाई गीतांचे लहान मुलांवर अनेक चांगले फायदे होत असतात. अंगाईमुळे बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास होत असतो. यासाठीच जाणून घ्या लहान बाळाला अंगाई गीत गात का झोपवावं… यासोबतच जाणून घ्या बाळ रडण्याची कारणे आणि उपाय | Reasons Why Your Baby Is Crying In Marathi

benefits of angai geet in marathi

बाळाला अंगाई गीत गात झोपवण्याचे फायदे

जर तुम्ही बाळाला झोपवताना अंगाई गात नसाल तर आजपासून लगेच सुरू करा. कारण याचे अनेक फायदे आहेत.

भावनिक विकास होतो

संगीतामध्ये एक अद्भूत शक्ती असते. जेव्हा तुम्ही बाळासाठी गाणं गुणगुणत असता. जेव्हा नकळत तुमच्या बाळाचा भावनिक विकास होत असतो. बाळ झोपण्यासाठी रडत असतं कारण त्यावेळी त्याला त्याची आई जवळ हवी असते. जेव्हा तुम्ही बाळासाठी अंगाई गाता तेव्हा त्याला आधार वाटू लागतो. मन शांत झाल्यामुळे त्याला लगेच झोप लागते. संगीतामध्ये भावना उत्तेजित करण्यासाठी आणि मनाला शांत करण्याची अशी दुहेरी ताकद असते. यासाठी अंगाई गात तुम्ही बाळासाठी भावनात्मक वातावरण निर्माण करू शकता.

झोपेचे चक्र नियमित होते

झोपण्यासाठी तुमची वेळ, जागा अशा काही गोष्टी नियमित असण्याची गरज असते. थोडक्यात काही गोष्टी केल्या की तुमच्या मेंदूला झोपेचा सिग्नल जात असतो. बाळाला पुरेशा झोपेची गरज असते. कारण बाळ जितकं जास्त आराम करेल तितका त्याचा विकास होत जातो. यासाठी अंगाई गाण्याची सवय लावली की बाळाच्या मेंदूला झोपेचा सिग्नल मिळतो. त्यामुळे बाळाला झोपवण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करावे लागत नाही. जागा बदलली अथवा वातावरणात बदल झाला तरी तुमच्या अंगाईने बाळाला छान झोप लागते.

आईबाबांसोबत बॉडिंग वाढते

बाळासाठी फक्त आईनेच अंगाई गावी असं मुळीच नाही. बाळासोबत असलेलं नातं दृढ करण्यासाठी बाबा अथवा घरातील इतर मंडळीदेखील अंगाई गाऊ शकतात. यामागे एक मानसशास्त्र दडलेलं आहे. जेव्हा तुम्ही बाळासाठी अंगाई गाता तेव्हा तुमच्या मनात हॉर्मोनल बदल होतात. बाळाच्या शरीरात निर्माण होणारे हॉर्मोन्स यामुळे तुमच्या दोघांमध्ये एक छान भावनिक नातं तयार होतं. आयुष्यभर तुमचं नातं दृढ राहण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. मात्र कधीच अर्धवट अंगाई गाऊ नका. गाणं गाताना ते पूर्ण केलं जाईल याची जरूर काळजी घ्या.

बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी उपयुक्त

बाळाच्या शरीराची आणि मनाची वाढ आणि विकास जन्मानंतरही होत राहतो. यासाठीच बाळाला पुरेशी झोप घेण्याची गरज असते. बाळ हसतं, रडतं अथवा खेळत असतं तेव्हा बाळाच्या शरीरात अनेक बदल होत असतात. यातून निर्माण झालेला ताण कमी करण्यासाठी बाळाला जास्तीत जास्त झोपेची गरज असते. मात्र कधी कधी वातावरणात बदल झाल्यामुळे, आवाजामुळे बाळ न झोपता चिडचिड करतं. अशा वेळी बाळाला अंगाई गाणं ऐकताच छान झोप लागते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From आपलं जग