Diet

काळ्या तांदुळाचे फायदे, ठरतात आरोग्यासाठी फायदेशीर

Dipali NaphadeDipali Naphade  |  Nov 8, 2019
काळ्या तांदुळाचे फायदे, ठरतात आरोग्यासाठी फायदेशीर

घरात रोज भातासाठी लागणारे पांढरे तांदूळ तर सर्वांनाच माहीत आहे. इतकंच काय अगदी ब्राऊन राईसदेखील सगळ्यांना माहीत आहे. पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काळ्या तांदुळाचे फायदे. आता नक्की काळा तांदूळ म्हणजे काय? तो कुठे मिळतो असे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आले असणार. तर हो काळा तांदूळ असतो आणि त्याचे अनेक फायदेही असतात. तुम्हाला तांदळाची ही प्रजाती माहिती आहे का? खरं तर भारतामधील ईशान्येकडील भाग विशेषतः मणिपूरमध्ये हा भात पिकवण्यात येतो. आता याची लागवड विदर्भातदेखील सुरू करण्यात आली आहे. या काळ्या तांदळामध्ये लोह आणि तांब्याची मात्रा नेहमीच्या तांदुळापेक्षा अधिक प्रमाणात असते. तसंच यामध्ये प्रथिनं आणि अँटिऑक्सिडंट्सची मात्राही अधिक प्रमाणात असते. हा भात शिजवल्यानंतर गडद जांभळ्या रंगाचा होतो. या तांदुळाचे आपल्या आरोग्यासाठी नक्की काय फायदे होतात ते पाहूया – 

1. लठ्ठपणा कमी करण्यासाठी

Shutterstock

आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमुळे वजन वाढण्याचा बऱ्यापैकी त्रास असतो. भात खायला आवडत असतो. पण आपल्या डाएटमध्ये भाताचा समावेश करण्यात आलेला नसतो. मग अशावेळी तुमचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्हाला काळ्या तांदुळाचा वापर करता येऊ शकतो. यामध्ये असलेलं लोह आणि तांब्याचं प्रमाण तुमची जाडी कमी करण्यासाठी उपयोग होतो. 

2. कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी

Shutterstock

आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी काळे तांदूळ फायदेशीर आहेत. यामध्ये आढळणारं फायटोकेमिकल हे कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. तसंच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसंच आपल्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अर्थ्रोस्क्लेरोसिस प्लेकच्या निर्मितीची शक्यता कमी करतात आणि त्यामुळे हार्टअटॅकचा धोका कमी होतो. तसंच तुम्हाला जर हृदयाची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला नियमित हा काळा तांदूळ खाण्याने उपयोग होतो. 

गुढीपाडव्याचा झटपट तयार होणारा महाराष्ट्रीयन खास मेनू

3. कर्करोग टाळण्यासाठी

काळ्या तांदुळामध्ये अँथोसायनिन नावाचं अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात आढळतात. जे तुमच्या शरीरात कर्करोगसारखे रोग टाळण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच नियमित काळे तांदूळ खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसंच याचं सेवन नियमित केल्याने तुमच्या शरीरापासून इतरही अनेक आजार दूर राहण्यास मदत होते. 

4. पचनक्रिया योग्य होण्यास मिळते मदत

काळ्या तांदूळामध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळतं. यामुळे तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही याचं सेवन नियमित करायला हवं. या समस्या नष्ट करण्यास मदत मिळते. तसंच तुमचं पोट फुगत असेल आणि पचनसंबंधित त्रास असेल तर तुम्ही याचं सेवन नियमित करा. तुमचा हा त्रास कमी होण्यास मदत मिळते आणि तुमची पचनक्रिया नियमित होते. 

उन्हाळ्यात जेवणाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही करा या रेसिपीज

5. शरीरातील टॉक्झिक काढून टाकतं

Shutterstock

काळ्या तांदुळाचं सेवन हे तुमच्या शरीरातील टॉक्झिक काढून टाकण्यास मदत करतं. आपल्या शरीराला नको असलेले तत्व बाहेर फेकून शरीरातील अशुद्धपणाचा काढून आंतरिक सफाई करण्यास मदत करतं. तसंच तुमच्या लिव्हरची स्वच्छता करण्यासाठीदेखील याचा उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही काळ्या तांदुळाचं सेवन करून त्याचा फायदा करून घेतल्यास तुमचं आरोग्य अधिक निरोगी ठेवता येतं. 

चुकूनही ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नका, होतील दुष्परिणाम

6. डोळ्यांसाठी फायदेशीर

Shutterstock

काळ्या तांदुळामध्ये जास्त अँँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आपल्या डोळे आणि मेंदूसाठीही याचा उपयोग होतो. नियमित याचं सेवन केल्याने तुमची दृष्टी चांगली राखण्यास मदत होते. तसाच तुमचा मेंदूही तल्लख होतो. 

तोंडाला पाणी आणणारे अप्रतिम तांदळाचे पदार्थ, रेसिपी मराठीत

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Diet