सिताफळ हे एक सिझनल फळ आहे. सध्या बाजारात सिताफळं मिळायला सुरूवात झाली आहे. वास्तविक प्रक्रिया करून तुम्ही सिताफळ अगदी वर्षाचे बाराही महिने टिकवून ठेवू शकता. पण जे फळ ज्या हंगामात पिकतं ते त्याच सिझनमध्ये खाण्यात एक वेगळीच मौज असते. हंगामी काळात ते फळ अगदी ताज्या स्वरूपात मिळत असल्यामुळे त्याचे चांगले फायदे आरोग्यावर होत असतात. सिताफळ हे अतिशय उपयुक्त असं फळ आहे. सिताफळ खाण्यासाठी जितकं स्वादिष्ट लागतं तितकंच ते तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. सिताफळ हे पित्तानाशक, पौष्टिक, रक्तवर्धक, वातदोष कमी करणारं असं फळ आहे. काही जणांना पिकलेल्या सिताफळाचा गर खायला आवडतो तर काहीजणांना त्याच्यापासून तयार केलेलं मिल्कशेक आणि बासुंदी. कशाही स्वरूपात खाल्लं तरी सिताफळाचे फायदे शरीरावर नक्कीच मिळू शकतात. फक्त सिताफळ हे एक गोड चवीचं फळ असल्याने ते मधुमेहींनी अती प्रमाणात खाऊ नये. यासाठीच जाणून घ्या सिताफळाचे आरोग्यावर काय परिणाम होतात.
सिताफळाचे आरोग्यदायी फायदे
shutterstock
ह्रदयरोगापासून बचाव होतो
आजकालच्या दगदगीच्या जीवनशैलीमुळे ह्रदयावरील ताण दिवसेंदिवस वाढत चालता आहे. काम आणि चिंता यामुळे ह्रदयाचे आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते. ह्रदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ह्रदयातील मांसपेशींना मॅग्नेशियमची गरज असते. सिताफळात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. ज्यामुळे ह्रदयविकारापासून दूर राहण्यासाठी सिताफळ खाणं तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
किवीचे पौष्टिक मूल्य देखील वाचा
सुंदर दिसण्यासाठी खा सिताफळ
सिताफळामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहू शकतं. कारण सिताफळात व्हिटॅमिन ए आणि अॅंटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या पेशींचे कार्य सुरळीत चालते आणि तुमची त्वचा चमकदार आणि फ्रेश दिसते. शिवाय नियमित सिताफळ खाण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा कमी प्रमाणात दिसतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात ज्यामुळे तुम्ही नक्कीच वयापेक्षा अधिक तरूण दिसू शकता.
दम्याचा त्रास कमी होतो
ज्यांना अस्थमा अथवा दम्याचा त्रास असेल त्यांना सीताफळ खाल्ल्यास चांगला फायदा होऊ शकतो. सिताफळमधील व्हिटॅमिन बी 6 तुमच्या श्वसनमार्गातील सूज कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे तुम्हाला इनफेक्शनचा त्रास कमी होतो आणि दम्यापासून नक्कीच आराम मिळू शकतो.
किवीचे आरोग्य फायदे देखील वाचा
अशक्तपणा कमी होतो
आजकाल योग्य पोषण न झाल्यामुळे आणि रक्ताचे प्रमाण कमी असल्यास अॅनिमियाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ज्यामुळे सतत थकवा आणि चक्कर अशी लक्षणे जाणवतात. पुरूषांपेक्षा महिलांना या समस्येचा त्रास अधिक होत असते. मात्र सिताफळात लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे सिताफळ खाण्यामुळे तुमच्या शरीरातील लोहची कमतरता भरून निघू शकते.
गर्भधारणेसाठी सिताफळ आहे वरदान
आजकाल गर्भधारणेत अपयश आल्यामुळे अनेक जोडप्यांचं आई-बाबा होण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही. वास्तविक गर्भधारणेसाठी स्त्रीच्या शरीराला फॉलिक अॅसिडची गरज असते. जर तुमच्या फेलोपियन ट्यूब मध्ये दोष असतील तर ते फॉलिक अॅसिडमुळे कमी होतात. सिताफळात भरपूर प्रमाणात फॉलिक अॅसिड असतं. ज्यामुळे गर्भधारणेच्या प्रक्रियेला नक्कीच चालना मिळू शकते. यासाठी आई होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर सिताफळ खायला काहीच हरकत नाही. मात्र लक्षात ठेवा गर्भधारणेनंतर अती प्रमाणात सिताफळ खाल्ल्यास गर्भपाताचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रेगन्सीनंतर सिताफळ कमी प्रमाणात खा.
बदामाच्या फायद्यांविषयी देखील वाचा
केसांच्या आरोग्यासाठी उत्तम
केसांमध्ये उवा अथवा कोंडा झाल्यास सिताफळाच्या पानांचे चूर्ण लावल्यास चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी सिताफळाच्या पानांची पावडर नारळाच्या तेलात मिसळून केसांना लावा आणि वीस मिनीटांनी केस धूवून टाका. मात्र लक्षात ठेवा केस धूतांना सिताफळाची पावडर तुमच्या डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. कारण या पावडरचा संपर्क डोळ्यांना झाल्यास तुम्हाला कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकतं.
सिताफळ हे एक बहुगुणी फळ आहे. शिवाय हंगामी असल्यामुळे ते फक्त या सिझनमध्येच मिळतं. त्यामुळे सिताफळ खा आणि मस्त राहा.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
संत्र्याचे सौंदर्यावर होणारे फायदे
किवी (Kiwi) तुमच्या फिटनेस आणि त्वचेसाठी आहे वरदान, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या