Fitness

वजन कमी करण्यासाठी लेमनग्रास आहे खास (Lemongrass For Weightloss In Marathi)

Dipali Naphade  |  Dec 10, 2019
वजन कमी करण्यासाठी लेमनग्रास आहे खास (Lemongrass For Weightloss In Marathi)

लेमनग्रासचं नाव वाचल्यानंतर तुम्हाला नक्की हे काय असतं असा प्रश्न उद्धवला असेल तर काही जणांच्या डोळ्यासमोर गवत आलं असेल. शिवाय तुम्हाला हादेखील प्रश्न मनात निर्माण झाला असेल की, शरीरस्वास्थ्यासाठी हे कसं काय फायदेशीर ठरू शकतं? खरं तर लेमनग्रास ही अशी वनस्पती आहे जे फक्त गवत नाही. तर लेमनग्रासमध्ये अनेक औषधीय गुण असतात. याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत अनेक आजारांवर लेमनग्रास फायदेशीर आहे. तुम्हाला जर नक्की लेमनग्रास काय आहे हे माहीत नसेल अथवा याचे फायदे काय आहेत? हे माहीत नसेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचा. याचा नक्की काय उपयोग आहे आणि त्याचं नुकसान काय आहे हे यातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हीदेखील लेमनग्रासचे फायदे वाचून नक्की याचा उपयोग करा. जाणून घेऊया काय आहेत याचे खास फायदे. सर्वात मुख्य म्हणजे वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. पण त्याआधी जाणून घेऊया नक्की काय आहे लेमनग्रास. 

लेमनग्रास म्हणजे नक्की काय? (What Is Lemongrass In Marathi)

Shutturstock

लेमनग्रास एक औषधीय झाड आहे, जे विशेषतः दक्षिण – पूर्व आशियामध्ये आढळतं. हे गवताप्रमाणेच दिसतं. पण त्याची उंची ही गवतापेक्षा थोडी जास्त असते. तर याचा सुगंध हा लिंबाप्रमाणे असतो.  त्यामुळेच याला लेमनग्रास असं म्हटलं जातं. याचा जास्त उपयोग हा चहा बनवताना त्यात स्वाद निर्माण करण्यासाठीही करण्यात येतो. लेमनग्रासमध्ये अँटिबॅक्टेरियल, अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिफंगल गुण आढळतात. तुम्हाला अनेक आजारांपासून हे गुण वाचवण्याचं काम करतात. लेमनग्रासचं तेल औषध म्हणून वापरण्यात येतं. यामध्ये साधारण 75 टक्के सिट्रल आढळतं, त्यामुळे याचा सुगंध हा लिंबाप्रमाणे येतो. बरेचदा लेमनग्रास तेलाचा उपयोग हा सौंंदर्य उत्पादन आणि पेय पदार्थांमध्ये करण्यात येतो. 

लेमनग्रासचं पोषक तत्व (Nutritional Value Of Lemongrass)

Shutterstock

लेमनग्रासमध्ये अनेक पोषक तत्व असतात ज्याची आपल्याला जास्त माहिती नाही. पण आपण जाणून घेऊया नक्की यामध्ये कोणकोणत्या प्रकारची पोषक तत्व असतात. यामध्ये जास्त प्रमाणात ऊर्जा असून त्याचं प्रमाण 99 कॅलरी इतकं आहे. तर पाणी साधारण 70.58 ग्रॅम आढळतं. तर यामध्ये साधारण 1.82 ग्रॅम प्रोटीन आढळतं आणि 0.49 इतकं फॅट असतं. त्याशिवाय कार्बोहायड्रेटदेखील यामध्ये आढळतं. याशिवाय लेमनग्रासमध्ये अनेक मिनरल्सचं प्रमाणदेखील आढळतं. कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, जिंक, कॉपर, मँगनीज ही सगळी मिनरल्स यामध्ये काही मिलीग्रॅम प्रमाणात आढळतात जी आपल्या शरीराासाठी आवश्यक असतात. याशिवाय विटामिसी सी, नियासिन, विटामिन – बी6 अशी अनेक विटामिन्सदेखील यातून आपल्या शरीराला मिळतात. त्यामुळे लेमनग्रास हे आपल्या नियमित खाण्यामध्ये आवश्यक आहे हे आपल्याला कळतंय. किमान चहातून तरी तुम्ही लेमनग्रासचा वापर केल्यास, तुम्हाला यातील पोषक तत्व मिळू शकतील. 

लेमनग्रासचे फायदे (Benefits Of Lemongrass In Marathi)

लेमनग्रासचे अनेक फायदे आहेत. अगदी वजन कमी करण्यापासून ते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यापर्यंत लेमनग्रासचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. जाणून घेऊया नक्की काय आहेत फायदे – 

तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर लक्षात ठेवा काही गोष्टी

कोलेस्ट्रॉल राहते नियंत्रणात (Cholesterol Control)

शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याने स्ट्रोक आणि हृदयरोगासारख्या आजारांची समस्या वाढते. अशावेळी लेमनग्राससारख्या औषधीय गुण असलेल्या वनस्पतींचा वापर करावा. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही लेमनग्रासचा उपयोग करून घेऊ शकता. एका वैज्ञानिक अभ्यासानुसार, लेमनग्रासचं तेल वापरल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत मिळते. 

पोटासाठी लेमनग्रासचे फायदे (Benefits Of Lemongrass For Stomach)

लेमनग्रासमुळे तुमची पचनशक्ता वाढवण्यास मदत मिळते. त्याशिवाय यामध्ये आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स गुणांमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचण्यासाठी आणि पोटामधील अल्सर आणि पोटातील संबंधित अनेक समस्या थांबवण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. पोटाच्या समस्या तुम्हाला लवकर बऱ्या करायच्या असतील तर तुम्ही लेमनग्रासचा काढा करूनदेखील पिऊ शकता. फक्त याचं प्रमाण अति करू नका. साधारण एक कप काढा तुमच्या आरोग्यासाठी योग्य ठरतो. 

किडनीसाठी लेमनग्रास ठरतं उपयुक्त (Lemongrass For Kidneys)

लेमनग्रासमध्ये मूत्रवर्धक (Diuretic Properties) असतात. याचं सेवन केल्यामुळे तुम्हाला सतत लघ्वीला जावं लागेल. पण ते तुमच्या किडनीसाठी उपयुक्त ठरतं. यामुळे तुमच्या शरीरात असणारे विषारी पदार्थ अर्थात टॉक्झिन्स बाहेर निघून जाण्यास मदत मिळते आणि तुमची किडनी निरोगी राहण्यासही मदत मिळते. याशिवाय तुम्हाला मुतखड्यासारखा त्रासदायक आजार असेल तरीही तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. यामध्ये मूत्रवर्धक गुण असल्याने किडनी स्टोन बाहेर काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे बरेचदा वैद्यदेखील तुम्हाला लेमनग्रास या औषधाचा पर्याय सुचवतात. 

कॅन्सरवरही गुणकारी (Beneficial For Cancer)

लेमनग्रास असो अथवा लेमनग्रास तेल असो या दोन्हीमध्ये अँटिकॅन्सर गुण आढळतात. जे कॅन्सरच्या पेशी नष्ट करून कॅन्सरपासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्याशिवाय तुम्ही कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी लेमनग्रासचा चहादेखील पिऊ शकता. तुम्ही याचं नियमित सेवन केल्यास, कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी याची मदत होते. 

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त (Useful For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. पण त्यापैकी वजन कमी करण्यसाठी उपयुक्त असा उपाय म्हणजे लेमनग्रास. लेमनग्रासमध्ये असणारे मूत्रवर्धक गुण शरीर डिटॉक्सिफाय होण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच युरिनद्वारे विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी लेमनग्रासचा उपयोग होतो. डिटॉक्सिफिकेशनमुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत मिळते असं म्हटलं जातं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लेमनग्रास तुम्ही वापरू शकता. अजूनही याबाबत शोध चालू आहे. जेणेकरून वजन कमी करण्यासाठी लेमनग्रासचा उपयोग करून औषध बनवता येईल. 

प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत (Helps Boost Immunity)

लेमनग्रासमध्ये अनेक औषधीय गुण आढळतात ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते. यामध्ये अँटिबॅक्टेरियल, अँटिफंंगल, अँंटिइन्फ्लेमेटरी गुणदेखील असतात, जे तुम्हाला अनेक प्रकारच्या संक्रमण आणि आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. त्याशिवाय यामध्ये विटामन्स आणि मिनरल्स असलेलं प्रमाणदेखील तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं. 

चांगली झोप येण्यासाठी (To Get A Good Sleep)

चांगली झोप येण्यासाठी

आजकाल धावपळीच्या आयुष्यात झोपेचे त्रास जास्त प्रमाणात सुरू झाले आहेत. अशा वेळी तुम्हाला लेमनग्रासचाही उपयोग करून घेता येतो. तुम्हाला नीट झोप येत नसेल तर तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लेमनग्रास तेलाचा उपयोग करून पाहू शकता. यामध्ये सिडेटिव्ह गुण असतात जे तुम्हाला झोप येण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही लेमनग्रास तेलाचे काही थेंब डिफ्यूजरमध्ये घालून त्याने अरोमा थेरपीदेखील करू शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळून झोप व्यवस्थित लागण्यास मदत मिळते. 

सांधेदुखीवर गुणकारी (Effective On The Joints)

रुमेटाईड आर्थरायटिस ही अशी समस्या आहे ज्यामध्ये गुडघेदुखी, सूज आणि वात येतो. 30-60 या वयोगटातील व्यक्तींना साधारण या आजाराचा त्रास होतो. तुम्हालादेखील ही समस्या असेल तर तुम्ही त्यासाठी लेमनग्रासची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला लेमनग्रासचं तेल उपयुक्त ठरतं. यामध्ये असणारे अँटिइन्फ्लेमेटरी गुण तुमच्या शरीरातील सांधेदुखीला आराम मिळवून देण्यास फायदेशीर ठरतं. आराम मिळण्यासाठी तुम्ही लेमनग्रास तेलाचे काही थेंब हातावर घेऊन सांधेदुखी असलेल्या ठिकाणी काही काही मालिश करा. त्यानंतर तुम्ही हे नियमित केल्यास, तुम्हाला या त्रासापासून सुटका मिळते.

नैराश्यावरही उपायकारक (Cure For Depression)

नैराश्यावरही उपायकारक

नैराश्यावर मात करण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होतो. वास्तविक लेमनग्रासमध्ये अँटिडिप्रेसेंट गुणही आढळतात. जे तुम्हाला नैराश्याशी लढण्यास मदत करतात. तुम्ही यासाठी नियमित जर लेमनग्रासचा चहा करून प्यायलात तर तुमच्या मेंदूला तरतरी येऊन मनात वाईट विचार येणार नाहीत. तसंच तुम्हाला नैराश्यापासून दूर ठेवण्यासाठी याचा तुम्हाला उपयोग होईल. 

नर्व्हस सिस्टिमसाठी फायदेशीर (Beneficial For The Nervous System)

लेमनग्रासचे पोषक तत्व हे नर्व्हस सिस्टिमसाठी उपयोगी ठरतं. वास्तविक यामध्ये असणारं मॅग्नेशियम तुम्हाला न्यरोडिजनरेटिव्ह रोगांपासून वाचवण्यास मदत करतं. या रोगामध्ये मेंदूला त्रासदायक समस्या निर्माण होतात. त्याचा परिणाम होतो तो नर्व्हस सिस्टिमवर. लेमनग्रास नर्व्हस सिस्टिमसाठी फायदेशीर ठरतं. 

अस्थमासाठीही उपयोगी (Useful For Asthama)

लेमनग्रासचे औषधीय गुण तुम्हाला अलर्जिक अस्थमापासून वाचवतात. त्यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिअलर्जिक गुण आढळतात. जे तुमच्या संक्रमित पेशींना आपल्या हृदयात जाण्यापासून रोखतात. तसंच तुम्हाला अस्थमापासून वाचवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. 

ताणापासून मिळते मुक्तता (Relieves Stress)

ताणापासून मिळते मुक्तता

सध्या प्रत्येकालाच आयुष्यात ताण येत असतो. सतत कामाचा ताण, घराचा ताण. या सगळ्या गोष्टीतून सुटका मिळण्यासाठीही तुम्हाला लेमनग्रासचा उपयोग करून घेता येतो. लेमनग्रासमधील गुण तुम्हाला ताणापासून मुक्तता मिळवून देतात. वास्तविक यामध्ये मॅग्नेशियमचे गुण असतात. त्यामुळे तणावाला मॅग्नेशियम हे औषध आहे. डोकेदुखी, रात्री झोप न येणं, थकवा, अति चिंता या गोष्टींपासून सुटका मिळवून देण्यासाठी लेमनग्रास उपयुक्त आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही लेमनग्रास तेल अरोमाथेरपी म्हणूनदेखील वापरू शकता. याविषयी अधिक शोधदेखील चालू आहेत. 

मधुमेहावरील उपचार (Diabetes Treatment)

मधुमेहावरील उपचार

आजकाल कमी वयातही मधुमेह होण्याचे प्रमाण वाढलं आहे. तुम्हीदेखील या त्रासाने त्रस्त असाल तर तुम्ही लेमनग्रास आणि त्याच्या फुलांचा मधुमेहावरील उपचार म्हणून उपयोग करू शकता. यामध्ये अँटीबायोटिक गुण उपलब्ध आहेत. तुमच्या रिकाम्या पोटावर आणि अगदी खाल्ल्यानंतरही साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतं. तुमच्या मधुमेहावरील हा रामबाण इलाज आहे. 

चेहऱ्यावरील मुरूमांवरही उपयोगी (Useful For Facial Acne)

चेहऱ्यावरील मुरूमांवरही उपयोगी

लेमनग्रासचे गुण तुम्हाला डागविरहीत आणि पिंपल फ्री त्वचा मिळवून देण्यासाठी मदत करतात. यामध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुण असतात. जे पिंपल आणि संक्रमण पसरवणाऱ्या किटांणूंसह लढा देतात. तसंच त्यांंना मुळापासून नायनाट करण्यातही लेमनग्रासचा उपयोग होतो. याशिवाय यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स गुणदेखील ताण कमी करून पिंपल्समधील वाढ रोखते. 

लेमनग्रासचा वापर कसा करावा (How To Use Lemongrass)

Shutterstock

लेमनग्रासचा स्वाद हा लिंबाप्रमाणे असता. थाई आणि कॉन्टिनेन्टल जेवण बनवण्यासाठी लेमनग्रासचा खास उपयोग करण्यात येतो. तुम्ही लेमनग्रासचा उपयोग इतर तऱ्हेनेदेखील करू शकता. पाहूया कसा करायचा उपयोग – 

कसा करावा  उपयोग – 

कधी उपयोग करू शकता – 

किती वापर करावा – 

लक्षात ठेवा – तुम्ही ही गोष्ट लेमनग्रास वापरताना लक्षात ठेवा की, लेमनग्रास वापरताना तो ताजाच वापरावा. उपयोग करण्यापूर्वी याचा खालचा भाग कापून टाका आणि सुकलेल्या पाकळ्याही काढून टाका. तुम्हाला लेमनग्रासची पानं ही चहा बनवण्यासाठी आणि आतील पिवळा भाग जेवण बनवण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. 

हे फायदे वाचाल तर रोज प्याल ‘गवती चहा’

लेमनग्रासने होणारे नुकसान (Side Effects Of Lemongrass In Marathi)

Shutterstock

तसं तर लेमनग्रास हे सेवन करण्यास सुरक्षित आहे. पण याचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास, त्रासदायक ठरतं. लेमनग्रासने नक्की काय नुकसान होऊ शकतं हे पाहूया – 

लेमनग्रास तेलाने काय होतात नुकसान – 

लक्षात ठेवा – लेमनग्रासने होणाऱ्या नुकसानाचं तसं काही वैज्ञानिक प्रमाण उपलब्ध नाही. हे नुकसान लोकांच्या अनुभवानुसार आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोणतीही स्वास्थ्य समस्या असेल तर याचा उपयोग तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करा. 

प्रश्नोत्तरं (FAQs)

1. लेमनग्रासचा वापर रोजच्या जेवणात करू शकतो का?

हो आपण नेहमीच्या जेवणातही याचा वापर करू शकतो. यामध्ये लिंबाचा स्वाद असल्यामुळे जेवणामध्ये एक वेगळी चव निर्माण होते. 

कढीपत्त्याचे फायदे वाचाल तर आजपासूनच कढीपत्त्याचा वापर कराल सुरू

2. लेमनग्रासचा चहा दिवसातून किती वेळा पिऊ शकतो?

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. तुम्ही लेमनग्रासचा चहा दिवसातून साधारण दोन वेळा पिऊ शकतो. त्याचा तुम्हाला वजन कमी होण्यासाठी नक्की फायदा होतो. 

3. लेमनग्रासचा काही तोटा आहे का?

तसा तर लेमनग्रासचा काहीही तोटा नाही. पण हे नेहमी प्रमाणात खायला हवं. अतिरेक केल्यास, तुम्हाला याचा तोटा होऊ शकतो. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Fitness