DIY सौंदर्य

रोज रात्री चेहऱ्याला बदाम तेल लावण्याचे फायदे

Leenal Gawade  |  Nov 16, 2020
रोज रात्री चेहऱ्याला बदाम तेल लावण्याचे फायदे

चेहरा कायम  मुलायम राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी अगदी सुरक्षित आणि ऑरगॅनिक असा पर्याय आहे तो म्हणजे ‘बदामाचे तेल’ बदामाच्या तेलाचे खूप फायदे आहेत. रोज रात्री चेहऱ्याला बदामाचे तेल लावल्यामुळे त्वचा अधिक चांगली आणि सुंदर राहण्यास मदत मिळते. नेमकं कोणत्या त्वचेच्या प्रकारासाठी तुम्ही बदामाचे तेल लावायला हवे आणि त्याचे फायदे काय? ते आता आपण जाणून घेऊया. 

कमी वेळात चमकदार त्वचेसाठी बदामाचं तेल (Benefits Of Almond Oil In Marathi)

त्वचेचा पोत सुधारतो

 बदामाचे तेल हे व्हिटॅमिन E ने युक्त असते. त्वचेत हे तेल मुरल्यानंतर त्वचा आतून अधिक चांगली होण्यास मदत मिळते. त्वचेच पोत अर्थातच त्वचेवरुन हात फिरवल्यानंतर त्वचा रुक्ष किंवा खडबडीत लागत असेल तर बदामाच्या तेलाच्या वापरामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते. याच्या नित्य आणि योग्य वापरामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते. 

त्वचा उजळण्यास मदत

Instagram

व्हिटॅमिन C आणि E ने युक्त अशा बदामाच्या तेलाच्या उपयोगाने त्वचेचा पोत सुधारतो. त्वचेचा पोत सुधारताना त्वचा उजळण्यास मदत मिळते. त्वचेवरील लव आणि इतर डाग कमी होत त्वचा उजळण्यास मदत मिळते. हे तेल त्वचेत मुरल्यानंतर कोलॅजन बुस्ट होते आणि त्यामुळे त्वचा अधिक उजळते. 

पिंपल्सचे डाग करते कमी

बदाम तेलातील घटक पिंपल्सचे डाग कमी करायला मदत करते. पिंपल्सचे डाग कमी करत त्वचा अधिक चांगली दिसण्यास यामुळे मदत मिळते. जर तुमच्या त्वचेवर पिंपल्सचे डाग असतील तर दररोज रात्री झोपताना अगदी दोन ते तीन थेंब बदामाचे तेल लावा तुम्हाला नक्कीच तुमच्या त्वचेमध्ये असलेला फरक जाणवेल. 

केसांना तेल लावल्यावर करू नका ‘या’ चुका

कोरडी त्वचा करते दुरुस्त

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुमच्यासाठी बदामाचे तेल हे वरदान आहे. कारण बदामाच्या तेलामधील मॉईश्चर करणारे घटक त्वचा अधिक चांगली करण्यास मदत करतात. कोरड्या त्वचेला तजेला आणण्याचे काम बदामाचे तेल फार उत्तम पद्धतीने करते. कोरडी त्वचा नरीश करण्याचे काम बदामाचे तेल फार उत्तम पद्धतीने करते.

डोळ्यांखालील काळी वर्तुळं करते कमी

Instagram

रात्रभर जागून किंवा सतत काम करुन जर तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळ आली असतील. तर तुमच्यासाठी बदामाचे तेल हा उत्तम पर्याय आहे. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्याचे काम करतात. त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं असतील तर तुम्ही रात्री अगदी हमखास बदामाचे तेल लावा. 

केसांवर हेअर ट्रिटमेंट केल्यानंतर करु नका तेल मालिश

नाजूक आणि तेलकट त्वचेने टाळावा प्रयोग

जर तुमची त्वचा नाजूक असेल किंवा तेलकट असेल तर तुम्ही बदामाच्या तेलाचा मुळीच उपयोग करु नका.कारण याच्या वापरामुळे तुमच्या त्वचेवर पिंपल्स येण्याची शक्यता जास्त असते. 

असा करा वापर

बदामाच्या तेलाचा उपयोग करताना तुम्हाला अगदी कमीत कमी तेलाचा उपयोग करायचा आहे.हातावर अगदी दोन ते तीन थेंब हातात घ्या ते चेहऱ्याला लावून मस्त मसाज करा. 


आता रोज रात्री बदामाचे तेल लावून झोपा आणि सुंदर त्वचा मिळवा.

पुढे वाचा –

Badam Oil ke Fayde

 

 

Read More From DIY सौंदर्य