Table of Contents
फॅशन आणि स्टाईलसाठी आपण केसांवर अनेक प्रयोग करत असतो. अनेक केमिकल उत्पादनांचा वापरही आपण केसांवर करतो. केसांना सरळ करायचे असो वा कुरळे अथवा द्यायचा असेल केसांना रंग हे सर्व तर आता अगदीच कॉमन झाले आहे. कोणत्या ना कोणत्या तरी कार्यक्रमासाठी आपण हे करतोच. पण या सगळ्या नादामध्ये केसांच्या मुळांना तर त्रास होतोच. पण केस अतिशय कमकुवतही होतात. त्यात वरून प्रदूषणामुळे केसांना अधिक त्रास होतो आणि केस निस्तेज होतात. अशावेळी केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून केसांसाठी उपयुक्त ठरते ते म्हणजे ऑलिव्ह ऑईल. यापेक्षा चांगला पर्याय असूच शकत नाही. केसांसाठी आणि त्वचेसाठी ऑलिव्ह ऑइल उपयुक्त आहे. केसांसाठी हे तेल कसे उपयुक्त ठरते हेच आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. तसंच ऑलिव्ह ऑईलचे हेअर मास्क तुम्हाला उपयोगी ठरतात. या सगळ्याचा उपयोग तुम्ही जाणून घ्या. त्याआधी ऑलिव्ह ऑईलचे प्रकार जाणून घेऊया.
ऑलिव्ह ऑईलचे प्रकार (Types Of Olive Oil In Marathi)
Shutterstock
ऑलिव्ह ऑईल हे ऑलिव्ह या फळापासून काढण्यात येते. हे वेगवेगळ्या रिफाईंड प्रक्रियेतून तयार होते. याचे नक्की कोणते प्रकार आहेत ते जाणून घेऊया.
व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल – प्रति किलो व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलमध्ये 150 ते 400 मिलिग्रॅम प्रमाणात पॉलिफिनॉल आढळते. पॉलीफिनॉल फायटोकेमिकल आहे जे प्लांट फूड्सचा स्रोत आहे. यामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुण आढळतात. हे ऑलिव्ह ऑईलचे सर्वात शुद्ध रूप अर्थात प्रिमियम ग्रेड स्वरूपाचे तेल आहे. याचा स्वाद आणि सुगंध दोन्ही अप्रतिम असते.
रिफाईंड ऑलिव्ह ऑईल – हे सर्वात कमी गुणवत्ता असणारे ऑलिव्ह तेल समजण्यात येते. प्रति किलो रिफाईंड ऑलिव्ह ऑईलमध्ये 0 ते 5 मिलिग्रॅम प्रमाणात पॉलीफिनॉल आढळते
ऑलिव्ह ऑईल – हे सर्वात शुद्ध तेल मानले जाते. हे नॉनव्हर्जिन असते. रिफाईंड ऑलिव्ह ऑईल आणि व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलचे हे मिश्रण असते. यामध्ये यामुळेच पोषणाचे प्रमाण कमी असते. प्रति किलो ऑलिव्ह ऑईलमध्ये 10 ते 100 मिलिग्रॅम प्रमाणात पॉलिफिनॉल आढळते.
पोमेस ऑलिव्ह ऑईल – हे ऑलिव्ह ऑईल पहिले गुदा आणि व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलने तयार करण्यात येते. प्रति किलो ऑलिव्ह ऑईलमध्ये 10 ते 30 मिलिग्रॅम प्रमाणात पॉलिफिनॉल आढळते.
केसांसाठी तुम्ही अधिक व्हर्जिन अथवा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. यामुळे केसांना अधिक पोषण मिळते.
केसांसाठी ऑलिव्ह ऑईलचे फायदे (Benefits Of Olive Oil For Hair In Marathi)
केसांसाठी ऑलिव्ह ऑईलचे अनेक फायदे होतात. मुळात केसांच्या अनेक समस्या असतात आणि या समस्यांवर ऑलिव्ह ऑईल हा उत्तम तोडगा आहे. ऑलिव्ह ऑईलचे सौंदर्यासाठी फायदे होतात तसंच केसांसाठीही फायदे असतात. झटपट केस वाढविण्यासाठी याचा कसा फायदा होतो ते आपण पाहूया.
घनदाट केसांसाठी (Thick Hair)
घनदाट केस सर्वांनाच आवडतात. पण प्रत्येकाला ते मिळतातच असं नाही. तुम्हालाही घनदाट केस हवे असतील तर तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करा. ऑलिव्ह ऑईलचे गुण फ्री रॅडिकल्सच्या दुष्परिणामांपासून तुम्हाला वाचवतात. त्यामुळे तुमचे केस घनदाट होतात.
स्काल्पसाठी (Scalp)
Shutterstock
स्काल्प उत्तम राखणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा केसांंच्या अनेक समस्यांना सामोरं जावे लागते. ऑलिव्ह ऑईलमुळे ही समस्या दूर होते. तुम्ही स्काल्पला ऑलिव्ह ऑईल आंघोळीच्या आधी अर्धा तास लावा आणि किमान पाच ते दहा मिनिट्स मसाज करून तसंच राहू द्या. नंतर आंघोळ करा आणि माईल्ड शँपू वापरा. यामुळे स्काल्प चांगला राखण्यास मदत मिळते.
कोंडा काढण्यासाठी (Dandruff)
Shutterstock
केसात कोंडा होणे ही अत्यंत कॉमन समस्या आहेत. विशेषतः हिवाळ्याच्या दिवसांमध्ये केस अधिक कोरडे होतात आणि कोंड्याचा जास्त त्रास होतो. कोंडा काढण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा उपयोग करून घेऊ शकता. यामध्ये मॉईस्चराईंजिंग गुण असल्याने केसांवर ऑलिव्ह ऑईलचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि केसातील कोंडा काढण्यासाठी उपयोग होतो.
पांढऱ्या केसांच्या समस्येवरील उपाय (Grey Hair)
आजकाल लहान वयातच केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुण आणि फ्री रॅडिकल्सपासून सुटका देणारे गुण असल्याने वयाच्या आधी केस पांढरे होण्याचे प्रमाण रोखण्यास ऑलिव्ह ऑईलची मदत मिळते. त्यामुळे याचा नियमित उपयोग केल्यास, तुम्हाला केस अधिक लांबसडक आणि अधिक काळे राहण्यास फायदेशीर ठरते.
उत्तम कंडिशनर (Good Conditioner)
केसांसाठी उत्तम कंडिशनर म्हणून ऑलिव्ह ऑईलचा उपयोग होतो. यामध्ये असणारे इमोलिएंट आणि तैलीय गुण हे नैसर्गिक कंडिशनर स्वरूपात काम करतात. त्यामुळे तुमच्या केसांना योग्य पोषण मिळून तुमचे केस अधिक मऊ आणि मुलायम राखण्यास मदत मिळते.
केसांच्या वाढीसाठी (For Hair Growth)
Shutterstock
केसांची उत्तम वाढ हवी असेल तर तुम्ही नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईल या दोन्हीचा एकत्र वापर करू शकता. आंघोळीपूर्वी साधारण अर्धा तास आधी या तेलाने मसाज करून तसंच राहू द्या. नंतर माईल्ड शँपूने केस धुवा. तुम्हाला याचा उत्तम परिणाम पाहायला मिळतो.
केसगळती थांबविण्यासाठी (To Stop Hair Loss)
केसगळती ही केसांची सर्वात मोठी समस्या आहे आणि प्रत्येकाला ही समस्या असते. केसगळती समस्येतून सुटका करण्यासाठी आपण अनेक शँपू वापरतो. पण या समस्येतून सुटका हवी असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईलची मदत घेऊ शकता. ऑलिव्ह ऑईलचे असे काही हेअर मास्क आहेत ज्याचा उपयोग करून तुम्ही केसगळती थांबवू शकता. इथेच या लेखामध्ये काही हेअर मास्कची माहिती आम्ही देत आहोत. तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता.
दुहेरी फाटा फुटलेले केस (Eliminates Split Ends)
Shutterstock
केसांना फाटा फुटणे हेदेखील कॉमन आहे. पण यामुळे केसांची हानी होते. केसांची वाढ खुटंते आणि केस कोरडे होतात. पण हे थांबविण्यासाठी तुम्ही आठवड्यातून किमान एक दिवस तरी ऑलिव्ह ऑईलने केसांचा मसाज करून पाहा. तुम्हाला आपोआपच फरक दिसून येईल.
डोक्याला उत्तम मसाज (Good For Head Massage)
Shutterstock
ऑलिव्ह ऑईलच्या गुणांमुळे याचा उपयोग प्री शँपू ट्रिटमेंटप्रमाणे केला जाऊ शकतो. अर्थात शँपू करण्याआधी केसांना तेल लाऊन उत्तम मसाज करा अथवा ऑलिव्ह ऑईलचे हेअर मास्क लावा. ज्यामुळे केसांना उत्तम पोषण मिळण्यास मदत मिळते.
केसांसाठी ऑलिव्ह ऑईलचा उपयोग कसा कराल (How To Use Olive Oil For Hair In Marathi)
केसांची वाढ होण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा उपयोग करू शकता. बऱ्याच जणांना याचा कसा उपयोग करायचा ते माहीत नाही. त्यामुळे याचा नक्की कसा उपयोग करायचा ते जाणून घेऊ.
- यासाठी तुम्हाला किमान चार ते पाच लहान चमचे ऑलिव्ह ऑईलची गरज भासते
- हे तेल तुम्ही अगदी थोडेसे गरम करून घ्या
- त्यानंतर साधारण 15-20 मिनिट्स तरी तुम्ही तेल लाऊन अगदी मुळापासून स्काल्पचा मसाज करा
- मसाज करून झाल्यानंतर अर्धा तास तुम्ही तसेच राहा
- त्यानंतर केस शँपूने धुवा. असा वापर केल्याने तुमचे केस अधिक मऊ मुलायम होतात आणि केसगळती रोखण्यासही याचा उपयोग होतो. त्याशिवाय केस वाढण्यासही मदत मिळते
ऑलिव्ह ऑईलचे हेअर मास्क (Olive Oil Hair Mask)
केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आम्ही सांगितलेल्या ऑलिव्ह ऑईल मास्कचा उपयोग करून घेऊ शकता. याचा वापर करणे अत्यंत सोपे आहे.
ऑलिव्ह ऑईल आणि नारळाचे तेल (Olive Oil And Coconut Oil)
Shutterstock
साहित्य
- दोन चमचे नारळाचे तेल
- दोन चमचे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल
- गरम टॉवेल
वापरण्याची पद्धत
- दोन्ही तेल एकत्र करून गरम करा आणि त्यानंतर केसांच्या मुळापासून लावा
- साधारण 10-15 मिनिट्स मसाज करा
- यानंतर टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि पिळून पाणी काढून टाका
- हा गरम टॉवेल डोक्यावर ठेवा आणि अर्धा तास तसंच राहू द्या आणि वरून वाफ घ्या
- नंतर शँपूने केस धुवा. केस धुताना थंड पाण्याचा वापर करा
- ही प्रक्रिया तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता
कसे ठरते फायदेशीर
नारळ तेल हलके असल्यामुळे केसांच्या मुळाशी जाते आणि केसांना पोषण देते. यामध्ये लॉरिक अॅसिड असल्याने केसांमधील प्रोटीन राखण्यास मदत मिळते. केसांच्या वाढीसाठी प्रोटीनचा जास्त उपयोग होतो. प्रोटीनची कमतरता असेल तर केसगळती होते. त्यामुळे अधिक पोषण मिळण्यासाठी या हेअरमास्कचा उपयोग होतो.
मध आणि ऑलिव्ह ऑईल (Honey And Olive Oil)
Freepik.com
साहित्य
- अर्धा कप मध
- पाव कप व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल
- एक विटामिन ई कॅप्सुल
- शॉवर कॅप
वापरण्याची पद्धत
- एका बाऊलमध्ये सर्व साहित्य मिक्स करून घ्या आणि 15 सेंकदासाठी मायक्रोव्हेवमध्ये गरम करून घ्या
केसांना शँपू लाऊन धुवा आणि सुकवा - त्यानंतर हे मिश्रण थोड्याशा ओलसर केसांमध्ये अगदी मुळापासून लावा आणि पूर्व लावल्यावर केसांना शॉवर कॅपने झाका
- अर्धा तास तसंच राहू द्या आणि मग केसांना शँंपूने धुवा
- ही प्रक्रिया तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता
कसे ठरते फायदेशीर
मधामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटिऑक्सिडंट्सचे गुण आढळतात. हे केसांमध्ये असलेला कोंडा आणि खाज यासह केसगळतीची समस्याही दूर करतात. याशिवाय हे सेबोरिक डर्मेटायटिससारख्या समस्यांवरही तोडगा आहे. मध आणि ऑलिव्ह ऑईलच्या हेअरमास्कचा असा उपयोग केसांसाठी होतो. मात्र लक्षात ठेवा की, काही बाबतीत ऑलिव्ह ऑईल केसांची समस्या वाढवूही शकते कारण यामध्ये फॅटी अॅसिडचे प्रमाण असते. त्यामुळे वापरताना काळजीपूर्वक वापरा.
अंडे आणि ऑलिव्ह ऑईल (Egg And Olive Oil)
Shutterstock
साहित्य
- दोन अंड्याचा आतला भाग (कोरड्या केसांसाठी) अथवा दोन अंड्यांचा सफेद भाग (तेलकट केसासाठी) अथवा एक पूर्ण अंडे (सामान्य केसांसाठी)
- दोन चमचे ऑलिव्ह ऑईल
वापरण्याची पद्धत
- एका बाऊलमध्ये अंडे घेऊन व्यवस्थित फेटा आणि त्यामध्ये ऑलिव्ह ऑईल मिक्स करून घ्या
केस शँपूने नीट धुवा आणि सुकवा - त्यानंतर थोड्याशा ओल्या केसांमध्ये मिश्रण लावा आणि केस बांधून ठेवा
- साधारण अर्ध्या तासानंतर सुकल्यावर शँपूने केस धुवा. ही प्रक्रिया तुम्ही आठवड्यातून एक वेळा करू शकता
कसे ठरते फायदेशीर
अंड्यामध्ये पेप्टाईड नावाचे कंपाऊंड असते, जे केसांचा विकास घडविण्यासाठी मदत करते. अंड्यासह ऑलिव्ह ऑईलचा हेअर मास्क लावल्याने केसांना पोषक तत्व मिळते आणि केसगळती थांबते.
अव्हाकॅडो आणि ऑलिव्ह ऑईल (Avocado And Olive Oil)
Shutterstock
साहित्य
- एक उकडलेले अव्हाकॅडो
- एक चमचा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल
- शॉवर कॅप
वापरण्याची पद्धत
- अव्हाकॅडोचा आतला उकडलेला भाग काढून ब्लेंड करून घ्या
- एकदम घट्ट पेस्ट झाली तर त्यात दोन ते तीन चमचे पाणी मिक्स करा
- ही पेस्ट बाऊलमध्ये काढून त्यात ऑलिव्ह ऑईल तेल मिक्स करा
- केस धुवा आणि पुसल्यावर थोडे ओलसर राहू द्या. यावर ही पेस्ट लावा आणि शॉवर कॅपने झाका
- एक तासानंतर केस थंड पाण्याने शँपू लाऊन धुवा आणि हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता
कसे ठरते फायदेशीर
विटामिन ए, सी आणि ई, लोह आणि जिंंक अशा पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे केसगळती होते. अशावेळी अव्हाकॅडो आणि ऑलिव्ह ऑईलचा हेअर मास्क लावणे अत्यंत फायदेशीर ठऱते. कारण यामध्ये सर्व पोषक तत्वांचे प्रमाण असते. हा हेअर मास्क केसगळती थांबवतो आणि केस मुलायम करण्यास फायदेशीर ठरतो.
केळे आणि ऑलिव्ह ऑईल (Banana And Olive Oil)
Shutterstock
साहित्य
- एक उकडलेले केळे
- एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑईल
- शॉवर कॅप
वापरण्याची पद्धत
- केळे मॅश करून घ्या आणि त्यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करा
- केस धुवा आणि पुसल्यावर थोडे ओलसर राहू द्या. यावर ही पेस्ट लावा आणि शॉवर कॅपने झाका
- ही पेस्ट संपूर्ण केसांना लावा. साधारण अर्धा तास तसंच ठेवा आणि मग थंड पाणी आणि शँपूने धुवा
- हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता
कसे ठरते फायदेशीर
केळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुण आढळतात. अँटिऑक्सिडंट हे केसांना फ्री रॅडिकल्स आणि सूर्याच्या किरणांपासून वाचविण्याचे काम करते. तसंच केसांची नैसर्गिक चमक राखण्याचेही काम करते. केळ्यामध्ये अधिक प्रमाणात पोटॅशियम असते जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. ऑलिव्ह ऑईलसह मिक्स केल्याने याचा दुप्पट फायदा मिळतो.
काय घ्यावी काळजी (Caution)
ऑलिव्ह ऑईल हेअर मास्क लावल्याने तुमच्या केसांना नक्कीच फायदा मिळतो. पण काही गोष्टींची काळजी घेणंही अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुमच्या केसांना अधिक चांगला फायदा मिळतो.
- तुमचे केस जर कोरडे असतील तर त्यासठी तुम्ही सल्फेट फ्री शँपूचा वापर करा आणि यामुळे तुमचे केस अधिक मऊ आणि मुलायम राहतात
- केस नेहमी थंड पाण्यानेच धुवा. गरम पाण्याने धुतल्यास, त्यातील मऊपणा निघून जातो
- केस धुतल्यावर टॉवेलने रगडून पुसू नका. यामुळे केसांना दुहेरी फाटा फुटतो आणि केस तुटतात
- केसांना ब्लो ड्राय करताना किमान पंधरा सेंटीमीटर तरी दूर ठेवा. तसंच त्याची सेटिंग कोल्ड एअरवर ठेवा. जवळून ब्लो ड्राय केल्याने अथवा हॉट एअरमुळे केस कोरडे होतात
- हेअर मास्क लावण्यापूर्वी केस स्वच्छ धुवा. असं केल्यामुळे केसांमधील घाण निघून जाते आणि हेअर मास्कमुळे व्यवस्थित पोषण मिळते.
प्रश्नोत्तरे (FAQs)
इतर तेलांच्या तुलनेत केसांना अधिक चांगले पोषण देण्याचे काम ऑलिव्ह ऑईल करते. तसंच यामुळे केसांना नुकसान पोहचण्याची शक्यता नसते. म्हणून केसांसाठी ऑलिव्ह ऑईल वापरावे. तसंच पार्लरचा हजारो रूपयांचा खर्चही तुम्ही यामुळे थांबवू शकता.
तुम्ही ऑलिव्ह ऑईल आणि मेयोनीजचा हेअर मास्क नक्कीच वापरू शकता. यामध्ये अँटिइफेक्टिव्ह गुण असल्यामुळे केसगळती होण्यापासून मदत मिळते आणि त्याशिवाय केसांना चांगले पोषणही मिळते. पण याचा वापर करण्यापूर्वी एकदा पॅच लाऊन नक्की पाहा.
हो ऑलिव्ह ऑईलचा वापर हा नक्कीच नैसर्गिक घटकांमध्ये येतो. ऑलिव्ह ऑईल हे केसांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही नियमित याचा वापर करू शकता.
पुढे वाचा –
Olive oil benefits in hindi
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक