DIY सौंदर्य

पोटाच्या आरोग्यासाठी नाही तर त्वचा उजळण्यासाठी गरम पाणी आहे उत्तम

Leenal Gawade  |  Apr 10, 2022
गरम पाणी आणि त्वचा

 खूप जणांना गरम पाणी पिण्याची सवय असते. गरम पाणी प्यायल्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते हे आपण अनेक जण जाणतो. ज्यांना बद्धकोष्ठता असेल अशांनी जर गरम पाणी प्यायले तर त्यामुळे त्यांना मोशन अगदी सुरळीत होण्यास मदत मिळते. पोटात असलेली घाण विष्ठेवाटे बाहेर पडली की, त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यासही मदत मिळते. पण केवळ पोटाच्या आरोग्यासाठीच नाही. तर उत्तम त्वचा हवी असेल तरी देखील गरम पाणी हे उत्तम आहे. गरम पाणी प्यायल्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल पण त्वचा उजळण्यासाठी गरम पाणी हे फारच फायद्याचे आहे कसे ते जाणून घेऊया

वजन करते कमी

गरम पाणी

अनेकदा वजन वाढले की, चेहऱ्याचा रंग बदलू लागतो. खूप जणांचा असा गैरसमज आहे की, वजन वाढले की त्वचा ताणते त्यामुळे ती अधिक गोरी होण्यास मदत मिळते. असे अजिबात नाही. उलट वजन वाढल्यामुळे त्वचेचा रंग गडद होतो. गरम पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. वजन आणि त्वचेचा संबंध असल्यामुळे तुम्ही वजन कमी करुन त्वचेचा ग्लो मिळवण्यासाठी तुम्ही गरम पाणी प्यायला हवे. गरम पाण्यामध्ये तुम्ही लिंबू आणि मध घालून प्यायल्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही गरम पाण्याचे सेवन करायला हवे.

डिटॉक्स होण्यास मदत करते गरम पाणी

तुम्हाला डिटॉक्स करायचे असेल तर तुमच्यासाठी गरम पाणी हे फारच उत्तम आहे. गरम पाण्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. खूप जण वजन कमी करण्यासाठी डिटॉक्स करतात. तुम्हालाही असे डिटॉक्स करायचे असेल तर तुम्ही गरम पाणी प्या. शरीर शुद्धीकरण झाल्यामुळे तुमची त्वचा चांगली होण्यास मदत मिळते.डिटॉक्स झाल्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होते. इतकेच नाही तर तुम्हाला नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते.ग्लो हवा असेल तर तुम्ही गरम पाण्याचे सेवन करायला हवे.

 त्वचा करते मॉश्चराईज

त्वचा मॉश्चराईज असेल तर ती नेहमी चांगली दिसते. गरम पाणी प्यायल्यामुळे तुमच्या त्वचेचा ग्लो अबाधित राहतो. दिवसातून योग्य प्रमामात गरम पाण्याचे सेवन केले तर तुमचा ग्लो चांगला टिकून राहील. ग्लो चांगला असेल तर तुमच्या त्चचेचा रंग हा नक्कीच चांगला दिसण्यास मदत होते. तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने त्वचा चांगली हवी असेल तर तुम्ही गरम पाण्याचे सेवन करायला हवे. गरम पाण्याचे सेवन केल्यामुळे तुम्हाला हा फायदा मिळण्यास मदत मिळेल.

रक्त शुद्धीकरणासाठी चांगले

 गरम पाणी रक्त शुद्धीकरणासाठी खूपच चांगली असते. रक्त शुद्धीकरण झाले की, त्वचा चांगली होण्यास मदत मिळते. गरम पाणी शरीरातील अनेक क्रिया सुरळीत करण्यास मदत करते. जर तुम्ही गरम पाणी प्यायची सवय नसेल तर तुम्ही आजच ही सवय लावू घ्या. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होतो. 

गरम पाणी त्वचेसाठी चांगले असेल तरी देखील ते सतत प्यायला नको. तुम्ही योग्य प्रमाणात आणि शरीराला जमेल इतके पाणी प्या. पाणी गरमाम गरम म्हणजे वाफाळते नको. ते कोमट असल्यास जास्त उत्तम. आता चांगल्या आणि उजळ त्वचेसाठी नक्की गरम पाणी प्या.

Read More From DIY सौंदर्य