Diet

म्हणून आहारात हमखास हवी शेपूची भाजी (Shepu Bhaji Benefits In Marathi)

Leenal Gawade  |  Nov 14, 2019
Shepu Bhaji Benefits In Marathi

पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. म्हणून त्या खाव्यात असे कितीही सांगितले तरी पालेभाज्यांमध्ये असलेली शेपूची भाजी मात्र अनेकजण खायला बघत नाही. कारण ती खाल्यानंतर सतत करपट ढेकर येत राहतात. पण केवळ वासामुळे जर तुम्ही भाजी खात नसाल तर तुम्हाला कदाचित या भाजीचे फायदे माहीत नाहीत. अगदी थोडीशी शेपूची भाजी जरी तुम्ही खाल्ली तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल. (शेपूच्या भाजीला ‘डील’ असे देखील म्हणतात)

शेपूची भाजी सहज उपलब्ध

Shepu Bhaji Benefits In Marathi

 

शेपूची भाजी बाजारात सहज उपलब्ध असते. त्याची पान अगदीच पातळ असतात. बाराही महिने ही भाजी उपलब्ध असते. बाजारात शेपूची भाजी मिळणार नाही असे अजिबात होत नाही. अगदी लहानशी जुडीही एका दिवसासाठी पुरेशी असते. मुगाची डाळ घालून शेपूची भाजी केली जाते. भाकरी किंवा पोळीसोबत ही भाजी खाल्ली जाते. शेपूची भाजी करण्याची पद्धत जरी  वेघली असली तरी त्याचे फायदे तेच आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पद्धतीने ही भाजी बनवू शकता.

हार्मोन्सचे संतुलन राखले जाते

 

हार्मोन्सचा सर्वाधिक त्रास हा महिलांना होत असतो. हार्मोन्स कमी जास्त झाले की, त्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो. जर तुम्हाला अनियमित मासिक पाळीचा त्रास असेल किंवा तुम्हाला मासिक पाळी येणार असेल तर तुमच्या आहारात शेपूची भाजी असायला हवी. कारण शेपूमध्ये असलेल्या पोषकतत्वांमुळे तुमचे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते.

कोबी आणि फ्लॉवरच्या भाजीचा असा घालवा वास

झोप चांगली येते

Shepu Bhaji Benefits In Marathi

 

हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना निद्रानाश असतो. तुम्हालाही रात्री झोप लागत नसेल तर तुम्ही शेपूची भाजी हमखास खायला हवी. शेपूमध्ये फ्लेवोनाईड्स आणि व्हिटॅमिन B हे घटक असतात जे तुमचे मन आणि मेंदू शांत ठेवण्याचे काम करतात. जर तुमचे मन आणि मेंदू शांत असेल तर तुम्हाला झोपही चांगली लागते.

वाचा – शांत झोप लागण्यासाठी उपाय जाणून घ्या

पचनाचे विकार दूर होतात

 

शेपूमुळे तुम्हाला करपट ढेकर येत असतील तरी तुमच्या पचनाचे सगळे त्रास दूर करण्याची क्षमता शेपूमध्ये असते. शेपूची भाजी पचायला फारच हलकी असते. शेपूच्या बिया गुदद्वारातून मल बाहेर काढण्याचा मार्ग मोकळा करतात. जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर तुम्ही शेपूची भाजी खायलाच हवी.

वाचा – Traditional Thalipeeth Bhajani Recipe In Marathi

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते

Instagram

 

हल्ली अनेकांना सर्रास होणारा त्रास म्हणजे कोलेस्ट्रालचा. जर तुम्हालाही कोलेस्ट्रॉल असेल तर तुम्ही शेपू खायलाच हवा. शेपूच्या भाजीमुळे वाईट कोलेस्ट्राल शरीरातून कमी होते आणि शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची वाढ होते.कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिले तर तुमचे हृदयाचे कार्य सुरळीत चालते.

आजारांपासून दूर ठेवते

 

शेपूच्या बियांमध्ये अँटीबॅक्टोरिअल आणि दाहशामक घटक असतात.  त्यामुळे ही भाजी तुम्हाला कोणत्याही आजांरापासून दूर ठेवण्याची क्षमता ठेवते. असे म्हणतात की, पूर्वीच्या काळी शेपूच्या बिया जखमेच्या जागी लावल्या जात असतं. जखमेवर त्या लावल्यामुळे संसर्गाची भिती कमी होते. म्हणूनच तुम्ही आहारात शेपूची भाजी खायला हवी. त्यामुळे आजपासूनच शेपूची भाजी खायला सुरुवात करा.

Read More From Diet