xSEO

अंडी खाण्याचे फायदे | Benefits of Eating Eggs In Marathi

Leenal Gawade  |  Dec 22, 2021
अंडी खाण्याचे फायदे

अंडे में फंडा… अंडे का फंडा… रोज व्यायाम करणाऱ्यांच्या जीवनात अंड्याचे एक अनोखे स्थान आहे. कॅल्शिअम आणि प्रोटीनने युक्त अशी अंडी ही आरोग्यासाठी फारच लाभदायची असतात. म्हणून अंडी खाण्याचे फायदे व तोटे जाणून घेणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. आहारात अंड्याचा समावेश कसा करावा? दिवसातून किती अंडी खावी आणि गावरान अंडी खाण्याचे फायदे कोणते हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यांच्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता असते त्यांना डॉक्टर अगदी हमखास अंडी खाण्याचा सल्ला देतात. तुम्हालाही अंडी खाण्याचा सल्ला दिला असेल तर तुम्ही अंडी खायला हवीत. एका अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉल (124%),सोडिअम (5%), पोटॅशिअम(3%),आर्यन (6%), व्हिटॅमिन D (21%), व्हिटॅमिन B6 (5%),मॅग्नेशिअम (2%) असते. अंड्यासोबत चिकनच्या रेसिपीज या देखील तुम्ही नक्की ट्राय करायला हव्यात. आज आपण जाणून घेऊया अंडी खाण्याचे फायदे.

 अंडी खाण्याचे फायदे | Andi Khanyache Fayde

अंडी खाण्याचे फायदे

अंडी खाण्याचे नेमके शरीराला कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया. अंड्याबद्दल असलेले गैरसमज दूर होण्यास मदत मिळेल.

निरोगी केस

केसांसाठी रिच हेअर फूड म्हणून अंड्याची ओळख आहे. अंड्याचा उपयोग केसांना थेट लावूनही केला जातो. अंड्याचा पांढरा बलक हा केसांसाठी उत्तम कंडिशनरचे काम करतो. तसेच केसांच्या अनेक समस्या दूर करतो. अंड्यामध्ये व्हिटॅमिन A, E , बायोटीन आणि फोलेट असते.  केसांची उत्तम वाढ करुन देण्यासाठी हा घटक खूपच महत्वाचा असतो. अंड्याचे सेवन केल्यामुळे हे घटक तुम्हाला मिळतात. त्यामुळे अंड्याचे नियमित सेवन करावे म्हणजे तुम्हाला त्याचे फायदे होण्यास मदत मिळेल. 

मजबूत हाडं

अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. तुम्हाला मजबूत हाड हवी असतील आणि हाडांना चांगली बळकटी हवी असतील तर तुम्ही अंडी खायला हवीत. आपली हाडं ही कालांतराने ठिसूळ होत असतात. अशावेळी जर तुम्ही योग्यवेळी अंडी खायला घेतली तर त्याचा फायदा तुम्हाला होतो. हाडांच्या बळकटीसाठी तुम्ही अगदी लहान मुलांनासुद्धा अंडी द्यायला काहीच हरकत नाही.

डोळ्यांसाठी उत्तम

अंड्याच्या बलकमध्ये असलेले ल्युटेईन (Lutein), व्हिटॅमिन A, झिंक असते. झेॲक्झाथिन असते जे डोळ्यांना चांगले ठेवण्याचे काम करते. नजर चांगली असेल तर तुम्हाला तुमच्या रोजच्या कामात कोणताही अडथळा येत नाही. त्यामुळे तुम्ही दररोज अंड्याचे सेवन करावे. अंड्यामध्ये असलेले घटक तुमच्या डोळ्यातील कॉऱनिआ आणि त्याच्या आजुबाजूचा परिसर निरोगी ठेवण्यास मदत करते.

स्मरणशक्ती वाढवते

मेंदूला तल्लख ठेवणारे न्युट्रिएंट्स आणि व्हिटॅमिन्स असतात. यामध्ये असलेले फोलेट, कोलिन हे मेंदुला बुस्ट करण्याचे काम करत असते. कोलिन हे मेंदूसाठी आवश्यक असलेल्या न्युरोट्रान्समिटरला बुस्ट करण्याचे काम करते. त्यामुळे अंडी खायची असतील तर तुम्ही पिवळा आणि पांढरा असा दोन्ही बलक खायला हवा. अंडीच नाही तर खेकड्याचे खाण्याचे फायदे शरीरासाठी आवश्यक असतात

ताण-तणाव कमी करते

अंड्यामध्ये Tryptophan ,अमिनो ॲसिड नावाचा घटक असतो. जो सेरोटीनन नावाच्या घटकाची निर्मिती करतो. ज्यामुळे न्यूरोट्रान्समिटरचे काम योग्य चालते. तुमचा मूड आणि ताण तणाव कमी करण्यास ते मदत करते.  जर एखादी व्यक्ती काहीही केल्यामुळे बैचेन होत असेल तर अशा लोकांसाठी अंडी हे खूपच फायद्याचे आहे. अंड्याचे सेवन केल्यामुळे ताण-तणाव कमी होण्यास मदत मिळते.

वजन नियंत्रणात ठेवते

ज्या व्यक्ती जीमला जातात किंवा व्यायाम करतात अशांसाठी अंडी ही फारच फायद्याची असतात. अंड्यामध्ये असलेले घटक वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. अंड्यामुळे पोट भरते  त्यामुळे इतर काहीही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे जर तुम्ही जीम किंवा व्यायाम करत असाल तर तुम्ही नियमित अंड्याचे सेवन करायला हवे.

व्हिटॅमिन्सचा साठा

व्हिटॅमिन्स हे शरीरासाठी फारच गरजेचे असते. अंड्यामध्ये वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सचा साठा असतो. जो आरोग्यासाठी खूप फायद्याचा असतो. जर तुम्हाला निरोगी शरीर हवे असेल तर तुम्ही अंड्याचे सेवन करायला हवे. अंड्याचा पांढरा किंवा पिवळा बलक दोन्ही तुम्ही खायला हवे. त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळण्यास मदत होईल.

शरीरासाठी चांगले कोलेस्ट्रॉल

शरीरासाठी कोलेस्ट्रॉल हे चांगले आणि वाईट दोन्ही असते. शरीराला आवश्यक असलेले चांगले कोलेस्ट्रॉल देखील अंड्यामध्ये असते. ज्यामुळे ह्रदयाचे कार्य उत्तमरित्या होण्यास मदत मिळते.अशावेळी तुम्ही शरीराला चांगले कोलेस्ट्रॉल मिळवून देण्यासाठी अंड्याचे सेवन करायला हवे.

प्रोटीन्सचा साठा

प्रोटीन्स हे शरीरासाठी आवश्यक असतात. अंड्यामध्ये प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स असते जे शरीरासाठी खूपच जास्त आवश्यक असते. अंड्याचे सेवन जर तुम्ही प्रोटीन्ससाठी करत असाल तर अंड्याचे सेवन हे तुमच्यासाठी फारच फायद्याचे असते. व्यायाम करणाऱ्यांसाठीही अंडी ही फारच फायद्याची असतात.

फायबरचा साठा

शरीरासाठी फायबर हे फारच गरजेचे असते. फायबरमुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.पोट भरलेले राहते. त्यामुळे इतर काहीही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे जर तुमच्या शरीरात फायबरची कमतरता असेल आणि ती भरुन काढायची असेल तर तुम्ही अंड्याचे सेवन करायला हवे.

 असे करावे अंड्याचे सेवन | How To Eat Egg

अंड्याचे सेवन करण्याचा तुम्ही निर्णय घेतला असेल तर आहारात अंड्याचा अशाप्रकारे समावेश तुम्ही करु शकता.

उकडलेली अंडी

उकडलेली अंडी

नाश्त्याला उकडलेली अंडी असतील तर तुमचा आहार हा एकदम उत्तम असा आहार आहे. अंडी कशी उकडायची हे माहीत नसेल तर अशी उकडा अंडी

साहित्य: अंडी, पाणी
कृती :

अंड्याची आमटी

अंड्याची आमटी

अंड्याची आमटी ही देखील मस्त चमचमीत अशी रेसिपी आहे. ती भात-पोळी सोबत तुम्हाला खाता येईल.

साहित्य: 4 अंडी, कांदा-खोबऱ्याचे वाटप, मीठ, तेल, कडीपत्ता, कोथिंबीर

कृती:

सनी साईड अप

सनी साईड अप

अंड पटकन खायची इच्छा असेल तर तुम्हाला असे सनी साईड अप करता येते. याचाच अर्थ अंड्याचं पिवळा बलक तसाच्या तसा ठेवला जातो.

साहित्य : अंड, तेल, मीठ, हळद, मसाला

कृती:

एग फ्राय

एग फ्राय

अंड्याचे आम्लेट हे खूप जणांना आवडतं. त्यामुळे काही जणांच्या आहारात अंड्याचे आम्लेट अगदी रोज असते.

साहित्य: एक अंड, मीठ, हळद, मसाला किंवा मिरची, कोथिंबीर, कांदा (आवडत असल्यास), तेल

कृती:

 तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. अंड्याचा पांढरा बलक की पिवळा बलक अधिक आरोग्यदायी असतो ?

हल्ली खूप जण अंड्याचा पिवळा बलक खात नाही. कारण अंड्याच्या पिवळ्या बलकमध्ये मोठ्या प्रमाणात फॅट असते.  त्यामुळे खूप जण खात नाही. पण अंड्याचा पिवळा आणि पांढरा दोन्ही बलक हा आरोग्यदायी असतो. पण जर तुम्हाला डॉक्टरांनी सल्ला दिला असेल तर तुम्ही पिवळा बलक नाही खाल्ला तरी चालू शकेल.

2. अंडी खाण्याची योग्य वेळ कोणती ?

अंडी ही तुम्ही सकाळी किंवा साधारण 11 च्या दरम्यान खायला काहीच हरकत नाही. संध्याकाळी शक्यतो अंडी खाऊ नका. कारण अंडी पचायला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे अंडी खाऊन तुम्ही झोपणार असाल तर शक्यतो अंडी त्यावेळात खाणे टाळा.

3. गावरान अंडी खाण्याचे फायदे ?

गावरान अंडी ही थोडी वेगळी असतात. गावरान अंडी ही थोडी गुलाबीसर असतात. त्याची चवही वेगळी असते. गावरान कोंबडीची अंडी ही महाग असतात. पण खूप जण लहान मुलांना योग्य आहार मिळावा म्हणून गावरान अंडी खायला देतात.

अधिक वाचा

वजन कमी करण्याचे उपाय जाणून घ्या (Weight Loss Tips In Marathi)

Read More From xSEO