Recipes

जाणून घ्या कुळीथ (हुलगे)चे अफलातून फायदे आणि रेसिपीज (Benefits of Kulith Dal In Marathi)

Trupti Paradkar  |  Dec 7, 2020
benefits of kulith dal in marathi

आहारात तृणधान्य, डाळी आणि कडधान्य असणं खूप गरजेचं आहे. कारण त्यामुळे तुमच्या शरीराला चौरस आहार मिळतो. मूगडाळ, तूरडाळ, मटकी, चवळीप्रमाणेच आहारात कुळीथदेखील असायलाच हवे. काहीजण कुळीथला हुलगे असंही म्हणतात. आयुर्वेदातही कुळीथ डाळ आणि अख्खे कुळीथ खाण्याचे फायदे सांगण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की, कुळीथामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. महाराष्ट्रात कुळीथाची भाजी, कुळीथाची डाळ आणि कुळीथाची पिढी आवडीने खाल्ली जाते. यासाठीच जाणून घ्या कुळीथचे फायदे अथवा हुलग्याचे फायदे

कुळीथामधील पौष्टिक तत्त्वे (Nutritional Value of Horse Gram In Marathi)

कुळीथामध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत. ज्यामुळे तुमच्या शरीराचे पोषण होते आणि आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

शंभर ग्रॅम कुळीथामध्ये असलेले पौष्टिक घटक 

Instagram

कुळीथचे फायदे (Benefits of Kulthi Dal In Marathi)

कुळीथ अथवा हुलगे आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहेत. यासाठी जाणून घ्या या डाळीचा आहारात समावेश केल्यास आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो.

मधुमेह नियंत्रणात राहतो (Controls Diabetes)

मधुमेह हा आजकाल अनेकांच्या जीवनशैलीचा एक भाग होत चालला आहे. काही संशोधनानुसार भारतात याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आढळते. पण जिथे उपाय असतो तिथे उपायही असतोच असं मानलं जातं. जर तुम्ही मधुमेही असाल तर आहारात काही ठराविक बदल करून तुम्ही तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवू शकता. यासाठी आहारात कुळीथ(हुलगे) असणं गरजेचं आहे. कुळीथात अॅंटि ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे मधुमेहातील धोके कमी होण्यास फायदा होतो. संशोधकांच्या मते ज्यांना टाईप 2 प्रकारातील मधुमेह आहे त्यांच्यासाठी कुळीथ डाळ वरदान ठरू शकते. कुळीथाटा आहारात समावेश केल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर कमी प्रमाणात वाढते. मधुमेहींसाठी डाळी किती फायदेशीर आहेत हे अवश्य जाणून घ्या.

वजन कमी होते (Promotes Weight Loss)

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत आहात तर मग आहारात कुळीथाचा समावेश जरूर करा. कारण कुळीथामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराचे पचन योग्य प्रमाणात होते. वजन नियंत्रित ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. कुळीथ खाण्यामुळे तुम्हाला सतत भुक लागत नाही. कुळीथ तुमच्या शरीरातील फॅट्सवर बर्निंग ऐंजटप्रमाणे काम करते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात कुळीथाची भाजी अथवा सूपचा नक्कीच समावेश करू शकता.

Instagram

स्पर्म काऊंट वाढतो (Improves Sperm Count)

कुळीथात कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह आणि अमिनो अॅसिड असतात. ज्याचा परिणाम पुरूषांच्या आरोग्यावरही चांगला होतो. कुळीथाचे सेवन केल्यामुळे पुरूषांचा स्पर्म काऊंट वाढण्यास मदत होते. कुळीथातील मिनरल्समुळे त्याच्या प्रजनन क्षमतेवर चांगला परिणाम होतो. प्रजनन अवजवांमधील रक्ताभिसरण सुधारते. जर तुम्ही बाळाचं प्लॅनिंग करत असाल आणि रिपोर्टमध्ये तुमचा स्पर्म काऊंट अथवा गुणवत्ता योग्य नसेल तर आहारात कुळीथाचा समावेश जरूर करा.

यकृताच्या कार्याचे संरक्षण होते (Protects Liver Functions)

कुळीथाच्या बियांमध्ये फ्लेवोनॉईड आणि पोलीफेनॉईल मुबलक असतात. ज्यामुळे तुमच्या यकृत आणि स्वादुपिंडाच्या कार्यावर चांगला परिणाम होतो. आहारात कुळीथाचा समावेश असेल तर तुमचे रक्त शुद्ध होते आणमि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. जर हे कार्य सुरळीत झाले नाही तर शरीरातील पित्त, कफ आणि वात दोष वाढतात आणि आजारपणाला सुरूवात होते. यासाठीच यकृताचे कार्य सुरळीत होणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला याबाबत काही त्रास असेल तर आहारात कुळीथाचा समावेश करण्यास विसरू नका. 

मूतखड्याचा त्रास कमी होतो (Treats Kidney Stones)

शरीरात कॅल्शिअम फॉस्फरेट मीठाचे खडे निर्माण झाल्यामुळे किडनी स्टोन अथवा मूतखड्याचा त्रास जाणवू लागतो. मात्र हुलग्याचे फायदे हे आहेत की हुलगे खाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे अॅंटि ऑक्सिडंट मिळतात. याचा फायदा असा होतो की मूतखड्याची निर्मिती यामुळे रोखली जाते. किडनी स्टोनचा धोका कमी करण्यासोबतच जर तुम्ही आहारात हुलग्याचा समावेश केला तर तुमच्या किडनीच्या आरोग्य समस्या कमी होऊ शकतात.

Instagram

थंडी, तापावर गुणकारी (Common Cold and Fever)

वातावरणातील बदल अथवा इनफेक्शनमुळे होणारा सर्दी, तापाचा त्रास कमी करण्यासाठी कुळीथ फायदेशीर आहे. फार पूर्वीपासून सर्दी, खोकला अथवा ताप आल्यास डाळीचा उपयोग एखाद्या काढ्याप्रमाणे केला जातो. कारण डाळीमुळे तुमचा सर्दी-ताप फक्त कमीच होत नाही तर तुम्हाला इनफेक्शन अधिक वाढण्यापासून दूर ठेवतो. यासाठीच सर्दी अथवा ताप आल्यास कुळीथ डाळीचं पाणी पिण्यास द्यावं. ज्यामुळे रूग्णाला लवकर आराम वाटू लागतो. 

दमा नियंत्रणात येतो (Treats Asthma)

दम्याच्या रूग्णांना वातावरणातील बदल, सर्दी, धुळ यामुळे त्रास जाणवतो. मात्र जर त्यांच्या आहारात कुळीथ असतील तर त्यांचा त्रास आटोक्यात आणणं शक्य होतं. कारण कुळीथामध्ये असे अनेक पोषक घटक आहेत ज्यामुळे अशा वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारपणावर मात करणं सोपं जातं. दमा अथवा अस्थमा असणाऱ्या लोकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात हुलगे अथवा कुळीथ सारख्या डाळी असणं गरजेचं आहे.

मासिक पाळीच्या तक्रारी (Irregular Periods)

अनेक महिलांना आजकाल मासिक पाळीच्या समस्या जाणवतात. पाळी उशीरा येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र त्यावर लवकर उपचार करणं खूप गरजेचं आहे. कारण असं न केल्यास महिलांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम दिसू शकतात. काही संशोधनात असं आढळलं आहे की महिलांच्या या आरोग्य तक्रारींवर कुळीथ गुणकारी ठरू शकतात. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी कुळीथ डाळीचा आहारात समावेश केल्यामुळे महिलांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम नक्कीच होत नाही. 

डायरियामध्ये आराम मिळतो (Diarrhea)

जुलाब अथवा डायरिया सारख्या आजारपणात कुळीथ खाण्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो.अती प्रमाणात जुलाब झाल्यामुळे अथवा पाण्यासारखे जुलाब झाल्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व शक्ती कमी होते. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे प्रचंड थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. मात्र कुळीथ डाळीत फ्लेवोनॉईड भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे ते तुमचे जुलाब अथवा डायरिया थांबवण्यासाठी प्रभावी ठरतात. शिवाय कुळीथामध्ये भरपूर फायबर्सही असतात. ज्यामुळे तुमच्या पोटाच्या समस्या  कमी होतात आणि डायरिआमधून लवकर आराम मिळतो. 

Instagram

त्वचेसाठी उत्तम (Good for Skin)

कुळीथ अथवा हुलग्याचे फायदे फक्त तुमच्या आरोग्यावरच होतात असं नाही. तुमच्या त्वचेसाठीही कुळीथ फायदेशीर ठरतात. बेसन अथवा मसूर डाळीप्रमाणे कुळीथाचे पीठ तुम्ही तुमच्या त्वचेवर फेसपॅकप्रमाणे लावू शकता. कुळीथाच्या पिठामुळे तुमच्या त्वचेवरील डाग, व्रण, चट्टे, फोड, एक्ने कमी होण्यास मदत होते. कुळीथामध्ये असलेल्या घटकांमुळे सनटॅनचे कठीण डागही त्वचेवरून निघून जातात. यासाठीच तुमच्या सौंदर्योपचारांमध्ये कुळीथाच्या पिठीचा अथवा पिठाचा अवश्य समावेश करा. त्यासोबतच जाणून घ्या मूगडाळ खाण्यामुळे त्वचेवर काय फायदा होतो.

कुळीथ(हुलगे)चा वापर कसा करावा (How to Use Horse Gram In Marathi)

कुळीथ अथवा हुलगे स्वयंपाकात निरनिराळ्या प्रकारे वापरण्यात येतात. कुळीथाच्या अनेक पारंपरिक आणि मॉर्डन रेसिपीज आहेत.

कुळीथाची पिठी (Kulthachi Pithi)

साहित्य –

कुळीथाची पिठी करण्याची कृती –

यासोबतच दररोजचा स्वयंपाक करण्यासाठी या रेसिपीज आहेत उपयुक्त

Instagram

कुळथाचं सूप अथवा कढण (Kulthacha Soup)

साहित्य –

सूप अथवा कढण बनवण्याची कृती –

Instagram

कुळीथाची उसळ (Kuthachi Usal)

साहित्य –

उसळ करण्याची कृती –

Instagram

कुळथाचे दुष्परिणाम (Side Effects of Horse Gram In Marathi)

कुळीथ अथवा हुलग्यांमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे जर अती प्रमाणात कुळीथ अथवा हुलगे खाल्ले तर पोटात गॅस, सूज अथवा जडपणा निर्माण होतो. त्याचप्रमाणे  कुळीथात कॅल्शिअमही भरपूर असते. शरीरात अती प्रमाणात कॅल्शिअम जमा झाल्यास पोटाला सूज येते अथवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. थोडक्यात कुळीथ अथवा हुलग्याचे फायदे आहेत तसंच ते अती प्रमाणात खाण्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात. आहारात नियमित एक वाटी कुळीथ अथवा मानसी शंभर ग्रॅम कुळीथाचे सेवन करण्यास काहीच हरकत नाही. मात्र यापेक्षा जास्त प्रमाणात कुळीथाचे सेवन करू नये.

कुळीथाचे फायदे याबाबत निवडक प्रश्न – FAQs

1. कुळीथामध्ये प्रोटिन्स जास्त प्रमाणात असतात का ?

होय, नक्कीच कुळीथामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटिन्स असतात. आधीच सांगितल्याप्रमाणे शंभर ग्रॅम कुळीथामधून तुम्हाला 22 ग्रॅम प्रोटिन्स मिळू शकतात.

2. हुलग्यामुळे किडनी स्टोन विरघळतात का ?

हुलग्यामध्ये प्रोटिन्स, लोह, व्हिटॅमिन बी असे अनेक घटक असतात ज्यामुळे तुमचा मूतखडा अथवा किडनी स्टोनचा त्रास कमी होऊ शकतो. हुलग्यामुळे किडनी स्टोन विरघळत नसले तरी त्याची निर्मिती नक्कीच रोखली जाते.

3. अती रक्तदाबावर कुळीथ फायदेशीर आहेत का ?

होय कारण कुळीथामुळे तुमचा रक्तदाब आणि साखरेच्या पातळीत नियंत्रण राखले जाते. यासाठीच असा त्रास असणाऱ्या लोकांनी आहारात कुळीथाचा समावेश जरूर करावा.

Read More From Recipes