Weight Loss

हिवाळ्यात करू शकत नसाल व्यायाम, तर वजन कमी करा आल्याच्या पाण्याने

Dipali Naphade  |  Dec 26, 2019
हिवाळ्यात करू शकत नसाल व्यायाम, तर वजन कमी करा आल्याच्या पाण्याने

वजन वाढताना भराभर वाढतं. पण कमी करायची वेळ येते तेव्हा आपली दमछाक होते. पटतंय ना? वजन कमी करण्यासाठी आपण बरीच मेहनत करत असतो. कोणताही उपाय वापरायचा आपण सोडत नाही. पण सर्वात जास्त त्रास होतो तो हिवाळ्यात. हिवाळ्यातील गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करण्यासाठी उठावं लागणं यासारखं दुसरं दुःख नाही असंही कित्येक जण म्हणतात. पण यावरदेखील एक उपाय आहे. तुम्ही हिवाळ्यात व्यायाम करू शकत नसाल आणि तरीही तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही आल्याच्या पाण्याचा तुमच्या रोजच्या आयुष्यात उपयोग करू शकता. आल्याचं पाणी हे कोणत्याही चमत्काराशिवाय कमी नाही असं म्हटलं जातं. आल्यामध्ये आयुर्वेदिक औषधांची खाण आहे. कोमट पाण्यासह तुम्ही आलं घातलं तर याचे गुण अधिक वाढीला लागतात आणि वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. शिवाय हे एखाद्या जादुप्रमाणे तुमचं वजन कमी  करण्यासाठी फायदेशीर ठरतं. तुम्ही रोज ऑफिसमध्ये तासनतास बसत असाल तर हे आल्याचं पाणी तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया नक्की आल्याच्या पाण्याचा फायदा कसा होतो. 

आल्याच्या पाण्याने वजन होतं कमी

Shutterstock

आल्याचा एक विशिष्ट स्वाद असतो आणि त्यामुळेच कोणत्याही खाण्याच्या पदार्थात अथवा चहामध्ये आल्याचा स्वाद अप्रतिम लागतो. याचा वापर सहसा आपल्या खाण्याच्या पदार्थांमध्ये करण्यात येतो. तुम्ही तुमच्या अंगावरील न हटणारी चरबी कमी करण्यासाठी नक्कीच याचा उपयोग करून घेऊ शकता. आल्याचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळतो. आले हे गरम प्रकृतीचं असतं आणि यामध्ये आढळणारे अनेक तत्व हे तुमच्या शरीरातील चरबी कमी  करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे तुम्ही रोज आल्याच्या पाण्याचं सेवन केल्यास, तुम्हाला व्यायाम करण्याचीही गरज भासणार नाही. तुमचं वजन आणि चरबी कमी करण्यासाठी याचा नक्की उपयोग होईल. 

Flat Belly हवी आहे, तर मग आजपासूनच ट्राय करा हे 5 Detox Drinks

अपचन करते दूर

Shutterstock

आल्यामध्ये असे अनेक गुण असतात जे शरीरातील अनेक त्रास दूर करतात. अपचनामुळे खरं तर वजनाच्या अनेक समस्या निर्माण होतात. बऱ्याच जणांना अपचनाचा त्रास असतो. पण हा त्रास कमी करण्यासाठी नेहमी आल्याचा पाचक रस देण्यात येतो. आल्याचा रस, लिंबू आणि साखर एकत्र करून बनवण्यात आलेल्या या रसामुळे पोटातील गॅस निघून जाण्यास मदत होते आणि अपचनाचा त्रासही कमी होतो. आल्यामध्ये असलेल्या अँटीइन्फ्लेमेटरी गुणांमुळे तुम्हाला हा फरक जाणवतो आणि त्याचा फायदा तुमच्या  शरीराला मिळतो. 

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते ब्ल्यू टी (Blue Tea)

जास्त वेळ पोट भरलेले राहते

Shutterstock

आल्यामध्ये असे गुण असतात जे तुम्हाला तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं जाणवून देतात. तुम्हाला वजन कमी करताना हा गुण अधिक महत्त्वाचा ठरतो.  कारण पोट भरलेलं जाणवलं तर तुम्ही कमी खाणार आणि तुमचं वजन वाढण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. त्यामुळे वजन कमी करताना तुम्ही आल्याच्या पाण्याचा जास्त उपयोग करून घ्या. किमान दिवसातून दोन वेळा तरी तुम्ही आल्याचं पाणी प्यायलात तर तुम्हाला लवकरच फरक जाणवेल. हे तुमची भूक नियंत्रणात आणतं आणि त्याचप्रमाणे तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवतं. 

सकाळी उठल्याबरोबर प्याल हे तर होईल फायदाच फायदा

मेटाबॉलिजम अॅक्टिव्ह करण्यात फायदेशीर

Shutterstock

तुमचं मेटाबॉलिजम स्लो असेल तर तुम्हाला आल्याचं पाणी नक्कीच प्यायला हवं. हे तुमचं मेटाबॉलिजम वाढवण्यास मदत करतं आणि यामुळे मेटाबॉलिजम अॅक्टिव्ह होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठून तुम्ही आल्याचं पाणी प्यायल्यास,  तुम्हाला नक्की फायदा मिळेल. तुमची पचनक्रिया सुधारण्यासही याची मदत मिळते. 

आरोग्य आणि स्मरणशक्तीसाठी वरदान आहे आलं

कसं बनवाल आल्याचं पाणी

Shutterstock

आल्याचं पाणी बनवणं अतिशय सोपं आहे. शिवाय दिवसभर तुम्ही एका बाटलीत पाणी बनवून ठेवलंत आणि पित राहिलात तरीही तुम्हाला याचा फायदा मिळेल. जाणून घेऊया याची कृती – 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From Weight Loss